वेबसीरीज २

Submitted by sonalisl on 2 June, 2021 - 19:58

तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा वेबसीरीज. ( https://www.maayboli.com/node/65774 ) या धाग्यावर सुरू झाली. आता तिथली प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सिटी ऑफ ड्रीम्स मध्ये ती प्रिया मारते माझ्या आवडत्या actor ला. नाही बघवणार. पहिलाही नाही बघितला. अतुल कुलकर्णी बेस्ट एकदम.

सत्तेसाठी सर्वच एकमेकांच्या जीवावर उठलेत.

मैत्रेयी+१
मलापण आवडली होती. कामं छानच केली आहेत सगळ्यांनीच. आता दुसऱ्या सीझनमध्ये काय अशी उत्सुकता आहे. त्याआधी परत एकदा पहिला सीजन बघेन.

मॅनिफेस्ट सात आठ एपिसोड बघितले. मग कंटाळा आला आणि चिखलात पाय रुतू लागतोय वाटू लागलं आणि सुटली.

कामाठीपुरा - द टॅटू मर्डर्स

क्राईम - सस्पेन्स - सायकोथ्रिलर

खर्‍या अर्थाने नायिकाप्रधान कथा. सर्व गुन्ह्यांची उकल नायिका एकटीच करते. नायकाला जोडीदार म्हणून नायिका असला प्रकार इथे नाही. किंबहुना यात नायकच नाही. राणी मुखर्जीच्या मर्दानी सारखंच. नायिकेचे वरिष्ठ आणि कनिष्ठ तिला मदत करतात पण त्यात त्यांचं फारसं चातुर्य नाही. खरं तर ही नायिकाच या सिरीजची हिरो आहे.

  • मीरा चोप्राने फार मेहनत केली आहे. अभिनय चांगला आहे पण अडतिसाव्या वर्षी देखील ती कॉलेजच्या मुली इतकी लहान आणि नाजूक दिसते त्यामुळे पोलिस अधिकारी वाटत नाही ही बाजू तिच्या विरोधात जाते. अ‍ॅक्शन / मारामारी / फालतू स्टंटबाजी न करता तिने फक्त बुद्धीचातुर्य वापरुन केस सोडविली आहे ही जमेची बाजू आहे. शेवटच्या दृश्यात देखील खलनायकावर थेट आणि पुरेसं अंतर ठेवून गोळी चालविली आहे. नाहीतर सिनेमावाल्यांचं आवडतं तंत्र म्हणजे क्लायमॅक्स ला हिरो / हीरोईन व्हिलनला त्याच्या सर्व पापांची आठवण करुन देतात, भले मोठे प्रवचन मग तडपा तडपाके मारना वगैरे प्रोसेसमध्ये हमखास व्हिलन कुरघोडी करतो आणि हिरो / हिरोईन बुरी तरह जखमी आणि रक्तबंबाळ वगैरे वगैरे. हे सर्व इथे टाळत सरळ दोन सेकंदात थेट दोन गोळ्या आणि व्हिलनचा खेळ खल्लास.
  • ती स्मोकिंग करते पण इट जस्ट हॅपन्स. तिला तणाव वाटतो तेव्हा ती सिगारेट ओढते. चेहर्‍याची आणि ओठांची कुठलीच गलिच्छ हालचाल नाही की डोळ्यांत कुठलाही अ‍ॅटिट्यूड नाही. जो जनरली फिमेल कॅरेक्टर स्मोकिंग करताना दाखवतात. त्यामुळे तिचं स्मोकिंग तिच्याकरिता कितीही इंज्युरिअस असलं तरीही इतरांना ते खटकावं असं त्यामध्ये काही नाही.
  • एसीपी आणि डीसीपी मध्ये कोण वरिष्ठ आणि कोण कनिष्ठ? हे तर लहान मुलांनाही आता ठाऊक असेल. तरीही इथे डीसीपी असलेला अनंग देसाई एसीपीला सर म्हणतो त्याला रिपोर्टिंग करतो. एसीपी देखील डीसीपीचा एकेरी नावाने उल्लेख करतो असं का दाखवलं असावं? पीएसआय -> पीआय->सिनिअर पीआय->एसीपी->डीसीपी->अ‍ॅडिशनल सीपी->सीपी अशी चढती भाजणी असतानाही पीएसआय वाझे थेट कमिश्नर आणि होम मिनिस्टरला रिपोर्टिंग करायचा. तसं काहीतरी सिरीज निर्मात्यांना दाखवायचं आहे का? काही कळत नाही.
  • मीराला तिचे काही कनिष्ठ मॅडम म्हणतात तर एक सायबर स्पेशलिस्ट आणि इतर काही कनिष्ठ सर म्हणतात. हा काय प्रकार आहे? पोलिसांमध्ये सिनिअर महिला अधिकार्‍याला फारच ज्युनिअर्स सर म्हणतात अशी काही प्रथा आहे का?
  • हिप्नॉटिझम च्या साहाय्याने फारच सुलभ रीत्या मेंदूत मेमरी इरेज आणि रिइन्स्टॉल करताना दाखवणं बाळबोध वाटलं.

