चित्रपट कसा वाटला - ५

Submitted by ऋन्मेऽऽष on 12 December, 2021 - 15:18

चित्रपट कसा वाटला ५ व्या धाग्यात स्वागत

आधीचा धागा ईथे बघू शकता

https://www.maayboli.com/node/74596

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला आवडलेला अतरंगी रे.. पण वेगळी स्टोरी आणि धनुष ची ॲक्टिंग या दोन गोष्टींमुळे..
>>>
येस .. म्हाळसा.. सहमत...
अतरंगी मला आवडल्याची कारणे -
1. परफेक्ट कास्टिंग... स्पेशली अक्षय...
2. हटके स्टोरी आणि विषय
3. धनुष चा बाप अभिनय...
4. जबरदस्त कलायमॅक्स...

म्हणजे आहेत अतरंगी रे हा सिनेमा आवडणारे लोक तर Happy
मायबोलीवर आहेत का हा प्रश्न आहे ...
>>>

मी आहे. माझ्या बायकोला सुद्धा बरा वाटला. ती सुद्धा ऑफिशिअली मायबोली सभासद आहे. एक तुम्ही एक म्हाळसा. चार जण ईथेच जमले.

त्या हाय चकाचक मधे जबरदस्ती तीला सेक्सी दाखवण्याचा प्रयत्न केलाय .. मला ती क्युट वाटली, हॅाट नाही..
>>>>>

तिचा चेहरा क्यूटच आहे. केदारनाथमध्ये सूट होते. हॉट वगैरे नक्कीच नाही. पण फिगर छान आहे तिची. हेल्दी कॅटेगरी. मला आवडते ती.

लहान असताना आपण यांना पाहीलंत का मधे फोटो दाखवून निवेदिका सांगायची.. मजबूत बांधा, मध्यम बांधा, नाजूक बांधा. त्या वेळी असे वाटायचे की हे सापडले तर यांना या पद्धतीने बांधून मग कळवावे लागते.
आता सर्रास फिगर म्हणतात. सरांनी हेल्दी हा आणखी एक प्रकार आणला.

hotel transylvania: transformania काल पाहिला प्राईमवर..

पतंग नेहमी प्रवाहाच्या विरुद्ध वर जातो किंबहुना प्रवाहाविरुद्ध जातो म्हणूनच वर जातो
सर आणि सर चर्रप्स हे असेच लिजांड्री पतंग आहेत
>>>>>

प्रत्येकाची काहीतरी अशी आवड असते जी जगावेगळी असते. काही लोकं ट्रोलिंगच्या भितीने ईथे आपले वेगळे मत, वेगळी आवड मांडायला घाबरतात. मी आणि च्रप्स जनाची पर्वा न करता आपले मत मांडतो असेही असेल.

आणि हो, मला शाहरूख आवडतो हे प्रवाहावेगळे असेल तर ते हास्यास्पद आहे. तसे असते तर तो सुपर्रस्टार नसता. जाहीरातीचा सर्वात मोठा ब्रांड नसता. तो भारतातील सर्वाधिक लोकप्रिय कलाकार आहे म्हणूनच तो हे आहे. मायबोली म्हणजे जग नाही Happy

बादवे - झिम्मा देखील पाहिला मी.. अत्यंत टाईम वेस्ट सिनेमा वाटला मला... झिम्मा न आवडणारा कोणीच नाही का इथे ??
>>>>

झिम्माचा धागा आहे. तिथे बघा च्रप्स कोणी सापडते का?
आमच्या घरी सर्वांना आवडलाय Happy

झिम्मा - मराठी चित्रपट
https://www.maayboli.com/node/80649

मायबोली म्हणजे जग नाही>>>>>

सर उभे राहून सॅल्युट ठोकावा असे हे वाक्य आहे
तुम्ही म्हणजे आज सणसणीत षटकार खेचला आहे

मी तर याचे मोठे होर्डिंग करून पुण्यात जागोजागी लावले असते तेवढे पैसे असते तर
पण जर जमले तर नक्कीच करीन

मी सध्या ज्युलिया रॉबर्टचा Enrin Brokowich हा सिनेमा पाहतेय. ज्युलियाला ऑस्कर अवॉर्ड मिळालेलं त्यासाठी

Enrin Brokowich >> छानच आहे.. रिअल स्टोरीवर आहे..
ह्या मुव्ही नंतरच मला ज्युलिया रॉबर्ट फार फार आवडायला लागली

Enrin Brokowich छानच आहे.

ज्युलिया रॉबर्ट आवडतेच. या चित्रपटात जास्तच आवडली.

पुष्पा पाहिला.अपेक्षेनुसार काहीच झेपलं नाही.भडकपणा, पाच हजार रुपये देऊन किस, ती इथे वाचल्यानुसार नॅशनल क्रश असलेली नायिका,आणि अल्लू अर्जुन ला ब्राऊनफेस करून केलेला मेकप>>> मी अनू प्रत्येक शब्दाला मम. मी आधी अर्धा तास पाहून असह्य होऊन सोडला, मग मैत्रिणी म्हणाल्या..काय सांगतेस किती सही आहे अल्लु अर्जुन अन काय काय..तर नेटाने उरलेला पाहिला. त्याचा डॅन्स सोडला तर आवडण्या सारखं काहिच वाटलं नाहि खरंच!

