वेबसीरीज २

Submitted by sonalisl on 2 June, 2021 - 19:58

तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा वेबसीरीज. ( https://www.maayboli.com/node/65774 ) या धाग्यावर सुरू झाली. आता तिथली प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Squid गेम आणि हेलबाऊंड बघून सिनिकल झालेल्या मनाला उतारा म्हणून सॉंग जुंग की या गोंडस अभिनेत्याच्या विंचेंझो आणि डिसेंडंटस अंडर सन नावाच्या सिरीज पाहिल्या.दोन्ही खूप क्युट आहेत.
आता एमिली इन पॅरिस बघेन रात्री.

एमिली इन पॅरिस -२ आवडला.
सिल्वी रॉक्स. लूक, ज्युलियन, मिंडी पण आवडलेच. सिल्वी सगळ्यात बेस्ट. Happy

सिल्वी सगळ्यात बेस्ट>>> एकदम सुरुवाती ला अजिबात आवडली नव्हती..मग मस्त मुरली ती आणि तिचं कॅरॅक्टर Happy

कॅमी आणि मिंडी पण मस्त Wink

कॅमी फार बोर करते. ती, तिची फॅमिली, तिची सगळीच स्टोरी फार कंटाळवाणी वाटते मला. इग्नोरंट एल्फी पण ब्रिटिश असल्याने आवडला.

Hotstar वर शेफाली छायाची नवीन सिरीज येतेय. Human. Medical field आणि त्यात चालणारे भ्रष्टाचार यावर आहे. ट्रेलर चांगला आहे. राम कपूर, CID मधला अभिजीत आणि अजून बरेच ओळखीचे चेहरे आहेत. १४ जाने पासून येणार.

स्लिंगवर "तब्बर" नावाची आठ भागांची एक सिरीज पाहिली. बरेचसे संवाद पंजाबीत आहेत पण सबटायटल्सही आहेत आणि त्याशिवायही समजायला फार जड जाणार नाही. मूळची बहुधा सोनी लिव्ह वर आहे. एकदम जबरदस्त खिळवून ठेवणारी आहे. खूप ग्रिम आहे, अजिबात कोठे विनोदाचा रिलीफ वगैरे नाही. पण तरीही कथा वेगवान आहे आणि मुख्य कलाकारांच्या कामामुळे जमली आहे. पवन मल्होत्रा, सुप्रिया पाठक व इतर सहकलाकार सर्वांचीच कामे मस्त आहेत. कंवलजीतही आहे बहुधा. आधी ओळखला नाही त्याला.

आश्रमचा कंटाळा आला.

एमिली इन पॅरीस बघून झाली. मजा आली हाही सीझन बघायला. फक्त जास्त लॉजिक शोधायचे नाही हे लक्षात आले.
उदा. कोणतेही लक्झरी ब्रान्ड्स अचानक एकमेकासोबत कोलॅब करणे इतके सोपे नसेल. ( ते लगेज आणि पिएर, तो डिझायनर वगैरे). तसंच त्या शेफ च्या बुटिक रेस्टॉ. चे पिआर पण या लक्जरी ब्रान्ड च्या फर्म ने हँडल करणे हे बजेट चे गणित आपल्याला जमत नाही. ठीके पण.
इनसाइड एज चा नवा सीझन पण पाहिला पण हा नाही आवडला. पहिले दोन सीझन एंटरटेनिंग होते. यात बरेच अतर्क्य अन कै च्या कै झालेय.

KITZ नावाची जर्मन विथ इंग्रजी व्हॉईस ओव्हर सिरिज बघितली. ८ एपिसोडच आहेत.
आल्प्समधील स्कीईंग स्लोप असलेल्या गावातील एकाचा अपघाती मृत्यू होतो. त्याच्या बहिणीला हा अपघात कुणामुळे झाला याची कुणकुण असते आणि ती सूड घ्यायच्या इराद्याने प्रेरित होते. त्यासाठी ती म्युनिच मधल्या धनाड्या, इन्फ्युएन्सर अशा बड्या धेंडांशी जवळीत साधायचा प्रयत्न करते, जे लोक विंटरला दरवर्षी या गावात येतात. तेथील जमिन जुमला घेऊन त्या गावाला/ तेथील लोकांना कस्पटासमान वागवीत असतात.. म्हणजे बहुतेक तरी असतातच.... तसा समज तरी नक्की असतो. मग पुढे काय होते अशी कथा आहे.
बरी आहे सिरीज. पण शेवट फारच पटकन आणि संपवायची म्हणून केलेला वाटला.
जर्मन टीव्ही शो बघितला न्हवता कधी म्हणून हा चालू केलेला. नेफ्लिवर आहे

हो बघ. ब्रिटिश अ‍ॅक्सेंटवाल्या मी फारश्या बघितल्या नाहीत सिरि़ज. त्यामुळे ही जरा छान वेगळी वाटते ऐकायला.

