Submitted by sonalisl on 2 June, 2021 - 19:58
तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा वेबसीरीज. ( https://www.maayboli.com/node/65774 ) या धाग्यावर सुरू झाली. आता तिथली प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा..
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
The woman in the house across
The woman in the house across the street from the girl in the window. >>>अरे ही भारी आहे एकदम! ३ भाग बघून झाले काल. संपूर्ण बघावीशी वाटत होती पण खूप उशीर झाला होता म्हणून थांबले. ८ च भाग आहेत, त्यामुळे आज संपवेन.
अरे कुणीतरी नेटफलिक्स सोडून
अरे कुणीतरी नेटफलिक्स सोडून बाकी ott वरच्या पण सिरीज सुचवा pls.
हॉटस्टार वर चांगल्या आहेत
हॉटस्टार वर चांगल्या आहेत सीरिज.
Big little lies
Little fires everywhere
The undoing
परवाच the night of बघायला सुरुवात केली. क्रिमिनल जस्टिस सीजन १ सारखीच स्टोरी आहे.
वूटवर the gone case चांगली आहे.
नेटफ्लिक्सवर In from the cold
नेटफ्लिक्सवर In from the cold पण बरी आहे. वेगळी कन्सेप्ट आहे.
स्वस्ती हो. प्राचीने लिहिली
स्वस्ती हो. प्राचीने लिहिली तीच. (प्राची कष्टाळू आहे, मी नाही ). मालिका आवडली मला. शेवटावर चर्चा होऊ शकते कदाचित. भाग २ येईल असं वाटतंय.
हल्ली आपल्या सर्वांच्याच टीव्हीवर कोरीअन सुचवण्या येतात बहुतेक. त्यामुळे ‘वी आर डेड’ बरीच पाहिली. व आवडली.
नेटफ्लिक्सवरच Feria दिसते आहे. क्रीपी चित्र आहे. १०-१५ मिनिटे पाहिली पण काहीच पकड आली नाही. म्हणून सध्यातरी बंद केलीये.
Gone for good बघून संपवली.
Gone for good बघून संपवली.
चांगली वाटली. तो हिरो मात्र अजिबातच आवडला नाही .
फ्रान्स , ईटली , स्पेन मात्र आवडले.
आता ती the woman .... etc बघतेय.
हो Gone for good मधले दोघेही
हो Gone for good मधले दोघेही लीड अॅक्टर्स दिसायला अजिबात चांगले नाहीयेत त्यातल्या त्यात दिसायला ती जुनी गफ्रे चांगली होती!
त्यातल्या त्यात तो daco आणि
त्यातल्या त्यात तो daco आणि keseler बरे वाटतात.
Fedric तर completely चुकीची casting आहे.
लहान Fedric आणि hero सगळ्यात handsome आहेत.
zee५ वर आहे का काही चांगला,
zee५ वर आहे का काही चांगला, सबस्क्रिप्शन घेतलय पण कय बघाव सुचत नाहीये.
स्टे क्लोज मस्त होती.
स्टे क्लोज मस्त होती. उत्कंठावर्धक. मला गुन्हेगार कोण हा अंदाज आला नाही.
आता गॉन फोर गूड बघेन
किती ते नकली एक्सप्रेशन्स..>>> च्रप्स अहो तुमच्या साठी अर्जुन कपूर, जान्हवी वगैरे अभिनया चे मापदंड! माधुरी बद्दल असेच वाटणार तुम्हाला. ___/\___
अर्जुन नाही.. अर्जुन फक्त
अर्जुन नाही.. अर्जुन फक्त संदीप आणि पिंकी फरार मध्ये आवडला होता आणि औरंगझेब मध्ये.....
डान्स मध्ये माधुरी बेटर आहेच.. पण अभिनय? नो वे...
जान्हवी येस .. कधीपण बेटर आहे माधुरीपेक्षा.. अभिनयात...
आणि माधुरी ओव्हरहाईप्ड आहे असे इथे मायबोलीवर वाटणारे खूप आहेत... मी एकटा नाही
जान्हवी येस .. कधीपण बेटर आहे
जान्हवी येस .. कधीपण बेटर आहे माधुरीपेक्षा.. अभिनयात...>>> बरं बरं. तुमचंच खरंय.
बरेच म्हणजे तुम्ही, सर आणि अजुन एखादं कुणी ना?
The woman in the house across
The woman in the house across the street from the girl in the window. >>> आज संपवली बघून. ओके मी आता कन्फ्युज्ड आहे किंवा विचारात पडले आहे. कुणी बघून झाली असेल तर सांगा
माधुरी न आवडणारे भरपूर आहेत
माधुरी न आवडणारे भरपूर आहेत आणि मी एकटाच नाही म्हणून हे स्क्रिनशॉट टाकतोय.. रॅन्डमली दोन धागे चेक केले तर इतके लोक सापडले.. खरे तर प्रचंड आहेत...
