वेबसीरीज २

Submitted by sonalisl on 2 June, 2021 - 19:58

तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा वेबसीरीज. ( https://www.maayboli.com/node/65774 ) या धाग्यावर सुरू झाली. आता तिथली प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हेलबाऊंड आमच्याघरी बायको बघत असते. मी पाहिला एक एपिसोड. स्टोरीलाईन कळली. काहीतरीच वाटले. त्यानंतर नाही पाहिली. तरी घरात चालू असल्याने मध्येच आवाज वाढला की नजर टीव्हीवर जातेच. बघावे तेव्हा हिंसाचार, अत्याचार, नैराश्याने भारलेले वातावरण.. लोकं कसे बघतात हे देव जाणे.
स्क्विड गेम आवडलेली. कल्पक वाटलेली. पुढे काय याच्या उत्सुकतेने दोन रात्रीत संपवलेली.

त्यातली मुख्य घटना पाहता रहस्य असायला स्कोप असेल असं वाटत नाही.
कोणत्याही मानवी कंट्रोल शिवाय कोणा सोबतही घडणाऱ्या घटनेशी लढल्या सारखं स्वतःला वाटून घेणे असं काही पाहणं हेच आताच्या काळात निराशाजनक आहे.

त्यापेक्षा सरळ ईव्हील डेड वगैरे बघावा.त्यात भुतांच्या हवेलीत जाऊन स्वतः सीडी ऐकल्या शिवाय आणि पुस्तक वाचल्या शिवाय काहीही त्रास नाही आम जनतेला Happy

अरे Inside Edge 3 वर एकपण पोस्ट नाही?
मी गेल्या वीकांताला बिंज वॉच केला आख्खा सीझन Happy

अरे Inside Edge 3 वर एकपण पोस्ट नाही?
>>>>
क्रिकेटवर आहे ना?
त्यामुळे परवा आम्ही सीजन १ चा एपिसोड १ बघायला गेला तर पहिल्याच सीनमध्ये वेगळाच गेम चालू होता.. घाईघाईत बदलावे लागले..
अश्लील सीन आणि शिव्या वगैरे आहेत का त्यात? कारण आम्ही टीव्हीवर बघतो. तसे असेल तर रात्रीच बघता येईल

सध्या मी "life tak" या youtube चॅनेल वर शॉर्ट stories बघते आहे. 5-7 मिनिटाच्या क्रिस्प गोष्टी असतात... Women empowerment, समाजातल्या चुकीच्या रूढी परंपरा वगैरे आधारित गोष्टी. वेगळे चेहरे, व्यवस्थित सादरीकरण यामुळे ते एपिसोडस बघून छान फ्रेश वाटत.

माउस नावाची आणखी एक खतरनाक भारी कोरियन सिरीज पाहिली नुकतीच जी मला स्क्वीड गेमपेक्षा सरस वाटली. दुसरा सीजन कधी येतोय असे झालंय.
https://www.imdb.com/title/tt13634792/

स्काय कॅसल
आंतरजालीय मैत्रीण भावना ने ही कोरियन सिरीज सुचवली.एका अतिशय प्रतिष्ठित डॉक्टर्स च्या कॉलनी मधल्या 4-5 कुटुंबांची ही कथा.प्रत्येक पालकाची एकच इच्छा आहे की आपलं मूल एका प्रतिष्ठित मेडिकल कॉलेजमध्ये जावं.घराण्याची परंपरा चालू राहावी.आणि त्यासाठी ते वेगवेगळ्या प्रकारे काय वाट्टेल ते करायला तयार आहेत.यात अशी एक घटना घडते की सगळे आपल्या आयुष्यातले निर्णय, आपले विचार तपासून काही बदल करतात.

अजून हिंदी/इंग्लिश ऑडिओ नाही.फक्त इंग्लिश सबटायटल आहेत.पण मला ही सिरीज भारतीय सोसायटी,कल्चर च्या खूप जवळची वाटली.

कोणी prime वर Blindspot बघितली आहे ?
बर्यापैकी timepass आहे. Fast आहे.
मी सीजन 1 वरच आहे.

अरण्यक काल माझ्या बायकोने एका दिवसात संपवली. मी आजारी असल्याने बघितली नाही. पण एका दिवसात संपवली म्हणजे बोअरींग नसावी. माझ्या अध्येमध्ये नजरेवर पडले त्यानुसार आधा तेंदुआ आधा आदमी असे काहीतरी अमानवीय सस्पेन्सही होते.

हो. जी थोडीफार पाहिली मलाही बरी वाटली. रवीना टंडन सुद्धा छान वाटली. एकेकाळी गोविंदा सोबत ओवरॲक्टींगचे दुकान उघडले होते तिने. पण काल तिने घेतलेले बेअरींग पाहून सत्ता चित्रपट आठवला. त्यात छान काम होते तिचे.

काल आर्या २ पाहीली.. दुसरा सिझन मस्तच झालाय.. शेवटपर्यत पकड कायम राहते... अगदी १० सेकंद पण फॉरवर्ड नाही करवत..
Money heist लास्ट सिझन पण जबरदस्त... Well deserved ending..

आर्या बघितली. आवडली. सगळ्यात काय आवडलं तर एकदाही चंद्रचूड सिंग (शेवटी गालबोट लागलं) बडे अच्छे करत दिसतं नाही. शेवटचे काही एपि. अगदी predictable स्टोरी आणि ट्विस्ट होतात. पण रात्री ३ पर्यंत बघून संपवाविशी वाटली यातच काय ते आलं.

