Submitted by सूलू_८२ on 20 November, 2021 - 17:33

फायनलला थोडेच आठवडे उरले आहेत. स्पर्धा चुरशीची चालू आहे.
सो, हा आहे दुसरा धागा.
चला, चर्चा करुया!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सोनाली आणी विशालने त्याची
सोनाली आणी विशालने त्याची लुटूपुटू लढाई बन्द करावी ते फार बोअर होतय,... सगळे फॉरवर्ड करायचे. मी फक्त टास्क पाहिला. कारण सगळे जण त्याच त्याच लुपमधे अडकले आहेत. नवीन काही करतील अशी धमक कुणाच्याच अंगात नाही.
माझे सगळे व्होटस मीनल आणि विकास ला.
मला तर काल मजा आली सोना आणि
मला तर काल मजा आली सोना आणि विशाल चा सीन बघायला. सोना ने भोकाड पसरलं तेव्हा तर हसून हसून वाट लागली. तिचं भोकाड बघून विशाल आणि सगळेच हसायला लागले.
सोनाली - मी रात्रभर झोपले नाही, पायाला गोळे येत आहेत माझ्या.
विशाल - माझ्या भांडणाचा तुझ्या पायाला गोळे येण्याशी काय संबंध
हा हा हा
जय आणि स्नेहा च्या फालतू पणा पेक्षा मला विशाल सोना चं लुटूपुटू चं भांडण जास्त आवडलं.
जय मुद्दाम हळू धावला असेल शेवटच्या फेरीत असं नाही वाटलं मला तरी.
जय मुद्दाम हळू धावला>>>कोण
जय मुद्दाम हळू धावला>>>कोण होत त्यावेळी
मला पण विशाल आणि सोनाली च्या
मला पण विशाल आणि सोनाली च्या भांडणाची मज्जा आली. सोनालीला खरंच भोकाड पसरुन रडताना बघुन खुप खुप खुप हसू आलं सेम विशाल ला पण आलं, म्हणजे the feeling are real like us.
ह्यांची लुटुपटू ची भांडण नाही बघायची तर काय त्या टीम ए ची सारख्याच चाललेल्या चुगल्या न कपटी पना बघायचा का? त्यांचं नेहमीच वेगळंच काही चालू असत. काल पण विशाल न सोनाली च भांडण ऐकून ह्यांना आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या.
मी सोना ला वोट करणार
<<मला तर काल मजा आली सोना आणि
<<मला तर काल मजा आली सोना आणि विशाल चा सीन बघायला. सोना ने भोकाड पसरलं तेव्हा तर हसून हसून वाट लागली. तिचं भोकाड बघून विशाल आणि सगळेच हसायला लागले.<< अगदी अगदी.. मजा आली.

<<जय आणि स्नेहा च्या फालतू पणा पेक्षा मला विशाल सोना चं लुटूपुटू चं भांडण जास्त आवडलं.<< हो ना. ते पॅच अप झालेल पण आवड्ले. पण आता हे इतकेच मर्यादीत असावे. शेवटचे ४ आठवडे राहिलेत फक्त.. त्यात नको आणखी हा घोळ
तरी मीराबाईने पहिल्या आठवड्यातले विशालचे 'लव्हस्टोरी कराया पाहिजे" हे वाक्य म्हणुन दाखवलेच.
अजुन कोणत्याच channel वर
अजुन कोणत्याच channel वर स्नेहा सारन्गे ची मुलाखत आली नाही....सगळे लोक सोमवारीच देतात मुलाखत... हिला बाहेर आल्यावर कळाल असेल काय हिने काय माती खाल्ली आहे ते..??!!म्हणून देत नसेल का बाईट??
होना. तसंच वाटलं.
होना. तसंच वाटलं. आविष्कारबद्दल चांगलं मत आहे लोकांचं. हिच्यासाठी वाईट.
विकास ने मिराला कोपर मारले
विकास ने मिराला कोपर मारले असेल असे वाटत नाही. तो एकंदरीतच बाहेर इमेज बिघडू नये या प्रयत्नात दिसतो नेहमी.
पण सतत जर असे आरोप होत राहिले तर ते कदाचित त्याच्या विरोधात जाऊ शकते.
विशाल 'लव ऍंगल बद्दल' सुरुवातीला बोलला असला तरी नंतर कधी तश्या प्रयत्नात तो दिसला नाही.
मला पण काल टीम बी चे भांडण
मला पण काल टीम बी चे भांडण फार फनी वाटले. सोनालीने ते पायात गोळे वगैरे म्हटल्यावर सगळेच हसायला लागले.
