चित्रपट कसा वाटला - ५

Submitted by ऋन्मेऽऽष on 12 December, 2021 - 15:18

चित्रपट कसा वाटला ५ व्या धाग्यात स्वागत

आधीचा धागा ईथे बघू शकता

https://www.maayboli.com/node/74596

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

म्हाळसा निल बट्टे सन्नाटाची स्टोरी काय आहे?>> स्टोरी नाही सांगत.. मस्त हलकाफुलका पिक्चर आहे.. बरेली की बर्फी इतका जबरदस्त नसला तरी छानच आहे

निल बट्टे सन्नाटा छान आहे..पाहिलाय.

काल झिम्मा पाहिला..छान आहे ..आवडला..

पुष्पा परत पाहिला चौथ्यांदा Wink
इथे केजीएफ-चैप्टर वन वर चर्चा झालीए का? चैप्टर-2 कधी येणारे??
अखंडा तेलुगू ओटीटी वर आलाय का??इकडे थिएटरला हाऊसफुल्ल होता.

अतरंगी रे पहिला अर्धा तास पाहिलाय. पुढचा कधी मूड होईल तसा.
इंदू सरकार चांगला पोलिटिकल ड्रामा आहे. इमर्जन्सीचा ट्रू फेस आहे. खरे तर हे वातावरण सध्या पण आहे. बाकी संघटनेचे सदस्य पाहून हसू येते. अनिता राज सारखी दिसणारी इंदू सरकार झालेली अभिनेत्री आहे तिचा अभिनय उत्तम आहे. तिच्या नवर्‍याचा पण खूप छान आहे. मधुर भांडारकरचं दिग्दर्शन नेहमीप्रमाणे सफाईदार आहे.

अतरंगी रे या वर्षातला सर्वोत्तम चित्रपट आहे... स्टोरी आणि स्क्रिप्ट खूप ताकदीची आहे...

अतरंगी रे पहिला अर्धा तास पाहिलाय. पुढचा कधी मूड होईल तसा >> त्यानंतरच तर खरी मजा सुरू होते

खरं आहे Lol
मी पाहिला तर धनुष साठीच बघेन अतरंगी रे प्राईमवर आल्यावर.

पण ती दिसते छान
तिला बघणे सुसह्यच नाही तर आनंददायक देखील आहे Happy
केदारनाथ चित्रपटातले काफिराना गाणे मी पुन्हा तिच्यासाठीच बघतो

वाटलंच होत सर तुम्हाला आवडत असणार
शरूख, स्वप्नील आणि सई वरून कळतेच सर तुमची चॉईस
तुमच्या आनंदाच्या व्याख्याच सामान्य लोकांच्या पलीकडच्या आहेत त्यामुळे तुम्ही म्हणताय तर बरोबरच असणार

शाहरूखचे दिसणे मला आवडते हे तुम्हाला कोणी सांगितले?
अर्थात तुमचीही चूक नाही. आपल्याकडे अमुकतमुक हिरो हिरोईन आवडते म्हणजे त्यांचे दिसणेच आवडते असे समजले जाते. याच कारणास्तव सुंदर चेहऱ्यांनाच जास्त भाव दिला जातो.

शाहरूख दिसायला सामान्य आहे. मला त्याच्यातला एक्स फॅक्टर आणि सळसळता उत्साह आवडतो. सेन्स ऑफ ह्युमर तर त्याचा अफाट आहेच. पण स्क्रीन प्रेझेन्स असा आहे की ईतरांना झाकोळून टाकतो. तो सुपर्रस्टार झाला ते याच गुणांमुळे. पण नुसते दिसण्याचा निकष लावता तो सर्वसाधारण आहे हे मी मान्य करतो. पण तसा असूनही तो सुपर्रस्टारच नाही तर किंग ऑफ रोमान्स म्हणूनही ओळखला जातो याचे कौतुक वाटते.

सारा अली खानच्या अभिनयावर नो कॉमेंट्स.
दिसते मात्र सुंदर यात शंका नाही. वेगळे सौण्दर्य आहे. तशीच नजर हवी. कॉलेज गोईंग यंग जनरेशनला ती नक्की आवडत असेल.

बरोबर आहे सर तुमचं
शरूख नुसता सामान्य नाही तर खप्पड पण आहे
पण सरांच्या देवाला कसे काय बोलायचं म्हणून बोललो नाही
तुम्हाला मास्टर सज्जाद पण आवडत असेल ना बगदाद के उंट मधला?

झिम्मा बघितला प्राईमवर आज. छान आहे. आवडला.
सिद्धार्थ चांदेकरचा अभिनय जरा टिपिकल वाटतो पण आता.
बाकी सगळ्याजणींची कामं छान झाली आहेत. त्या अजून तिघीजणी दाखवल्या आहेत मधेच त्या पहिल्यापासून का नाही दिसत?

