खाऊगल्ली - आजचा मेनू - (४)

Submitted by ऋन्मेऽऽष on 30 May, 2021 - 09:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा

क्रमवार पाककृती: 

१. आपल्या आवडीचा कुठलाही खाद्यपदार्थ बनवा.
२. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
३. फोटो काढा
४. अपलोड करा

मगच त्यावर तुटून पडा Happy

फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556

आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/77265

हि सुद्धा तशीच तुडुंब भरू द्या Happy

वाढणी/प्रमाण: 
माहितीचा स्रोत: 
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फ्लॉवर-गाजर- हिरवी मिरची बारीक चिरून घालायची आणि हरभरे -मटार सोलून. एकत्र करायचं आणि लोणचं मसाला घालायचा. एक लिंबू पिळायचं. वरून फोडणी घालायची आणि मीठ. झालं. ३/४ दिवस टिकतं.

हिरवी मिरची बारीक चिरून घालायची
<<

हिरव्या मिरच्या घालून प्लस कैरी लोणचे मसाला?

बात कुछ 'हजम' नही हुई.

Chhole.jpg

हे घ्या छोले - भटूरे... छोट्या मेम्ब्राला वाढलेले ताट आहे, त्यामुळे कान्दा, लोणचे अशी फालतूगीरी नाही सोबत..
छोले - भटूरे ची आठवण आली कि एक छोटी मेम्बर गाणे म्हणू लागते सारखे "बम बम भोले, मस्ती मे डोले, छोले - भटूरे ओये"
मग केले जातात Happy

>>>>>>>एक छोटी मेम्बर गाणे म्हणू लागते सारखे "बम बम भोले, मस्ती मे डोले, छोले - भटूरे ओये"
मग केले जातात Happy
मस्त!

मस्त आरारा.. ईडली फराय माझा जगात आवडीचा पदार्थ, हॉटेलात गेले तरी टाईमपास म्हणून मी दरवेळी खातोच. माझ्यामुळे बायकोलाही सवय लागलीय Happy

aashu29 अशी करताना त्यात थोड्या शिल्लक असलेल्या भाज्या (त्यात एक पालेभाजी होती (नाव नाही, इकडे मिळते एक) ) टाकल्या.
चवीला ओके झाली होती, फार छान नाही.

धन्स मानव. ह्यात दही आणि टोमॅटो दोन्ही घातलेत आणि थिकनेस साठी काजू वा क्रीम नाही म्हणुन चव फार छान आली नसावी असे वाटते.. काजू/मगज वाटुन घालून छान चव येईल.

IMG_20220123_202339778.jpgIMG_20220125_203121805.jpgIMG_20220126_085244803.jpgIMG_20220126_205159904.jpg

वेगवेगळ्या दिवशी केलेले मेनू आहेत.
पाणीपुरी ,
तोंडली भात आणि ताक
केळे -सफरचंद-अक्रोड घालून पॅनकेक,
रशियन सॅलड,मेथी मटर मलाई,गार्लिक बटर नान

aashu29, ओके त्याने चव वाढेल तर पुढच्या वेळी घालेन पण मला असं म्हणायचं होतं की माझ्या हातुनच चांगलं झालं नव्हतं तेव्हा.

नीतिका सगळेच पदार्थ मस्त दिसताहेत.

वाह नितिका, मस्त पदार्थ. स्पेशली गार्लिक नान मस्तच दिसतोय.
पॅन केक आमच्याकडे सध्या वरणभातासारखे रोज खाल्ले जाताहेत. आधीच माझ्या कमी आवडीचे, त्यात ते सारखे बघून आणखी वीट आलाय. त्यामुळे त्याला तेवढे पास.

परवा २५ जानेवारीला घराचे काम सुरू केले. कामगारांसाठी सकाळीच खायला मागवले. गरमागरम समोसा, जिलेबी आणि फाफडा.
शिल्लक राहिल्याने संध्याकाळीही थोडेफार तेच खाल्ले.
मग दुसर्‍या दिवशी २६ जानेवारी आला. खाली जाऊन पाहतो तर काय.. पुन्हा तेच.. गरमागरम समोसा, जिलेबी आणि फाफडा.
अर्थात हे वेगळ्या दुकानातील असल्याने त्यावरही तुटून पडलो. घरी आईसाठीही आणले. पोरांनीही आपल्या वाटणीचे संपवले नाही. तसेच सोसायटीनेही शिल्लक राहिलेले प्रत्येक घरात वाटले गेले. मग रात्री समोसा, जिलेबी, फाफडा, त्यात दही, समोसाच्या गोड तिखट चटण्या, आणि घरी असलेली बारीक शेव असे सारे एकत्र करून धमाच चाट तयार केली.
फोटो एकाचाही नाही.. पण या सगळ्यातून शिल्लक शेवटचा समोसा आताच चहासोबत खाऊन झाला.

Pages