मराठी बिग बॉस पर्व तिसरे- २

Submitted by सूलू_८२ on 20 November, 2021 - 17:33

फायनलला थोडेच आठवडे उरले आहेत. स्पर्धा चुरशीची चालू आहे.

सो, हा आहे दुसरा धागा.

चला, चर्चा करुया!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

विकास सोनालीला सांगत होता की तिने विशालला चुकीचा स्पर्श केला वगैरे तसं तर विशाल काही बोलला नाही. विकास आणि मीनलला हे कसे ऐकायला आले जे तो बोललाच नाही किंवा त्या अर्थाचही काही बोलला नाही. सोनाली तर असंबद्ध बोलत सुटते.
Submitted by चंपा on 28 November, 2021 - 14:46

>> चंपा ... विशाल क्लिअरली असेच बोलला... आणि ते कोणत्याही मुलींसाठी खूप एम्बरॅससिंग आणि इन्स्लटिंग आहे...

विशाल गेम साठी कोणत्याही लेव्हल ला जाऊ शकतो.. पाताळयंत्री आहे...

विशाल सोनाली फार ताणले सरांनी.

किंवा त्या अर्थाचही काही बोलला नाही. >>> समहाऊ मला तोच अर्थ वाटला. मला जे वाटलं तेच विकास मीनलने सांगितलं नंतर पण मला विशाल सांगताना तोच अर्थ लागला, दूसरा नाही. लगेच अस वाटलंही की विशालने मग लगेच का नाही झापले तिला आणि नेलपॉलिश का लावत बसला नंतर.

सोनालीला अति बोलले पण त्यामुळे मीराला कमी झापले अगदी पहिल्यांदा हे बरं वाटलं अर्थात सोनाला अति बोलले ते नाही आवडलं पण ती किरकिरी आहे हे मात्र खरं. तरी ती माठ आहे, विकास मीनलने सांगूनही विशाल माझ्याबाबत चुकीचे बोलला हे बाहेर म मां ना सांगितलं नाही तिने. विशालने फार चुक केली.

विशालला विकास डोक्यावरचा भार का वाटतो, विकास डोक्याने खेळतो.

जय एकदम गुड बॉय झालाय ह्यावेळी.

मीनल छा गयी, फार सुंदर दिसत होती. तिच्यानंतर दिसण्यात मीरा आवडली. मीनल, विकास, मीरा तिघे आवडले मला पहिल्या विकेंड भागात, समहाऊ प्रेझेंटेबल वाटले, दिसण्यात आणि बोलण्यात. विकास मीनलने अगदी करेक्ट सांगितलं सोनालीला आणि विकास समोर बोलायलाही घाबरला नाही.

गा दा ला सेल्फ रिसपेकट आहे हे समजलं तिच्या सांगण्यावरून, हाहाहा. आता ही जाऊदे बाहेर.

टीम बीची टास्कमध्ये विशालवर - त्याच्या ताकदीवर अवलंबून असतात त्यामुळे त्याला वाटत असेल की आपण या लोकांची वजनं उचलून धावतोय. हे तो जयला म्हणाला. जयच्या बाबतही असंच आहे. टीम ए ची कामगिरी जयमुळेच होते.

मांजरेकरांनी नोट केलेला एक पॉइंट आवडला - नॉमिनेशन तिकिट टास्कमध्ये उत्कर्षने दादूस समोर मीनलचं तिकीट कॅन्सल केलं. पुढच्याच फेरीत मीनलने टीसी होऊन दादूसला बाद केलं.

टीम बीची टास्कमध्ये विशालवर - त्याच्या ताकदीवर अवलंबून असतात त्यामुळे त्याला वाटत असेल की आपण या लोकांची वजनं उचलून धावतोय.....जयच्या बाबतीत हे खरे आहे, विशालचा मात्र मोठा गैरसमज आहे. तो असताना देखील विकास मिनल सोनाली नॉमिनेशन मध्ये आलेत. उगाच भ्रमात आहे तो. उलट मिनलने सेफ केलय त्याला एक दोनदा.
आणि आता हा जर ह्यांना सोडून जय उत्कर्ष ला सेफ करणार असेल तर कर बापडा, पब्लिक आणखी शिव्या देणार. त्या ए टीमची ईमेज अजूनही बाहेर वाईटच आहे.

टीम बीची टास्कमध्ये विशालवर - त्याच्या ताकदीवर अवलंबून असतात त्यामुळे त्याला वाटत असेल की आपण या लोकांची वजनं उचलून धावतोय.....जयच्या बाबतीत हे खरे आहे, विशालचा मात्र मोठा गैरसमज आहे.>> +१ हे ममानी सुद्धा सान्गितल आहे की इकडे सगळे जयला लटकलेले असतात पण टिम बी मधे नाहिये कुणि कूणावर अवलबुन.
झाला त्या प्रकाराचा सोनाला फायदा झाला भरपुर सिम्पथी मिळालिये,विशालला तोटा झाला , थोड पब्लिक विकासवर पण कावल कारण त्याने हा टॉपीक काढला.

