वेबसीरीज २

Submitted by sonalisl on 2 June, 2021 - 19:58

तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा वेबसीरीज. ( https://www.maayboli.com/node/65774 ) या धाग्यावर सुरू झाली. आता तिथली प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आर्या १ चा शेवट दु:खी आहे असे इथेच वाचले होते म्हणुन पाहिली नव्ह्ती. भाग २ चर्चा वाचून बघण्याची इच्छा जागृत झाली.

आता "आश्रम" बघायला सुरूवात केली आहे. इतकी ग्रिपिंग वाटत नाही. मधे मधे कंटाळा येतो. मग मधूनच एचबीओ वर "सक्सेशन" बघतो. ती आता दुसर्‍या सीझन मधे रंगत चालली आहे. मत्स्य कांड ही रेकोज मधे तेथे दिसत आहे. च्रप्स यांनी वरती रेको दिलेले दिसले. चेक करायला हवे.

मॅन इन द हाय कॅसल जबरी आहे. या जर्मन लोकांना रोजच्या व्यवहारात इतकी लांबलचक नावे, उपाध्या घेण्याचा कंटाळा कसा येत नसे? बहुधा नाझी टेरर मुळे घेत असतील. उबरग्रुपेनफ्यूरर वगैरे.

हो आश्रम सोडली मध्येच. गोलगोल फिरत बसल्याचा फील येतो.
मॅन इन द हाय कॅसल सही होती (समहाऊ ती पूर्ण बघितली नाही असं आठवतं, हॉलिडेज मध्ये बघतो आता). हो! ती जर्मन नावं/ उपाध्या संपूर्ण घ्यायच्या पार्ट फार फनी होता. ती बघत असताना गॉट/ डाउनटन प्रमाणे त्यातील उबरग्रुपेनफ्यूरर इ. नावं इकडे तिकडे फेकायला कारणं शोधायचो आठवतं. आता काहीच आठवत नाही त्यातलं .:(

ती बघत असताना गॉट/ डाउनटन प्रमाणे त्यातील उबरग्रुपेनफ्यूरर इ. नावं इकडे तिकडे फेकायला कारणं शोधायचो आठवतं >>> लोल. हो त्यातल्या उपाध्या वापरायला हव्यात रॅण्डमली. किंवा लॉर्ड उबरग्रुपेनफ्यूरर ऑफ ग्रॅंथॅम, हाउस डाउनटन अशी एक फ्यूजनउपाधी करून टाकायला हवी.

उस्से याद आया. हे ही पाहा Happy

अरण्यकचे पुढचे भाग लगेच आलेत. मस्त आहे. पुढचे भाग बघताना शेवटी एक अंदाज येतो तो खरा ठरतो.

शेवट तसा अर्धवट ठेवलाय , म्हणजे दुसरा सीझन येऊ शकतो आणि नाहीही

Poirot मालिकेतले बेस्ट भागांची नावं सहज आठवत असतील तर कृपया सांगा. ब्रीटटीव्हीवर काही दिवसांचे सभासदत्व घेऊन पहायचा विचार आहे.

Poirot मालिकेतले बेस्ट भागांची नावं सहज आठवत असतील >> मला सगळे भाग आवडतात , विशेषतः सुरुवातीच्या सीजन्स चे .
केवळ कथा चांगल्या आहेत म्हणून नाही तर subtle humour मुळे .

Poirot मालिकेतले बेस्ट भागांची नावं सहज आठवत असतील तर कृपया सांगा. <<<<<
Sad cyprus
The mysterious affair at styles
Three act tragedy
Cat among the pigeons
Death on the nile
Murder on orient express
Dead man's folly
Murder in mesopotemia
Appointment with death
Murder of Roger Acroyd
Peril at the end house

खरंतर दोनचार भाग वगळता पूर्ण सिरीजच इंटरेस्टिंग आहे.

वा वा श्रद्धा. मस्त. तुला आवडले म्हणजे पहायलाच हवेत. खुप धन्यवाद.

स्वस्ती, थँक्स. हो सर्व पहायची इच्छा आहेच.

मी अजून blindspot मध्येच अडकले आहे . सीजन ३ चालू केला आता. far stretched आहे सगळं . पण gripping आहे .

डेव्हिड सुशे भूमिकेत असलेला पॉयरॉ चा मर्डर ऑन ओरियंट एक्स्प्रेस खूप सुंदर आहे. (मूळ कथेपासून शेवटाला फारकत घेतली आहे मात्र.)