अरण्यक चालू केली पण नर तेंदुआ वरून काही होईचना. आणि गरज नसताना complicate करायची म्हणून एकदम १० गोष्टी एकमेकांत दाखवायच्या स्टाईल वापरली आहे. जी नीट वापरली तर आवडते, पण इथे कशाचा पत्ता नाही वाटू लागलं. बघू नंतर परत बघाविशी वाटली तर.

हो अमितव, पहिले २ एपिसोड जरा गोंधळ होतो. नंतर छान घेतली आहे सीरिज. जमल्यास पूर्ण बघा. मी अजून ५वा एपि बघतेय. आता जरा वेग घेतला आहे

Mare of easttown ची कॉपी आहे म्हणत आहेत लोक. मी ती सीरिज नाही पाहिली पण आरण्यक चांगली आहे.
नेक्स्ट सीजनसाठी लूज एण्डस् सोडले आहेत.
आर्या बघत होते पण बहुतेक पहिला सीजन परत बघावा लागेल. इतकी कॅरेक्टर्स आहेत, त्यांचे उल्लेख आहेत की काही लिंक लागत नाही.

Inside edge 3 & आर्या 2- चांगल्या जमलेल्या आहेत.
IE3 - खेळाभोवतीचे बदलते राजकारण मस्तच दाख्वले आहे . सगळी characters ,चांगली जमलीयेत.. एक गोष्ट फक्त खटकली म्हणजे विवेक ओबेरॉय कुठेही कधीही कुठल्याही मिटींगमध्ये दार ढकलून पोहोचतो...
आर्या .. dirty game of power & money continues... With some more twists n turns in storyline .

Inside edge 3 & आर्या 2 --- दोन्ही बघायच्या आहेत . blindspot मध्ये अडक्लेले . त्याचा सीजन १ संपला . आता आर्या २ बघायला घेईन .

ऍमेझॉन प्राईम वरची 'द मॅन इन हाय कॅसल' पण मस्त आहे.फिलीप के. डिकच्या त्याच नावाच्या कादंबरीवर आधारित ही मालिका, दुसऱ्या महायुद्धाचा परिणाम वेगळ्या प्रकारे झाला असता तर जग कसे दिसेल या विषयी आहे.
या डायस्टोपियन परिस्थितीत, अक्ष शक्तींनी युद्ध जिंकले, ज्यामुळे युनायटेड स्टेट्सचे तीन भाग झाले, एक भाग जपानी नियंत्रित, नाझी-नियंत्रित विभाग आणि दोघांमधील बफर झोन.
हिटलरच्या मृत्यूनंतर त्याचा वारसदार कोण होणार याविषयी वाद चालू आहेत. आणि जपान आणि जर्मन govt मध्ये पण एकमेकांवर कुरघोडी करायचा प्रयत्न चालू आहे.अमेरिकन नागरिक दुय्यम नागरिकांसारखे वागवले जाताहेत.आणि काही गट क्रांती करण्याच्या प्रयत्नात आहेत. एका तरुण स्त्रीला एक रहस्यमय चित्रपट सापडला ज्यामध्ये निरंकुश राजवटी पाडण्याची गुरुकिल्ली असू शकते.
भन्नाट कल्पना आणि तेवढंच सुंदर चित्रण आणि दिग्दर्शन Season1Promo.jpg

blindspot मध्ये अडक्लेले . त्याचा सीजन १ संपला . - मस्त आहे Blindspot . 3 seasons तर आहेतच मस्त.. नंतर नीट पाहिली नाही.. आता पाहते 4th पासून.

Blindspot बघायला सुरुवात केलेले भारतात असताना. त्या बाईच्या अंगावर टॅटू असतात आणि प्लॅन असतो तेच ना? भारता बाहेर दिसत नाही. Sad

अरण्यक सुरु केलीये. ट्रेलर पाहून संजय कपूर च्या प्राइम वरच्या वेबसेरीज ची आठवण आली, ती पण पहाडी आहे.

कोरियन माउस दिसत नाही भारताबाहेर Sad

'द मॅन इन हाय कॅसल' मागे कधीतरी सुरवात केलेले पण सोडून दिली मधेच.

टेलिग्राम वरून डाउनलोड करून fringe ( ५ सिझन) संपवली. अचाट आणि अतर्क्य आहे पण कल्पनाशक्ती तुफान आणि वेगवान आहे.

नेटफ्लिक्स वर cowboy bebop ही एका जापनीज ऍनिमेटेड सिरीज वरून काढलेली ( हे नंतर कळालं कारण ऍनिमेटेड पण उपलब्ध आहे ) नॉर्मल सिरीज पहिली . मजा आली.

प्राईम वर व्हील ऑफ टाईम पाहतोय. स्लो आहे ..बघू पुढे काय होतंय.

प्राईम वर व्हील ऑफ टाईम पाहतोय >>> नवराही बघतोय ही.

इथे वाचून आर्या दोन भाग बघायला हवा असं वाटलं. पहिला बघितला आहे.

बाईच्या अंगावर टॅटू असतात आणि प्लॅन असतो तेच ना? >>>> हो तीच. पहिला सीजन एकदम हाय नोटवर संपला Happy
यातील सगळे कलाकार आवडले. Team bonding मस्त आहे. Patterson आणि तिचा bf David एकदम बेस्ट.

Pages