चित्रपट कसा वाटला - ५

Submitted by ऋन्मेऽऽष on 12 December, 2021 - 15:18

चित्रपट कसा वाटला ५ व्या धाग्यात स्वागत

आधीचा धागा ईथे बघू शकता

https://www.maayboli.com/node/74596

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बरोबरे
मी पहिल्यांदा पाहिला पुष्पा तेव्हाच म्हटले अल्लूअर्जून डेडिकेटेड डान्स सॉंग मिसींग है.

गॅंग्स ऑफ वासेपूर त्या मसानसारखा ओवरहाईप असावा. बरेच कौतुक ऐकून एकदा पाहायचा प्रयत्न केलेला. पण बोअर झाले १५-२० मिनिटांत. बहुधा नॉट माय टाईप. पुष्पा मात्र चांगला वाटला. स्टायलिश आहे. केजीएफ कसा आहे? वासेपूरसारखा की पुष्पासारखा?

केजीएफ कसा आहे? वासेपूरसारखा की पुष्पासारखा? >> मसान ओवरहाईप वाटला असेल सर तुम्हाला तर केजीएफ खास तुमच्यासाठीच नि तुमच्यासाठीच बनवलेला आहे असे समजू शकता Wink

@ मृणाली ओके धन्यवाद बघायला हवा केजीएफ मग एकदा..

@ असामी, मसानबाबत ओवरहाईप शब्दही कमी वाटावा. म्हणजे फेसबूकवर एके ठिकाणी लोकांनी त्याचे तोंड फाटेस्तोवर केलेले कौतुक ऐकले आणि सुरुवातीच्या काही वेळात हा आपल्यासाठीचा नाही हे समजूनही पुर्ण बघितला होता. शप्पथ आजही ती रात्र विसरू शकत नाही. दारू पिऊन कोणालातरी शिव्या घालाव्यात असे वाटत होते Happy
त्यातला हिरोही मला फार बोअर वाटतो.

मी आता शिव्याही देत नाही. म्हणूनच तसे म्हटले. माझा किती संताप झालेला हे दर्शवायला आतिशयोक्ती अलंकार वापरला.

"सुरुवातीच्या काही वेळात हा आपल्यासाठीचा नाही हे समजूनही पुर्ण बघितला होता. " हे उमगून ही सिनेमा बघितल्यावर "दारू पिऊन कोणालातरी शिव्या घालाव्यात" ह्या वाक्यात कोण वापरायची गरज नाही. सर , होऊन जाऊ दे तसे अजूनही Wink

मसान म्हणजे तो गंगाकिनारी प्रेतं वाला ना? भयंकर आवडलेला मला. अजुनही शहारे येतात अंगावर. बघितला पहिजे परत. तो बघुन मला वाराणसीला जावसं वाटू लागलेलं.

'मसान' मलाही फार आवडला होता, विकी कौशल व रिचा चड्ढा दोघंही शिवाय संजय मिश्रा सर्वांनी उत्तम कामं केलीत. विकी कौशल माहिती नव्हता तेव्हा !!

त्याचा पहिलाच होता ना? >> मी पाहिलेला पहिलाच. भयंकर डीप्रेसींग झाले होते सिनेमा पाहून. मलाही आवडला होता.

मला वाटतं 'लव्ह शव ते चिकन खुराणा' पहिला होता. पण मी ह्यातच पहिल्यांदा बघितलं आणि 'कोण हा ,काय काम करतो!!' असं झालं.

मला वाटतं 'लव्ह शव ते चिकन खुराणा' पहिला होता >> हा पण आवडलेला.. गाणी तर एक नंबर होती

मसान आवडला होता मला. विकी कौशल, संजय मिश्रा , रिचा चढा सगळ्यांचीच काम मस्त.
त्यातल तू किसी रेल सी गुज़रती है , मैं किसी पुल सा थरथराता हे गाणं फार आवडलं होतं

मसान बद्दल सगळ्यांना अनुमोदन
विकी कौशल ने फारच मस्त काम केलं आहे
ते गाणेही अगदी सुंदर आणि तो फुग्यांचा सिन अगदी मस्त

नेटफलिक्स वर Royal Arrangement बघितला
एकदम हलकाफुलका, अगदी बऱ्यापैकी प्रेडिक्टेबल आणि फिल गुड वाला मुव्ही
लॉरा मेरिनो कसली देखणी दिसते टिपिकल डिस्ने मुव्ही आहे

https://youtu.be/KWxJXZ3S3-g

हो. आम्हीपण परवा रॉयल ट्रिटमेंट बघितला. एकदम फेअरी टेल टाईप आहे. शेवटी राजकुमार घोड्यावरुन येऊन प्रपोज करुन घेऊन जातो इथवर सगळे चेकमार्क चेक होतात. अल्लाद्दिन दिसला म्हणून चालू केलेला. फीलगुड म्हणून एखाददा बघायला ठीक आहे.

राजकुमार घोड्यावरुन येऊन प्रपोज करुन घेऊन जातो >>
वडिलांची आठवण सांगते तिथेच टिक केलं की शेवटी हा घोड्यावर येणार म्हणून
Happy
वॉल्टर चे काम करणाराही मस्त आहे

मसान मस्त.
विकी कौशल उत्तम.
अमितव, अंदाज किंचित बरोबर. Proud
धनी, सिनेमा आवडला नाही तर मी दोषी नाही. Proud
रॉयल ट्रीटमेंट>> एकदा पहायला बरा. नाही पाहिला तरी चालतंय (माझ्यामते). हीरोहिरॉईनची केमिस्ट्री जमली नाही असं वाटलं. हा विषय वापरवापरवापरलेला असला तरी फार ताजातवाना सिनेमा बनू शकतो, ते काही मलातरी वाटलं नाही. बहुतेक हिरोमुळे तसं झालं असावं.

हीरोहिरॉईनची केमिस्ट्री जमली नाही असं वाटलं. हा विषय वापरवापरवापरलेला असला तरी फार ताजातवाना सिनेमा बनू शकतो, ते काही मलातरी वाटलं नाही. बहुतेक हिरोमुळे तसं झालं असावं.
<<< +1

मला वाटतं 'लव्ह शव ते चिकन खुराणा' पहिला होता >>> तो कुणाल कपूर. 'रंग दे बसंती' गँगमधला एक.

क्या याद दिलादी... लव्ह शॅव्ह चिकन खुराणा माझी ऑल टाईम फेव्ह मुव्ही आहे... एक नंबर आहे फुल मुव्ही..

मसान ओव्हररेटेड आहेच.. एकदा बघायलाही झोप येत होती...

खुराणा मधला तो आई तक्रार घेऊन येते वाला सिन
आणि नंतर गाडी स्टार्ट होत नाही तो वाला सिन भन्नाट जमले आहेत

Pages