इतकं असूनही सिरीज आवडली. क्रेडिट गोज टू मीरा ओन्ली.

City of dreams S2 पाहिला. पहिल्या पेक्षा चांगला आहे हा सीझन. पण हिंसा भयानक.

नेटफ्लिक्सवरची Reign मी पाहिली नव्हती. आवडली आहे. राजारजवाड्यांच्या मालिका पहायची इतकी उत्सुकता नव्हती तरी पहायला सुरु केली व आवडली. खरंतर नेटफ्लिक्स वर ‘कॅसमार’ पाहिल्यावर ही दिसली. (क्राऊन पण अजुन नाही पाहिली, नंतर पहाणार).

मला सिटी ऑफ ड्रिन्स सिझन १ जास्तं आवडला होता , एकदम सनसनाटी आणि स्पायसी होता Happy
या सिझनमधे सुद्धा एन्टरटेन्मेन्ट आहे पण पहिल्या सिझन सारखी भट्टी नाही जमली , मिसेस मुख्यमंत्रांची सिक्रेट्सच फार, त्यामुळे तिचं सिंहासन सारखं डोलत रहातं इंद्रा सारखं Proud
आदिनाथ कोठारे आवडला , सगळ्याच मराठी कलाकारांचा अभिनय चांगलाय !

The Mysterious Benedict Society ही सीरिज मस्त आहे एकदम... फिनाले जरा आटोपता घेतला आहे असे वाटले, पण पुढचा सिझन नक्की बघणार.
book series तर छानच आहे, ( पहिले तीनच वाचले आहेत ). टी व्ही सीरिजमध्ये थोडेफार बदल केले आहेत, पण तरीही आवडली. Happy

आणि काय हवं बघितली. छोटे सहा भाग आहेत त्यामुळे पटकन बघून होते. बरी आहे एकदा बघण्यासारखी. त्यांचं घर, शोभेच्या वस्तू आणि क्रॉकरी छानच.

>>City of dreams S2 पाहिला.

मी दोन्ही सीझन एकदम बघितले मागच्या वीकांताला..... मला तरी आवडली सिरीज!!
सगळ्यांचीच कामे छान आहेत!

नेफिवर एक Heist नावाची दोन दोन एपिसोड्सचे भाग असलेली मालिका आली आहे. इंटरेस्टिंग आहे.

आणि काय हवं बघितली.>>>>>> मी पण. मस्त आहेत सगळेच भाग. ">>>>> हलकीफुलकी आवडली. पिरीयड्सवाला खूप खेचल्यासारखा वाटला.
Max वर The test case पाहिली आवडली.

Prime वर modern love S2आलायं.बघतेय.
पहिली कारची गोष्ट फारच आवडली.

City of dreams दोन्ही सिझन आवडले. राजकारणातली कट थ्रोट स्पर्धा. अतुल कुलकर्णी चे टिपीकल पुरूषी विचार .. प्रिया बापट ने डोके शांत ठेऊन दिलेली मात.. एकदम आवडल

Modern love 2 बघून संपवली.
3 गोष्टी खूप आवडल्या. Car , Train and Night girl .
बाकीच्या ठीक वाटल्या.

