काल 83 बघितला. क्रिकेटचा अगदी मोठा फॅन नसूनही मला तरी आवडला. फक्त एक गोष्ट खटकली (किंवा तसे आवडले असते असे म्हणू शकतो), ते म्हणजे या सर्व खऱ्या खेळाडूंना प्रत्यक्ष दाखवायला हवे होते. फक्त कपिलदेव यालाच शेवटी बोलताना दाखवले आहे. (यशपाल शर्मा याच्या स्मृतीनिमित्त हे पण सुरुवातीला दाखवले आहे.)
Submitted by उपाशी बोका on 24 December, 2021 - 16:05
छतावर चढून अॅण्टेना सेट करायचे उद्योग अचूक घेतलेत. आम्हा पोरांचं काम असायचं, वर बघायचं, दिसतंय का विचारलं की पळत आत जायचं पुन्हा पळत यायचं, नाही म्हणायचं.
दिसलं दिसलं, नाही गेलं, हो आलं, गेलं परत हा गोंधळ चालायचा. मग कुणीतरी यायचा. तुम्ही उतरा खाली मी बघतो. दिग्दर्शकाने आठवणीने हा प्रसंग घातलाय. एव्हढी बारीकशी आठवण !
Submitted by शांत माणूस on 24 December, 2021 - 16:09
आशुचँप, मूव्हीमधे सुद्धा महत्वाच्या मोमेंट्स च्या ओरिजिनल क्लिप्स दाखवल्या आहेत. सिनेमातला प्रसंग त्या क्लिप्स मधे ब्लेंड होत होत, ती ओरिजिनल क्लिप जे बघताना मस्त वाटतं.
83 पिक्चर बघितला काल. एकदमच बेचव पिक्चर आहे. शेवटी शेवटी तर कधी एकदाच संपतोय असं वाटत होतं. प्रत्यक्षात युट्युबर ओरिजनल क्लिप पाहताना कित्येक पटीने भारी वाटतं.
अ तरंगी रे पाहिला. कथा ट्रोमा/मानसिक आघात सारख्या महत्त्वाच्या विषयावर आहे पण तकलादू आहे. तिघे कलाकार खूप मन लावून काम करतात नि रहमानचे सुरेख म्युझिक म्हणून तीन तास बसवतं.. नायतर कथा म्हणजे पिझ्झा डो झालंय... किती खेचायचं....
Submitted by Barcelona on 25 December, 2021 - 10:17
मुळशी पॅटर्न (वरातीमागून घोडं, बऱ्याच उशिरा) पाहिला.अतिशय भिडला.
त्यानंतर आता घरच्या आग्रहाने त्यांना मुळशी पॅटर्न नसून अंतिम पाहायचा होता म्हणून पाहिला.आणि डोकं आपटावं वाटलं.
मराठी जितका सटल आणि मुद्दा पोहचवणारा वाटला तितकाच हिंदीमध्ये मूळ आशय घालवून सगळीकडे सलमान आणि त्याच्या त्या डोळे वटारलेल्या आणि एम पॅटर्न बाल्डनेस थोडा चालू झालेल्या नातेवाईकाच्या मसल वर फोकस दिलाय.मराठी मधले पंच, प्रवीण तरडे चा ठसका, मराठीत पोलीस उपेंद्र लिमये चा बेरकीपणा सगळं हिंदीत हरवलंय.
अंतिम आणि मुळशी पॅटर्नची तुलना करत सारे असेच म्हणत आहेत.
मी दोन्ही पाहिले नाहीत. पण मला एक समजत नाहीये की सलमानच्या चित्रपटात लोकं आशय कश्याला शोधायला जाताहेत? भले तो एखाद्या आशयघन चित्रपटाचा रिमेक असला तरी सल्लूभाईचा चित्रपट का सेम त्याच धर्तीवर बनवतील? भाईच्या चित्रपटात फक्त भाईच भाई. चुकीच्या अपेक्षां खाईत नेई
Submitted by ऋन्मेऽऽष on 25 December, 2021 - 14:06
काल नेटफ्लिक्स वर Dont Look up म्हणून मूव्ही पाहिला. ट्रेलरवरून खरं तर चांगला फनी मूव्ही असेल असे वाटले होते. शिवाय सगळे मोठे अॅक्टर्स - लिओनार्दो, जेनिफर लॉरेन्स, मेरील स्ट्रीप वगैरे, अन गेस्ट अपियरन्स मधे आरियाना ग्रान्दे!
