मराठी बिग बॉस पर्व तिसरे- २

Submitted by सूलू_८२ on 20 November, 2021 - 17:33

फायनलला थोडेच आठवडे उरले आहेत. स्पर्धा चुरशीची चालू आहे.

सो, हा आहे दुसरा धागा.

चला, चर्चा करुया!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

विशाल फारच नखरे करतोय. त्याचा माजी या आठवड्यात उतरायलाच हवा. जयशी संगनमत करून काय मिळणार आहे त्याला?
मीनल एकटीच अशी आहे की टीम एशी डील करायला जात नाही. ती खरोखर डिझर्व करते जिंकणं.
विकास नक्की का जातो कटोरा घेऊन काय माहित? त्याने काहीच साध्य होत नाही.

विशाल फारच नखरे करतोय. त्याचा माज या आठवड्यात उतरायलाच हवा. जयशी संगनमत करून काय मिळणार आहे त्याला?
मीनल एकटीच अशी आहे की टीम एशी डील करायला जात नाही. ती खरोखर डिझर्व करते जिंकणं.
विकास नक्की का जातो कटोरा घेऊन काय माहित? त्याने काहीच साध्य होत नाही.

या आठवड्यात उत्कर्ष कॅप्टनसीसाठी का एलिजिबल नाही?
त्याने आपली संधी मीराला दिली. दुसरा जय.

मीनल एकटीच अशी आहे की टीम एशी डील करायला जात नाही. ती खरोखर डिझर्व करते जिंकणं. >>> ग्रेट आहे मीनल.

उत्कर्ष आणि मीनलने कँप्टनसाठी पात्र नाही अशा पाट्या घातल्या होत्या,म्हणून ते कँप्टन नाही होऊ शकत. >>> हे पूर्ण सीझनसाठी applicable आहे का, अरेरे .

मग आता सोना जाईल, या घरात राहण्यासाठी पात्र नाही पाटी घातलेली ना. दादुस गेले तर आवडेल मला.

मीनल आणि उत्कर्ष चा अवधी २ आठवड्यांचा होता. त्यामुळे मागच्या आणि या आठवड्यात त्यांना कॅप्टन होता येणार नव्हतं.
या आठवड्यात ए ग्रुप खरंच चांगला खेळतो आहे.
विशाल चा काय गेम आहे त्यालाच माहित. विकास पण उगीच नाही त्या गोष्टी उकरून काढत होता. काल सगळेच बी ग्रुप वाले एकमेकाबद्दल बिचिंग करत होते. फार बोअर झाले.
सोमि अन यूट्यूबर्स पण काहीही आउट ऑफ कॉन्टेक्स्ट वाक्यं हेडलाइन ला टाकून व्हिडिओ बनवतात. तेवढे काही मटेरियल नसतेच.
दादुस जावेत आता यावेळी.

अच्छा दोन आठवडे का, थॅंक यु मैत्रेयी.

ए टीम बहुतेकदा चांगली खेळते पण मनात बी टीमवालेच असतात पब्लिकच्या, माझ्याही. आता ते आपापसात मूर्खासारखे का भांडतात काय माहिती.

बाय द वे बीचुकलेला कोरोना झालाय त्यामुळे हिन्दी bb त नसणार तो, रश्मि देसाई आणि देबोलिनाला पण क्वारंटाईन व्हायला लागणार, अस अ‍ॅक्ट रायडरने सांगितलं.

हो विशाल सो मि वर जाम बोलणी खातोय.

खरंच मीनल व्हावी विनर. विशाल असाच वागत राहिला तर जिंकवणार नाहीत त्याला, votes पण कमी होतील. विकासचे जिंकायचे chances वाढतील. चॅनेल त्याला सपोर्ट करणार, तो चांगलाही खेळतोय. मला मीनल जिंकावी अस वाटतंय मात्र.

सोनालीच काय चाललय, काल म्हणत होती माझ अक्षयशी लग्न ठरलय. आज ती 'अक्षय माझा फक्त मित्र आहे' अस विकासला सान्गत होती.

विशाल इज टू मच. सत्यवादी हरिश्चन्द्र बनायला चालला होता जयसमोर. विकासने त्याच शिक्षेसाठी नाव घेतल्यावर चिडलाय तो.

जय आणि मीराच आता जुळवू पाहतायेत का आता बिबॉ? त्यान्च्या वागण्यावरुन तरी असच दिसतय.

उद्या विशाल विकासशी फिजीकल होणार आहे टास्कमध्ये. तरीच म्हटल अजून राडे कसे नाही झाले टास्कसमध्ये.

