वेबसीरीज २

Submitted by sonalisl on 2 June, 2021 - 19:58

तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा वेबसीरीज. ( https://www.maayboli.com/node/65774 ) या धाग्यावर सुरू झाली. आता तिथली प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

The Chestnut Man -> नेट्फ्लिक्स वर सुरु केलि आहे. एक सिरिअल खुनी , खुन करुन तिथे Chestnut चा छोटा पुतळा बनवुन ठेवत असतो आणि त्याचा सम्बन्ध एका महिला नेत्याच्या मुलीशी असतो ( ती गायब असते) . नोर्डिक आहे.

House of secrets the burari deaths ही नेटफ्लिक्स वरची वेबसिरीज कम डॉक्युमेंटरी बघितली.रिव्यु मध्ये जितकी भीतीदायक भयानक सांगत आहे तितकी भीती वाटली नाही कदाचित क्राइम कंटेंट बघून डोळ्यांना सवय झाली आहे.तरीही कमकुवत हृदयाच्या लोकांनी लहान मुलं आणि गरोदर स्त्रियांनी ही सिरिज बघू नका.काही दृश्य ,फोटोज सीन Disturbing आहेत .
बुरारी केस जे क्राइम न्यूज फॉलो करतात त्यांना माहीत असेल.2018 साली दिल्लीतल्या एका कुटुंबातील 11 जणांनी एकत्रितरीत्या आत्महत्या केली .ही केस फार गाजली होती मीडियामध्ये अनेक तर्कवितर्क बांधले गेले होते. पोलिसांनाही गूढ उकळण्यासाठी वेळ लागला होता सगळेच चक्रावून गेले होते.सिरीज या केसमधल्या प्रत्येक भागाची थोडक्यात आणि मीडिया पोलीस सायक्लॉजिकल एक्सपर्ट्स नातेवाईक मित्र यांच्या दृष्टिकोनातून माहिती मांडली आहे .जरी डॉक्युमेंटरी जरी असली तरी तीन तास आपण गुंतून राहतो. ते 11 जणं सुपरनॅचरल आणि अंधश्रद्धेचे बळी आहेत का याची उत्तर थोडक्यात मिळतात.सिरीज रोमांचक आहे पण तीतकीच विचार करायला लावणारी आहे .खरे फोटोज सीसीटीव्ही फुटेज आणि खरे लोकांचे व्हिडीओज दाखवले आहेत आणि बकग्राऊंड स्कोर जो ए आर रहेमान ने दिलाय तो फार परिणामकारक वाटतो 2 पार्ट मध्ये थोडा स्केरीही .स्पेशली ललित च्या वडिलांचा आवाज ऐकताना.

योगायोग म्हणजे आज वर्ल्ड मेंटल हेल्थ डे आहे आणि मेंटल अवेयरनेस ची समाजाला किती गरज आहे हेच यावरून लक्षात येते.

पाहायला चालू केली.
खूप उदासवाणं आहे.
यानंतर अश्या काही केसेस महाराष्ट्रातही पैश्यांच्या कारणावरून घडल्या.
बहुतेक काही लहानपणापासून बाळगलेले न्यूनगंड, काही मेंटल आजारपण(स्किझोफ्रेनिया वगैरे) यातून बुरारी केस घडली असावी.

मी स्क्विड गेम्स च्या धक्क्यातून अजून बाहेर आलेलो नाही
भयानक सुन्न करणारा प्रकार आहे
कितीही जरी त्याला व्हॅलेंटारी म्हणलं तरी अमानवी आहे हे

House of Secrets मी पण पाहून संपवली. मी कधीच वाचले नव्हते या घाटनेबद्दल. पण पाहून मन सुन्न झाले. या फॅमिलीतील एकाला पण कधीच काही प्रश्न पडले नाहीत ? आणि पडले असले तरी मनावर इतका धाक होता कि बाहेर कुणाला याबद्दल कधीच सांगितले नाही. त्यांना कसा विश्वास होता कि आपण यातून वाचणार आहोत ? का मग त्या ललितने सर्वांना मारले व नंतर स्वतःला ? आणि याबद्दल डोकमेंटरीत सांगितल्याप्रमाणे खूप कमी चर्चा झाली का ? यातील वडिलांच्या आवाजातले सीन अंगावर काटा आणतात.

मला हाही प्रश्न आहे की जो एक surviving भाऊ होता त्याला काहीच कल्पना नव्हती का की ह्या घरात काय चालले आहे ?

ह्याच्या आधी the maid हि पाहून संपवली. ती पण डिस्टरबिंग होती. डोमेस्टिक abuse ही इमोशनल abuse ही असू शकते हे कित्येक स्त्रियांना माहीतही नसते. हे गव्हर्नमेंट बेनेफिट्स घेणार्यांना आपण खूप जज ही करत असतो.

असो दोन हेवी सिरीज बघून आता डोक्याचे भजे झाले आहे, आता एखादी कोरियन सिरीज पाहावी म्हणते.

