Submitted by sonalisl on 2 June, 2021 - 19:58
तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा वेबसीरीज. ( https://www.maayboli.com/node/65774 ) या धाग्यावर सुरू झाली. आता तिथली प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा..
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला तर शेवटी शेवटी
मला तर शेवटी शेवटी मिर्झापूरच्या मुन्नाच्या तोंडचा डायलॉग आठवला ललितसंदर्भातला
मला वाटतं कुटुंबातल्या एका
मला वाटतं कुटुंबातल्या एका माणसाला जास्त महत्व मिळत नसल्याने, कायम ट्रॉमा जन्य परिस्थिती असल्याने त्याने अटेंशन सिकिंग आणि महत्व मिळवण्याचा हा टोकाचा मार्ग शोधून काढला.>>>+१
वडिल वारले तशी त्याची सुरूवात झाली ते माझ्यात येतात, मला सांगतात, त्यांचे ऐकायचे तरच आपली प्रगती होईल. वर्षानुवर्षे हे कंडीशनींग चालू होते. त्या घरातल्या मुलीचे लग्न होऊन ती दुसऱ्या घरी जाणार आणि घरातले सिक्रेट उघड होईल म्हणून सगळे एकदम संपवले असेही असेल. नाहीतर अशी पूजा कोणी करतं का?
पण तसेही ते पुजापाठ करायचे आणि त्याचे ऐकायचे म्हणजे कोणाच्या जीवावर उठलेत/कोणाचे वाईट केले/काही मोठी चूक केली असेही नव्हते. मग कोणाला ते कळले असते तर काय मोठे नुकसान झाले असते?
ललितचा तो वडिलांच्या आडून बघतानाचा फोटो, तो आवाज…. मैं आऊंगा…. फारच भयानक!
ही उडत उडत बघितली. वर
ही उडत उडत बघितली. वर सगळ्यांनी लिहिलंय तेच वाटलं.
आपला/ आपल्या परिवाराचा विनाश केला हे एक त्यातल्या त्यात बरं झालं. अंधप्रकार करुन बाकी कोणाचे बळी नाही घेतले/ इतरांच्या जीवनात काही गोंधळ नाही घातले हे किती बरं असं फीलिंग आलं मला.
हा नक्की काय प्रकार होता
हा नक्की काय प्रकार होता सांगाल का? कारण डॉक्युमेंटरी बघायची इच्छा नाही आणि google पण नीट सांगत नाहीये आणि इथली चर्चा वाचून उत्सुकता खूप वाढली आहे. कुणीतरी सविस्तर लिहा ना याबद्दल .
https://www.thehindu.com/news
https://www.thehindu.com/news/cities/Delhi/11-bright-people-with-one-dar...
मला नाही बघवणार. हल्ली दोन
मला नाही बघवणार. हल्ली दोन तीन वर्षात पण अशीच घटना घडली का, दिल्लीतच बहुतेक पण जरा कनिष्ठ मध्यमवर्ग वस्तीत. भिंतीवर काहीतरी लिहून बऱ्याच जणांनी आत्महत्या केली. न्यूजमध्ये बघितल्याचे स्मरतेय.
स्क्विड गेम संपवली. नाही
स्क्विड गेम संपवली. नाही आवडली फार. बर्याच गोष्टी अधांतरी राहिल्या आणि स्टोरी/कन्सेप्ट कन्विंसिंग ही वाटला नाही. उ.दा. शेवटी परत ट्रेन स्टेशनवर तो गेम मध्ये अडकवणारा इसम दिसल्यावर सगळं अंगावर यायला हवं होतं. पण तसं काहीच झालं नाही. शेवटचा सगळाच एपिसोड फारच प्रेडिक्टेबल झाला. सर्प्राईज एलिमेंट पारच निघुन गेलं शेवटी.
अंजूताई, ही घटना पण २०१८ ची
अंजूताई, ही घटना पण २०१८ ची म्हणजे ३ वर्षांपूर्वीची आहे.
नुकतेच बांगलादेश मध्ये पण अशीच घटना घडली असे वाचले.
सक्विड गेम (लिहिता येत नाहीये
सक्विड गेम (लिहिता येत नाहीये) बेटस मोटेल पेक्षा जास्त भयंकर आहे का?
ट्रेलर बघून बघावी वाटतेय.
