Submitted by sonalisl on 2 June, 2021 - 19:58
तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा वेबसीरीज. ( https://www.maayboli.com/node/65774 ) या धाग्यावर सुरू झाली. आता तिथली प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा..
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पाहतेय mumbai diaries.. पण
पाहतेय mumbai diaries.. पण नाही आवडली..
अजून दोन भाग बाकी आहेत.. पुढे बघेन का.. माहीत नाही..
वुट वर crackdown ही सिरीज
वुट वर crackdown ही सिरीज कोणी पाहिली का? काल याचे दोन भाग बघितले आणि जरा बरी सिरीज वाटली. अजून पुढचे भाग पहायचे आहेत.
श्रेया पिळगावकर अभिनयाबाबत आईवर गेलीय हे पाहून जरा बरे वाटले. वडीलांवर गेली असती तर ....
लिटिल थिंग्ज आणि कोटा फॅक्टरी
लिटिल थिंग्ज आणि कोटा फॅक्टरी चे पुढचे सिझन येतायत !!
Zoo बघितली आहे का कोणी
Zoo बघितली आहे का कोणी नेटफ्लिक्स वर??
श्रेया पिळगावकर शिल्पा तुळसकर
श्रेया पिळगावकर शिल्पा तुळसकर सारखी दिसते का? मला तर वाटलं तसं
crackdown पुर्ण बघितली. पहिले
crackdown पुर्ण बघितली. पहिले दोन चार एपिसोड सोडले तर नंतर बंडल वाटली. रॉ सारख्या एजन्सीच्या चिफ कुठल्याही मुलीशी चौकशी न करता लग्न करतो आणि दुसर्या मुलीबरोबर भानगड करतो असे दाखवले आहे. तसेच रॉ चिफची भाषा बरीच शिवराळ दाखवली आहे हे बरोबर वाटत नाही. उगाचच ओढून ताणून हे जुळवल्यासारखे वाटते.
हो बरोबर
हो बरोबर
मी आठवत होते ही कोणासारखी दिसते ते.
झू चे दोन सिझन बघितले. बरी
झू चे दोन सिझन बघितले. बरी आहे.
क्लिकबेट बद्दल इथे चर्चा
क्लिकबेट बद्दल इथे चर्चा झालेली का? टोटल बिंजवर्दी आहे. एकदम आवडली.
हो किंचित चर्चा झाली की.
हो किंचित चर्चा झाली की. मलापण आवडली होती.
Zoo बघितली आहे का कोणी
Zoo बघितली आहे का कोणी नेटफ्लिक्स वर??>>>>> बरी आहे पण खुप लाबंवत आहे म्हणून तीन सिझन नंतर बघणं बंद केलं त्यापेक्षा स्क्विड गेम बघा जबरदस्त आहे शेवट पर्यंत खिळवून ठेवते
बेटस मॉटेल बघतेय . डार्क आहे
बेटस मॉटेल बघतेय . डार्क आहे पण एन्गेजिन्ग आहे.
फ्रेडी हायमोअर ची ही दूसरी सिरिज ब्घतेय . तो चांगला अॅक्टर आहे पण ईथेही मर्फीचाच भास होतो . hope, त्याने वेगळ्या टाईपच्या भूमिका केल्यात .
Norma is extremely attractive.
बाकीचे कलाकार पण आवडले .
त्याला बेटस संपल्यावर लगेच
त्याला बेटस संपल्यावर लगेच गुड डॉक्टर मिळाली
त्यामुळे थोडा प्रभाव असेल
त्याच्या लहानपणीच्या वेगळा रोल वालया कलाकृती आहेत.
क्लिकबेट बद्दल इथे चर्चा
क्लिकबेट बद्दल इथे चर्चा झालेली का? टोटल बिंजवर्दी आहे-> हो पण बेसिक चुक वाटली मला. पण ट्विस्ट्स मुळे बिंजवर्दी झालि आहे.
कोटा फॅक्टरी चा दुसरा सिझन
कोटा फॅक्टरी चा दुसरा सिझन नेटफ्लिक्स वर आलाय आज.
क्लीकबेट <स्पॉयलर>
क्लीकबेट <स्पॉयलर>
एका एपिसोड मध्ये ती बहीण एकदा स्वतःच पेज रिफ्रेश/रिलोड करुन व्हिडिओ व्ह्यूज वाढवताना दाखवली आहे ना? ते का ते कळलं नाही. तिचं तिच्या भावावर प्रेम असतं की.