विकासवर पण कावल कारण त्याने हा टॉपीक काढला... हा कॅज्युअल टॉक होउ शकला असता, कुठल्याही समजूतदार मुलाने हसण्यावारी नेला असता. हे पात्र प्रेमात पडले असावे, त्यामुळे दुखावले गेले.
मला वाटतं प्रेक्षकांनीच मुव्ह ऑन व्हावे, इट इज नॉट वर्थ ईट.

आयेऽऽऽ आयलोऽऽ.....गेले एकदाचे.

विशाल ने ते एकदा स्मोक केलं आणि चारदा केलं असलं काहीबाही बरळून माती खाल्ली.

आयूष शर्मा सलमान ची body language काॅपी
करतो असं वाटलं.

आता नंबर 'तुला पाहतेच रे' चा.

कुणीतरी बरोबर म्हटलंय वर....under 30s च्या लोकांना maturity जरा कमीच आहे.
Though sonali is above 30.

यांना स्मोकिंग रूम म्हणायचं नाही असं सांगितलेलं दिसतंय. अनेकदा ड्रायरूम म्हणतात. चावडीवर जय आणि विशालच्या तोंडून स्मोकिंग रूम निघून गेलंय.

काल विकास, मीनल आणि सोना सगळ्यांनी विशाल च्या फोटो वर नांगर फिरवला... मीनल आणि विकास कारण देताना छान बोलले... विशाल शहाणा असेल तर त्याने समजुन घ्यावे...
सोना ला नांगर फिरवताना स्वत: चा मुद्दा नीट मांडायचा गोल्ड्न चान्स मिळालेला पण ती मुळातच माठ असल्याने तिने घालवला.. ..तिच्या पर्सनल गोष्टी जसं की तिचा बॉयफ्रेंड, स्मोकींग ई ई...चावडीवर बोलायची गरज नव्हती..गेम चं काय असेल ते बोल असं ठणकावुन सांगायचं होतं विशाल आणि सर दोघांना...शनिवारी सुद्धा विशाल च्या आरोपांवर मला काहीच बोलायचं नाही...या माझ्या पर्सनल गोष्टी आहेत असं बोलुन शांत बसली असती तरी चांगली दिसली असती ती...ग्रेसफुल दिसली असती...
तिच्यापेक्शा स्नेहा बरी म्हणायची...नुसतं हॅ हॅ हॅ हसुन गप्प व्हायची...

खरच माती केली आहे विशाल ने गेम ची... तिथल्या सगळ्यांनीच नांगर फिरवण्याची गरज होती विशाल च्या फोटो वर.
सोनाली बावळट आहेच..तिच्या नादाने विशाल ने स्वत: ची वाट लावुन घेतली.
सलमान नुसता हूल देउन गेला... आलाच नाही स्वत:

गादाने माशांच्या टास्कमधे पैसे लपवले ते निघालच नाही, चावडीवर. फालतु पर्सनल इश्युज उगाळत राहिले ममां, परवा.

कालही त्या गेस्टसच्या समोर , मीरा- जयचे काय ते कौतुक. अन विशाल विकास, मिनलबद्दल एकेक वाक्य फक्त.

हा सगळं गेम विकास ने खेळला असं वाटतंय... शांतपणे प्लॅन करून विशाल च्या डोक्यात सोना भरवून दिली आणि बावळट सोना च्या डोक्यात विकास बद्दल तिलाही न कळलेलं अर्थ भरवून दिला

विकास एक नंबरचा लबाड कोल्हा आहे. सोमीवर त्याचा उदो उदो का करतात लोकं? सोमीवर पण मायबोलीसारखे माहेरच्या साडीतले अलका कुबल आहेत असा माझा समज झालाय आता.