दि मिलियन डॉलर कोड म्हणून चार भागांची मिनिसिरीज चालू केली आहे. (एक जर्मन बघितली म्हणून आता नेफ्लि जर्मन शोजचा मारा करणार बहुतेक! )
'गूगल अर्थ' ने चौर्यकर्म केलेले आहे, म्हणून दोन जर्मन इनव्हेंटरनी २०१४ मध्ये पेटंट इनफ्रिंजमेंटची गूगले अर्थवर केस केलेली. त्यांनी तोच अल्गोरिदम १९९३ ला पेटंट केलेला असा त्यांचा दावा होता. त्याचं बदल इ. करुन केलेलं रुपांतर आहे. खखोदेजा , पण मजा येते आहे बघायला.

क जर्मन बघितली म्हणून आता नेफ्लि जर्मन शोजचा मारा करणार बहुतेक! >>> लोल हो. मी पहिला भाग पाहिला होता. इण्टरेस्टिंग वाटतोय.

स्टे क्लोज छान आहे.
द गर्ल फ्रॉम ओस्लो पण चांगली आहे.
ब्रिटिश ऍक्सेंटबद्दल अनुमोदन अंजली. Happy

Decoupled - Netflix - टाईमपास आहे पण थोडी आचरट आहे. माधवन / सुरवीन चावला लिड रोल मधे आहेत. चेतन भगत पण आहे Happy

जर्मन डार्क नावाची सिरीज आली होती की. बापरे काय भयानक टाइम ट्रैवल आहे त्यात. खुप गाजलेली पण.
स्टे क्लोज मधे कथानकात त्रुटी आहेत अश्या बातम्या वाचलेल्या म्हणुन नव्हतो बघत. आता बघतो.

स्टे क्लोज , based on harlan coben का ?? बघते मी पण आता .
मला आवडतात harlan coben ची पुस्तकं . :)ऑफिस चालू होतं तेन्व्हा आम्ही २-३ मैत्रिणी मिळून त्याची पुस्तकं आणायचो . लायब्ररीतुन , फूटपाथवरून , सेल मधून .

नेफ्लिवर स्टे क्लोज सिरीज बघतेय. मस्त एंगेजिंग आहे. कमी भागाची आहे.
सस्न्पेन्स थ्रिलर आहे.>>> थँक्स नक्की बघणार.

एमिली इन पॅरीस .. जास्त लॉजिक शोधायचे नाही हे लक्षात आले. उदा. कोणतेही लक्झरी ब्रान्ड्स अचानक एकमेकासोबत कोलॅब करणे इतके सोपे नसेल. >>> अगदी अगदी! विनासायास कामे होतात ह्यांची १ आयडिया सुचली की लग्गेच रीझल्ट हातात Happy

सध्या नेफ्लि वर च मॅनिफेस्ट बघत आहे..इतकी एंगेजीन्ग आहे की मुळिच इकडचं तिकडे बघितलं जात नाही काहितरी मिस होईल असं वाटून Wink
इथं चर्चा झालिये का?

हो मी पण एके काळी हार्लन कोबेन ची बरीच पुस्तकं वाचली आहेत आणि एकदम एंगेजिंग होती. त्यात तो इथे न्यू जर्सीत राहतो आणि इथलेच स्थळ काळाचे रेफरेन्सेस असतात त्याच्या लिहिण्यात त्यामुळे अजून रीलेट व्हायची त्याची पुस्तकं, पण पुस्तकावर आधारित सीरीज मागे अजून एक आली होती ती जेव्हा पाहिली तेव्हा रीलेट करता आले नाही कारण तो सेट अप सगळा वेगळा वेगळेच अ‍ॅक्सेन्ट असलेली पात्रं वगैरे. त्यामुळे आपण वाचून इमॅजिन केले ते आणि पाहतो ते यात फारच तफावत वाटली होती. क्लासिक प्रॉब्लेम.
आता ही बघते कशी आहे. ब्रिट अ‍ॅक्सेन्ट म्हटल्यावर पुन्हा जरा पाल चुकचुकलेली आहे मनात Happy

बघायला सुरुवात केली स्टे क्लोज. २ भाग पाहिले. पहिल्या भागात जरा लक्ष द्यावे लागते कारण खूप कॅरेक्टर्स इन्ट्रोड्यूस होतात. पण आता दुसर्‍या भागात चांगली ग्रिप घेतली आहे. इंटरेस्टिंग वाटतेय नक्कीच.

कारण खूप कॅरेक्टर्स इन्ट्रोड्यूस होतात.>> हो ते आहेच. माझा मधे थोडा ब्रेक पण झाला तरिही पकड घेते. ईंट्रेस्ट गेला नाही.

Stay close बघायला सुरुवात केलीयं. मस्त आहे
पहिल्या भागात जरा लक्ष द्यावे लागते कारण खूप कॅरेक्टर्स इन्ट्रोड्यूस होतात. >>>> +100000

Pages