वेबसीरीज २

Submitted by sonalisl on 2 June, 2021 - 19:58

तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा वेबसीरीज. ( https://www.maayboli.com/node/65774 ) या धाग्यावर सुरू झाली. आता तिथली प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

YOU चा सीझन २ चालु केला आता .
सीरीयल भारी क्रीपी आहे पण बघायला आवडतेय . Its kind of mind game . त्याच नरेशन आवडतं .
Joe भलताच कॉम्प्लेक्स कॅरेक्टर आहे . ईतक सगळ करून प्रत्येक वेळी सही सलामत सुटतोय . कधी कधी त्याचा चांगुलपणा एकदम उफाळून येतो .पहिल्यांदा पाको आता एलिस .
Love , Bec पेक्शा जास्त आवडली .

Hotstar खुपच underrated आहे पण तिथे खुप छान मालिका आहेत. HBO, Disney , Showtime यांचे ओरिजिनल कन्टेन्ट आहे . डिस्नी बरोबर tieup असल्यामुळे लहान मुलांच्या देखील खूप मालिका आहेत.

1. American Crime Story Season 1 - OJ Simpson - १९९५/९६ मधला ओजे सिम्पसन खून खटला हा विषय आहे . त्याचा freeway वरचा पाठलाग , कोर्ट Drama छान आहे. Emmy award winner

2. American Crime Story Season 3 - Impeachment . बिल क्लिंटन - मोनिका लिविंस्कय संबंधाबद्दल आहे. पण अतिशय संयंतरीत्या चित्रित केला आहे. (आपल्या Crime पेट्रोल वाल्यानी शिकायला पाहिजे) सध्या चालू आहे. दर बुधवारी नवीन भाग येतो. (बहुदा टोटल १० भाग आहेत.)

३. Veep - अमेरिकन व्हाईस प्रेसिडेंट बद्दल पोलिटिकल sattire विनोदी मालिका आहे. जुलिया ड्रायफास (Seinfeld साठी प्रसिद्ध ) मुख्य भूमिकेमध्ये आहे.

४. Generation Kill - २००४ इराक युद्धामधील मरीन रेकॉन युनिटचा अनुभव चित्रित केला आहे. रोलिंग स्टोन या मासिकाच्या रिपोर्टरचे मूळ लिखाण आहे. अतिशय raw अनुभव आणि हिंसा दाखवली आहे. पण रिऍलिस्टिक चित्रण आहे .

५ Curb your Enthusiam - लॅरी डेविडच्या (Seinfeld साठी प्रसिद्ध ) चाहत्यांना आवडेल. मला आवडणारी कॉमेडी मालिका. आजच season ११ आला आहे . Sarcasm , social situations मधून होणारी धम्माल छान आहे.

६ व्हाईट कॉलर - FBI एजन्ट आणि त्याचा क्रिमिनल इन्फॉरमेन्ट यांनी मिळून सोडवलेल्या पांढरपेश्या गुन्हांची मालिका आहे. मसाला मालिका आहे पण character building छान आहे . Mozzie माझा आवडता आहे. अजून लिहीत नाही .

७ आऊट ऑफ लव्ह - हिंदी मालिका . विवाहबाह्य संबंध, संशय असा मसाला आहे . उटीचे छान लोकेशन आहे. २ season आहेत . बायकोला आवडते मग विषय संपला

८. Legend ऑफ हनुमान - ऍनिमेशन मालिका आहे (पण लहान मुलांची वाटत नाही ) . २ season आले आहेत. मला छान वाटली . मराठी मध्ये बघायला मजा येते,

९. The Loudest Voice - हि मालिका सध्या मला हॉटस्टारवर दिसत नाही आहे. Roger Ailes या फॉक्स news च्या प्रेसिडेंट बद्दल आहे. MeToo मधला एक आरोपी आणि अमेरिकन उजव्या विचारधारेचा पुरस्कर्ता . Russell Crowe साठी जिथे मिळेल तिकडे बघा.

तळटीप - The Office (US ) आणि Seinfeld आता नेटफ्लिक्स इंडिया पण आहे सो prime video ची गरज संपली सध्यातरी.

काल बेट्स मॉटेल संपली एकदाची, सगळ्यांचे अभिनय छान जमलेत. वेरा फर्मिगा तर आवडतेच पण फ्रेडी हायमोर पण आवडला, कधी तो वेडा वाटतो, कधी विकृत कधी असहाय्य तर कधी इनोसंट. शेवट सुन्न करणारा आहे पण सगळ्यांच्या ॲक्टींग साठी बघण्यासारखी आहे सिरीज. एंगेजिंग आहे.

स्पॉयलर - शेवटी का कोण जाणे पण त्याला शेरीफ रोमेरोने मारायला हवं होतं असं वाटलं, त्याच्या भावाने नाही, ते बघून जास्त वाईट वाटतं.