सैफ अलीची पोरगी भयाण अभिनय करते इतकी तोंड वेडेवाकडे करत
असह्य आहे तिला बघणे >>>>>>+१११११११११११

त्या अमृता सिंगनं काय घोडं मारलं कुणाचं ? तिच्या मुलीनं अभिनय न करता पडद्यावर हुंदडावं कि नाही ? ठीक आहे आईइतकी दणकट, राकट आणि मजबूत नाही ती, थोडा चेहरा सौम्य पण आहे म्हणून बाजार उठवायचा का लगेच ?

अतरंगी रे ला झाडून सगळ्यांनी नाव ठेवलीत नेटवर . च्रप्स हे दुर्मिळ प्रजातीतील आहेत ज्यांना हा सिनेमा आवडलाय. किंबहुना पब्लिक ओपिनियनच्या विरुद्ध च्रप्स यांचं मत असतंय नेहमी Light 1 Biggrin

पतंग नेहमी प्रवाहाच्या विरुद्ध वर जातो किंबहुना प्रवाहाविरुद्ध जातो म्हणूनच वर जातो

सर आणि सर चर्रप्स हे असेच लिजांड्री पतंग आहेत

ते असो, एकेकाळी तुफान आवडलेले पण आता हास्यास्पद वाटू लागलेले बॉंड्याचे चित्रपट पाहून वैताग आलाय
हास्यास्पद स्क्रिप्ट, फिजिक्स च्या नियमांना धाब्यावर बसवत केलेले स्टंट, रानोमाळ पळून गेलेलं लॉजिक, कहाणीची मागणी म्हणून विनाकारण पेरलेल्या मदनिका

यातून बाहेर यायला एखादा चांगला चित्रपट सुचवा

च्रप्स हे दुर्मिळ प्रजातीतील आहेत ज्यांना हा सिनेमा आवडलाय.
>> सिरियसली... इथे कोणालाच आवडला नाहीय का ... अप्रतिम स्क्रिप्ट आहे... मेसेज पण छान आहे... मी प्रत्येक चित्रपट बायस न ठेवता बघतो .. ज्यांनी अतरंगी पाहिलंय त्यांनी कृपया फीडबॅक द्यावा ...
क्लायमॅक्स तर एकदमच छान आहे ..गेल्या चाळीस पन्नास बघितलेल्या चित्रपटात बेस्ट वाटला..

च्रप्स, मी तरी जे रिव्ह्यू वाचलेत त्या सर्वांनी प्रतिकूल मत दिलंय. फार कमी जणांनी सिनेमा आवडला असे लिहिलेय.

आशुचॅम्प, अश्यावेळी जुने इंग्लिश क्लासिक बघते.

बादवे - झिम्मा देखील पाहिला मी.. अत्यंत टाईम वेस्ट सिनेमा वाटला मला... झिम्मा न आवडणारा कोणीच नाही का इथे ??

फार कमी जणांनी सिनेमा आवडला असे लिहिलेय.
>>> धन्यवाद... म्हणजे आहेत अतरंगी रे हा सिनेमा आवडणारे लोक तर Happy
मायबोलीवर आहेत का हा प्रश्न आहे ...

शांत माणूस - नक्कीच... पुढच्या विकेंड बघतो हा...

सैफ अलीची पोरगी भयाण अभिनय करते
इतकी तोंड वेडेवाकडे करत

>>>+111
ती रोमँटिक सिन्समधे प्रचंड अनकंफर्टेबल वाटते, आधी तर मला तिला या क्षेत्रात तिच्या मनाविरुद्ध आणलंय असंच वाटायचं , चकाचक गाण्यात पण ओव्हर एक्स्प्रेशन्स दिलेत.
मी 'अतरंगी रे' नाही बघितला अजून...

मला आवडलेला अतरंगी रे.. पण वेगळी स्टोरी आणि धनुष ची ॲक्टिंग या दोन गोष्टींमुळे.. अजून चांगला होऊ शकला असता

ती रोमँटिक सिन्समधे प्रचंड अनकंफर्टेबल वाटते>> अगदी.
त्या हाय चकाचक मधे जबरदस्ती तीला सेक्सी दाखवण्याचा प्रयत्न केलाय .. मला ती क्युट वाटली, हॅाट नाही.. पण ते गाणं सोडलं तर ह्या स्टोरीसाठी तीचा क्युटनेसच गरजेचा होता. तीने जरा सौम्य एक्सप्रेशन्स दिले असते तर चाललं असतं

यातून बाहेर यायला एखादा चांगला चित्रपट सुचवा >>> आवारा पाहिला आज जुना.

<<<यातून बाहेर यायला एखादा चांगला चित्रपट सुचवा >>>

मी छिछोरे किंवा डियर जिंदगी बघते अशा वेळी

Pages