विकास ने काडी टाकली हे खरं आहे... पण त्याचा इतका मोठा भडका उडेल हे त्यालापण अपेक्षित नसणार .... चावडी चालु असताना विशाल चा बोलण्यावरचा ताबा सुटायला लागला तेव्हा विकास ने त्याला अडवायचा प्रयत्न पण केला होता..नको बोलुस हे म्हणुन तो थांबवत होता...पण विशाल भाउ कधी कुणाचं ऐकत नसतात.... सोना ला पण विकास बरोबर बोलला की अगं बाई नेलपेंट ची कमेंट चांगली नव्हती पण तुला बोलायची इतकी घाई असते की समोरचा काय बोलतोय ते तु ऐकुनच घेत नाहीस.... सोना ने तिचा मुद्दा क्लीअर केला नाही तर ती विनाकारण वाईट दिसेल असं त्याला वाटलं असावं...
समोरच्या चा वीकनेस ओळखणे आणि तो योग्य ठीकाणी वापरणे हाच तिथे गेम आहे...नुसती शक्ती लावुन फायदा नाही.....हे विकास ला बरोबर कळलंय.... आपला वापर होत आहे हेच विशाल आणि सोना ला कळत नसेल तर तो त्यांचा प्रॉब्लेम आहे... राजा हरीश्चंद्र होउन बिबॉ जिंकता येणारे का ?
आता विशाल एकटा पडलाय...त्याने याचा नीट उपयोग करुन घ्यावा..... मेघा पण एका पॉईंट ला एकटी पडली होती ( पुश्कर ला खुप पाणी प्यायला लावायचा असा काहितरी टास्क होता तेव्हा)...पूर्ण घर तिच्या विरुद्ध होतं आणि तिची चूक सुद्धा होती त्यावेळी...सोमी वर पण तिला शिव्या पडल्या होत्या तेव्हा....पण ती वेळीच सावरली.. झालेली चूक लगेच पुढच्या आठवड्यात निस्तरुन उलट अजुन फेमस झाली...
बघु विशाल ला जमतय का ?

कुणीतरी बरोबर म्हटलंय वर....under 30s च्या लोकांना maturity जरा कमीच आहे.>>>> आजकाल खाण्यापिण्याच्या गोष्टीत भरपूर भेसळ करतात त्यामुळे पूर्वीसारखी परिपक्वता आताच्या पिढीत राहिली नाही. हे साठीचे होऊन केस पिकले तरी असेच असतील.

यावेळी सोनाली जाईल. गा दा बाई नॉमिनेट नाही बहुतेक आणि असतील तरी सोना जाईल.

गा दा हुशार निघाली, लास्ट मोमेंटला टीम बी जॉईन केली म्हणजे आता काही आठवडे उरले आहेत ना. बी टीम सपोर्टर्सची वोटस मिळतील. ए टीममुळे कॅप्टनपण झाली. हे सर्व यु ट्यूबवर बघून लिहीलं.

युट्युबवर बघितलं ग, ए टीमवाले पण म्हणत होते गायत्री गद्दार निघाली. व्हिडीओ नाही बघितला पण ते यु ट्युबवर सांगतात, खाली लिहीलेलं असतं, चित्र दाखवतात ते बघितलं. ख खो तुम्हाला रात्री समजेल.

आता खरतर गा दा चा नंबर असायला हवा होता ..पण कालच्या चावडी ने सगळा गोंधळ केला आहे. विशाल ने जरा आत्मपरीक्षण केले तर कळेल त्याला कि त्याच्या भोळेपणा कम वेडेपणाचा उपयोग विकास ला झालाय. केस कापण्याच्या टास्क नंतर बहुदा विकासाला कळले असावे कि विशाल पटकन घसरतो . विकासने स्वतः काही करायची गरजच नाही . विशालचा नंबर खाली घसरला कि विकास आपोआप वर चढणार

शनिवारची चावडी मी पहिल्यापासून बघितली नाही त्यामुळे ते नेलपॉलिश प्रकरण मला नीट कळले नसेल. दादूस महेशला म्हणाले की मी तसा लवकरच जातोय बाहेर आणि मला ऑ... वाटलं. लवकर गेले की उशिरा. तृप्ती, आदिश किंवा निथा असायला हवे होते त्यांच्याऐवजी.

शनिवारची चावडी मी पहिल्यापासून बघितली नाही त्यामुळे ते नेलपॉलिश प्रकरण मला नीट कळले नसेल. दादूस महेशला म्हणाले की मी तसा लवकरच जातोय बाहेर आणि मला ऑ... वाटलं. लवकर गेले की उशिरा. तृप्ती, आदिश किंवा निथा असायला हवे होते त्यांच्याऐवजी. >>
बिग बॉस ने दादूस ना मीरा साठीच ठेवले होते शो मध्ये हे कन्फर्म झालं.

निथा आल्यामुळे मिनल आणि सोनाली मधे दुरावा येत होता. निथा आणि मिनलचे चांगले बॅांडींग होत होते. पण बिबॅाने लवकर निथाला बाहेर काढले. ती जाताना मिनल बोलली होती कि निथा असती तर आम्ही दोघी मिळून छान खेळलो असतो.
सोनालीने वचावचा बोलणे आणि रुसवे-फुगवे यातच वेळ घालवला आहे. सुरूवातीला तर जयशी गोड बोलू कि विशालशी असे झाले होते तिला. मीराने एकदा जयला सांगितले होते कि विशालला जळवायला ती तुझ्याशी बोलते. तू तिच्याशी फ्लर्ट करायला जाऊ नको, तू वाईट दिसशील. तेव्हा ममा तिलाच ओरडले होते कि कोणी काय करायचे ते तू नाही सांगायचे.

