मराठी बिग बॉस पर्व तिसरे- २

Submitted by सूलू_८२ on 20 November, 2021 - 17:33

फायनलला थोडेच आठवडे उरले आहेत. स्पर्धा चुरशीची चालू आहे.

सो, हा आहे दुसरा धागा.

चला, चर्चा करुया!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मांज्या येडा आहे का? मुर्खासारखे सगळचं काय सांगतो हा. MU बद्दल, सोनालीची विशाल आणि त्याच्या आईबद्दलची कमेंट, हे सांगायची काहीच गरज नाहीये. असं एकुणएक मागे बोललेले सांगणार असेल तर कोणाला काही बोलायलाच नको.
आणि मीराला isolute करता का म्हणून विचारतोय, ती मीरा पण माझ्याशी कोणी बोलत नाही म्हणून सांगत होती अरे हीच ना काल गायत्री विरुद्ध बोलताना म्हणत होती की मी एकटी बसेल पण त्या लोकांशी बोलायला जाणार नाही. हे दिसले नाही का मंज्याला.

सोनाली ला काढा यार बाहेर.. प्रश्न काय ,उत्तर काय.. किती घुमवते...
विकास ची MU कमेंट खरच वाईट होती ते पण नुकतेच फॅमिली व्हिजिट मध्ये उत्कर्ष ची बायको येऊन गेली असताना..त्याला बोलणं गरजेचं होतं असं मला तरी वाटलं... उत्कर्ष ची फॅमिली बॅकग्राऊंड बघता हे स्पष्ट कारणं गरजेचे आहे असे चॅनेल ला पण वाटले असेल..
सोना वेडी आहे.. इतके राडे झालेत तरी विशाल बद्दल कशाला बोलायला जाते..तिला मिळालेली सिंपथी ती घालवणार आहे हळूहळू

विकासने अशी कमेंट करायलाच नको होती, फार वाईट आहे ते, votes कमी होतील आता त्याचे (अर्थात votes मुळे नाही पण अयोग्यच आहे ते). विशालच जिंकेल अस वाटायला लागलं आहे. कलर्सना विकासला जिंकवायचे असतं तर तो काय म्हणाला ते सांगितलं नसतं.

म मां यावेळी इतके पत्ते ओपन का करतायेत.

प्रोमो बघितला त्यात उतक्याला बुगूबुगू म्हणतायेत अस दिसलं. तो झालाच आहे.

बिबॉसला जय आणि मीराकडून टीआरपी घेऊन कंटाळा आला बहुतेक.म्हणून गेल्या आठवड्यातून सोनाली आणि आता विकासला धरल आहे.आज चावडीच्या आधीतर सोनालीच होती सगळीकडे.
अस झाल तर सोनाली बाहेर जाण कठीण आहे.

२६ डिसेंबरला फिनाले आहे का, कारण २७ पासून नवीन सिरियल्स त्याजागी येणार आहेत, एका सिरियलचा प्रोमो बघितला, आई नाव आहे. भार्गवी चिरमुले आई आहे, तिची लेक आईशी खोटं बोलत असते, कॉलेजमध्ये एक्स्ट्रा लेक्चर आहे सांगून पबला जात असते.

दुसर्‍या चॅनेलच बघुन सेमच थिमवर काहीही सिरियल काढतात, तुमची मुलगी काय करते अस काहितरी नाव असलेली सिरियल येणार आहे त्याची थिमही अशिच आहे त्यात मधुरा वेलणकर आहे.
सुन्दरा मनामधे भरली वरुन येउ कशि मी नान्दायला अशी सिरियल काढली. बन्डल आहेत सगळॅ चॅनेलवाले

आई नाव आहे.>>> अरे देवा! अजून एक आई येणार का आता? आधीच एका आईचा नवरा सोडला तरी सासर सुटत नाही हा प्रॅाब्लेम आहे. आता या आईचा मुलगी हातातून सुटत चालली हा प्रॅाब्लेम असणार. किती टेंशन प्रेक्षकांना!

