खाऊगल्ली - आजचा मेनू - (४)

Submitted by ऋन्मेऽऽष on 30 May, 2021 - 09:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा

क्रमवार पाककृती: 

१. आपल्या आवडीचा कुठलाही खाद्यपदार्थ बनवा.
२. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
३. फोटो काढा
४. अपलोड करा

मगच त्यावर तुटून पडा Happy

फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556

आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/77265

हि सुद्धा तशीच तुडुंब भरू द्या Happy

वाढणी/प्रमाण: 
माहितीचा स्रोत: 
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Submitted by Ajnabi on 15 January, 2022 - 20:20

इक्कुश्यात कसं काय होतं तुमचं?
मुलींचं जेवण असतं असं चिमणीसारखं. ४ दाणे टिपले की झालं.

तो पापडाचा पॅकमॅन भारी दिसतोय रच्याकने.

पण बटाट्याच्या मोजून ५ काचर्‍या?

यानिमित्ताने एक अविस्मरणीय जेवण आठवलं.

"लहानपणी" एका छोट्या तालुका गावी एकदा एक तपासणी शिबिर केलं होतं. तिथल्या गुजराती डॉ. साहेबांच्या दवाखान्यात शिबिर होतं अन नंतर जेवणाची सोयही त्यांच्या घरी होती.

आधीच गुजराती गोड जेवण. मला गोडाच्या चवीची सवय असली तरी माझ्या सोबतच्या मित्रांना नव्हती. प्लस, पावणेचार इंच व्यासाचे फुलके, अन आग्रह करून चहाच्या चमच्याने वाढलेली (म्हणजे, और देउ? विचारत) काकडीची भाजी.

३-३ फुलके भरपेट खाऊन तिथून उठलो. परतीच्या प्रवासासाठी गावाबाहेर निघून हायवेवर लगेच एका ढाब्यावर गाड्या लावून 'जेवण' केलं.

ते मोबाईल वरून फोटो अपलोड केल्याने दोनदा पोस्ट झाली. ताट सासऱ्यांसाठी वाढले होते. हे सुद्धा त्यांना जास्त होत. नुकतेच आजारातून उठलेत.

ते मोबाईल वरून फोटो अपलोड केल्याने दोनदा पोस्ट झाली. ताट सासऱ्यांसाठी वाढले होते. हे सुद्धा त्यांना जास्त होत. नुकतेच आजारातून उठलेत.

दोन्ही सोबत घेऊ नये असं काही आहे का?
चव की अजुन दुसरे कारण?
कारण मी दही व बटाटे घालून केलेली अंडकरी सुद्धा खाल्ली आहे, कुठे आठवत नाही आता. ठीक होती. बहुतेक कलकत्त्याला किंवा पिलानीला.

वाह मस्त.. खिचड्यासोबत ताक पापड आणि मिरची.. त्या चकत्या मुळाच्या आहेत का?
आजारपणाने तोंडाची चव गेली असल्याने हे जेवण तर सर्वात बेस्ट .. बसतो लगेच ताटावर Happy

दही आणि अंड बरोबर?>>

दोन्ही सोबत घेऊ नये असं काही आहे का?>>

दही आणि अंड याबद्दल माहित नाही पण एक हिंदी कहावत आठवली.
दही, करेला, ककडी और साथ में भुट्टा..
खाकर जो सो गया,
फ़िर जनमभर नहीं उठता...

दुधाचे पदार्थ आणी अंडे/ मासे / मटण/ चिकन crossed food असल्यामुळे एकत्र खाऊ नये असे म्हणतात.

तरीसुद्धा आपण काही crossed food खातो. उदाहरणार्थ बिर्याणीत दही घालणे वगैरे. पण सवय नसल्यास ती कल्पनाही सहन होत नाही. मी सुद्धा अंडे आणी दही एकत्र खाऊ शकणार नाही.

बाजरी खिचडा,

<<

बाजरीची खिचडी यन्दा झाली नाहिये अजून

दुधाचे पदार्थ आणी अंडे/ मासे / मटण/ चिकन crossed food असल्यामुळे एकत्र खाऊ नये असे म्हणतात.
>>> मिथ ... चिकन बर्गर वर मिल्कशेक खूप कॉमन आहे आम्रविकेत ...

मला वाटतं जर आपले आई बाबा, आज्जी आजोबा पहिल्यापासून दूध आणि मासे खात आले असतील तर आपण खाल्ल्याने काही होणार नाही.. ते पचवण्याची क्षमता आपल्यात येत असावी

नवर्‍याच्या बाजूचे खूप नातेवाईक पक्के कोकणी मासेखाऊ आहेत. ते कधीच मासे आणि दुधाचे पदार्थ एकत्र खात नाहीत.

मासे,मटण दुधाबरोबर खात नाहीत.आयर्वेदानुसार तो विरुद्ध आहार समाजाला जातो.
पण दही, मटणा सोबत खाऊ शकतो किंवा मटण त्यात मुरवू शकतो.
लहानपणी दूधभात ,मासे आवडीचे होते.मोठेपणी कढीभात आणि तळलेले मासे! इथे कढी म्हणजे सोलकढी फक्त.

Submitted by आ.रा.रा. on 15 January, 2022 - 20:43>>>> हे हे , सेम किस्सा माझ्यासोबत पण घडलाय. Lol

अश्या किश्यांच्या एक धागा काढायला हवाय

आरारा, सारखा अनुभव अगदी आता परवाच्या दिवशी आला *पुण्यात*. एक तर अति गोड आळुचं फदफद. कोशिंबीरीच्या चमच्याने बटाटा भाजी वाढत होते. कोशिंबीर चटणीसाठी कोणता चमचा असेल सांगायला नको.हि.चटणी रंगाला फक्त हिरवी मिरची नव्हतीच कंचे/गोट्या एवढे गुजा. दोन भजी व पुरी पहिल्या वाढेला नंतर एकेक वाढत होते.... घरी आल्यावर कोरडी भेळ करून खाल्ली.

दही अंडे हे विरुद्ध अन्न आहे. आणि आता बरेच जण सरसावतील ह्यांव रेसीपीत काय करतात आणि त्यांव. ... वगैरे सांगायला. खावूनच पहावे व अनुभव लिहावे स्वतःचे.
बाकी तुमची मर्जी.
पण बंगाली अंडे आणि कच्च दही दूध नाही खात, इतकी वर्षे पाहिलेय. वर काही बधले नाही तरी, योग्य नाही असा आहार.
आणि मिश्र घटकाचे पदार्थ अथवा प्राणिजन्य प्रथिने मध्ये, वापरलेले तेल हे बहुधा राईचे असते. राई तेल ह्याची प्रक्रिया हा एक वेगळा विषय आहे. आणि जर थोडे फार केमिकली जाणूनच घ्यायचे असेल तर, त्या पदार्थाचे घटक, त्याची रासायनिक क्रिया व शिजवण्याची प्रक्रिया आणि तुमच्यात असलेले एन्झायम्स ह्याने पचन होते.
लोकांना तर राईचे तेल सुद्धा पचत नाही. असो.

Pages