पब्लिक ओपिनियनच्या विरुद्ध च्रप्स यांचं मत असतंय नेहमी >>> अगदी अगदी.. त्यांची कॉमेंट वाचून
अ तरंगी न बघण्याचा निश्चय बळावला Wink ट्रेलर बघून टिपिकल आणि रोशे फेम वाटत होता...सो पास!

सारा अली मला ही दिसायला आवडते, क्लासी वाटते. पण अभिनय रक्तात नसतो.. हे दिसून येते. आई वडिल कसलेले कलाकार असून ही पाट्या टाकते. शेम !

मला शाहरूख आवडतो हे प्रवाहावेगळे असेल तर ते हास्यास्पद आहे>>> शाखा मला ही आवडतो पण तो करतो ते सगळं पुज्यं..तो करेल तो प्रत्येक रोल बेस्ट अशी भुमिका नसते सर्वांची. त्याचे माकडचाळे हे माकडचाळेच. उगाच त्याला एंटर्टेनमेंट म्हणुन त्याची लाल नाही करत! Wink

त्याचे संयत भुमिका असलेले रोल्स अनेकांना आवडतात. असो शी बाई सारखं सारखं आपलं एकाच झाडावर काय..
Wink Lol

सारा अली चांगली आहे.तिचा केदारनाथ मधला अभिनय आवडला होता. सिंबा मधलं काम शोभेची बाहुली असल्याने फार जास्त वाव नव्हता अभिनय दाखवायला.
तिला तिच्या पंजाबी फीचर्स मुळे टिपिकल रोल्स मिळतील सुरुवातीला, पण अभिनयात नीट पुढे येईल.

पुष्पा जसा सौदिडियन मूवी असावा असाच आहे. भडकपणा सर्वच बाबतीत(कपडे, नाच, मारामारी, रजनीकांत टाईप्स शॉट्स) तसाच. डोकं न लावता पहावा.
एकटा पुष्पा सर्वांना मारणार. गोळ्या खावून सुद्धा लग्नमंडपात बसणार.... वगैरे.
सलमानचे सुद्धा तसेच असतात. फक्त गांडूगिरी आणि काही नाही...( गांडूगिरी हि शिवी नाहीये. गुज्जु दोस्त व आम्ही मुर्खपणा ह्यासाठी वापरलेले संबोधन आहे).

अतरंगी रे - अ आणि अ सिनेमा आहे.
कथाबीज खरंतर खूप चांगलं आहे. पण त्याची वाट लावली आहे. Uhoh

धनुषचं काम एक नंबर. सारा अली खानही आवडली. मी हा तिचा पाहिलेला पहिलाच सिनेमा.

काल झिम्मा पहिला अफाट बोर झाला
एकही व्यक्तिरेखा धड उभी राहत नाही
नुसती गर्दी करून ठेवली आहे पात्रांची
कसेतरी ढकलत ढकलत संपवला

बरे झाले थेटर ला जाऊन पैसे वाया नाही गेले

सरांच्या मताच्या विरोधात मत मांडणे हा अपराध आहे. नुसताच अपराध नाही तर दंडनीय अपराध होय. जर सर झिम्मा हा उत्तम चित्रपट आहे असे म्हणाले असतील तर दुसरे मत अस्तित्वातच कसे असू शकते ?

काल पहिला अतरंगी ,, चांगला /वाईट नाही ठरवता आला , पण धनुष चे काही scene मात्र एकदम सॉलिड आहेत.
१. पहिल्यादा तो सारा ला माझं तुझ्या वर खूप प्रेम आहे हे तेलगू मध्ये सांगतो आणि सारा मात्र निघून जाते तो
२.हॉस्पिटल मध्ये जेव्हा तोच दुसरा हिरो जिवंत आहे हे सारा ला सांगतो तो
३. तो तिला एक पर्याय निवडायला सांगतो तो ,

अहो सर च म्हणाले आहेत की ट्रोल व्हायची भीती न बाळगता बिनधास्त बोला
म्हणून पटदिशी लिहून टाकलं हातासरशी
Happy

चला.. अतरंगी रे आवडलेली लोक सापडतायत... Happy
कलायमॅक्स बद्धल एकही कमेंट नाही... ज्याने पूर्ण पाहिला त्याला न आवडणे शक्यच नाही...
सारा काही जान्हवी नाही कि तिचा अभिनय टॉप लेव्हल असेल..
या रोल साठी मात्र एकदम परफ़ेकत कास्टिंग आहे...
धनुष आणि अक्षय ने मात्र मस्त अभिनय केला आहे...

अतरंगी चित्रपट नावाला साजेसा बनवलाय! तो काही सगळा बघू शकलो नाही, पण सारा त्या रोल मध्ये आवडली. धनुष पण आवडला. सारा बाकीच्या अनेक स्टार किड्स पेक्षा नक्की उजवी आहे. उदा. झानवी इ.

Pages