दोन शास्त्रज्ञांना ( लिओनार्दो आणि जेनिफर) एका अॅस्टरॉइड चा शोध लागतो जो येत्या ६ महिन्यात पृथ्वीवर आदळून पृथ्वी नष्ट होणार आहे. हे दोघे अर्थात प्रेसिडेन्ट ला भेटतात, (मेरील स्ट्रीप) जिला मिड टर्म इलेक्शन ची जास्त चिंता आहे. टिव्ही, सोशल मिडिया वर जातात पण त्यांना आरियाना ग्रान्देच्या ब्रेक अप आणि पॅच अप मधे जास्त इंटरेस्ट आहे. कोणी श्रीमंत टेक सीईओ ला त्या अॅस्टरॉइड वर असलेल्या मिनरल्स चा साठा हवा आहे. मला इडिऑक्रसीची आठवण येत होती अधून मधून. पण हा काही जमलेला नाही. चांगल्या अपॉर्चुनिटीची पार खेचून वाट लावलीय.
Submitted by maitreyee on 25 December, 2021 - 14:16
मी काल अर्धा पाहिला. तोपर्यंत मस्त होता. पुढे अजून पाहिला नाही. धुमकेतून पृथ्वीवर आदळायची शक्यता किती टक्के आहे यावरचे निगोशिएशन मजेदार होते.
साधारण अशा पद्धतीचा पण एकदम वेगळ्या विषयावर असलेला इन द लूप हा पिक्चर आहे, त्याची आठवण येते हा पाहताना.
सॅण्ड्रा बुलक चा "अनफर्गिव्हेबल" (नेफि) जबरदस्त आहे. ती मला कधी आवडली नव्हती या आधी पण यातले तिचे काम जबरी आहे.
"जंगल क्रूझ" थोडा बघितला. जरा जास्तच "किडिंग अराउण्ड" आहे. पुढे बघू इण्टरेस्टिंग आहे का. डिस्ने ने थीम पार्क मधली राइड आधी ठरवली आणि मग त्यावर पिक्चर काढल्यासारखा वाटतो. ड्वेन जॉन्सन चे विनोदी रोल्स धमाल असतात. हा ही वाटतोय.
८३ पाहिला . भारता मध्ये रिलिज व्हायच्या आधी आमच्या इकडे (फिनलंड ) झाला ह्याच आश्चर्य वाटलं. फापट पसारा नव्हता . चक दे शी तुलना होणारच होती पण मला आवडला . रणवीर ने कमाल केलीये.
83 पिक्चर बघितला काल. एकदमच बेचव पिक्चर आहे. शेवटी शेवटी तर कधी एकदाच संपतोय असं वाटत होतं. >>मी बघून आले आज.. मला फार आवडला..सुरूवातीचे १०-१५ मि स्लो आणि मग जे रणवीर सिंग कपिल देवचे कॅरेक्टर पकडतो ते अगदी शेवट पर्यंत खिळवून ठेवतो.. त्याच्यानंतर श्रिकांतचे कॅरेक्टर करणाऱयाने पण जबरदस्त काम केलंय
मी दहा मिनटात बंद केला बं ब. ते पहिलं स्टेजवरचं गाणं सुरू झाल्या झाल्या.>> मी पण.
अस्तित्वात नसलेल्या देशाचे तिकिट ५ लाख देऊन काढणारे महाभाग कुठे असतात?
नाही सहन करू शकले..पहिला भाग ही न पटणारा च होता..म्हणे ताज महल विकायला काढलाय. काहीही.
म्हणे ताज महल विकायला काढलाय. >>> ही सत्य घटना आहे. नटवरलाल या नावाने प्रसिद्ध असलेल्या एका श्रीवास्तवने गेट वे ऑफ इंडीया, राष्ट्रपती भवन, संसद, लाल किल्ला आणि ताजमहाल विकले होते.
