मराठी बिग बॉस पर्व तिसरे- २

Submitted by सूलू_८२ on 20 November, 2021 - 17:33

फायनलला थोडेच आठवडे उरले आहेत. स्पर्धा चुरशीची चालू आहे.

सो, हा आहे दुसरा धागा.

चला, चर्चा करुया!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

विकास,मीनल,गायत्री,सोनाली,मीरा हे बहुधा नॉमिनेट झाले आहेत.
तुपारे किंवा मीराला काढायच नसेल तर फँमिली विकच कारण देऊन वोटिंग लाईन्स बंद ठेवतील. कारण आज टास्क पूर्ण झालेला नाही..

गा दा नॉमीनेट झाली तर बरं होईल पण यावेळी सोनालीला पाठवतील बहुतेक. विकास मीनल सोनाली नॉमीनेट अस दुपारी बघितलं होतं. त्यात उतक्या किंवा गा दा यापैकी नक्की कोण ते समजलं नाही अस सांगितलं होतं.

कोणा कोणाला नॉमिनेट करायचे ते जय ठरवणार?! बिबॉ ने ९-१० व्या आठवड्यात जय ला इतकी मोठी पावर देणे अजब आहे. अर्थातच तो बी ग्रुप ला टार्गेट करणार. बिबॉ च्या निशाण्यावर बहुतेक सोनाली असावी या वेळी.

मला वाटतय कि या आठवड्यात नो एलिमिनेशन्स, अजुन नॉमिनेशन टास्क कंप्लिट झालं नाही म्हणून असेल पण वोटिंग लाइन्स बन्द आहेत !
फॅमिलीविक सुद्धा आहे त्यामुळे कॅन्सल करु शकतात एलिमिनेशन !
हिन्दी मधेही कॅप्टनला जेंव्हा पॉवर दिली होती, तो आठवडा एलिमिनेशन्स बन्द ठेवली होती!
तरी मला नाही वाटत सोनाली जाईल, अ‍ॅटलिस्ट बिबॉने प्रामाणिक वोट्स धरली तर.. तिला प्रचंड सपोर्ट मिळतोय सोशल मिडियावर, उलट शनिवारच्या विशाल प्रकरणाने चांगलाच फायदा झालाय तिला !
गायत्री जायला हवी !
विशालने स्वतःचा गेम खराब करून विकासचा मार्ग सोपा केलाय जिंकण्यासाठी, जय तर अजिबात नाही जिंकणार.. शक्यताच नाही.. विकास नंतर मीनलचे चान्सेस आहेत.

एपिसोड नाही पाहिला अजून, पण नॉमिनेशन कार्य का पूर्ण झाले नाही? कार्याचा प्रोमो बघून काही कॉम्प्लिकेटेड वगैरे दिसत नव्हते.
दाखवण्यापुरते टास्क असेल अन वोटिंग लाइन्स बंद असतील तर मग ठीके.
सोनाली ला विशाल प्रकरणामुळे बराच मनस्ताप झाला आणि बिबॉ ने तिला कन्फेशन रूम मधे बोलावले अन समजावले असे सोमि वर वाचले. असे असेल तर मग यावेळी नाही जाणार सोनाली. सोमि वर सपोर्ट पण खूप दिसतो आहे.

हाय अन्जु,
सुट्टी एन्जॉय करत होते Happy
सिक्रेट रुम कन्सेप्टला फारसा अर्थ राहिलेला नाहीये चुगली बुथ सुरु झाल्या पासून !

फॅमिली वीक म्हणजे प्रेक्षकांसाठी शिक्षाच. सगळे फेक रडारड करणार. सगळ्यांचे कुटुंबिय एकच कॅसेट वाजवतात चांगले खेळतोय. काही कॅमेरा समोर भांबावून जातात. ईन मीन तीन महिने तर असतात, त्यात कसला आलाय विरह?

गायत्री विशालला जॉईन झाली. दोघान्नाही त्यान्च्या टिम्सने हाकलल. हि विशाल-सोनालीच्या पर्सनल इश्यूमध्ये का इण्टरेस्ट घेतेय?.

सोनाली म्हणे कधीच पझेसिव झाली नाही विशालसाठी असे तीच म्हणतेय. मागे तीच विशालला ' मीराशी बोलू नको' म्हणून टोकत होती ना!

ती विशालच्या स्विमिन्ग पूल प्रकरणाबद्दल विकासल सान्गत होती.

नेलपेण्ट लावताना तिने त्याच्या हाताला टच केल अस विशालच म्हणण आहे.

आज दोन मॉर्निन्ग सॉन्गज दाखवली

कोई हिरो यहा (जयवर कॅमेरा)

कोई झिरो यहा ( गायत्रीवर कॅमेरा) हा हा हा

जयचा पुन्हा माकड झाला आज टास्कमध्ये.

बादवे, ती महिमा मकवाना (अन्तिम ची हिरवीण) छान मराठी बोलते.