नेटफिफ्लिक्सवर The Good Doctor सिरीज पाहिली. पहिला सीजन - तब्बल १८ एपिसोड binge watching करत दोन दिवसात संपवले.
समांतर नंतर आयुष्यात पाहिलेली दुसरीच वेबसिरीज. ती सुद्धा चक्क ईंग्लिश Happy अर्थात ईंग्लिश सबटायटल्सचा फायदा झाला म्हणा, पण खूपच आवडली. मेन हिरो ऑटीजम असलेला एक सुपर ईंटेलिजंट डॉक्टर. कसले कमालीचे बेअरींग पकडलेय त्याने आणि कसला क्यूट अभिनय केलाय. दर एपिसोडला मेडीकलच्या दोनेक सुरस कथा. सगळेच एपिसोड खिळवून ठेवणारे. सगळ्या टीमचा अभिनय उत्तम आणि एडीटींग कमाल. कुठलाही फाफटपसारा नाही की उगाच कुठल्याही एपिसोडमध्ये पाणी घालणे नाही. म्हणूनच सलगच्या सलग सबटायटल्सवर एक डोळा ठेवायचा त्रास सहन करूनही ईतके बघितले गेले. कधीची सिरीज आहे आणि किती जुनी आहे कल्पना नाही. बायकोनेच लावलेली. अर्थात मी कश्याला ईंग्लिश सिरीज बघायला जातोय म्हणा. पण दोघांनीही सलग दोन दिवस दोन रात्र मिळेल तसा एकत्र वेळ काढून १८ एपिसोड उरकले. टीव्हीवर बघत असल्याने एकत्रच बघायचो. मोबाईलवर बघण्यात मजा नाही. आता एखाद दिवस ब्रेक घेऊन वा या विकेंडला दुसरा सीजनही उरकू. कदाचित जुनी असेल तर ईथे त्यावर चर्चाही झाली असेल. तरी कोणी बघितली नसल्यास जरूर बघा. नेटफ्लिक्सवर आहे Happy

ऋ,
मी पण कालच संपवली.खूप गोड सिरीज आहे.हाऊस एमडी च्याच माणसाची असल्याने कधीकधी हाऊस ची आठवण येते,पण सुंदर सिरीज.शॉन चं काम करणारा फ्रेडी हायमोअर खूप कमालीचा ऍक्टर आहे.
सिझन 4 भारतात नेटफ्लिक्स वर अजून आला नसला तरी अस्तित्वात आहे.(स्पॉयलर देत नाही)

House MD बघतेय.
सुरवातीला house चा तिरसटपणा आवडत होता. नंतर डोक्यात जायला लागतो. He is sexiest and racist. विल्सनशी किती वाईट पद्धतीने वागतो.
House ची team सर्वगुणसंपन्न वाटते. Test , surgery, investigation सगळं करता येत त्यांना. पण team bonding वाटत नाही. अंदाज पंचे दाहोदहरसे असा मामला खतरनाक आहे. लोकांच्या जीवाशी खेळ करतात ही लोकं.
विल्सन एक sensible वाटतो सुरवातीला नंतर मुर्ख.
2 सीझन्स बघितले आता सोडून देईन. House is becoming more n more irritating.

Defending Jacob अॅपल टिव्ही वरची दुसरी आणखीन एक सुंदर सिरीज...एंडी (आपला कॅप्टन अमेरिकावाला) हा एका छोट्याशा गावात तेथे असलेल्या कोर्टात सरकारी वकील असतो .छान चालले असते पण अचानक एक घटना घडते व एंडी च पुर्ण आयुष्य बदलून जातं एका शाळकरी मुलाचा खुन होतो व त्याचा अरोप एंडी चा मुलगा जेकब वर येतो जो त्याच मुलाच्या वर्गात शिकत असतो. एंडी ला संपूर्ण खात्री असते की आपला मुलगा निर्दोष आहे पण प्रथमदर्शनी सर्व पुरावे हे जेकब च्या विरोधात असतात पण एंडी हार मानत नाही व केस लढतो तर ऐकीकडे एंडी च्या पत्नीला कधी वाटत असतं की हा खुन जेकब ने केला असेल तर कधी नाही ह्या द्विधा मन स्थितीत ती जगत असते आणि ह्यामुळेच पुढे सर्वांच आयुष्य होत्याच नव्हत होऊन जातं ...बहुतेक दुसरा सिजन येईल ...सर्वांचा अभिनय उत्तम झालाय
वेगवान कथानक तुम्हाला बोर होऊ देत नाही पण विचार करायला भाग पाडते..... आवर्जून बघावी अशी सिरीज

हाऊस हे मेडिकल डिटेक्टिव्हज मधल्या केसेस वर आहे.त्यामुळे ते सुरुवातीला सस्पेन्स मेंटेन करतात आणि शेवटी 15 मिनिटात पेशंट ला वाचवतात किंवा निपटवतात.
पण हाऊस चे पात्र खूप अरोगंट आहे.
इथे पण शॉन च्या वागण्या बद्दल, लिमिटेशन्स बद्दल घोळ आहेच सुरुवातीला. प्रश्न उत्तर कधी देतो कधी नाही, स्पर्श कधी आवडतो कधी नाही.अर्थात ऑटिझम हा समजायला खूप मोठा एरिया असल्याने तितके जस्टीफाईड आहे.

द गुड डॉक्टर खूपच मस्त आहे! मी पण पहीला सिझन नुकताच संपवला. मला मेडिकल ड्रामा आवडत नाहीत फारसे पण हा आवडतोय चक्क!

Pages