मला वाटत जस जयच्या टिम मधे जय सर्वेसर्वा आहे तस बी टिम मधे आपण असाव अस विकासला कुठेतरी वाटत असत पण इकडे सगळेच आपल्या मर्जिचे मालक अर्थात तेच बरय.
विकास थोड्या थोड्या काड्या करतोच,त्याला खरोखर यातल काही करायची गरज नाहिये चान्गला डोकेबाज आहे विकास. केस काढण्याचा टास्क वरुनच कळल की त्याला बरोबर उमगल की हे सगळ बाहेर कस दिसणार.
विशाल फेअर वैगरे ठिक आहे पण फार रडवा आहे, एवढ्या तेवढ्या वरुन लगेच हळवा होतो,सोनालीला जे बोलला त्याबद्दल त्याला वाइट वाटत होत ना ,म्हणायच की सॉरि,विषय सन्पतो.
मीनलला वाघिण म्हटेल ममा! एकदम भारी वाटल, ती एकटिच सात्यत्य राखुन आहे खेळात ,किचन मधे वैगरे फार काहि करताना दिसत नाही, लाइव्ह मधे दाखवत असतिल तर माहिती नाहि.
बा़की सोनालीही उगाच काहितरी बोलत बसते, विषय घुमवते.
जय-मिराची आज उद्द्या सलग खरडपट्टी निघणार हे ते क्लियरच होत.

अरे देवा! अजून एक आई येणार का आता? आधीच एका आईचा नवरा सोडला तरी सासर सुटत नाही हा प्रॅाब्लेम आहे. आता या आईचा मुलगी हातातून सुटत चालली हा प्रॅाब्लेम असणार. किती टेंशन प्रेक्षकांना!>>>smiley36_0.gif

सोनालीची सतत किचनच्या कामावरुन किरकिर चालू असते. विकासमुळे ती ए टिम कडे जाता जाता थोडक्यात वाचली. तसेही ए टिम सन्धीच शोधत होते सोनालीला आपल्याकडे खेचायला.

विशालची स्वत:शी बोलण्याची सवय इतर स्पर्धकान्ना लागली वाटत. काल गायत्री, आज सोनाली एकटया बोलत बसल्या होत्या.

विशालची स्वत:शी बोलण्याची सवय इतर स्पर्धकान्ना लागली वाटत.>> बाकिचे स्वतःशी बोलत असतिल कदाचित पण विशाल पुर्णपणे प्रेक्षकाशी बोलत असतो.. ट्रिक आहे ती.

मांजरेकर सोशल मीडिया वाचून त्यावरच जास्त बोलताहेत. सोनालीला बोलल्याबद्दल आणि ती रडल्याबद्दल लोक त्यांनाही बोलत होते त्याचं स्पष्टीकरण त्यांनी सोनालीकरवी काढून घेतलं.

विकास बोलू नये अशा गोष्टी बोलतो तेही अकारण . मांजरेकर आता त्याला पकडू लागलेत.

चावडी दरम्यान उत्कर्ष भलताच टेन्स दिसत असतो. जय आताल्या आत खदखदत असतो. मीरा deer in the headlights असते.
गायत्री अगदी आरामात असते. सोनालीला काय चाललंय ते कळत नसतं. आपलं कौतुक केल्यावर मीनल ओव्हर रिअ‍ॅक्ट होते.

ममां, बी टीम ला बोलण्यासाठी काहीतरी छिटपूट मुद्दे काढून त्यांना रागावतात, त्यांची स्ट्रॅटेजी उघड करतात! काय गरज होती, एम यु, अन विशालचे घरचे येऊन गेल्यावर सोनाली कशी रिएक्ट झाली, ए टीम मूळे मीनलला लोक फेव्हर करत आहेत.. हे मुद्दे काढायची.

गादा बी टीममध्ये आल्यापासून तिचा खेळ खुललाय. बरीच पोजिटिव्ह वाटतेय, मुद्देसूद बोलतेय.. सगळं आठवून! काल चावडीवर मिराला मस्त छान टशन दिली! तिने परवा विकास सोनालीलाही छान समजावलं की तुम्ही सतत भांडता अन टास्क मध्ये टीम ए त्याचा वापर करून घेते!
मिराला 16 मिनिट मिळाले की 14... हा मुद्दा ममांनी दोनदा काढला! जयला नेहमी त्यामानाने सौम्य रागावतात. पण आज मात्र सोमीच्या अतिआग्रहावरुन जय या त्यांच्या लाडक्या केंडीडेटवर बरसणार आहेत हो.. अगदी टडोपा झालं.

<<जय विशालचा पाय पूर्ण ताकद लावून ओढत होता, पिरगाळला हे तिथे दाखवलं पाहिजे.<<अगदी! त्यांना ती व्हिडीओ क्लिप दाखवली पाहिजे.

