मराठी बिग बॉस पर्व तिसरे- २

Submitted by सूलू_८२ on 20 November, 2021 - 17:33

फायनलला थोडेच आठवडे उरले आहेत. स्पर्धा चुरशीची चालू आहे.

सो, हा आहे दुसरा धागा.

चला, चर्चा करुया!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता परत विशाललाच जिंकवतील बहुतेक. दुसरा नं तरी मीनलला देणार का, का तिथे जय असेल. मला विशाल जिंकलेला आता आवडणार नाही, तोही सोना सोना करत सोनालीमागे होताच आणि चीप कमेंट केली. सोनालीबद्दल अजिबात ममत्व नाहीये, ती ह्याच्या मागे त्याच्या मागे करतेच पण विशालने ह्या चावडीत मी मागे असं म्हणून चुक केली असं सांगायला हवं होतं, माफी मागायला हवी होती कारण त्याच प्लॅटफॉर्मवर त्याने तिच्या कॅरॅक्टरबद्दल चीप कमेंट केली. माफी मागितली असेल चावडीवर तर योग्य केलं त्याने. मी अजून विकेंड बघितला नाहीये.

अजुनही मीनलनेच ट्रॉफी जिंकावी असं वाटतं. त्या विकासने टॉप टू चान्स गमावला. जयला नेणार असतील तर अगदीच धन्य.

आज मात्र शेवटी ममांनी कहर केला.चक्क मीराला सांगितल की तुला वाटलच कस की तुला आम्ही बाहेर काढू,तू नसलीस तर कस होणार.
ममां हे बोलून टोटल फ्लॉप ठरले.आता असच पुढच्या वेळी विनर पण सांगून टाका.

माझे टॉप ३
१)मिनल
२) विशाल
३) जय
मिनलला सर सातत्याने उत्तम प्लेयर म्हणत आलेत्,फार क्वचितच तिच्या चुगल्या आल्यात, ओव्हरऑल बेस्ट प्लेयर व्हेरी डाउन टु अर्थ.
तिघानाही कुठल्याही आधाराची गरज नाही.
विशाल आणी जय टास्क चान्गले खेळतात, जयने एका टिमला पर्यायाने ५-६ प्लेयरला स्वतःभोवती गुण्डाळुन ठेवल जे एक स्किल आहे ते सगळे बाहेर गेलेच पण ती त्याची चुक याची नाही.पर्सनली मला जय पहिल्या दिवसापासुन कधिही आवडला नाही, भयकर अ‍ॅरोगन्ट,उद्धट्,माजोरडा आहे,त्याच्या श्रिमन्तीचा,बॉडिचा त्याला खुप गर्व आहे असे लोक विनर होवु नयेत.
विकास चान्गला खेळतो पण चुगल्या,मागे बोलणे,नको त्या काड्या करणे टाळायला हवे होते आणी सरानी पण त्याचा गेमप्लॅन बर्‍याच वेळा फोडलाय त्यामुळेही त्याचा गेम फसतो.

ममां हे बोलून टोटल फ्लॉप ठरले.आता असच पुढच्या वेळी विनर पण सांगून टाका.>>> हो ना! ममाना होस्टिन्ग मधे थोडा छुपाओ थोडाही बताओ अस करताच येत नाही, सगळ सगळ चावडीवर डिस्कस करणार असाल तर तुम्हीच जा ना आत खेळायला, प्लेयर थोडे गाफिल राहिले तर मजा असते पण ममाना सगळे सगळे सिक्रेट लगेच सान्गुन टाकायचे असतात.

प्रोमो मधे उद्या स्नेहा, तृप्ती आणि आदिश घरात आलेले दाखवले. इतक्या लवकर एविक्टेड कन्टेस्टन्ट्स ना कसे बोलावले? फिनाले ला बोलावतात ना!