**** क्लिकबेट*********
**** क्लिकबेट**********स्पॉयलर***
व्हूज वाढवायला रिफ्रेश नाही ना करत? अँक्शिअस असल्याने परत बघुन काही क्लू मिळेल अशासाठी करते असं मला वाटलं.
बेसिक काय चुक बब्बन?
त्याला बहिणीला रात्री १ वाजता व्हॉईस मेल ठेवून काय सांगायचं असतं ते एक जरा समजलं नाही. पण बायकोच्या रिलेशन बद्दल असावं. त्याला ते कळून दोन वर्षे झालेली. पण एकदा मनावरचा भार हलका करायचा असेल.
क्लीकबेट <स्पॉयलर>
क्लीकबेट <स्पॉयलर>
पण ती ज्या स्पीडने ते रिफ्रेश करते त्यावरुन क्लू मिळण्यासाठी बघत होती असं वाटलं नाही. पण असेल कारण मतभेद असले तरी भावावर तिचे प्रेम आहे.
बब्बन तुमच्या दृष्टीने बेसिक चूक काय होती?
मला तरी असं वाटलं: नवीन नोकरीच्या ठिकाणी नुकतेच जॉईन झालेलो असताना, आपले पर्सनल फोटो/मेसेजेस असलेला फोन कोण असा सहज दुसर्याच्या हातात सोपवेल? अगदी कोवर्कर असली तरी? आणि त्यातून फोन पासकोड लॉक्डही नाही! तसंच त्या काल ओळख झालेल्या कोवर्करला (अगदी आँटीच्या वया/नात्यची वाटली तरी) स्वतःच्या बायकोबरोबरच्या नात्याबद्दल इतक्या लवकर कोण सांगेल. हे काहीही वाटलं.
ही सिरीज नाही पण अॅपल टीव्ही
ही सिरीज नाही पण अॅपल टीव्ही+ वर The Year Earth Changed नावाची डेव्हिड अॅटनबरो चे नॅरेशन असलेली एक साधारण तासाभराची डॉक्युमेण्टरी आहे. खूप इंटरेस्टिंग आहे. लॉकडाउन मुळे एकूणच माणसे बाहेर पडणे बंद झाल्याने प्राण्यांच्या जीवनात पडलेला फरक दाखवला आहे. अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या एरव्ही आपल्या लक्षातही येत नाहीत. जरूर पाहा.
'माझ्यासाठी नवीन' टॅबवर मला
'माझ्यासाठी नवीन' टॅबवर मला वेबसिरीजचा पहिला धागा दिसायचा... हा दुसरा दिसला नव्हता. मी तोच विचार करत होते की वेबसिरीजचा धागा कुठे गायब झाला! म्हणून आज मुद्दाम 'मायबोलीवर नवीन' टॅबवर क्लिक करून पाहिलं, तर सापडला.
असो.
'शांतीत क्रांती' बद्दल : (जरा उशीराच लिहितेय, पण चालवून घ्या.)
कन्सेप्ट, acting आवडलं,
पण प्लस पॉईंट्स इतकेच
बाकी सगळं विस्कळीत DCH चा प्रभाव कुठेही लपवला नाहीये, पण तरी सगळं ओढून ताणून वाटलं मला तरी
एकूण, टोटल गंडलेली सिरीज.
आलोक राजवाडे मला एरवी प्रचंड आवडतो, पण यात बोअर झाला, टोटल ओव्हरacting.
तीन मित्रांची घट्ट मैत्री प्रेक्षकांपर्यंत पोचतच नाही ... लहानपणापासून एकत्र असतात, एकत्र दारू पितात, एकमेकांना शिव्या देतात, म्हणून आपण समजायचं की त्यांच्यात घट्ट मैत्री आहे
तीनही actors ची आताची वयं आणि २००१ साली त्यांनी एकत्र पाहिलेला DCH, याचं गणित जुळवण्यासाठी २००१ सालची ती मुलं दाखवलेली अगदीच लहान आहेत.