Maid चे अजून २-३ भाग पाहायचे राहिले आहेत पण त्या अ‍ॅलेक्स ची धडपड जबरदस्त दाखवली आहे. त्यामुळे पाहताना खूप वेळा वाईट जरी वाटले तरी तिचे सतत चाललेले प्रयत्न, अपयश, पुन्हा उठून उभे राहणे वगैरे एकदम ग्रिटी वाटते. मी आधी रेकमेण्ड केलीच होती वर पण पुन्हा एकदा रेको.

बाय द वे त्यातली तिची आई (अ‍ॅण्डी मॅक्डॉवेल) ही त्या अ‍ॅक्ट्रेसची खरी आईच आहे. तिचा "ग्राउण्डहॉग डे" मधला रोल छान होता. तो चित्रपटही पाहिलेला नसेल तर पाहा.

>> या फॅमिलीतील एकाला पण कधीच काही प्रश्न पडले नाहीत ?<<
आत्तापर्यंत २ एपिसोड्स पाहिले; यावर माझं मत -
१. लार्जर कांटेक्स्टच्या नजरेतुन बघाल तर हि केस सायकलाजिकल आहे. ललित नीडेड हेल्प; पण आपल्या भारतीय मानसिकतेच्या चौकटित ते बसत नाहि.
२. माझ्या मते हि मास सुसायडची केस नाहि. मर्डर केस आहे. ललित आणि त्याची बायको मर्डरर आहेत, आणि बाकिचे विक्टिम्स.
३. २००७ पासुन चाललेल्या ब्रेनवॉशिंगला घरातल्या कोणालाहि त्यात काहि वावगं वाटलं नाहि, कोणिहि विरोध केला नाहि, हि खरी शोकांतिका आहे.
४. बॉटम लाइन - नोबडि वाँटेड टु डाय, इन्क्लुडिंग ललित्/टिना (आय गेस), दे जस्ट फेल्ड टु सी व्हॉट इज कमिंग...

आरती, कोरीअन पहा पण स्क्विड गेम पाहू नको. पोळी होईल डोक्याची. Happy >>>

हो सुनीती सध्या तरी तो शो पाहायचा मूड नाही. जरा हलकाफुलका रोमान्स बघीन...

राज -- परफेक्ट लिहिले आहे. Point 4 तर अगदीच बरोबर.. no one wanted to die.. कहितरी वेगळंच चाल्लेल त्यांच्या मनात..
ते हवन..घराचं रिनोवेशन, ११ पाईप्स.. विचित्र सगळं..
समाजात सगळीकडे वावरून पण इतका disconnect !!
अतिशय भयानक , सुन्न करणारी ,spine chilling अशी docuseries. आहे House of secrets. रियल फोटोज आणि शूटिंग काही भागात दाखवले आहेत तर बघताना खूप डिस्टर्ब होतो आपण.

अतिशय भयानक , सुन्न करणारी ,spine chilling अशी docuseries. आहे House of secrets.
+१
जेंव्हा २०१८ ला ही बातमी ऐकली होती तेंहा जे प्रश्णचिन्ह उभं राहिलं होतं ते क्राईम पॅट्रोल पाहिल्या वर थोडं कमी झालं होतं पण ही डॉक्युमेन्टरी पाहिल्या वर त्या आठवणींना उजाळा मिळाला. खूप भयानक आणि डिप्रेसींग आहे ते सगळं. वडपूजा हा शब्द त्या कॉन्टेक्स्ट मधे घॄणा उत्पन्न करतो.

त्या कुटुंबातील १ सून एम ए इन सायकॉलॉजी होती असे डॉक्युमेन्टरीत सांगितले आहे. >>>> सायकॉलॉजी नाही त्यातली सून टीना मास्टर डिग्री इन socialogy होती.
सायकॉलॉजी शिकली असती तर तिने कदाचित ललित ला सायकायट्रिस्ट कडे नेलं असतं,स्पेशली त्याच्यावर हल्ला झाल्यावर कोणीतरी सायकायट्रिस्ट कडे जाणे सुचवलेले पण असते. शेवटी काय आंधळ्या विश्वासापुढे शिक्षण डिग्र्या गहाण पडतात.

एखादी नवीन वेबसिरीज सुचवा. Prime , Hotstar किंवा sonyliv
Bates motel बघून भांजाळले आता मेंटालिस्ट रिपीट करतेय काही चांगले मिळेपर्यंत

गुड डॉक्टर बघ
बेटस मोटेल वर उतारा.
ती सुपर मार्केट पण बरी वाटतेय ट्रेलर बघून.

