चित्रपट कसा वाटला - ५

Submitted by ऋन्मेऽऽष on 12 December, 2021 - 15:18

चित्रपट कसा वाटला ५ व्या धाग्यात स्वागत

आधीचा धागा ईथे बघू शकता

https://www.maayboli.com/node/74596

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पाहिला आम्ही आताच बळी (प्राईमवर)

भितीदायक आहे. पण यातच चित्रपटाचे यश आहे. मराठीत असा ॲक्चुअली घाबरवणारा, उलगडा होतोय असे वाटूनही शेवटपर्यंत उत्कंठा कायम ठेवणारा, कॉमेडीच्या नावावर काहीही नॉनसेन्स नसलेला चित्रपट बनलाय हे बघून मस्त वाटले. नुकतेच पाहिलेल्या झिम्मानंतर अजून एक चांगला मराठी चित्रपट बघणे झाले.
आवडता कलाकार स्वप्निल जोशी यात आहे आणि नेहमीची चॉकलेट बॉय ईमेज झुगारून (समांतर नंतर) पुन्हा एकदा भुमिकेची बेअरींग पकडलीय हे छान वाटले.

त्या पूजा सावंतच्या चेहऱ्यामध्ये मला प्रियांका चोप्राची झलक दिसते.
या आधी तिचा अंकुश चौधरी सोबत दगडी चाळ आणि गश्मीर महाजनीसोबत बोनस पाहिला होता. दोन्ही चित्रपट ठिकठाक वाटले होते पण त्यात ती आवडली होती. यात तिचा रोल रोमॅंटीक वगैरे नसल्याने ठिकठाक वाटली पण पिक्चर आवडला.

लपाछपीबद्दल माहिती नव्हतं त्यामुळे छोरी आधी बघितला आणि मग लपाछपी. फ्रेम टु फ्रेम कॉपी असल्याने पहिले लपाछपी पाहिलेला चांगला.
--------------------------------
स्पॉयलर अलर्ट
--------------------------------
.
.
.
.
.
.
प्रतापच्या बायकांचे गर्भ मारण्याऐवजी प्रतापलाच का नाही मारत ते भूत. कमीत कमी नपुंसक तरी करायचे त्याला. आपोआप निर्वंश झाला असता. अर्थात मग सिनेमाही नसता बनला Wink
.
.
.
----------- -

प्राईमवर थॅक्यू फॅार स्मोकींग पाहिला. आवडला. ‘बीग टोबॅको’चा स्पोकपर्सन, लॅाबीस्ट- नीक आणि त्याच्या मुलातले संवाद, चित्रपटातला डार्क ह्यूमर आवडला.

काल कित्व्यांदा तरी दिल तो पागल है लावला होता. त्यात अक्षय कुमार का आहे कशाला आहे? काय गरज?! फुल वेस्ट ऑफ फुटेज.

अक्षय कु. अजिबात आवडत नाही. हसला की प्रचंड फाळके दिसतात त्याचे दात.
आता 'बॉडी शेमिंग स्क्वाड' धावुन येउ नये म्हणजे मिळवली Wink

मी 'अरण्यक' सिरीअल फर्स्ट सीझन/ ८ एपिसोडस पाहीला. रवीना आहे. सिरीअल आवडली. रवीना , इन्स्पेक्टरच्या भूमिकेत शोभते.

सामो + १
आजकालचे अक्षयकुमार चे सिनेमे पाहू शकत नाही.

हसला की प्रचंड फाळके दिसतात त्याचे दात.>>> हिरड्या दाखवुन हसतो तो, जरा वेट पुट ऑन करायला हरकत नाही .
पण फिटनेसला मात्र तोड नाही त्याच्या , लॉन्ग शॉट मधे अजुनही फारतर ३०चा वाटेल इतका फिट दिसतो. त्याच्या बरोबरीचे कुठलेही अ‍ॅक्टर इतके फिट नाहित.सगळे एक्दम एजेड दिसतायत.

एका मुलाखतीत हा अक्षय कु म्हणालेला मी अजिबात डेझर्ट खात नाही. जर अगदीच म्हणे इच्छा झाली तर मिंटवाल्या टूथपेस्टने दात घासतो.
याईक्स!!! इतकं कसं तरी वाटलेलं मला.
------------------
माझा function at() { [native code] }ओनात आवडता 'शकोला/ चॉकलेट' हा सिनेमा काल परत नेटफ्लिक्स्वरती पाहीला. झ-का-स!!!
https://en.wikipedia.org/wiki/Chocolat_(2000_film)

माझ्या मैत्रिणीने सांगीतलेले म्हणुन पूर्ण 'द शॅक' कादंबरी वाचली होती. खूप आवडली होती. आज सिनेमा पहाते आहे. नेटवर पीडीएफ मिळाली जी परत वाचणार आहे. आवडती कादंबरी आहे.

