चित्रपट कसा वाटला - ५

Submitted by ऋन्मेऽऽष on 12 December, 2021 - 15:18

चित्रपट कसा वाटला ५ व्या धाग्यात स्वागत

आधीचा धागा ईथे बघू शकता

https://www.maayboli.com/node/74596

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@डिस्ने
काल 'नोएल' बघितला, छान हॉलीडे मुव्ही आहे.
'शँग ची' पण आवडलेला, त्यात रिंग म्हणून बांगड्या घालतात.
@नेटफ्लिक्स/प्राईम
'छोरी' बघितला बरा आहे कधीकधी भिती वाटते पण फार नाही, मैत्रिणीचा भाचा हिरो(नुश्रतचा नवरा) आहे म्हणून जास्त कौतुक वाटले , इथला बहुचर्चित 'बळी' बघितला ओके वाटला, फार भितीदायक नाही. Collateral Beauty , The Shack बघितला. CB आवडला, The Shack फार धार्मिक व फँटसी असलेला आहे. तरीही बरा वाटला.

वीकेन्डमध्ये पॉवर ऑफ डॉग, अनफर्गिवेबल आणि छोरी असे वट्ट तीन सिनेमे बघून झाले! तिन्ही आवडले.
'छोरी' खरंच भयपट आणि बोधपटही आहे ('बळी'सारखा लुटुपुटूचा नाही! Proud )
सगळ्यांची कामं मस्त आहेत - मीता वसिष्ठ भारी! मला बघताना थोडीशी 'रोजमेरीज बेबी'ची आठवण येत होती.

'पॉवर ऑफ डॉग'मध्येही सगळ्यांचीच कामं मस्त आहेत. चांगला सिनेमा.

'अनफर्गिव्हेबल'मधला ट्विस्ट मी इमॅजिन केला नव्हता - सिनेमा ग्रिपिंग आहे आणि सॅन्ड्रा बुलक तिच्या प्लॅस्टिक चेहर्‍यातूनही चांगलं अ‍ॅक्टिंग करून दाखवते.

छोरी किंवा लपाछपी यापैकी एकच बघायचा असेल तर किंवा दोन्ही बघायचे असतील तर त्यात पहिला कोणता बघावा?
दोन्ही बघितलेल्यांनी प्लीज मार्गदर्शन करा. खूप चर्चा होतेय ईथे दोन्हींची..

छोरी किंवा लपाछपी यापैकी एकच बघायचा असेल तर किंवा दोन्ही बघायचे असतील तर >>>
"साहब, कितने गरीब लोगों को एक भी मूवी नसीब नही होता, आप दो दो देखने की और चॉईस की बात कर रहे हो. बहोत साल पहले एक बच्चे ने अपने बूढे मां बाप के लिए दो टिकटे चुराई थी, और पुलिस वाले ने उसपर गोली चलाई थी. क्युं की उसके मां बाप मूवी के लिए मौताज हो गए थे "
" नही सावित्री, दोष उस पुलिसवाली का नही है. हमारे बेटे ने चोरी की थी, सजा तो उसे मिलनी ही चाहिए "
" अगर सजा ही देनी है, तो टोरट डालो वालों को क्युं नही देते ? युट्यूब पर अन लपाछपी देखने वालों को क्युं नही देते ? क्या वह कापी लिगल है ?"
" सर , मेरी पत्नी की बातों का बुरा मत मानिए, मां है ना. उसकी आंखे अंधी हो गई है ममता मे. दूसरों के पाप गिनाने से हमारे अपने पाप तो धुल नही जाते "
" सर वैसे आप करते क्या हो ?"
" स्कूल टीचर था , अब आंखे नही रही तो ट्यूशन्स भी बंद हो गयी गै"
" मास्टरजी, मुझे इतनी बडी शिक्षा मुझे एक टीचर के घरसे ही मिल सकती थी. आजही लपाछपी गैरकानूनी तरीके से युट्यूब पर देखने वालों के खिलाफ कडी से कडी कारवाई करुंगा. छोरी देखू कि लपाछपी पूछते है, ये तो चोरी है "

मी पण आत्ता नवा पिक्चर मिळाल्याच्या आनंदात बायकोला सांगितलं आज छोरी बघू, तर मला सांगते परत तू लावलेलास आणि ५ मिनिटांत बंद केलास तोच पिक्चर. :डोक्याला हातः आज माबोकेवास्ते दुसर्‍यांदा ट्राय करू. Proud

आज माबोकेवास्ते दुसर्‍यांदा ट्राय करू >>> 'लपाछपी' ट्राय कर हवं तर (पिक्चरबद्दल बोलते आहे. नाहीतर उगाच... Wink ) Proud

Proud

दिलीप वेंगसरकर ८३
(आदिनाथ कोठारे)
तिकीट बुक झाले कि रिलीज डेट कळवतो.
FB_IMG_1640061723233.jpg

८३ नक्कीच बघणार आहे.. ४ मिनिटांचे मोठ्ठ ट्रेलर पाहिलं.

