वेबसीरीज २

Submitted by sonalisl on 2 June, 2021 - 19:58

तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा वेबसीरीज. ( https://www.maayboli.com/node/65774 ) या धाग्यावर सुरू झाली. आता तिथली प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

द ग्रेट इंडियन मर्डर काहीच्या काही अतर्क्य आहे. तिग्मांशू धुलियाचा राम गोपाल वर्मा होत चाललाय हळूहळू...

मला तो विकी राय तर कुठूनही प्रॉमिसिंग वाटला नाही, म्हणजे मिर्झापूरच्या मुन्नाला एक सोफिस्टीकेटेड वर्जन द्यायला जावं, असाच... कुठल्याही पात्राचा कुठलाही प्रभाव पडत नाही. आशुतोष राणा, रघुवीर यादव, प्रतीक गांधी, शरिब हाश्मी सगळे होलसेलमध्ये कचऱ्यात टाकलेत.
तो मुन्ना तर इतका काहीच्या काही महाबोर आहे, आणि त्यात तो अमेय वाघसुद्धा... कहर म्हणजे अंदमान, चेन्नई, जैसलमेर, दिल्ली, रायपूर...धुलियाला सगळचं फिरायचय. तो एकेती मेला, तरी काहीहीही वाटत नाही.... ती रीचा चढ्ढा का घेतलीय ते कळत नाही. गांधी आणि मोहनकुमार विनोद तर, आता आम्ही हसायचय का? असं विचारावं वाटतं.

तद्दन फालतू....

रिचर चांगली वाटली. पुस्तकाशी खूप फैथफूल आहे.

टॉम क्रूझ हा पुस्तकातल्या रीचरच्या वर्णाना सारखा अजिबात नव्हता.

वीकांताला अर्काईव्ह ८१ पाहून संपवली. डेमॉनिक कल्ट / रिचुअल्स वगैरे गोष्टी झेपत आणि आवडत असलेल्यांनी जरूर पहा. मला आवडली. त्यातला लीड जसजश्या टेप्स रिस्टोअर करत जातो तसतसा तो आणि त्यासोबत आपणही नायिकेच्या स्टोरीत गुंतत जातो. बरीच पात्रं एकमेकांशी कनेक्ट होतात. पण ती कशी कनेक्ट होत जातात हे पहायला मजा येते.

पल्लवी जोशीच वाटली एक्दम. तसाच आवाज >>> थँक्यू! मी केव्हापासून आठवायच्या प्रयत्नात होते की असाच आवाज मी कुठे ऐकलाय.
या सिरीजचा सिझन २ पण चांगला असेल असं वाटतंय. लवकर आणायला हवा त्यांनी.

नेटफ्लिक्स वरची stranger हि कोरियन थ्रिलर series नुकतीच संपवली. सोळा एपिसोडस चे दोन season आहेत.

मला आणि बायकोला फार आवडली. पोलीस खाते आणि जुडीसिअरी यातले राजकारण, हेवेदावे आणि भ्रष्टाचार छान दाखवले आहेत.

हाणामारी चा जवळपास पूर्णपणे अभाव असल्याने आणि dialogue / slow बिल्डअप वर भर असल्याने काही जणांना बोरिंग वाटू शकते.

>>>'रिचर' जॅक रिचर स्टोरी आहे का? तर बघेन मीपण.
Much better than Tom Cruise Reacher movies. हा रिचर बुक मधल्या रिचर सारखा हुबेहूब आहे.

पल्लवी जोशीच वाटली एक्दम. तसाच आवाज >> >>अगदी सारखा आवाज..
सीरिज मस्त आहे. गुंतवून ठेवते.फक्त शेवट जरा लवकर गुंडाळला असं वाटलं..

नेटफ्लिक्स वरची stranger हि कोरियन थ्रिलर series नुकतीच संपवली. सोळा एपिसोडस चे दोन season आहेत.
>>> ऑडिओ इंग्रजी आहे का?

नेफ्लि वर Feria पहिली. ठीक आहे. थोडी स्लो आहे. अर्काइव्ह 81 सारखाच यात कल्ट आणि रिचुअल्स वगैरे आहेत. पण ती थोडी जास्त अभद्र आहेत. 81 सारखी एंगेजिंग मात्र वाटली नाही मालिका समहाऊ. शिवाय अर्धी सिरीज अंधारात किंवा निळ्या उजेडात असल्यामुळे फेरीया पाहतोय की सावरिया असं पण वाटून जातं Happy

काल आर्या संपविली. आता सुस हळुहळु मायकेल जॅक्सन सारखी दिसु लागली आहे. ठाकठीक वाटली.
रिचर बघेन आता.