विशाल किती स्नॅप करतो सगळ्याना? प्रत्येक वेळेस मिनलला गप बसवत होता, एक्दम काहितरी वेगळच बिहेव करतोय, मी फेअर खेळणार फेअर खेळणार एवढी एकच टेप वाजवत होता पण प्लॅनिन्ग तर करत होता तिकडे जयकडे जाउन.तो टिम ए मधे कूणालाही स्नॅप करत नाही कधि.
जय अर्धी स्लाइड अडवुन बसला होता कसे गोळा करणार कोणी मासे? भयकर ओव्हरपोवर करतो तो.
दादुसने आज बोलावुन दाखवल की त्याना बाहेरचे वेध लागलेत, त्याचि बॉडी लॅन्गवेजच सान्गते की त्याना काहिच रस नाहिये खेळण्यात.

विशाल किती स्नॅप करतो सगळ्याना?>>> हो. अतिशय नकारात्मक दिसते ते. त्याचा खेळ उतरत चालला आहे.
मांजरेकर हेच सांगत होते पण त्याने चुकीच्या पद्धतीने घेतले. आता उलट बाहेर मी आणि तू वाईट दिसतोय म्हणून बोलूच नको सुरू झाले आहे.
आतापर्यंत प्रत्येक विकांतला त्याचे कौतुक होत होते, एकदाच टिका झाली तर तो बिथरला तो. त्याच्या अश्या वागण्यापुढे जय, उत्कर्ष उजवे वाटायला लागलेत.
सोनालीने आता स्वयंपाक घरातली भांडणे बंद करावीत. जेवणावरून सतत किरकिर करते ते डोक्यात जाते.

आतापर्यंत प्रत्येक विकांतला त्याचे कौतुक होत होते, एकदाच टिका झाली तर तो बिथरला>>> अगदी अगदी! विकेन्डला त्याला परत ममा बोलतिल.
विशालचे फॅन त्याच्यावर नाराज आहेत.
तसा तोही जय इतकाच शॉर्ट टेम्पर आहे फक्त इतके दिवस तो फेअर खेळायचा कुठलिही टिम असो या सगळ्याला मिनल सगळ्यात जास्त वैतागली आहे.
सोनालीला सरानी ३ नबर दिला,जरा कौतुक केल तर फुल हवेत वाटतेय, तिला आपण फारच बाजी मारल्यासारख वाटतय.

विशाल च्या बाबतीत मम वरील सर्व पोस्ट ला. तो म्हणतो मी एकटा खेळेल , कसा खेळणार हा? अरे टीम टास्क आहे माश्यांचा. तू ग्राहक आहे तुला जास्तीत जास्त मासे मिळवायचे आहेत ना? कसे मिळवणार तू एकटा खेळून?

चल विकास देईल तुला सर्व मासे पण जय देईल का? जय तर तुझ्याशी डील करून लगेचच तुला वेड्यात काढण्याचे प्लॅन करत होता.

मीनलला याचा फायदा झाला तर बरेच आहे.
विकासची एक कमेंट आवडली. समोरच्या टीमशी बोलणे माझा गेम आहे, विशालचा नाही. तो हेच सुचवत होता पब्लिकला नाही आवडणार विशाल असले काही डील करताना. सोनालीचे कथित लग्न ह्या शुल्लक गोष्टीचं एवढे भांडवल कशासाठी?
जय जोपर्यंत फिजिकली बुलींग करणे बंद करत नाही तोपर्यंत तो नंबर दोन सोडत नाही.
गायत्री किती ओपनली जयच्या बाजूने भांडत होती. भयंकर विनोदी वाटत होते बघायला.

गायत्री किती ओपनली जयच्या बाजूने भांडत होती. भयंकर विनोदी वाटत होते बघायला.>> +१ कीव वाटण्याच्या पलिकडे गेलय ते.
सोनालीचे कथित लग्न ह्या शुल्लक गोष्टीचं एवढे भांडवल कशासाठी?>>> अगदी अगदी ! अगदी बोअर झाल ते सतत एकूण, टास्कही बोअरच झाला
कुणीही घुसल नाही की चोरले नाही.टिम ए सतत त्याना मुद्दे देवु नका,हायलाइट करु नका हेच बोलत होती,उत्क्या पण सतत चिडू नको, शान्तपणे घे हेच सतत बोलत होता.
व्हेन इट्स कम टु द टास्क जय हॅन्ड डाउन विनर असतो.
विकासची एक स्टॅटर्जि सरानी फोडली दुसरी विशालने अप्लाय करायला सुरु केली त्यानेही तो वैतागलेला वाटला जरा.