कारखानीसांची वारी पाहिला..SonyLIV वर.
मोहन आगाशे, अमेय वाघ, मृण्मयी देशपांडे , वंदना गुप्ते आणि बरीच प्रसिद्ध मंडळी आहेत. पुढे काही तरी इंटरेस्टिंग असेल , असं करत करत पूर्ण पाहिला. काही विशेष घडलच नाही. घरच्या ज्ये ना आवडला.

Zee5 वर ४२० IPC पाहिला. तो पण खास नाही वाटला. विनोद मेहरा चा मुलगा आहे , क्यूट दिसला आहे एकदम. विनय पाठक ला जास्त रोल नाही.

मायबोलीकर धुंद रवी उर्फ रविंद्र मठाधिकारी चा लकडाउन हा मराठी चित्रपट २४ तारखेपासून चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. जबरदस्त भरारी आहे रवीची. अभिनंदन आणि शुभेच्छा!

लकडाऊन नक्की बघणार.
धुंद रवी इतर सर्व मोठ्या गोष्टींत व्यस्त झाल्याने त्यांच्या इथल्या लिखाणाची आठवण येते.
लुंगी खरेदी आणि आध्यात्मिक साक्षात्कार तर अमर आहेतच Happy

बिग बॉस वर अन्कुश आला होता प्रमोट करायला पण मला ट्रेलर नाही सापडला, कूणाला दिसला तर लिन्क चिकटवा इकडे.

मी त्यात प्राजु आहे म्हणून बघणार होतो
आता तर अजून एक मस्त कारण मिळला
धन्यवाद हे अजिबातच माहिती नव्हते

अरे वाह धुंद रवींचा पिक्चर.. त्यांचे काय आहे त्यात, कथा पटकथा संवाद दिग्दर्शन वगैरे... ईथले विनोदी लेखन तर हसून हसून पुरेवाट असायचे त्यांचे. तसले पुन्हा कोणाचे वाचनात आले नाही. दोनेक वर्षांनी मी त्यांचाच एखादा लेख पुन्हा वाचतो. पुन्हा हसायला येते Happy

काल छोरी बघितला. चांगला आहे.
*******स्पॉयलर******
लांबी लहान करायला हवी होती वाटलं. काय होतंय समजलं की पुढचा धक्का/ स्टोरी चटकन पुढे गेली पाहिजे. घाबरायला मात्र अजिबात नाही झालं, सुरुवातीच्या शॉटवरुन, एनजीओ मधील दृष्यांवरुन कशाबद्दल आहे कल्पना आली होती.कावळा चिमणीच्या गोष्टीच्या वेळी खात्री पटली. त्या 'सुपुत्राचा' चेहरा न दाखवल्याने तो कोण असेल ही कल्पनाही आली होती. विहीरीत बाळं व्हिज्युअल मात्र अंगावर आलं.
सुरुवातीला बायकोला त्या बुजगावण्यापाशी सोडून घरी निघुन जाण्याचं काय प्रयोजन होतं? तिला घाबरवणे? हा भूलभूलैया आहे हे ठसवणे? का फक्त प्रेक्षकांची वातावरण निर्मिती करुन उसाचा मळा दाखवणे?
शेवटी ती पानाला मारलेली गाठ तोडून जाईल वाटलेलं. ते पण पॉवरफुल व्हिज्युअल झालं असतं.

लपाछपी पाहताना भीती वाटली. रात्रीची वेळ , हेडफोन्स मुळे असेल. शिवाय अवघडलेली बाई ( असहाय्यता) आणि हे असले वातावरण, ती माणसं. हे भीतीदायकच होतं.

बळी आणि लपाछपी साठी (स्पॉयलर्स सहीत) वेगळे धागे निघाले नाहीत का अजून ?
https://www.maayboli.com/node/80782

८३ चं अ‍ॅड बु करताना ३ डी त पण आहे असे कळ्ळं. थ्री डी त पडद्यावरची माणसं छोटी दिसतात. तिकीट पण ६०० रूपये आहे. एकदम डबल.
मी २ डी मधे पाहणार आहे. ३ डी त विशेष काही असेल तर कळवा इथेच.

Pages