आज मला एक खटकत होत आणि हे ममा आधिही बोलले आहेत जयला" अरे तुला विनर बनायच तर असेल तर हे कराव लागेल, ते कराव लागेल"
म्हणजे ??? तोच विनर बनणार आहे हे जणुकाही ममाना आधिच माहित आहे आणी चॅनेललाही खात्री आहे ]
चावडीवर येवुन फक्त जयला हिन्टस देण चालू आहे का की बाबा कमी चुका कर्,फेअर दिस, माजोरडेपणा थोडा कमी दाखव म्हणजे आम्ही तुला विनर केल तरी पब्लिक बोन्बा मारणार नाही अस आहे का?
उत्क्याला जयला सगळ्यात सॉफ्टली रागवतात त्यामानाने मिरा आणी सोनालीला खुप हार्शली बोलतात.

बाय द वे काल मांजरेकर म्हणाले "अनुल्लेखाने मारा रे!!" ,>>
हो हो. मी नेमकं तिथूनच पहायला सुरुवात केली.. आणि लगेच म्हणाले..म मां माबो वाचतात. Proud

उत्क्याला जयला सगळ्यात सॉफ्टली रागवतात त्यामानाने मिरा आणी सोनालीला खुप हार्शली बोलतात.>>> हो. अगदी जाणवण्याइतपत.
मला असं वाटतं की रागावल्यावर कोणी स्पष्टीकरण देऊ लागले की ते चिडतात आणि बोलत सुटतात. उत्कर्ष किंवा वि२ आणि मिनल सॉरी म्हणून टाकतात, मग ममांना काही बोलता येत नाही. जय काहीच रिऍक्शन देत नाही. त्यामुळे, तिथेही गप्प बसतात.

ममांनी आज अगदीच सोशल मिडिया वरच्या त्यांना बॅश केलेल्या मुद्द्याला जस्टिफिकेशन देऊन केली Wink
ट्विटर, फेसबुक आणि मायबोली सगळीकडून फिडबॅक घेते बिबॉ क्रिएटिव्ह टिम Happy
उत्कर्षला बुगुबुगु म्हंटल्यानी फार समाधान वाटलं, मला आवडली ही सुद्धा चवडी , जय -मीरा नेहेमीचे यशस्वी कोडगे बोलणी खात बसले आजही !
विकास सोनाली बरोबर गॉसिप करून फसतोय विकेन्डला, अ‍ॅक्सेप्ट करायचं कि त्यापेक्षा, त्यानी प्रॉपर गाणं म्हंटलं होतं “ऐसे भोले बनके है बैठे, जैसे कोई बात नही“ !
सोनालीला अजिबात मुद्देसूद उत्तरं देता येत नाहीत, फसतेय ती पण , त्या मानाने गायत्रीने गेम अप केलाय, व्यवस्थित बोलतेय!
आता ममांनी एकदम प्रेडिक्टेबल केलेत टॉप २, मीनल-विशाल !
विकास नाही जिंकणार आणि जय तर नाहीच !
बिबॉ सुरु होण्या आधी जयला इन्स्टावर 426k फॉलॉअर्स होते, दर आठवड्याला त्याचे फॉलॉअर्स कमी होत चाल्लेत, आता 411k आहेत.

विकास विनर मटेरियल नाहीचे.‌ खरं बघता विशाल पण तसा नाही.( मला वाटत नाही) पण त्याला फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. त्यातच मिनल कुठेतरी मागे पडेलसं वाटतं.

विकासच्या बाबतीत ममांनी जे अगदीच पुचाटपणे त्याला समजावल,हे अजिबात नाही पटल.ते अत्यंत चिप मेंटँलिटीच होत.
विशालला बोलून देऊन सोनालीच्या जशचारित्राला बदनाम केल,
हाच विशाल अगदी पहिल्या आठवड्यात मीराला बोलला होता की लव्ह अँगल लागतो,त्यावर मीराने त्याला झापल होत.तो ही सोना सोना करत मागे फिरायचा,सौंदर्या होती तर मग हे का करायचा तो?
पण ममांनी एकदाही त्याला त्याबाबत झापल नाही.
ममांनी यावेळी टीम बी ला फारच झुकत माप दिल.
याच गायत्रीच कौतुक करून तिला ममां सिंपथी मिळवून देत आहेत.
पण पहिल्याच आडवड्यात तिला बुगुबुगु म्हणणारे ममांच होते.
गायत्रीला फार वाटत आहे की टीम बी तिच्या बाजूने खेळणिर आहे,पण तोंडावर आपटणार आहे.

"सध्याच्या टॉप 8 ऐवजी एलिमीनेट झालेल्या पैकी कोणाला घरात पाहायला आवडलं असतं" या गेम मध्ये मीरा ने विशाल च्या ऐवजी दादूस चं नाव घेतलं... जोक ऑफ द सिझन ...
ममांना पण फसकन हसायला आलं

Pages