चित्रपट कसा वाटला - ५

Submitted by ऋन्मेऽऽष on 12 December, 2021 - 15:18

चित्रपट कसा वाटला ५ व्या धाग्यात स्वागत

आधीचा धागा ईथे बघू शकता

https://www.maayboli.com/node/74596

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एम पॅटर्न बाल्डनेस थोडा चालू झालेल्या नातेवाईकाच्या मसल वर फोकस दिलाय >> अनू म्हणजे काय गं? >>> आयुष शर्मा... (आता कळलं असेल दृष्यावरून गाणे धाग्यावर कसे आमचे हाल व्हायचे!! Wink :D)

तो व्हिलन आयुष शर्मा सलमान खानच्या बहिणीचा नवरा आहे

सलीम खानला ती रस्त्यात सापडली होती , तिला त्यांनी सांभाळले

तिचा हा नवरा म्हणजे थोर राजकारणी सुखराम ( पैसा खुदा डायलॉगवाले)चा नातू आहे

Happy मला खरंच त्याचं नाव शोधायचं नव्हतं कष्ट घेऊन.नाहीतर एम पॅटर्न ह्रितीक ला पण आहे.बऱ्याच मेल्स मध्ये चालू होतोच.

त्या हिरोने अभिनय खूप चांगला केलाय.पण ते विचित्र लेन्स घातल्याने भयंकर दिसतो.पुढे जाईल.
माझी मूळ चिडचिड त्याच्या लूक बद्दल नसून या हिंदी वाल्या लोकांनी मुळशी पॅटर्न चे भूत केल्याबद्दल आहे.सलमान ला सरदार बनवायची अजिबात गरज नव्हती.

हो.बातमी वाचली.त्यात 2 ओळींची सापाची बातमी आणि बाकी 50 ओळी सलमान च्या आयुष्याचा रि कॅप असे होते.बहुधा विषारी नसावा.

लोकसत्तेत (app मधे तरी) ' वाढदिवसाच्या आधीच सलमानला झाला सर्पदंश' असं हेडिंग होतं. आधीच म्हणजे काय? वाढदिवसाच्या नंतर चावायला हवा होता का?
Screenshot_20211227-095536~2.png

काहीही Happy
तरी त्यांनी
'वाढदिवसाच्या आधी सलमान ला चावली 'ही' व्यक्ती' असं नाही लिहिलं याबद्दल आपण सर्वांनी स्वतःला कृतकृत्य मानावे.

Lol

लवकरच ही बातमी पण येईल -
वाढदिवसाच्या दिवशी सलमान नाशिकात करणार नारायण नागबली

कृपया शाहरूखला यात आणू नका. धागे भरकटतात.
त्यापेक्षा सलमानला अभिनय येत नाही म्हणणार्‍यांनी वरचा फोटो बघा. काय खतरनाक एक्सप्रेशन दिलेत. साप त्याच्या समोर आ वासून उभा आहे असे खरेच वाटतेय. हा फोटो ऑस्करला जायला हवा..

सल्लूने सापाच्या शेपटीवर पाय दिला असणार म्हणून सापाने त्याचा पाठलाग केला असण्याची शक्यता आहे. साप विनाकारण कोणाला चावत नाही. गावी मित्र शेतात क्रिकेट खेळायला गेल्यावर नकळत साप दुखावले जायचे आणि आमचा पाठलाग करत थेट घरापर्यंत यायचे. एकदा तर एकाचा पाठलाग करत साप आला आणि घराच्या छतावर बसून राहिला. ज्याच्या पाठीवर साप आला होता तो घरातून बाहेर आला आणि कोणाला तरी हाक मारली. ती हाक ऐकून सापाने उडी मारली ती जवळपास त्याच्या डोक्याववरच होती. काही सेंटीमीटरने वाचला.

आयुष शर्मा>>> Rofl कळाले...

वाढदिवसाच्या आधी सलमान ला चावली 'ही' व्यक्ती' असं नाही लिहिलं याबद्दल आपण सर्वांनी स्वतःला कृतकृत्य मानावे.>> Rofl आणि क्लिक केल्या वर चावणारी व्यक्ती मादक मुलगी नसून खरोखरीची नागिण निघाली असा मथळा झळकेल lol

मागे ह्या धाग्या वर कभी अलविदा चित्रपटा बद्दल ऋन्मेष नी काही मतं मांडली होती..ती माझ्या पुर्वग्रहदुषित व्ह्यु मुळे किंवा त्याच्या येथिल इमेज मुळे असावीत..पण हिच गोष्ट जेंव्हा माझ्या आवडत्या ओन्ली देसी युट्युबर नी पटवुन सांगितली तेंव्हा अगदीच पटली उलट माझ्या डोक्यात हे का आलं नाही असं वाटुन गेलं.. Happy
रीविजिट केएएनके एक्स्ट्रास ह्या व्हिडिओ वर आहेत.
हे मी प्रांजळपणे कबूल करते Lol

आशू Proud _/\_
हेच ना.. https://www.youtube.com/watch?v=aVGUYbcErvU
अजूनही रिव्यू बघायला हवेत याचे, कधी बघत नाही मी असे विडिओज

येस

सलमानचे एक्सप्रेशन त्रिफळा चूर्ण घेऊनही पोट साफ होत नाही असे आहेत वरच्या फोटोत
ते जर सरांना ऑस्कर च्या तोडीचे वाटत असतील तर मग बरोबर आहे
सरांचा या विषयात अनुभव दांडगा आहे
Happy

डिटेल बातमी वाचली
तो फार्म हाऊस वर सापाला घालवताना साप 3 वेळा चावला.

नक्की शेपटीला पकडून उचलले असणार Happy
म्हणून म्हणत असते डिस्कव्हरी आणि अ‍ॅनिमल प्लॅनेट चॅनल बघत जावे. पण ऐकत नाहीत मुलं Happy

Whatsapp जोक

IMG-20211228-WA0001.jpg

वावे Lol
वरील चित्रात बहुतेक black mamba आ वासून बघतोयं. ते आफ्रिकेत असतात, भयंकर विषारी असतात. सखाला आपला बिनविषारी गार्डन स्नेक किंवा सापसुरळी टाईप काई तरी चावले असेल. पनवेल आफ्रिकेत नाही. कोब्रा असता तर वाईट झाले असते.

Pages