इतक्या लवकर एविक्टेड कन्टेस्टन्ट्स ना कसे बोलावले? फिनाले ला बोलावतात ना!>>> छोट्याशा व्हिजिटला बोलवतात, पहिल्या सिझनला राजेश ,थत्ते वैगरे लोक आले होते हे आठवतय, स्पर्धकाना फ्रिज ठेवुन जनरली एविक्टेड कन्टेस्टन्ट्सनी टिप्स देण अपेक्षित असत, काही ग्रजेस असतिल तर तेही बोलले जातात.
आजच्या टास्क मधे आदिश,अक्षय्,त्रुप्ती ताइच नाव बर्‍याच जणानी घेतल, स्न्हेहाच नाव कुणिही घेतल नव्हत तरी तीलाही बोलावलेल दिसतय. अर्थात हे आधिच ठरलेल असणार.

मीनलचं कौतुक चालू असेल तर जयचा जळफळाट होतो. मध्ये मीनल आणि विकासचं भांडण कळलं नाही. उदया स्नेहा वाघ जयवर बरेच आरोप करणार आहे. सौ चुहे खाके बिल्ली चली..... कोणाला रस आहे आता हा ब्लेम गेम बघण्यात. मीरा जातेय कळल्यावर जयने बरेच खोटे रडायचा प्रयत्न केला. मीराला वाटते सगळे तीच ठरवणार, अगदी समोरच्याने कोणत्या टोनमध्ये बोलायचे, कधी हसायचे, काय बोलायचे. तिच्या ऐवजी खरेच तृप्ती किंवा निथा असायला हव्या होत्या. आज विशाल पहिला, उत्कर्ष दुसरा आणि मीनल तिसरी असे नंबर दिले. सोनाली विशाल आणि त्याच्या घरच्यांबद्दल बोलली त्यावर ममानी ईतका वेळ घालवला आणि आज परत तीच चुगली. सोनाली म मां कडे रागाने बघत होती तेव्हा Lol

पहिला भाग बघितला. सोनालीला विचारलं, खडसावले पण विशालला तू चावडीवर सोनालीबद्दल अस बोलायला नको होतं हे एका शब्दाने नाही बोलले. त्या विषयाला बगल दिली त्याअर्थी विशालच जिंकेल अस वाटायला लागलं आहे.

मीरा जाईल गा दा आधी अस मला वाटतंय. सर्वात आधी सोनाली जाईल. मीराऐवजी गा दा असेल फायनलला.

आज विशाल पहिला, उत्कर्ष दुसरा आणि मीनल तिसरी असे नंबर दिले. >>> उतक्या का दूसरा.

मीनल कितीही चांगली खेळली, वागली तरी या बिग बॉसना तिला मागेच ठेवायचं आहे.

आज विशाल पहिला, उत्कर्ष दुसरा आणि मीनल तिसरी असे नंबर दिले. >>> उतक्या का दूसरा.>>> मलाही नाही कळल त्याच्यापेक्षा सोनाली,विकास बरे खेळले होते की एका बाजुला तो जयच्या मागे खेळतो,बुगुबुगुही आहे वर तुझा खेळच दिसत नाही, असही म्हणायच आनी विशालचा पाय ओढला त्याच्यावरुन लोक बाहेर शेण घालतायत पण म्हणायचे आणी द्यायाचा २ नबर !!!! मला तर लॉजिकच कळल नाही, मला वाटत जयला दिला तर लोक बोन्बा मारतिल, मिरा तर मठ्ठ आहे त्यामुळे तिला कस देणार, उत्क्याला नाही दिला तर तिनही न्बर बी टिम कडेच जातिल.

मीराला एव्हिक्ट करण्याचा ड्रामा करणार हे माबोवर प्राजक्ताने लिहिल होत. सो बिबॉ माबो वाचतात हे पुन्हा एकदा सिद्द झाल.

मीरा जातेय ह्याचा सर्वात जास्त आनन्द गायत्रीला झाला होता. तो ड्रामा होता हे बघितल्यावर तिचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता.

वरच्या फोटोजकडे पाहून वाटतय की स्नेहा आणि तृप्तीताई टिम बी कडे वळल्या.

अतरन्गी डिमाण्डस मध्ये लहान मुलान्नाच का आणतात?

मीराला एव्हिक्ट करण्याचा ड्रामा करणार हे आधीच माबोवर कुणीतरी लिहिल होत. सो बिबॉ माबो वाचतात हे पुन्हा एकदा सिद्द झाल.>> मीच लिहल होत.
मीराशिवाय शो पुर्ण नाही होणार म्हणजे पुढच्या वेळेस सोनाली किवा गादाला बळच काढणार का?

