Submitted by ऋन्मेऽऽष on 30 May, 2021 - 09:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा
क्रमवार पाककृती:
१. आपल्या आवडीचा कुठलाही खाद्यपदार्थ बनवा.
२. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
३. फोटो काढा
४. अपलोड करा
मगच त्यावर तुटून पडा Happy
फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556
आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/77265
हि सुद्धा तशीच तुडुंब भरू द्या
वाढणी/प्रमाण:
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
हे घरच्याच ख्रिस्तमस्त आणि
हे घरच्याच ख्रिस्तमस्त आणि हॅप्पी न्यूयर सेलिब्रेशनसाठी केलेले केक..
.
.
सुंदरच. प्रो एकदम प्रो
सुंदरच. प्रो एकदम प्रो
सुंदर केक !
सुंदर केक !
छान M वर शिंगे अप्रतिम आहेत
छान
M वर शिंगे अप्रतिम आहेत
सुरेख, छान, सुंदर, केक दिसत
सुरेख, छान, सुंदर, केक दिसत आहेत
अमुपरी- अशी थाळी खाऊन वर्ष
अमुपरी- अशी थाळी खाऊन वर्ष झालं
वरचे केक्स मस्तच.. बनवायला किती आवड आणि स्किल्स लागतात हे कळालंय
ताट मस्त.
ताट मस्त.
केक नेहमीप्रमाणेच भारी
हे हलव्याचे दागिने घरी बनवलेले. हलवा पण घरी बनवलाय. काही दिवसांपूर्वी फोटो टाकले होते.
वाकी, चिंचपेटी, नेकलेस, बिंदी, मंगळसूत्र, झुमके, बांगड्या
Cakes as usual awesome !
Cakes as usual awesome !
हलव्याचे दागिने छानच
१००० वा प्रतिसाद. दागिने
१००० वा प्रतिसाद. दागिने मस्त!
मस्त दागिने
मस्त दागिने
खुप छान आहे दागिने आणि केक
खुप छान आहे दागिने आणि केक
मेधावि मस्त झालेत दागिने..
मेधावि मस्त झालेत दागिने..
मस्त आहेत हलव्याचे दागिने. हा
मस्त आहेत हलव्याचे दागिने. हा नेमका काय प्रकार असतो हे आज मला समजले. ते सुद्धा या धाग्यावर आले म्हणून गूगाळून चेक केले
केक प्रतिसादांचे आभार.. ऑर्डर घेत असल्याने घरी स्वत:साठी बनवलेले केक सुद्धा तसेच मन लाऊन केले जातात जेणेकरून त्याचे फोटो काढून जाहीरात करता यावी
ऑर्डर घेणे सुरू केले, छानच!
ऑर्डर घेणे सुरू केले, छानच!
पुढे ऋप बेकरी काढा.
खूप सुंदर आणि प्रो आहेत
खूप सुंदर आणि प्रो आहेत हळव्याचे दागिने
केक्स अप्रतिम व yummy
आले का फोटो हलव्याच्या
आले का फोटो हलव्याच्या दागिन्यांचे? आजच आठवण आली होती मला.
मेधावि, हलव्याचे दागिने सुरेख
मेधावि, हलव्याचे दागिने सुरेख!
उदयगिरी, तुमचे वैदर्भीय पदार्थ खासच! सांभारवडी झाली की नाही ह्या सिझनची?
केक व बाकीचे सगळे पदार्थ मस्तच!
दर गुरूवारचं बल्क कुकिंग..
दर गुरूवारचं बल्क कुकिंग.. आता पुढचे दोन दिवस मी भटकायला मोकळे
विदर्भ स्टाईल मेथीचे आळण (मी विदर्भातली नाही)
पंजाबी पनिर मख्खनवाला (मी पंजाबची पण नाही)
दिल्ली स्टाईल पालक पनिर (मी दिल्लीची पण नाही)
मालवणी अंडा मसाला (मी मालवणची पण नाही)
वरच्या मेथीच्या आळणातल्या उरलेल्या मेथीचे थेपले जे उद्या बनवणार (अरे हो, मी गुजरातची पण नाही)
आणि वाफळलेला भात किंवा गरम तव्यावरच्या गरमागरम चपात्या
(तेच ते पोळ्या) ह्या आयत्या वेळेस बनवल्या जाणार
हे किती दिवस खायचे
हे किती दिवस खायचे
नावे 4 , भांडी 5
नावे 4 , भांडी 5
जोड्या जुळेनात
उद्या आणि परवा
हे किती दिवस खायचे >> उद्या आणि परवा
मेथी पराठ्याण भिजवलेली कणिक
मेथी पराठ्याण भिजवलेली कणिक
सध्या ज्वारी बाजरी नाचणी मेथी
किती हुशार हो, आमचे डोकेच नई चालले
सध्या ज्वारी बाजरी नाचणी मेथी लाडू प्रयोग आणि उकड प्रयोग सुरू आहेत
लाडू पीठ भाजून खमंग होतील की भाकरी करून चुरमा करून?
कधीकधी आंबील , उकड नेता येईल डब्यात , रात्रीही मस्त दाट आंबील 15 मिनिटात होते व पोटही भरते
कधीतरी जेवण म्हणून लाडूच खावेत , दिवसाही डब्यात एक सलाड व दोन लाडू नेता येतील.
अमच्याकडे एका बेकरीत मेथी लाडू मिळतात , 10 रु ला 1 , मस्त असतात , नुसते बेसन / तांदुलपीठच नसते तर मेथीही बर्यापैकी असते , कडवट लागतात , पण चवदार असतात
दिवसा जड जेवण झाले की रात्री फक्त एक मेथी लाडू बॅलन्स होईल
अरे वाह ईथे तर दावत आहे...
अरे वाह ईथे तर दावत आहे... आपापल्या घरातून चपात्या आणा आणि तुटून पडा सत्ते पे सत्ता सारखे
म्हाळसाक्का, मेथीच्या आळणाची
म्हाळसाक्का, मेथीच्या आळणाची पाकृ द्या प्लिज.
मेथीच्या आळणाची पाकृ द्या
मेथीच्या आळणाची पाकृ द्या प्लिज.>> मधुराची रेसिपी
https://youtu.be/eLTxvvvN3W8
आपापल्या घरातून चपात्या आणा आणि तुटून पडा सत्ते पे सत्ता सारखे>> नको नको.. हे चार वेळेचं जेवण आहे
दर गुरूवारचं बल्क कुकिंग..
दर गुरूवारचं बल्क कुकिंग.. आता पुढचे दोन दिवस मी भटकायला मोकळे Proud >> वीकएंड मिल प्लॅन मस्तच, म्हाळसा ! फोटुही आवडला. माझे soccer mom days आठवले.
भारी बेत आहे.
भारी बेत आहे.
आळण शब्द मला गमतीदार वाटतो (मी विदर्भात लहानाचा मोठा झालो तरी.) आलम सारखा. मेथी का आळण मैं क्या खिलाऊ तुम्हे असं काही डोक्यात येतं मेथीचे आळण ऐकलं की.
माझे soccer mom days आठवले >>
माझे soccer mom days आठवले >> माझेही येतीलच लवकर ते दिवस पण सध्या माझेच बॅडमिंटन डेज चालू आहेत त्यामुळे दर गुरूवारचा घाट
आळण शब्द मला गमतीदार वाटतो (मी विदर्भात लहानाचा मोठा झालो तरी.)>> मी खरं तर ह्याला आंबट पिठलं म्हणते.. मला आवडतं विदर्भातलं जेवण.. तिखट तेलकट झणझणीत
Pages