रिचर पाहीली काल, रादर पाहीला. मस्तच आहे. एंगेजिंग आहे. टॉम क्रुझचा पाहीला नाहीये त्यामुळे फ्रेश स्टार्ट होती. सही आहे हीरो.

मी subtitles आणि ओरिजिनल कोरियन ऑडिओ मध्ये पहिली.
>>> कोरियन कळत नसल्यामुळे पास...

Long pending ---- inside edge 3 संपवली.
पहिले 2 सीझनस जासत आवडले मग. हा सीझन बराचसा फिल्मी आणि अ आणि अ , predictable वाटला.
परत एकदा Vaayu rocks ! बाकी सगळे आपापल्या जागी ठीक.
इमाद आवडला
4 test matches दाखवल्या आहेत. भन्नाट चित्रीकरण आणि commentary. मैदानावच्या छोट्या छोट्या गोष्टी मस्त घेतल्या आहेत.

>>>आता सुस हळुहळु मायकेल जॅक्सन सारखी दिसु लागली आहे.

सुश्मिता सेनला Addison Disease हा rare आजार आहे.

स्किन मध्ये होणारे बदल फार कॉमन असतात या आजारात.

त्या शिवाय प्लास्टिक surgeries तर गृहीत धरल्या पाहिजेत ४० शी च्या पुढल्या एक्टरेससेस मध्ये.

द ग्रेट इंडियन मर्डर >>>>
रीचा चढ्ढा कुठल्याच अँगल ने IPS वाटत नाही.
सगळं कसं ओढून ताणून दाखवल्याप्रमाणे वाटल मला तरी

उगीच वेळ वाया गेला

रॉकेट बॉईज सुरू केली आहे. चांगली वाटतीये series. Dr Homi भाभा आणि Dr विक्रम साराभाई ह्यांच्यावर. चित्रण उत्तम.

>>> कोरियन कळत नसल्यामुळे पास...
म्हणुन तर subtitles आहेत ना Happy डब केलेलं ऐकताना ओरिजिनल कलाकारांचे expressions त्यात कितपत उतरतात असं वाटतं. भाषा कळत नसली तरी expressions कळतातच. म्हणुन मला पण ओरिजिनल ऑडिओ आणि subtitles आवडतात.

The legend of Vox Machina- प्राईम.
Dungeons and Dragons खेळाच्या काही डावांमध्ये तयार झालेल्या कथेवर सिरीज. फॅन्टसी अवडणाऱ्यांसाठी खजिना आहे.

प्राईमचे जॉनर बेण्डिंग शोज आतापर्यंत जाम आवडलेत. द बॉईज, इन्व्हिन्सीबल आणि व्हॉक्स माकीना.

रॉकेट बॉईज सुरू केली आहे. चांगली वाटतीये series. Dr Homi भाभा आणि Dr विक्रम साराभाई ह्यांच्यावर. चित्रण उत्तम.,,,

नाही आवडली , नाव रॉकेट Boys आहे पण स्टोरी खूप फिरवली आहे, त्याचे पर्सनल लव्ह स्टोरी खूप फिरवलीये असा vatey .

स्टे क्लोज पाहीली आज. चांगलीये , एंगेजिंग आहे, पण शेवटापर्यंत सस्पेन्स फार ताणलाय असं वाटलं. शिवाय पोलिसांचा आरामात कारभार वाटला, तो डिटेक्टिव काही पटला नाही, कामं सोडून याचं भलतंच असायचं, म्हणून आठ भाग लागले नाहीतर लवकर सापडला असता गुन्हेगार Wink

तो फोटोग्राफर हिरो stranger वाला आहे. बिचाऱ्याला शेवटी हीरोइन मिळालीच नाही. त्याचं नाक भारीये धारदार, ज्याच्या कुणाच्या भानगडीत खुपसेल, त्याचं काही खरं नाही मात्र Lol Proud

ग्रेट इंडीयन मर्डर चा शेवट आवडला. स्पून फीडिंग नसावंच. पॉलिटिकल क्राईम थ्रिलर असावी तशीच आहे.
पुढचा सीझन आलाच तर त्यात अमेय वाघचं कॅरेक्टर महत्वाचं असेल. पण तो भाग पाहवणार नाही. रघुवीर यादव बेस्ट !

Pages