मागच्या सीझनला बाहेर गेलेले सदस्य पुन्हा भेटायला घरी आले होते आणि त्यांना आता राहिलेल्यांना सेफ करायला मतं दिली होती.
उद्याही नॉमिनेशनचा वार आहे.
स्नेहाचा प्रोमो मिसलीडिंग नसू दे.

ते बाहेर गेलेले सदस्य आता जास्तच नाटकी वाटत आहेत का?! प्रोमो वरून वाटले की स्नेहा तर मिळालेल्या १० रुपयात १०० रुप्यांचं अ‍ॅक्टिंग करते आहे! Lol
जय कॉमेडि आहे. वर बघून बघून डोळ्यात पाणी आणायचा प्रयत्न करतो , नाहीच आले तर मनोज कुमार स्ट्रॅटेजी आहेच Happy

प्रोमो वरून वाटले की स्नेहा तर मिळालेल्या १० रुपयात १०० रुप्यांचं अ‍ॅक्टिंग करते आहे!>>>>>अगदी अगदि!! मुळात प्रोमोत ती जयला म्हणत असेल की त्याने तिचा युझ करुन घेतला तर तिने स्वतःच तोन्ड आरशात बघाव.

पहिल्या सिझनसारख... उशा शिवणे, डिक्टेटर टास्क, बिबॉचे घर एक लॅव्हिश हॉटेल आहे असे मानुन आलेल्या गेस्टचे आदरातिथ्य करणे असे कमीत कमी राडा होईल, असे टास्क नाहित का यावेळी?
एरवी जय, विशाल ... फार राडा करतात, ताकद दाखवतात! इथे दाखवा म्हणावं जरा कमीपणा घेउन.

एलिमीनेटेड स्पर्धकांना परत घरात कसं काय आणलं ? त्यांना कोविड नॉर्म नाही का फॉलो करावा लागत... ? बाहेर जाऊन आलेत ना ते सगळे जण ?

त्यांना क्वारन्टीन केलं होतं म्हणे आधी काही दिवस. ते लोक आता हा आठवडा भर राहतील की काय कुणास ठाऊक. नॉमिनेशन आणि कॅप्टनसी टास्क करून जाणार बहुधा.

स्नेहा बहुतेक मेघा कडून टिप्स घेऊन आलीये.. attitude देते आहे फुल सगळ्यांना... पण आता काय उपयोग...बैल गेला आणि झोपा केला... जय दुधाणे च्या इगो वर आलं.. आता राग सहन होईना झालाय साहेबांना...

हे सगळे विशाल मीनल पहीले दोन सांगत असतील तर तेच येणार हे फायनल बहुतेक कारण मागच्यावर्षी शिव नेहा, शिव नेहा करत होते सर्व तर तेच दोघे होते शेवटी.

मीनल विशाल आहेतच बेस्ट आणि पॉझिटिव , टोटली डिझर्व इन टॉप २ !
विशालने जी चूक केली सोनालीच्या बाबतीत बोलून, मला नाही वाटत त्यामुळे तो निगेटिव होतो!
मेघानेही सिमिलर गोष्ट बोलून चूक केली होती तरी ट्रॉफी तिचीच होती Happy
रेशमला म्हंटली‘ फोटो एकाचा ठेवते आणि झोपते दुसर्‍याच्या बेड वर“ , फरक इतकाच कि तिने पटकन माफी मागितली, अगदी रेशमचे पाय धरून !
विशालनेही सॉरी म्हणायला हवे होते तिच्या फॅमिलीला आणि तिला, चूक कोणाची का असेना , पण कदाचित इतके फ्लॉलेस टेक्निकली करेक्ट वागणे त्या घरात राहून जमत नसेल !
ओव्हरॉल जर्नी बघता मला अजुनही विशालनेच ट्रॉफी घेतलेली आवडेल, मीनलही आवडतेच पण १९-२० बघता माझ्यासाठी विशाल २० Happy

तोच जिंकेल असं वाटतंय. मीनल जिंकली तर आवडेल अर्थात. बिग बॉस मधे जिंकणाऱ्याला महत्व असते. दूसरा नंबर फार कोणी लक्षात घेत नाही. लाईट्स बंद केल्याचे समाधान फक्त.