मुबलक हिंसा, एक अश्लील दृश्य
मुबलक हिंसा, एक अश्लील दृश्य आणि बराचसा इमोशनल अत्याचार
माणसे माणसांना इतक्या थंड आणि क्रिएटिव्ह पद्धतीने मारताना बघून नाझी राजवट असल्याचे वाटते इतकं सांगू शकतो किंवा पूर्वीचे राजे ग्लाडीएटर वगैरे लढती बघत तसे
बेट्स मोटेल मी नाही पहिली त्यामुळे त्याबद्दल पास
नकोच मग.मला ट्रेलर बघून जरा
नकोच मग.मला ट्रेलर बघून जरा परेश रावल च्या टेबल नंबर 21 ची आठवण आली.
खूप जास्त व्हिज्युअल हिंसा बघवत नाही.(अर्थात बेटस मध्ये प्रति एपिसोड 1 खून हा रेट फ्रेडी हायमोर आणि मॅक्स थिरीऑ साठी सहन केला.)
बापरे हे वरील लिंक मधे जे
बापरे हे वरील लिंक मधे जे काही दिल्लीचं प्रकरण लिहीलंय , फार भयानक आहे. नाहीच बघवणार एवढं डिप्रेसिंग. हिंसक बघणं वेगळं, सवय झालेली असते पण हे असलं काही नकोच. एकंदरीत UP तील लोकांचं सायको असल्याचं प्रमाण जास्ती वाटतं इथल्या तुलनेत, ही केस, निर्भया केस, आरुषी केस..
बेट्स मॉटेल सिझन वन संपला. आवडत्या शॉनला अशा रोलमध्ये बघणे जरा शॉकिंग आहे पण यात पण जरा त्याचाच भास होतो. पण तो blackouts येताना जे काही बघतो, ती नजर खरंच scary आहे. सिझन २ थोडी स्लो वाटतेय सिरीज.
खूप जास्त व्हिज्युअल हिंसा
खूप जास्त व्हिज्युअल हिंसा बघवत नाही.(अर्थात बेटस मध्ये प्रति एपिसोड 1 खून हा रेट फ्रेडी हायमोर आणि मॅक्स थिरीऑ साठी सहन केला.) >>>> . So true .
मी पण squid game बघू की नको विचार करतेय . House of secrets नक्कीच बघणार नाही.
अंजूताई, ही घटना पण २०१८ ची
अंजूताई, ही घटना पण २०१८ ची म्हणजे ३ वर्षांपूर्वीची आहे. >>> मग हीच असेल. भिंतीवर काही लिहिलेलं का. घर, एरिया फारसा posh वाटला नाही न्यूज मध्ये बघताना.
वडिल वारले तशी त्याची सुरूवात
वडिल वारले तशी त्याची सुरूवात झाली ते माझ्यात येतात, मला सांगतात, त्यांचे ऐकायचे तरच आपली प्रगती होईल. तशी झालेली दाखवलेली आहे. म्हणुन कदचीत विश्वास बसला असेल सगळ्यान्चा . वर्षानुवर्षे हे कंडीशनींग चालू होते.
त्या घरातल्या मुलीचे लग्न होऊन ती दुसऱ्या घरी जाणार आणि घरातले सिक्रेट उघड होईल म्हणून सगळे एकदम संपवले असेही असेल. -> ही एक शक्यता वर्तवली आहे.
हात बान्धलेले , तोन्डात बोळा , डोळ्यावर पट्टी म्हणुन काही करता नसेल आले. आणि जेव्हा कळाले असेल तेव्हा फार उशीर झाला असेल.
डायरी मधे असे पण लिहीलेले असते की नन्तर एकमेकाना सोडण्यासाठी मदत करणे वगैरे ...१५ मिनटे जप करत रहाणे अस पण लिहीले होते.
पण खरच...अस काही झाल असेल ही कल्पनाच भयानक आहे.
स्क्विड गेम्स नाही बघितली तर
स्क्विड गेम्स नाही बघितली तर काही बिघडणार नाही. वर हंगर गेम्सशी तुलना होती, ती जॉन्रा पुरती ठीक आहे. पण हंगर गेम्स पुस्तकात अनेकोनेक पदर/ छटा होत्या. विविध पातळ्यांवर द्वंद्व होती. इथे ते फारच साधं सरळ सोपं एकाच लेव्हलला आलं आहे.
हंगर गेम्स चित्रपट बघायचे राहिलेत, ते बघेन आता.
स्क्विड गेम फार सुरेख आहे
स्क्विड गेम फार सुरेख आहे सीरीअल. हिंसक आहे पण आतला भावनिक गाभा अगदी गाढ आहे. वेगळा धागा काढून लिहि ते.