ओके मी आता कन्फ्युज्ड आहे
ओके मी आता कन्फ्युज्ड आहे किंवा विचारात पडले आहे. कुणी बघून झाली असेल तर सांगा << मी ही. उलगडा झाल्यावरही अर्धा एपिसोड होता, अजुन काहीतरी ट्विस्ट असणार असं वाटलेल, विमानातल्या सीन मुळे कन्फुझन झाले..
उलगडा, अॅक्चुअली लास्ट
उलगडा, अॅक्चुअली लास्ट २ पूर्णच भाग झेपले नाहीत, अन मग दुसरी एक शक्यता मनात आली. एक दोन आर्टिकल्स वाचली त्यावरून तसेच वाटते आहे
असो. जरा थोड्या अजून लोकांनी पाहिली तर स्पॉयलर वार्निंग देऊन चर्चा करता येईल.
दोन तीन दिवस कामात गेले. आज
दोन तीन दिवस कामात गेले. आज चालू करतो.
माझी झाली पाहून. मला तरी काही
माझी झाली पाहून. मला तरी काही गोंधळायला झालं नाही. चर्चा केल्यावर कळेल.
माझेही अदितीसारखेच झाले आहे.
माझेही अदितीसारखेच झाले आहे.
विमानातील सीन जरा गोंधळ करतो.
स्पाय सीरिज आवडत असेल तर in
स्पाय सीरिज आवडत असेल तर in from the cold बघा. Interesting आहे. अय्यार वगैरे टाइप.
जरा थोड्या अजून लोकांनी
जरा थोड्या अजून लोकांनी पाहिली तर स्पॉयलर वार्निंग देऊन चर्चा करता येईल. >>> थोडा धीर धरा. मी येतेच .
ईथे चर्चा नकोच please
काली काली आँखें बघतोय... चार
काली काली आँखें बघतोय... चार एपिसोड पाहिले .. मस्त पेस आहे...
in from the cold १० मिनिटे
in from the cold १० मिनिटे पाहिली होती, मग मागे पडली… पुन्हा पहाते.
काल चार भाग बघितले. आता
काल चार भाग बघितले. आता उरलेली आज.
The woman in the house across
The woman in the house across the street from the girl in the window.>>बघायला सुरु केली. ग्रिपिंग आहे.पूर्ण पाहून झाली.शेवटचा भाग ओढून ताणून जमवल्या सारखा वाटला. लीसाची बॉडी कशी/कुठे लपवली ते कळलं नाही.
The woman in the house across
The woman in the house across the street from the girl in the window. >>>> काल binge केली. रात्री 1 वाजेपर्यंत पाहुन संपवली. उत्सुकता टिकवुन ठेवणारी आहे, पण जरा अ आणि अ सुद्धा वाटली. मलाही शेवटाबद्दल झालेली चर्चा वाचायला आवडेल.
Spoiler Alert
एका लहान मुलीने एवढा पद्धतशीर खुन करणे झेपलं नाही. टीनेजर दाखवली असती तरी पटलं असतं, पण 9-10 वर्षांच्या मुलीने फिंगर प्रिंट्सचा विचार करून मर्डर वेपन प्रेताजवळ ठेवणं वगैरे अतिच वाटलं.
ओ मीराताई , कशाला फोडताय ??
ओ मीराताई , कशाला फोडताय ?? spoiler alert नंतर , जरा जागा तरी सोडा .
spoiler alert नंतर , जरा जागा
spoiler alert नंतर , जरा जागा तरी सोडा .>>>> भरपुर स्पेस होती, पण पोस्टमध्ये दिसत नाही. आता परत enter key ने space दिली, पण पोस्ट save केल्यावर दिसत नाही
पण मूळात spoiler टाकायचा का
पण मूळात spoiler टाकायचा का बरं ? या अगोदर काही लोकानी पोस्ट्स टाकल्यात पण त्या फार मोघम आहेत .
हे तुम्ही आडून आडून लिहू शकत होता . हा सरळ सरळ तुम्ही शेवट उघड करताय .
मी तर म्हणेन , क्रुपा करून तो स्पॉयलर उडवा .
मी अजून एपि. ४ वर आहे , थोडा अंदाज आला होता , त्यामुळे ईतका धक्का बसला नाही पण चिडचिड नक्कीच झाली .
ज्या लोकानी अजून सिरिज पूर्ण पाहिली नाही आहे , त्यांचा रसभंग का करताय ?
स्पॉयलर देताना नुसत्या ओळी
स्पॉयलर देताना नुसत्या ओळी सोडल्या तर गॅप येत नाही )त्या ओळींवर पूर्णविराम दिले की गॅप येते :))
Pages