म्हणजे विशाल गायत्री तिसरी टीम का आता. विशाल का धोंडा मारून घेतोय अजून. एवढा तमाशा पुरे नव्हता का.

बादवे, ती महिमा मकवाना (अन्तिम ची हिरवीण) छान मराठी बोलते. >>> हो, दिसतेही गोड. म मां चे कौतुक, एकीकडे आजारपण सुरू असताना, फिल्म केली.

एक समजत नाही मला...इतक्या मिठ्या कोणीही कोणालाही मारतात ते सगळं निर्मळ, जयने मीराला उचलून उत्क्याच्या अंगावर टाकलं होतं. ह्यांचे कपडे, बसणं उठणं सगळंच लिंगनिरपेक्ष असतं अन् मग नेलपेंट लावताना असं काय वेगळं टच करणार देवालाच ठाऊक.

नेलपेंट लावताना असं काय वेगळं टच करणार देवालाच ठाऊक.
>>>अगदी बरोबर... अत्यंत चीप कमेंट आणि आरोप होता विशाल चा... सोनाली च्या जागी मेघा धाडे किंवा शिवानी सुर्वे असती.. फाडून खाल्ला असता.. आणि हा मुद्दा आठवडा भर चालला असता...

गायत्री मिरापासुन वेगळी झाली पण आज लढली, टुकुटुकू का होइना पुढे गेली, जय कधिही फेअर खेळुच शकत नाही याने तो सगळ करुन माती खातोच भयकर अहकारी आहे तो आणि तोच त्याला नडणार आहे, हाच एक गुण विशाल मधे लोकाना आवडायचा पण त्यानेही नको ते बोलुन मातीच कालवली.
हे माझ्या डोक्यातले कीडे असतिल पण आज मिराचा हात हातात घेवुन उत्कर्षच काय चालल होत नक्की??? विकास कशाला विचारत होता सोनालीला की तु बोलणार आहेस का विशालशी? या ग्रुप तुटायला नकोय की हे फार डिप गेल तर तो एक्ष्पोज होइल अस वाटतय की अजुन फायरवर्क हवय हेच कळत नाहिये.

हे माझ्या डोक्यातले कीडे असतिल पण आज मिराचा हात हातात घेवुन उत्कर्षच काय चालल होत नक्की???
<<<
+१११११११
अगदी हेच्च लिहायला आले कि कोणीच कशी नाही चर्चा केली याची Proud

बाकी जयने पुन्हा स्वतःला मूर्ख प्रुव्ह केले, मीनल रॉक्ड !!
मीरा अजिबात इथपर्यन्त यायच्या लायकीची वाटत नाही, ना डोकं, ना फिजिकल स्ट्रेंथ !
गायत्री पहिल्यांदाच जरा एकटी डोकं चालवत होती, मीराच्या कंपॅरिझनमधे बरीच बरी वाटली!
सोनाली व्हिक्टिम कार्ड खेळतेय !
विशालने ज्या प्रकारे चावडीवर सांगितले तिथे फारच माती खाल्ली पण म्हणून सोनाली काही बरोबर प्रुव्ह होत नाही, तिची होतीच स्ट्रॅटजी विशाल किंवा जय बरोबर रोमान्स अँगल घेत पुढे जायची, एकदा तर म्हंटलीही होती कि मांजरेकर आपल्याला का नाही चिडवत स्नेहा जय सारखे Uhoh
जयच्या मागे कायम असायची.. स्नेहाचं कौतुक करतोस तसं माझं का नाही करत विचारत होती !
ती खरं तर स्ट्राँग आहे, बोलण्यात ठसका आहे , एंटरटेनिंग आहे.. या गोष्टींची गरज नाही तिला पण विशालच्या मागे मागेच असायची .
अजुनही तिला उत्तर देता आलं नाहीच आहे, बॉय असलेला फ्रेंड? सिरीयसली ? Uhoh

काल सोनाली डोक्यात गेली. ती बोलत असताना मी टीव्ही म्यूट केला. विकास मीनल तिलाही समज वायचा प्रयत्न करताहेत असं दिसलं पण त्याचा उपयोग नाही. ती जाईल तर बरं.
गायत्रीने काल चांगल्या मुव्हज केल्या असं वाटलं. विशालशी बोलली. पण त्या गोष्टींबद्दल नव्हे. गॉसिपिंग किंवा बिचिंग नव्हतं. जे झालं त्याचा तुला खूप त्रास झाला असेल तर स्ट्राँग रहा असं म्हणाली. मग विशालशी डील केलं. जयशी ही व्यवस्थित बोलली. मी तुला मीराचं पुस्तक उचलायला सांगितलं तर उचलशील का?

कालच्या शेवटच्या राउंड आधी विकासने फेअर खेळा असं म्हणून मैदान व्यवस्थित तयार केलं. जयने मीनलला बाद केल्यावर तिला कोलीत मिळालं. पण त्या वादाचा मला कंटाळा आल्याने मी टीव्ही म्यूट केला. मागच्या वेळी तिने उत्कर्षला "माझ्यापेक्षा दादूस अधिक योग्य आहे कएव? एवढंच दोनदा विचारलं होतं ते पर्फेक्ट होतं.
मला वाटतं काल आणखी एक फेरी झाली असावी. ती आज दाखवतील. काल जयला त्याचे प्रेफरन्सेस क्लियर करायला लागले.