Special ops 1.5 चा teaser
Special ops 1.5 चा teaser आलाय.
Himmat's story .
ईथले वाचून काल आज मध्ये कोटा
ईथले वाचून काल आज मध्ये कोटा फॅक्टरी दोन्ही सीजन उडवले. मजा आली. मुख्य कॅरेक्टर धमाल आहेत. हळूहळू चढत गेली..
तिसरा सीजन आता कधी येणार...? हे असे अर्धवट बघून वाट पाहणे नकोसे वाटते
स्क्विड गेमचे वर्ल्ड वाइड
स्क्विड गेमचे वर्ल्ड वाइड प्रीमीअर कोरी अन टाइम प्रमा णे दुपारी चार ला होते व त्या आधी दहा मिनिटे सांग वू ची भूमिका करणा र्ञा कलाकाराने आपल्या नवजात मुलग्यास प्रथम पाहिले व हातात घेतले. व्हाट अ मोमेंट ना. त्याला बेबी स्क्विड म्हन त आहेत लोक्स. सो क्वीट.
नाही नाही म्हणताना गूड
नाही नाही म्हणताना गूड डॉक्टरचा सीझन ४ संपवला . सुरुवातीचे काहे भाग कंटाळवाणे झाले विशेशतः नविन रेसिडेन्टसचे .
नंतर , ती जॉर्डन आणि अॅशर आवडायला लागले . आता शॉनपेक्शा बाकी सगळे जास्त आवडतायेत .
लिआबद्दल सहानभूती . शॉनला काही गोष्ट ईमोशनली न कळणं तिच्यासाठी किती कठीण .
शेवटचे ग्वाटेमालाचे एपिसोड पण आवडले . शेवटच्या एपिसोडमध्ये क्लेअर बरोबर मी पण रडून घेतलं . .
sony liv वरची Tabbar बघितली
sony liv वरची Tabbar बघितली का कुणी..बरेच चांगले reviews आहेत..
बेस्टच्या बसवर मी केव्हाची
बेस्टच्या बसवर मी केव्हाची बघतेय तब्बरची जाहिरात आणि मला प्रश्न पडलाय की हे नक्की काय लिहिलंय की माझे डोळे खराब झाले आहेत. काय अर्थ आहे तब्बरचा.
हाऊस ऑफ सिक्रेट्स बघितली.
हाऊस ऑफ सिक्रेट्स बघितली. जामच curiosity होती म्हणून. पण बघितल्यावर मेंदू थिजल्यासारखा झालाय. सारखं that's not all वाटतंय.
Tabbar is word use for family
Tabbar is word use for family… basically used for joint family or big family…..and its also used for relatives some times… like some people have lots of ...
Netflix वर Baking Impossible
Netflix वर Baking Impossible चे कोणी चाहते? Baking आणि इंजिनिअरिंग चा मस्त कॉम्बिनेशन. क्रिएटिव्ह चॅलेंजेस.
शेवटी नेटफिल्क्स चं
शेवटी नेटफिल्क्स चं सबस्क्रिप्शन घेतलचं . सध्या "ब्रिजरटन" बघतेय .
क्वीन , ड्युक आणि डचेस वगैरे मुळे डाउनटाउन अॅबे सारखी वाटली होती ,एक वेगळी जरा लाईट काहीतरी म्हणून बघायला ठीक आहे . पण डाअॅ ची सर नाही . ते कॅसेल , छोटसं गाव , बग्ग्या वगैरे बघायला छान वाटतं
ईथे फक्त लग्न हाच मुख्य विषय दिसतोय . मुलींचं लग्न लावून द्यायच हेच आयांच अंतिम ध्येय .
ईथे मीराने एक डीटेल परिक्षणात्मक पोस्ट लिहेलेली , त्याच्याशी बरीचशी सहमत .
Baking Impossible चे कोणी
Baking Impossible चे कोणी चाहते? -- येस्सस .. मी पाहिली..मस्त वाटतीये ..
YOU बघितली का कोणी ??? मी
YOU बघितली का कोणी ??? मी पहिला सीझन बघतेय.
जाम creepy वाटतेयं . पण Joe आणि Bec दोघेही cute आहेत.
मी बघितली आहे you. क्रिपी
मी बघितली आहे you. क्रिपी आहेच. नुकताच तिसरा सिझन पण आलाय त्याचा
Pages