मला नाही वाटत विकास ने मुद्दाम विशाल आणि सोना मध्ये वाद घालून दिला. तो बोलण्याच्या ओघात बोलून गेला विशाल कडे सोनाली च्या बॉयफ्रेंड बद्दल. आणि नेलपेंट चा मुद्दा सोनाली ला सांगितला कारण त्याला बरोबर वाटलं कि विशाल जे बोलला ते बावळट सोनाली ला कळलं नाहीय. त्याने विशाल ला सुद्धा थांबवायचा प्रयत्न केला होता. जर त्याच्या मनात अस काही असतंच तर तो शांतपणे बघत बसला असता. विशाल ने तो स्मोकिंग चा विषय काढला ते सुद्द्धा आवडलं नाही. स्वतःची इमेज वाचवणे हा एवढा एकच उद्देश होता त्याचा. तोंडाने फक्त सोनाली ला नाही म्हणत होता पण सारखा सोना सोना करत तिच्या मागे तो पण फिरत होताच ना.

अस्मिता पोस्ट आवडली.

विशालवर टीका होतेय, सोनालीचं चावडीवर सर्वांसमोर असं सांगितल्याने. नंतर त्याला बहुतेक पश्चाताप झालाय पण फार उपयोग नाहीये (युट्यूबवर मीनलला सांगतोय, अस बघितलं) . सोनालीचं जर असं वाटलं होतं तर तिथेच त्याने तिला ओरडून, निघून जायला हवं होतं खरंतर. आता खरं असो अथवा खोटं सोनालीला सपोर्ट मिळतोय.

आता जयला जिंकवतील पण मीनल जिंकूदे.

हा फॅमिली वीक आहे बहुतेक. विशालला सांगायला हवं त्याच्या फॅमिलीने कधीपासून तो निगेटिव्ह दिसायला लागला ते.

अस्मि_ता, अनुमोदन.
विशाल काही एकदम गरीब आणि सरळ नाही. मध्यंतरी २-३ दा लाइव बघितले (भांडी घासताना मस्त टिपी होतो :))तर तो 'सोना सोना' करत मागे फिरत होता. जर तिचे इंटेशन्स आवडत नव्हते तर का करत होता असे? तेव्हाच 'जेवढ्यास तेवढे' ठेवायचे. दोघंही सारखेच मुर्ख आणि दोषी आहेत पण त्याने सगळाच दोष सोनालीवर ढकलला.
विकासने आग लावली असे मला तरी वाटले नाही.
विशालचे हेही म्हणणे पटले नाही की ही तिघं मला निगेटिव्ह दाखवत आहेत. आम्ही बघतोय ना तू कुठल्या टोनमध्ये बोलतोस त्यांच्याशी ते. त्यातून काय इम्प्रेशन होतेय ते म मांनी सांगायचा प्रयत्न केला तर याचं उलटच. एवढा राग जर मनात होता तर आधीच वेगळं व्हायचं.

शनिवारी गोष्टी सावरायच्या सोडून विशाल आणि सोनाली एकमेकांना चुकीचे दाखवण्याच्या प्रयत्नात खूप वाईट दिसलेत. कुठे थांबायचं हे विशालला कळालं नाही.
सोनालीला तर लक्षातच येत नाही.

गावाकडे म्हण आहे.

रू ला टू लावणे.
तसं वागते ती.

नेलपेंट वेळी विशाल जे सांगत होता ते विकास, मिनल आणि A टीम सगळ्यांना बरोबर कळालं. त्यानंतर त्यांची एकमेकात चर्चा झाली असेल पण ती दाखवतीलचं असं नाही.

विकासने मुद्दाम काडी टाकली असेल असं वाटत नाही.
आपल्याला एडिटिंग असं दाखवतात त्यामुळे तसं वाटते कधी कधी. अजूनही 2 आठवडे तरी ग्रुप चा फायफा होईल सेफ राहण्यासाठी.

सोनाली मात्र खूप negative दिसली आहे.
तिला मॅटर handle करता आलं नाही.
काही काही सिन्स मध्ये बिगबॉस ने दाखवलं आहे की तीच विशालच्या मागे मागे करत असायची.
गायत्रीच्या आधी जाण्याची शक्यता वाढलेली आहे तिची.

मीरा आणि उत्कर्ष सेफ. जय कॅप्टन म्हणून सेफ.

नॉमिनेशन टास्क संपल्याचं अजून सांगितलं नाही.

Pages