स्पॉयलर:
रोमेरो च्या पापांचा घडा भरला होताच.बरेच खून, गैरमार्गाने संपत्ती.
नॉर्मा (पात्र,व्हेरा अभिनेत्री नाही) अति मूर्ख.सगळे इतकं सांगतात तरी नाहीच.

सगळे इतकं सांगतात तरी नाहीच.>> हम्म्, होना.
YOU चा एक भाग पाहीला, हिरो याच टाईप्स वाटतोय , devil hidden in handsome guy, बापरे किती ते प्रमाणाबाहेर स्टॉकिंग आणि मनात बोलणं, सोडून दिली मी तर. नेक्स्ट वीकेंडला अजून थोडे भाग बघून पाहीन आवडतय का.

यु चा पहिला सिजन झपाट्याने पाहिला. खतरनाक होता. ती मुलगी प्रचंड प्रचंड सुंदर आहे. मग दुसर्‍या सीजनला तोच थंडपणा सतत आपल्या डोक्यावर आदळण्याने जरा कंटाळा आला. महिनाभर पाहिलंच नाही. आता हळुहळु पहात आहे.

मुलगी प्रचंड प्रचंड सुंदर आहे>>> हो ना. हे लोक जवळपास सर्वच जण इतके देखणे कसे काय असतात, म्हणजे दर दहा मधील सहा सात तर नक्कीच निघतील, अगदी म्हातारी माणसेही फार ग्रेसफुल दिसतात.

प्राईमवर कोरियन Tale of the Nine Tailed पाहिली. फँटसी प्रकारातील आहे. सगळ्यात काय आवडले असेल तर हिरोईनचे कॅरॅक्टर. जबरदस्त स्ट्रॉंग आहे. हँडसम हिरो, व्हिलन आणि बाकीच्या पात्रांचे कामपण छान झाले आहे. Technically 1000 वर्षाचा हिरो आणि तरुण हिरॉईन पाहून काही प्रमाणात Twilight भास झाला. इथे व्हॅम्पायर ऐवजी मानवी रूपातील फॉक्स आहे. संवाद मस्त. रोमान्स पण कथेच्या गरजेनुसार. इतर वेब सिरीजच्या स्टॅण्डर्ड प्रमाणे अश्लिल नाही. शेवटी शेवटी हॅरी पॉटरचीही आठवण आली. फँटसी आवडणार्यान्नी पाहायला हरकत नाही. फ्रेश चेहरे, मस्त संवाद, थोडा हॉरर, रोमान्स, सस्पेन्स असं मस्त जमून आलं आहे. फक्त सब टायटल वाचण्याचा पेशन्स हवा.

squid game फायनली पाहून झाली. खूपच रिव्हेटिन्ग होती. एक उत्तम सिरीज ! कोरियन कन्टेन्ट किती चांगल्या दर्जाचा आहे हे परत एकदा जाणवले.

YOU बघितली का कोणी ??>>> मी तिसर्या सीझन वर आहे, क्रीपी आणि एक्सायटींग आहे, पण दुसर्या सि. च्या शेवटाकडे असं वाटायला लागलं की तिथले पोलिस काय बोळ्याने दुध पितात काय? जो शी रीलेटेड २ स्त्रिया सटासट मरतात तरी जो ला कुणी चौकशी साठी पण आत घेत नाहित.. अजून १ म्हणजे मोबाईल फोन लोकेशन (क्राईम पॅट्रोल मधे मिळालेली अक्कल) पोलिसांना काहीच कळत नाहि? अशक्य!
जो ला जी माहिती हवी ती सहजरित्या फेबू फ्रेंड नसून ही कुणाच्याही अकौंट हॅक करून काढता येते..अगदी लव च्या आई वडिलांची ही ..इतकी सगळी लेटेस्ट माहिती सगळेच्या सगळेच रोज सोमि. वर टाकतातच ही म्हणजे काहीही थियरी आहे.

दुसर्या सि. च्या शेवटाकडे असं वाटायला लागलं की तिथले पोलिस काय बोळ्याने दुध पितात काय? जो शी रीलेटेड २ स्त्रिया सटासट मरतात तरी जो ला कुणी चौकशी साठी पण आत घेत नाहित.. अजून १ म्हणजे मोबाईल फोन लोकेशन (क्राईम पॅट्रोल मधे मिळालेली अक्कल) पोलिसांना काहीच कळत नाहि? >>>>> +1000000000.
आपल्या एसीपी प्रद्यूम्न आणि टीमला कामाला लावलं असतं तरी खूनी शोधून काढला असता त्यांनी