Submitted by शांत माणूस on 26 December, 2021 - 21:47
हिंदीमध्ये मूळ आशय घालवून सगळीकडे सलमान आणि त्याच्या त्या डोळे वटारलेल्या आणि एम पॅटर्न बाल्डनेस थोडा चालू झालेल्या नातेवाईकाच्या मसल वर फोकस दिलाय.>>> अनू म्हणजे काय गं?
काल 83 बघितला. क्रिकेटचा अगदी
काल 83 बघितला. क्रिकेटचा अगदी मोठा फॅन नसूनही मला तरी आवडला. फक्त एक गोष्ट खटकली (किंवा तसे आवडले असते असे म्हणू शकतो), ते म्हणजे या सर्व खऱ्या खेळाडूंना प्रत्यक्ष दाखवायला हवे होते. फक्त कपिलदेव यालाच शेवटी बोलताना दाखवले आहे. (यशपाल शर्मा याच्या स्मृतीनिमित्त हे पण सुरुवातीला दाखवले आहे.)
छतावर चढून अॅण्टेना सेट
छतावर चढून अॅण्टेना सेट करायचे उद्योग अचूक घेतलेत. आम्हा पोरांचं काम असायचं, वर बघायचं, दिसतंय का विचारलं की पळत आत जायचं पुन्हा पळत यायचं, नाही म्हणायचं.
दिसलं दिसलं, नाही गेलं, हो आलं, गेलं परत हा गोंधळ चालायचा. मग कुणीतरी यायचा. तुम्ही उतरा खाली मी बघतो. दिग्दर्शकाने आठवणीने हा प्रसंग घातलाय. एव्हढी बारीकशी आठवण !
अहो नका सांगू इथे काही.. मी
अहो नका सांगू इथे काही.. मी पण लवकरच जाणार आहे
रहस्य काही नाही विशेष.
रहस्य काही नाही विशेष.
शेवटी साळुंकेंचा खूनी एसीपी प्रद्युम्नकुमार निघतो एव्हढाच धक्का दिलाय.
शां मा, संदिप पाटील ची भुमिका
शां मा, संदिप पाटील ची भुमिका त्याच्या मुलानेच केलीय.
रहस्य काही नाही विशेष.
रहस्य काही नाही विशेष.
शेवटी साळुंकेंचा खूनी एसीपी प्रद्युम्नकुमार निघतो एव्हढाच धक्का दिलाय >>>>
शां मा
शां मा
बघायला पाहिजे हा पिक्चर. थिएटरमध्येच.
ओरिजनल वर्ल्ड कप चे हायलाईट्स
ओरिजनल वर्ल्ड कप चे हायलाईट्स अजूनही आहेत आंतरजालावर उपलब्ध
मला तेच बघायला मज्जा येते, कसलाही मसाला न घालता
ओरिजनल कलाकृती
जे घडलं जसं च्या तसे
ओरिजनल विंडीज ची टीम आणि स्पेशली रिचर्डस ची विकेट बघताना फार भारी वाटतं
आशुचँप, मूव्हीमधे सुद्धा
आशुचँप, मूव्हीमधे सुद्धा महत्वाच्या मोमेंट्स च्या ओरिजिनल क्लिप्स दाखवल्या आहेत. सिनेमातला प्रसंग त्या क्लिप्स मधे ब्लेंड होत होत, ती ओरिजिनल क्लिप जे बघताना मस्त वाटतं.
83 पिक्चर बघितला काल. एकदमच
83 पिक्चर बघितला काल. एकदमच बेचव पिक्चर आहे. शेवटी शेवटी तर कधी एकदाच संपतोय असं वाटत होतं. प्रत्यक्षात युट्युबर ओरिजनल क्लिप पाहताना कित्येक पटीने भारी वाटतं.
मी वाट बघतोय विराट च्या
मी वाट बघतोय विराट च्या चित्रपटाची...
विराट = कपिल + धोनी
अ तरंगी रे पाहिला. कथा ट्रोमा
अ तरंगी रे पाहिला. कथा ट्रोमा/मानसिक आघात सारख्या महत्त्वाच्या विषयावर आहे पण तकलादू आहे. तिघे कलाकार खूप मन लावून काम करतात नि रहमानचे सुरेख म्युझिक म्हणून तीन तास बसवतं.. नायतर कथा म्हणजे पिझ्झा डो झालंय... किती खेचायचं....