अशा मूर्ख बायकांमुळे मीनलसारख्या चांगले खेळाडू झाकोळले जातात. बिंडोकपणा करणारे, लंपटपणा करणारे प्रत्येक सिझन मध्ये असतात. त्यांना फुटेज देण्यापेक्षा आपण मिनलला जिंकून देऊयात.

विकास-मिनल अगदी ठरवुन माइण्डगेम खेळतात,
मिरा-मिनल मधे जयची चॉइस मिराच असणार आहे हे अगदी स्पश्ट असल तरी ते जय कडुनच त्यानी वदवुन घेतल की तो कसा बायस्ड आहे, मिरा बाई नॉट आउट तर काय चल हड करत तयारच असतात की लगेच तीही विकासला बोलली.खरतर तिच्या बाजुने ऑलरेडी जय बोलत होता पण गप्प बसेल ती मिरा कुठली.
विकासच शस्त्रच मुद्देसुद बोलण आहे, कितीही टोकाचे वाद चालू असले तरी बाकी सगळे भरकटतात तो कधिच मुद्दा सोडत नाही... गायत्रीच्या मानाने सोनाचे एफर्ट कमी वाटले.

वोटिंग लाईन्स बंद आहेत या आठवड्यात.
फॅमिली वीक, रडारड सुरू.
120 मिनिटे 8 जणात वाटून घ्यायची पण समान वेळ नाही मिळाली पाहिजे कोणालाच असं गणित बिबॉ ने घातलं
गादा ने तिचं गणित खूपच पक्के असल्याची झलक दाखवली.
मीरा ने वेळ वाटून देताना पण भांडण काढलं. 5 वर्ष घरचे बोलले नाही म्हणे. इथे तरी बोलतील.. काहीही..
गादा कृपेने टीम बी ला पाहिल्यांदाच बहुमताची मजा घेता आली

5 वर्ष घरचे बोलले नाही म्हणे. इथे तरी बोलतील.. काहीही..>>> ॲा! ५ वर्ष काय झोपली होती का ती, आता ५-१० मि. साठी भांडते. आताच नॅामिनेट हो आणि घरी जा. मग बोलत बस काय बोलायचे ते. असे सांगायला हवे तिला.

गादा कृपेने टीम बी ला पाहिल्यांदाच बहुमताची मजा घेता आली>> अगदीच त्याने जय-मिराची नुसती चरफड चालू होती, मीरा केवढी रफ बोलते नुसरी हाड्तुड चालु असते तिची, बीबॉ पण विचित्रच आहेत, घरच्याना भेटायच्या वेळेत कसली आलिये वाटणी, सगळच काय एनकॅश करता?

हे नवीन काय सुरु केलं, वेळ वाटणी वगैरे. दोन सीझन असं कुठे होतं. भेटुद्याकी फॅमिलीला बराच वेळ, समान वेळ वाटणी करा.

गा दा चांगली खेळायला लागली असेल तर ती जाईल फायनल सहात. मीरा पडेल आधी बाहेर.

युटयूबवर लाईव्ह फिडचे काही भाग दाखवले त्यात टिम बीच पॅचअप झालेल दाखवलय. पण गायत्री अजूनही टिम बी मध्ये आहे.

मीराचा फॅमिलीशी नक्कीच काहीतरी इश्यू असावा. तिच्या भावाने ' मरणाच्या दारातून परत आलीस' अस काहीस लिहिल होत बोर्डावर.

सोनालीच्या आईने विशालकडे बघून न बघितल्यासारख केल.

सोनालीची आई एकदम साधी पण खमकी वाटत होती, बहिण पण एकदम उत्साहात, जवळ घेवुन काचेलाच पाप्या चालल्या होत्या, ते एकदम ओव्हरव्हेलिमिन्ग होत, छान होत्या दोघी.
सोना आइला बघुन एकदम मिठी वैगरे आणि एकदम ही कोणती साडी नेसलियेस, मला एकदम रिलेट झाल.

मीरच्या भावाने बहिणीला ग्लोरिफाय करायला लिहिले खरे, पण सोमिवर पब्लिक सॉलिड रेवडी उडवतय. फुल्ल ट्रोलिंग सुरु आहे मीराचे.
गादाने टीम बी जॉइन काय केली आणि सोमि पब्लिकने तीला सपोर्ट करायला सुरवात केली आहे. म्हणजे अजुन तरी गेम टीम ए आणि टीम बी असाच सुरु आहे.

नो एव्हिकेशन विक आहे मग तुम्हाला काय वाटत कुणाला दारापर्यत नेवुन परत आणणार? थोडक्यात कुणाला हुल देणार बिबॉस?
मला वाटत मिराला देतिल, तीच ड्रामाक्विन आहे

Pages