आपल्या एसीपी प्रद्यूम्न आणि टीमला कामाला लावलं असतं तरी खूनी शोधून काढला असता त्यांनी>>> अगदी अगदी..गेला बाजार डॉ. साळुंके नी सुके रक्त, नखं असलं काही बाही उकरत नक्कीच पकडला असता.. अब तुम्हे फांसी ही होगी Wink

हुश्श्श , You S3 बघून संपवला एकदाचा .
मध्ये मध्ये रोचक होतो , मध्ये मध्ये कंटाळा येतो . शेवट बराचसा अपेक्षित होता , पण फार योगायोग वगिअरे वाटला.
Officially , S4 will b there

लव ची बेकरी किती मस्त आहे . आणि ती ही किती छान दिसते , library fundraiser च्या वेळी ती किती गोड दिसते .
जर बॉलीवूड वर्जन बनवले तर माझी पसंती ---
जो - शाहिद कपूर/ कार्तिक आर्यन/ बदलापूरमधला वरूण धवन
लव- आलिया भट
शेरी-केरी - रिचा चढ्ढा - जीम सर्भ
मरीयन - तापसी पन्नु
थीओ - I can think of only आर्यन खान Happy

कुणी एजंट बॉलीवुड अशी काही सिरीज आली आहे ती पाहतंय का?,मी काल थोडी पाहिली.....चांगली वाटतेय..........................

कॉल माय एजन्ट- बॉलिवुड - प्रोमो चांगला वाटला होता पण मी पहिला एपिसोड अर्ध्यात सोडला. फारच भंपक वाटली. ते ऑफिस, त्यातले लुटुपुटू च्य फायली घेऊन फिरणारे इन्टर्न्स अन अस्सिस्टन्ट्स, एक से एक भंपक सो कॉल्ड एजन्ट्स, त्यांच्या मीटिंगा, सगळेच फार फेक आणि कॉपी केलेले वाटले.

मैत्रेयी +१
जाई., कुठे आला आहे ९ वा सीझन

मैत्रेयी... हो...ते मलाही फार फेक वाटले..पण फक्त चकचकीत दुनिया दाखवली आहे....ते जरा entertaining वाटले एव्हढेच...
Happy

कॉल माय एजन्ट- बॉलिवुड >>> अशीच एक फ्रेंच सिरीज आहे. ही बहुधा त्यावरच काढलेली असावी. पण ती फ्रेंच सुद्धा एक भाग जेमतेम पाहू शकलो.

स्क्विड गेम - दोन तीन भाग पाहिले. पण पुन्हा आवर्जून लावण्याइतका इण्टरेस्ट वाटत नाही. रेड लाइट्/ग्रीन लाइट, ते तीन शेप मधले कामगार्/सैनिक व तो टुणटुणीत म्हातारा, यांच्यावरच्या मीम्स कळण्याइतके पाहिले आहे Happy

कॉल माय एजन्ट- बॉलिवुड > तरीच मी विचार करीत होते की इतकी चटपटीत सिरियल आपली ओरिजिनल कशी काय असू शकते?
फ्रेंच ओरीजिन असेल तर मग ठीक च आहे....आपल्या हिरोईन्सना कुठे एजंट अँड ऑल....?

रेड लाइट्/ग्रीन लाइट, ते तीन शेप मधले कामगार्/सैनिक व तो टुणटुणीत म्हातारा, यांच्यावरच्या मीम्स कळण्याइतके पाहिले आहे >> Lol हे भारी आहे. फारच आवडले. #फोमोसेफ ... किंवा काही अनुप्रासाचा हॅशटॅग केला पाहिजे. बिंदी आणि बिन्नेस सारखा Wink Proud

हो #फोमोसेफ परफेक्ट Happy

या लाइन्सबद्दल कोणाला फोमो आला का? असेल तर त्वरा करा व त्या त्या सिरीज पाहा Happy

- द मू पॉइण्ट
- विंटर इज कमिंग
- लेजेन्- वेट फॉर इट- डरी
- बझिंगा
- से माय नेम
- द किंग, ही स्टे द किंग*
- यू जस्ट गॉट लिट अप**

* शब्दशः असे वाक्य आहे. व्याकरण वगैरे सोडा
** लिट= Litt

Submitted by चैत्रगंधा on 28 October, 2021 - 20:42>>>>
प्रतिसाद वाचून tail of nine tailed बघायला सुरू केली.
दोन एपिसोड पाहिले. छान वाटतेय. सगळ्यांसोबत पाहता येतेय.

अशी आणखी वाक्यं शोधताना हे सापडलं. "You Add Plus A Douchebag To A Minus Douchebag And You Get, Like, Zero Douchebags.” यो यो यो बिx म्हणणारा म्हणतो. अगदीच आठवेना. हॉलिडेज मध्ये परत बघायला एक कारण मिळालं.

Pages