घोर निराशा! >>> अरेरेरे!
घोर निराशा! >>> अरेरेरे! मेट्रिक्स कडून अशी अपेक्षा नव्हती थँक्यू अमितव. आता निदान खूप जास्त अपेक्षा ठेवून बघणार नाही हा पिक्चर.
बॅालिवूड स्टाईल वाटतोय मला..
बॅालिवूड स्टाईल वाटतोय मला.. बघू की नको विचार करतेय.. पण प्रियंकासाठी बघावासा वाटतोय
मुळशी पॅटर्न (वरातीमागून घोडं
मुळशी पॅटर्न (वरातीमागून घोडं, बऱ्याच उशिरा) पाहिला.अतिशय भिडला.
त्यानंतर आता घरच्या आग्रहाने त्यांना मुळशी पॅटर्न नसून अंतिम पाहायचा होता म्हणून पाहिला.आणि डोकं आपटावं वाटलं.
मराठी जितका सटल आणि मुद्दा पोहचवणारा वाटला तितकाच हिंदीमध्ये मूळ आशय घालवून सगळीकडे सलमान आणि त्याच्या त्या डोळे वटारलेल्या आणि एम पॅटर्न बाल्डनेस थोडा चालू झालेल्या नातेवाईकाच्या मसल वर फोकस दिलाय.मराठी मधले पंच, प्रवीण तरडे चा ठसका, मराठीत पोलीस उपेंद्र लिमये चा बेरकीपणा सगळं हिंदीत हरवलंय.
अंतिम आणि मुळशी पॅटर्नची
अंतिम आणि मुळशी पॅटर्नची तुलना करत सारे असेच म्हणत आहेत.
मी दोन्ही पाहिले नाहीत. पण मला एक समजत नाहीये की सलमानच्या चित्रपटात लोकं आशय कश्याला शोधायला जाताहेत? भले तो एखाद्या आशयघन चित्रपटाचा रिमेक असला तरी सल्लूभाईचा चित्रपट का सेम त्याच धर्तीवर बनवतील? भाईच्या चित्रपटात फक्त भाईच भाई. चुकीच्या अपेक्षां खाईत नेई
काल नेटफ्लिक्स वर Dont Look
काल नेटफ्लिक्स वर Dont Look up म्हणून मूव्ही पाहिला. ट्रेलरवरून खरं तर चांगला फनी मूव्ही असेल असे वाटले होते. शिवाय सगळे मोठे अॅक्टर्स - लिओनार्दो, जेनिफर लॉरेन्स, मेरील स्ट्रीप वगैरे, अन गेस्ट अपियरन्स मधे आरियाना ग्रान्दे!
दोन शास्त्रज्ञांना ( लिओनार्दो आणि जेनिफर) एका अॅस्टरॉइड चा शोध लागतो जो येत्या ६ महिन्यात पृथ्वीवर आदळून पृथ्वी नष्ट होणार आहे. हे दोघे अर्थात प्रेसिडेन्ट ला भेटतात, (मेरील स्ट्रीप) जिला मिड टर्म इलेक्शन ची जास्त चिंता आहे. टिव्ही, सोशल मिडिया वर जातात पण त्यांना आरियाना ग्रान्देच्या ब्रेक अप आणि पॅच अप मधे जास्त इंटरेस्ट आहे. कोणी श्रीमंत टेक सीईओ ला त्या अॅस्टरॉइड वर असलेल्या मिनरल्स चा साठा हवा आहे. मला इडिऑक्रसीची आठवण येत होती अधून मधून. पण हा काही जमलेला नाही. चांगल्या अपॉर्चुनिटीची पार खेचून वाट लावलीय.
मी काल अर्धा पाहिला. तोपर्यंत
मी काल अर्धा पाहिला. तोपर्यंत मस्त होता. पुढे अजून पाहिला नाही. धुमकेतून पृथ्वीवर आदळायची शक्यता किती टक्के आहे यावरचे निगोशिएशन मजेदार होते.
साधारण अशा पद्धतीचा पण एकदम वेगळ्या विषयावर असलेला इन द लूप हा पिक्चर आहे, त्याची आठवण येते हा पाहताना.