ग्रीफ प्रोसेसिंग बद्दल सिनेमा हवा असेल तर कोलॅटरल ब्यूटी जास्त चांगला आहे. द शॅकला धार्मिक झालर आहे.
अक्षयकुमारच्या दाताबद्दल अनादर दर्शवल्याने माझ्या भावना दुखावल्या आहेत Lol सिरीयसली, काय हे!!

'बळी' आवडला.
घाबरायला होतं, फक्त शेवटी रहस्य उलगडल्यावर संपवायला हवा होता. मग संत्र अगदी शेवटच्या फोडी पर्यंत सोलून त्याचा ज्यूस ग्लास मध्ये सर्व करायचं टाळलं असतं तर तो इम्पॅक्ट जास्त वेळ राहिला असता.
स्वजो ने चांगलं काम केलंय. पूजा सावंत पण ठीक आहे. मराठीत चांगलं/ सहज काम करणारी लहान मुलं अजिबात का नाही सापडत कोण जाणे. इंग्रजीत बारकी बारकी पोरं भारी मिळतात.

हो सहमत.
दुसरं म्हणजे जे मुख्य व्यक्तिमत्त्व या पिक्चर चं मुख्य अस्तित्व आहे त्या ला जाताना शेवटी साधं वर बघून बाय पण नाही(#गरजसरोएलिझाबेथमरो)

मग संत्र अगदी शेवटच्या फोडी पर्यंत सोलून त्याचा ज्यूस ग्लास मध्ये सर्व करायचं टाळलं असतं तर तो इम्पॅक्ट जास्त वेळ राहिला असता.
>>>

- स्पॉईलर -

हो, उगाच बाळबोध प्रकार करून एका जमलेल्या चित्रपटाला अचानक झी मराठी मालिका लेव्हलवर आणले. झाल्यास हे सारे नावे पडताना एकीकडे दाखवायचे होते. ते स्वप्निल शेवटी हिरोगिरी करत उठला नसता आणि कोणी पकडले गेले नसते तरी चालले असते. त्याने मनातली भिती कायम राहिली असती.

- माझ्यासाठी तरी तिथेच संपला होता तो चित्रपट - पुढे कॉफीचा कप धुता धुता पाहिले...

अनु सहमत.
मला पण शेवटपर्यंत वाटलं आता हा खिडकीकडे बघेल.

मला त्यातले अशुद्ध संवाद दातात खडा आल्यासारखे वाटत होते
माझी मदत करा हे शब्दशः हिंदी भाषांतर आहे

निव्वळ भूतपटाऐवजी वैद्यकीय भ्रष्टाचारावर शेवट केला आहे. पण युएसपी भूतच राहिले आहे. अलिकडे भूत दाखवताना जे स्पेशल इफेक्ट्स वापरतात त्यांना फाटा देऊन आपल्या ऐकण्यातली एखाद्या जागा असते तसे थेट पडद्यावर येत जाते. हे आवडले.

'बळी' बघितला. चांगला आहे. शेवट ताणलाय याच्याशी सहमत. हो, शेवटी वर बघायला हवं होतं त्यांनी Happy
'माझी मदत करा' खटकलं +१

'माझी मदत करा' खटकलं >> हो! दरवेळी सलाते करुन मी आजुबाजूच्यांना वीट आणला. Wink Proud
बळी *****स्पॉयलर*****
त्या मंदारला गर्तेत ढकलायला सुरुवात झाल्यावर मात्र माझा रावसाहेब झालेला. पोराला मारणं पापं हो!
मला पण शेवटी स्वजो मेलेला/ किंवा/ त्या बंद खिडकीतून स्वजो ४ नंबर बेडकडे बघतो आणि त्याला मंदार ऐवजी वेगळाच मुलगा दिसतो आणि तो मुलगा स्वजोला बघुन 'एलिझाबेथ साठे' ओरडतो आणि ओळखीचं हसतो. /किंवा/ स्वजोला इंकेक्शन देऊन खोली बंद करुन सगळे निघुन जातात आणि द एंडच्या आधी स्वजोचा पाय हलल्याचा आपल्याला भास होतो... असा काही सूचक/ अधांतरी शेवट आवडला असता.

बरेच लूज एंड्स हाइंडसाईट मध्ये दिसतात पण बघताना भान हरपून बघयला लावला, उत्सुक्ता व्हिज्युअली नाही तर मेंटली ताणली आणि असा चित्रपट मराठीत केला त्यामुळे सगळं माफ.

रावसाहेब >> +१
मी तर पुढे बघावा की नको हाही विचार केला.
स्वप्नील जोशीचं काम मला पहिल्यांदाच आवडलं असावं. (समांतर बघितली नाहीये)

Pages