अनु +1000.
मला सिनेमा इतका नाही आवडला.
पण सिरीजमध्ये एपिसोड आवडला.
ते ट्रेन धावत असताना च background music अंगावर येतं.

सक्सेशन सिरीज जबरदस्त इंटरेस्टिंग होत चालली आहे. सीझन २ काल पाहून झाला.

मात्र बिझिनेस डीलिंग्ज बघत असताना सतत, ही सिरीज झी ने मराठीत कशी बनवली असती हे डोक्यात येत आहे Happy

काही सीन्स ऑलरेडी तयार आहेत- (लोगन रॉय सीईओ, बाकी उल्लेख आहेत ते त्याची मुले किंवा स्टाफ)
- लोगन रॉय हेलिकॉप्टरने जाताना त्याचे विविध कोनातून व स्लोमो मधून घेतलेले शॉट्स. सर्र सर्र बॅकग्राउण्ड म्युझिकसकट
- एखाद्या जनरल सीन मधे काही कारण नसताना उभे असलेले सेमी-ऑटोमॅटिक रायफलधारी सुरक्षासेवक.
- काँग्रेशनल हिअरिंग "सुंदर झाली" - अशी सर्व सिनीयर मॅनेजमेण्ट मधे चर्चा.
- बाकी सगळे लंडन मधे असताना शिव नंतर तेथे जाते, तेव्हा ती येणार म्हणून सीईओ, जनरल कौन्सेल, विविध विभागांचे प्रमुख रिसोर्टच्या दारात उभे आहेत
- ऑल्मोस्ट नं २ असलेली जनरल कौन्सेल "जेरी" कधी सर्वांवर अधिकार गाजवत आहे, तर कधी केन्डाल चे ऑफिस सजवत आहे. मग तिसर्‍या एखाद्या एपिसोड मधे लोगनच्या घरी स्वयंपाक करत आहे.
- शिव तिच्या पहिल्या मीटिंग मधे "न्यूज चॅनल मधून यापुढे आपण फायद्याचा विचार न करता बातम्या द्यायच्या" असे आर्जवाने सांगत आहे व ही पब्लिक कंपनी आहे वगैरे किरकोळ गोष्टींचा विचार न करता सर्व उपस्थित सिनीयर स्टाफ माना डोलावत आहेत. नंतर एक जुना जाणता सिनीयर स्टाफ मेम्बर तिला "प्रेझेण्टेशन छान झाले" असे शाब्बास सुनबाई मोडमधे सांगत आहे व बाजूला "CXO" लेव्हलचे एक दोन लोक हॉलवे मधे रिकामटेकडे उभे राहून ते ऐकत आहेत.
- रोमनने काहीतरी अचाट वाक्य म्हंटल्यावर लोगनपासून ते सर्व्हिंग स्टाफ मधले सगळे सिक्वेन्शियली चमकून पाहात आहेत.
- शिव एकटी असताना "डॅड मला का सीएओ करत नाहीत? त्यांचा माझ्यावर विश्वास नाही का?" वगैरे लांबलचक स्वगत म्हणत आहे.
- ...आणि शिव शेवटी एक लेमनेड स्टॅण्ड लावून त्यातून मिळणार्‍या पैशातून लोगनची आख्खी कंपनी विकत घेत आहे.

अरण्यक् पाहीली. Netflix वर.. कमाल भारी झालिये.. total suspense thriller. १० सेकंद पण पुढे घ्यावी वाटत नाही एवढी खिळवून ठेवते.. acting जबरदस्त सगळ्यांचीच..

धन्यवाद श्रद्धा sonyLIV नाही दिसत भारताबाहेर Sad . vpn घ्यावे लागेल .
अरण्यक् पाहीली. Netflix वर.. कमाल भारी झालिये +१११
witcher season २ चालू केलाय . भारी इफेक्ट्स आहेत.

witcher season २
>>> आला का.. भारीच !

Tehran बघितली मोसाद ची एक ऐजंन्ट इराण मध्ये घुसते मिशन असतं तेथील अॅन्टी एअर कार्फट मिसाइल चे कोड चोरणे जबरदस्त सिरीज आहे एकदा बघायला सुरुवातीपासून शेवट पर्यंत खिळवून ठेवते ...सिजन दोनची प्रतिक्षा

तेहरान बघायची आहे.
Apple TV वरच्या The Morning Show, Ted Lasso (पहिला सिझन बेस्ट आहे, दुसरा अगदीच विखुरलेला आणि कोणी नविन लेखकांनी लिहील्यासारखा वाटतो), Defending Jacob पण आवडल्या.

Pages