Hotstar - This is US , Big Little Lies
Netflix - Unbelievable, The Spy , Caliphate, Hit & Run
Amit london comedy, son of Abish
Amazon prime - Patal lok, Family man, four more shots please, Blindspot , Tandav

हाऊस ऑफ सिक्रेट्स पाहिली.
या बद्दल बातमी ऐकली होती पण नंतर काय झाले ते वाचले नव्हते. मालिकेत भिती वाटावी अशा पद्धतीने घेतलं नाहिये पण ती घटनाच अतर्क्य, विचार कुंठीत करणारी आहे त्यामुळे पहाताना थंडथंड, सुन्न, भयानक, गूढ असं काहीतरी वाटत रहातं.
मला एक सांगा, वर तुम्ही ललितच्या वडिलांच्या आवाजाबद्दल लिहिले आहेत तो आवाज भितिदायक आहे नक्कीच पण खरा त्यांचा आवाज नाही ना? माझं काहीतरी सुटलं का पहायचं? मला वाटले तो पत्र वाचायला कोणत्या दुसर्‍या माणसाचा आवाज आहे. बरोबर ना? खतरनाक आवाज काढलाय त्याने.

आम्ही सुद्धा स्क्विड गेम संपवली. काल आणि आज दोन नाईट मध्ये... जबर्रदस्त होती.
संजय दत्त आणि ईमरान खानचा लक पिक्चर आठवला. कन्सेप्ट सेम म्हणून. बाकी तुलना होऊ शकत नाही.
फक्त वॉईलन्स असल्याने पोरांसमोर बघता येत नव्हती. आणि ऊत्सुकता ईतकी की थांबताही येत नव्हते.
बायकोला अध्येमध्ये एकेकाचे वागणे आणि बदलते रूप पाहून, तसेच पुढे काय घडणार याची कल्पना येताच टेंशन यायचे.
पण मला पुढे काय कसे घडणार हे गेस करायला मजा आली. हुमायून नेचरचे बरेच कंगोरे आढळले. आणि अभिनयाचा दर्जा ऊत्तम असल्याने पोहोचलेही.

सद्ध्या द मेड बघत आहे, संकटांवर संकटं येऊन ही सतत पुढे कसं चालत रहावं याचं छान उदाहरण. ह्याचा शेवट चांगला आहे असे ऐकले म्हणुन च पाहत आहे.

मला वाटले तो पत्र वाचायला कोणत्या दुसर्‍या माणसाचा आवाज आहे. बरोबर ना?>>>. हो. सादरीकरण आणि चित्रं खरी आहेत, शेजारी/मित्र खरे आहेत. जिवंत उरलेल्या भावाचा फेस ब्लर केलाय. ती डायरी पण खरीच आहे, आवाज धीरगंभीर आणि खोल परीणाम करणारा आणि म्हणुनच भितीदायक वाटला.

सर्वात वाईट त्या लहान मुलांचं वाटतं.>>+१

सायकॉलॉजी नाही त्यातली सून टीना मास्टर डिग्री इन socialogy होती.>> ओह्ह मी चुकीचे ऐकले. तरी सोशल वगैरे सगळं असुन ही बोंब च होती सगळी...

स्पॉयलर
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.

.

.

.
.

.

.

पण इतक्या सुशिक्षित माणसांना खरंच वाटलं की आपण 15 मिनिटांनी ठणठणीत जिवंत होऊ(तेही व्यवस्थित हात पाय तोंड गच्च बांधून, स्टूल लाथाडून वाचण्याचे सर्व मार्ग स्वतः बंद करून.)इतकी युनिटी आपल्या कुटुंबातल्या 2 मेम्बर मध्ये तरी दिसते का?11 सोडाच. त्याने सर्वाना पाण्यातून काहीतरी ड्रग दिलं असेल ट्रेसेस मिळणार नाही असं.

मला वाटतं कुटुंबातल्या एका माणसाला जास्त महत्व मिळत नसल्याने, कायम ट्रॉमा जन्य परिस्थिती असल्याने त्याने अटेंशन सिकिंग आणि महत्व मिळवण्याचा हा टोकाचा मार्ग शोधून काढला.

पण इतक्या सुशिक्षित माणसांना खरंच वाटलं की आपण 15 मिनिटांनी ठणठणीत जिवंत होऊ(तेही व्यवस्थित हात पाय तोंड गच्च बांधून, स्टूल लाथाडून वाचण्याचे सर्व मार्ग स्वतः बंद करून.)इतकी युनिटी आपल्या कुटुंबातल्या 2 मेम्बर मध्ये तरी दिसते का?11 सोडाच. त्याने सर्वाना पाण्यातून काहीतरी ड्रग दिलं असेल ट्रेसेस मिळणार नाही असं.>>>
मलाही तसेच वाटतेय. नाही तर कितीही झालं तरी अगदी जीव जाताना पण त्यांना काहीच धडपड करावीशी वाटले नसेल का?
प्रत्यक्ष त्या रात्री काय घडलं कळणारच नाही.

पोस्ट मॉर्टेम मध्ये सर्वांच्या पायांना खरचटणे/जखमा आहेत(सुटण्या साठी किंवा जीव जाताना झालेल्या स्ट्रगल च्या)
असं त्यावेळी वाचल्याचं आठवतं.
(मी खूप क्रिपी लिहितेय.आता मृतांचा मान ठेवून थांबते.)

Pages