टास्क कंटाळवाणा करण्यामागे मांज्याचा हात आहे. सगळ्यांना शनिवारी हाग्या दम देऊन देऊन त्यांनी हे कठीण कार्य साध्य केलंय.

जय कॅप्टन झाला असं वाचलं इन्स्टा वर.
हा आठवडा फार फार बोअर...
विशाल ने फारच निराशा केली राव....इतके दिवस कौतुक केलं सगळं पाण्यात... काय डोकं फिरल्यासारखं वागतोय.
सध्या तरी मीनल च पहिल्या दिवसापासुन कन्सिस्टंटली नीट खेळते आहे...पण जौदे नको जास्त कौतुक करयला नाहितर ती पण उद्या वेड्यासारखं वागायची.

मीनल सध्या सगळ्यात बेश्ट खेळतेय. काल शिक्षेसाठी तुपारेने पहिल्यांदा उत्कर्षच नाव घेतल अन मग रद्द करून मीनलचं नाव घेतलं.
सोना अन विकासचा मीनलला सपोर्ट होता तरी मीनल का नको बाहेर जायला अस बोलत होती.
अहॅरे तुपारे !

विशाल मला पहिल्यापासूनच ओव्हर हाईप्ड वाटला. विकास बोलला मीनलला का, कि विशाल एकट खेळणार एकट खेळणार म्हणतो पण खेळत नाही एकटा.

सोना - विशाल मोना - विकास अस डिव्हायडेशन झालयं वाटत बी टीम च

सध्या प्रचंड बिझी असल्याने वेळ नाही मिळत पूर्ण एपि बघायला.
फेसबुकवर क्लिप्स पाहत होते.‌विकासने खरंच शिक्षेसाठी विशालचे नाव घेतले का? तो खरं तर हुशार वाटतो मला. मध्येच असा काय करतो?

कोणत्या चौघांना शिक्षा करायची ते कॅप्टनसीच्या उमेदवारांनी ठरवलं.
त्यातल्या कोणत्या दोघांनी पहिल्या रात्री शिक्षा भोगायची एवढंच या तिघांना - ( विकास, गायत्री, सोनाली) ठरवायचं होतं. उरलेल्या दोघांना दुसर्‍या रात्री शिक्षा (असायला हवी )

हो, उत्कर्ष फिक्स होता. पण दादुसला वयाच्या मानाने रात्रभर जागायची शिक्षा नको म्हणुन विशालला तयार केले.
विशाल खरोखर बिथरल्यासारखा झालाय. अन मला वाटतय , जसजसे शेवटचे दिवस येत चाललेत अन तरीही एवढ झोकुन देउन खेळुनही ,म्हणावा तसा रिजल्ट दिसत नाहीये म्हणुन हे त्याचे फ्रस्टेशन असावे.
बी टिमचे कोणीही कॅप्टन होतांना दिसत नाहीयेत, कि तशी धडपडही करत नाहीयेत.

मीरा काहीच करत नाहीय का? एकाही प्रतिसादात तिचे नाव नाही... शिव्या घालण्यासाठी देखील...

मीनल जिंकायला हवी, विशालने सर्व घालवले. माणूस म्हणून मी किती छान, फेअर हा मुखवटा होता की काय.

म मां बोलले ते इतकं निगेटिव्हली मनाला लावून घेत असेल आणि चुकीचं खेळत असेल तर बी टीम वाल्यानी सर्व votes मीनल विकास कडे वळवावीत आता, जे हार्डकोअर फक्त विशालचेच फॅन्स आहेत, त्यांची votes त्याला मिळतीलच पण बाकीच्यांना choice आहे.

नाहीतर खरंच जय जिंकायचा Lol तसं नको व्हायला.

हे मी इथलं वाचून आणि youtube दोन दोन मिनिटांचं बघून लोहितेय, मी स्वतः एपिसोडस बघितले नाहीत.

काल उत्कर्ष जयला देणार होता ना उमेदवारी मग अचानक मीराला कशी दिली. शेवटी मीरा गूढ हसत होतीआणि तिने जयला मिठी मारली. तीन आठवड्यात काय प्रेमप्रकरण होणार की काय. सोनलचं काय मित्र की होणारा नवरा यातच अडकलीय आणि किचन.

जयला करतील विनर अस वाटत नाही,तस झाल तर कलर्सचा चेहरा विकासला करतील अस वाटत आहे.आतातरी.
पण बिबॉसचा भरवसा नाही.विशाल ठरलाच असेल तर त्यालाच करतील.
दादूसला नाही का ठेवल इतके दिवस घरात ,
यावेळी बिबॉस सगळ ठरवत आहेत,वेळप्रसंगी सोमिला सुध्दा जुमानत नाहीत.

Pages