DCH चा त्यांच्यावर प्रभाव पडणे, त्यातली प्रीति झिंटा स्वप्नात येणे, हे काहीच त्यात convincing होत नाही
क्लीकबेट <स्पॉयलर>
क्लीकबेट <स्पॉयलर>
मला तरी असं वाटलं: नवीन नोकरीच्या ठिकाणी नुकतेच जॉईन झालेलो असताना, आपले पर्सनल फोटो/मेसेजेस असलेला फोन कोण असा सहज दुसर्याच्या हातात सोपवेल? अगदी कोवर्कर असली तरी? आणि त्यातून फोन पासकोड लॉक्डही नाही! तसंच त्या काल ओळख झालेल्या कोवर्करला (अगदी आँटीच्या वया/नात्यची वाटली तरी) स्वतःच्या बायकोबरोबरच्या नात्याबद्दल इतक्या लवकर कोण सांगेल. हे काहीही वाटलं.+१
आणि ती जी बाइ येते सान्गयाला की माझे त्याच्याबरोबर अफेअर आहे ती त्याला कधी भेटलेली नसते . तो केवळ तिचा कल्पना विलास असतो. तरि ति किती आत्मविश्वासाने सान्गते कि माझे आनि त्याचे अफेअर आहे. पोलिसाना सुद्धा सान्गते . हे नाही पटले.
बेटस मॉटेल बघतेय . डार्क आहे
बेटस मॉटेल बघतेय . डार्क आहे पण एन्गेजिन्ग आहे. >>> भारी आहे ही सिरीज. सायको चित्रपटावर आधारित आहे.
Good doctor season 4 सोनी
Good doctor season 4 सोनी लिववर दोन एपिसोड दिसले.
भारी आहे ही सिरीज. >>> हो .
भारी आहे ही सिरीज. >>> हो . मी आता सीजन तीन पर्यन्त पोचलेय . प्रत्येक वेळी " अरे बापरे , हे जरा जास्तच होतय . झेपत नाहीये " असं वाटतं , पण सोडवत नाहीये .
क्लीकबेट <स्पॉयलर>
क्लीकबेट <स्पॉयलर>
बब्बन, ह्मम. मला सम्हाऊ दोन्ही गोष्टी वावग्या नाही वाटल्या.
त्या Sacramento च्या बाईने कधी न भेटता जीव दिला. एल ए ची ला जे प्रत्यक्षात घडलं नाही ते इतकं इमोशनली जवळचं आहे की घडलंय असच वाटतंय. किंवा तिला त्या निमित्ताने त्याला त्याच्या कुटुंबाच्या जवळ यायचं आहे. इ. इ.
पहिल्या आक्षेपा बाबत, असं सर्रास कोणी देत नाही पण देणारे असतील तर हे ही घडू शकतं. हा एक रेड लाईट आहे.
Lucifer सिरीज कशी आहे ?
Lucifer सिरीज कशी आहे ?
आसा, चांगली आहे असं ऐकलंय पण
आसा, चांगली आहे असं ऐकलंय पण मी नाही पाहिली अजुन.
क्लीकबेट <स्पॉयलर>
क्लीकबेट <स्पॉयलर>
हिंदी सिनेमा सारखे ‘मुझे पता है तुमही गुन्हेगार हो, ऐसा क्यों किया तुमने? अब मै जाकर पुलिस को सब सच बता दुंगा’ असे मध्यरात्री गुन्हेगाराच्या घरी जाऊन(तेही एकीकडून कसाबसा जीव वाचल्यावर आपल्या घरी किंवा पोलिसांकडे जायचे सोडून) सांगणेच मुळी पटले नाही. कोणताही गुन्हेगार जीव घ्यायचा नसेल तरी घाबरून मारून टाकेल.
क्लीकबेट <स्पॉयलर>
क्लीकबेट <स्पॉयलर>
Sacramento च्या बाईने कधी न भेटता जीव दिला.-> हे पटल . कारण तीच पात्र तसे दाखवलय.
ल ए ची ला जे प्रत्यक्षात घडलं नाही ते इतकं इमोशनली जवळचं आहे की घडलंय असच वाटतंय. किंवा तिला त्या निमित्ताने त्याला त्याच्या कुटुंबाच्या जवळ यायचं आहे. इ. इ.->>> पण त्याच्या बाबतीत एवढे होउनही ( तो मेलाय आणि काय परिस्थीतित ) ती त्याच्या बहिणीला आणि पोलिसाना सान्गतान तरी खर सान्गाव ना.
sonalisl -> त्याला कदाचित विश्वास नसेल की ती असे करु शकेल. ती काही सराइत गुन्हेगार नसते .तु अस का केल हे विचारायला जातो.
कोरिअन Squid Game -
कोरिअन Squid Game - नेटफिल्क्स. मला आवडली. टेन्शन येतं पहाताना.
Pages