बिग बॉस टीम. वीणाच दुसरी असणार पण नेहाला आणलं जुगाड करून, हाहाहा.

एनिवे नेहाचे fans होते तरी तिला दुसरी आणण्याचे कारण एक पराग इनसिडन्स असावा अस वाटतं. votes मध्ये ती दुसरी असेल की नाही मला अजूनही शंका वाटते. सॉरी नेहा fans, तुम्हाला दुखवायचा हेतु वगैरे नाही.

हल्ली पुंबा दिसले नाहीत.

मला मीनल आवडेल जिन्कलेली कारण काहीही असो पण विशाल कडन चुक झाली आणी ती रियलाइझ होवुन त्याने माफी मागायलाच हवी होती.एक गोश्ट त्याची मला अजिबात आवडली नव्हती जेव्हा सरानी त्याला १०वा न्बर दिला आणि मिनल-सोनालीला स्नॅप करतो सान्गितल तेव्हापासुन तो फक्त एकच पालुपद लावतो ते म्हणजे मी अस केल तर बाहेर वाइट दिसेल आणी हे करताना आपल्या वागण्याने दुसर्‍याची इमेज टार्निश होइल त्याच काय?? हे एक सोडल तर गेम मधे फेअर,टास्क मधे फेअर वैगरे आहेच तो.
नीट बघितल तर कळेल की सोनाली विक विक म्हणून तिला बरेच टास्क खेळायलाच मीळालेले नाही याउलट मिरा प्रत्येक टास्क खेळली आहे त्यामुळे सोनाली टास्क मधे भारी आहे हे थेट मिराशी भिडल्यावरच कळल अर्थात बाकी बर्‍याच बाबतित ती कमी पडली आहे ते मान्य.
अजुन एक गोश्ट म्हणजे बरेच व्युहरच मत मीनल मराठी नाही या गैरसमजामुळे मीळत नाहिये , काही लोक तिच्या अगेस्ट पण आहेत.
अस झाल तर फारच दुर्दैवी ठरेल.

प्राजक्ता फार छान विश्लेषण (विशाल, मीनलबाबत फार पटलं) .

विशाल मनाने चांगला वाटायचा आधी तेवढा तो आता वाटत नाही. त्याला निगेटिव्ह कमेंट्स नीट घेता येत नाही. त्यालाच जिंकून देणार चॅनेल हे मात्र आता नक्की वाटतंय. त्याच्यावर जास्त कॅमेरा असतो. त्याला मीनलपेक्षा जास्त भाव दिला जातो. मीनल मेघा पेक्षाही उत्तम आहे खरंतर.

विशाल ने सोनालीवर जो घाणेरडा आरोप केला. आता नाही जिंकत तो... >>> नाही वाटत असं. त्याचं ग्लोरीफीकेशन सुरू केलं म मां नी परवा पासून आणि सोनालीला सिंपथी positively घेता आली नाही, फार कटकटी, किरकिरी आहे.

मीनल विशालपेक्षा खूप positive वाटते मला. मला आधी विशाल खूप आवडायचा पण मीनलपेक्षा कमीच.

कोणाची जाऊन माफी मागण्याएवढं मोठं मन नाही त्याचं. म मां ही त्याला सोनालीला अस चावडीवर बोलायला नको होतंस अस एका शब्दाने बोलले नाहीत. सोनालीनेही विषय काढला नाही तो. मोठी गोष्ट होती ती, सोडून देण्यासारखी होती अस मला personally वाटत नाही.

विकासने काही गोष्टींमुळे टॉप 2 मधला चान्स गमावला त्यात उतक्या मीरा बद्दल गॉसिप केलं तो मोठा भाग आहे.

चुका होतात खरंतर मोठ्या मोठ्या जसे मेघाने रेशमवर आरोप केले, शिव तर चावला होता पण त्या लोकांनी माफी मागितली आणि समोरच्यांनी माफ केलं. तसे इथे झालं नाही.

Pages