सॅण्ड्रा बुलक चा "अनफर्गिव्हेबल" (नेफि) जबरदस्त आहे. ती मला कधी आवडली नव्हती या आधी पण यातले तिचे काम जबरी आहे.
"जंगल क्रूझ" थोडा बघितला. जरा जास्तच "किडिंग अराउण्ड" आहे. पुढे बघू इण्टरेस्टिंग आहे का. डिस्ने ने थीम पार्क मधली राइड आधी ठरवली आणि मग त्यावर पिक्चर काढल्यासारखा वाटतो. ड्वेन जॉन्सन चे विनोदी रोल्स धमाल असतात. हा ही वाटतोय.
डी क्याप्रिओ चा आत्ताच चालू
डी क्याप्रिओ चा आत्ताच चालू करणार होतो. आता एमिली इन पॅरिस.
मी disney वर आत्ताच encanto
मी disney वर आत्ताच encanto बघितला. मस्त मुव्ही.. मुलांनी फार एंजॅाय केला.
मला dont look up प्रचंड आवडला
मला dont look up प्रचंड आवडला. ब्रिलियंट satirical movie. मी आज परत बघणार आहे, ashes बरोबर
८३ पाहिला . भारता मध्ये रिलिज
८३ पाहिला . भारता मध्ये रिलिज व्हायच्या आधी आमच्या इकडे (फिनलंड ) झाला ह्याच आश्चर्य वाटलं. फापट पसारा नव्हता . चक दे शी तुलना होणारच होती पण मला आवडला . रणवीर ने कमाल केलीये.
राधे शाम चा ट्रेलर आला
राधे शाम चा ट्रेलर आला
83 पिक्चर बघितला काल. एकदमच
83 पिक्चर बघितला काल. एकदमच बेचव पिक्चर आहे. शेवटी शेवटी तर कधी एकदाच संपतोय असं वाटत होतं. >>मी बघून आले आज.. मला फार आवडला..सुरूवातीचे १०-१५ मि स्लो आणि मग जे रणवीर सिंग कपिल देवचे कॅरेक्टर पकडतो ते अगदी शेवट पर्यंत खिळवून ठेवतो.. त्याच्यानंतर श्रिकांतचे कॅरेक्टर करणाऱयाने पण जबरदस्त काम केलंय
हसीना दिलरुब्बा पाहिला. नंतर
हसीना दिलरुब्बा पाहिला. नंतर अगदीच अचाट केला....
अंदाज आलेला पण उगाच्च तो हाताचा सीन घातला आणि वाट लावली.
इथे कोणी लिहिले नाही ह्या मूवीवर
मी दहा मिनटात बंद केला बं ब.
मी दहा मिनटात बंद केला बं ब. ते पहिलं स्टेजवरचं गाणं सुरू झाल्या झाल्या.>> मी पण.
अस्तित्वात नसलेल्या देशाचे तिकिट ५ लाख देऊन काढणारे महाभाग कुठे असतात?
नाही सहन करू शकले..पहिला भाग ही न पटणारा च होता..म्हणे ताज महल विकायला काढलाय. काहीही.
इथे कोणी लिहिले नाही ह्या
इथे कोणी लिहिले नाही ह्या मूवीवर>> लिहिले आहे. धागाच आहे त्यावर असे आठवते
म्हणे ताज महल विकायला काढलाय.
म्हणे ताज महल विकायला काढलाय. >>> ही सत्य घटना आहे. नटवरलाल या नावाने प्रसिद्ध असलेल्या एका श्रीवास्तवने गेट वे ऑफ इंडीया, राष्ट्रपती भवन, संसद, लाल किल्ला आणि ताजमहाल विकले होते.
हिंदीमध्ये मूळ आशय घालवून
हिंदीमध्ये मूळ आशय घालवून सगळीकडे सलमान आणि त्याच्या त्या डोळे वटारलेल्या आणि एम पॅटर्न बाल्डनेस थोडा चालू झालेल्या नातेवाईकाच्या मसल वर फोकस दिलाय.>>> अनू म्हणजे काय गं?
ही सत्य घटना आहे. एकाने गेट
ही सत्य घटना आहे. एकाने गेट वे ऑफ इंडीया आणि ताजमहाल विकले होते.>> अर्रे देवा कपाळ बडवती मोड ऑन
Pages