विकास - विशाल ने काल स्नेहाच्या जाण्याचा जय ला काहीही फरक पडलेला नाही हे आपसात बोलून घेतले. ही एक सिंपल पण भारी स्ट्रॅटेजी आहे, विशेषतः विकास अन मीनल नेहमी अशा गोष्टी मुद्दाम बोलून दाखवतात आणि प्रेक्षकांनाही त्याची नोंद घ्यायला भाग पाडतात. काल मीनल ने एकदम शांतपणे उत्क्याला २-२ वेळा विचारले, "जस्ट टु बी क्लियर, तुला मी आणि दादुस मध्ये दादुस जास्त डिजर्विंग वाटतात असेच म्हणतो आहेस ना? ठीक आहे. " उत्क्या वॉक्ड राइट इन्टु द ट्रॅप "होय दादुस मला जास्त डिजर्विंग वाटतात" #महाराष्ट्रऐकतोय
दादुस अन मीरापैकी कोण आत्ता गेलेले चालेल असे विचारले तर उत्क्या बहुतेक मीराचेच नाव घेईल कारण नंतर तो स्वतः नॉमिनेशन मधे येईल तेव्हा त्याला सोबत दादुस असायला हवे असणार आहेत.
काहीही असो, पण या आठवड्यात चावडी नंतर ए टीम , विशेषतः उत्क्या अन मीराच्या तोंडावर १२ वाजलेले दिसत आहेत प्रथमच. कुठेतरी त्यांना हळू हळू बाहेर स्वतःची पोझिशन काय असावी हे रिअलाइजेशन होत आहे असे वाटले. अर्थात तरी ते लोक बदलणार नाहीतच कारण मुळात ते तसेच आहेत.
अजुन कोणत्याच channel वर
अजुन कोणत्याच channel वर स्नेहा सारन्गे ची मुलाखत आली नाही....विशेष कष्ट न घेता स्नेहाने बरेच पैसे कमावले. आता ती तिच्या पुढील असाइनमेंट च्या कामाला लागेल. ती प्रोफेशनल वाटते. पैसे मिळतील तरच मुलाखत देईल.
फायनल वीक जवळ येतोय तशी नवी
फायनल वीक जवळ येतोय तशी नवी समीकरणे जुळू लागलीत.
फायनल वीक जवळ येतोय तशी नवी
फायनल वीक जवळ येतोय तशी नवी समीकरणे जुळू लागलीत... आतापर्यंतचा खेळ बघता तुम्हाला खरेच असे वाटतय हे लोक नवीन समिकरण जुळवतील?
सगळे जण बोलबच्चन आहेत. गेली अनेक आठवडे नुसते हुल देतायेत. पण गेमचा पॅटर्न तर बदलत नाहीत.
बोलणी तरी होताहेत.
बोलणी तरी होताहेत.
टीम बी एकमेकांत गैरहजर सदस्यांबद्दल वाईट बोलताहेत.
आज मीनल विशालला म्हणाली, तुमच्यातला कोणी टीसी व्हावं याची मी वाट पहात होते.
कोअर चार चार पैकी एक कोणी जात नाही तोवर ओपन होणार नाही.
काल उत्कर्ष गेला असता तर मजा आली असती
दादूस, गायत्री, सोनाली
दादूस, गायत्री, सोनाली जाईपर्यंत शेवटचा आठवडा येईल.
भांडण व्हायला ईथे ट्रांयगल कुठलाच नाही. बी टीम एकेकटीच खेळते. ए टीम सगळे स्वार्थासाठी किंवा लाचारी म्हणून एकत्र आहेत.
विकास ने आज खूप काड्या
विकास ने आज खूप काड्या टाकल्या. विशाल ला आधी मीनल च्या विरुद्ध भडकवलं आणि मग सोना च्या लग्नाचं सांगत सोनाविरुद्ध.
विशाल सेफ असल्यामुळे खेळत नाहीये सांगून त्याच्या विरुद्ध सोना ला भडकवलं.
काय चाललंय टीम बी. विशाल पण आज असं का करतोय. जय च्या बोलण्यावर भुलला का काय ?
आता गेम खरं interesting
आता गेम खरं interesting व्हायला हवा पण आता काय माहीत बोर व्हायला लागलंय... अजून कोणाला असं वाटतंय का?
बाकी विकास आणि दादूस चा सीन funny होता
गादा सोडून सगळी टिम ए हललेली
गादा सोडून सगळी टिम ए हललेली दिसली, उत्क्याला बिचार्याला हेच कळत नाहिये आपण एवढे भारी मास्टरमाइन्ड आहोत तरी आपल रॅन्किन्ग खाली कस आहे,आपण डेन्जर पर्यत कसे जातो. काल बी टिमने दादुस बरोबर सोनाच कार्ड उचलायला हव होत.
दादुस किती लाचार वाटत होते काल, आधी ग्रुप बसला असताना ह्या दादुसला तुम्हीच वाचवा विनवण्या चालु होत्या सगळ्यात शेवटी जयच तिकिट घेवुन जाताना थान्बले मग जयने सुचना दिल्यावर किल्लि दिल्यासारखे बुथपर्यत गेले पण जय विरोधात बोलायच म्हणजे महापाप, आवन्ढा दाटुन आला त्याच्या गळ्यात मग ,कसेबसे एक वाक्य बोलले जय एक स्ट्रॉन्ग प्लेयर आहे, मिनललाच त्याचि दया आली तिने त्याना ओके म्हणुन परत जायला सान्गितल.
गादा तर सगळा सेल्फ रिस्पेक्ट वैगरे स्लिन्ग मधे गुन्डाळुन बसलिये, कालही जयला मिठ्या वैगरे चालुच होत, काल ती गेम मधे नसणार होती तरी प्लॅनिन्ग मधे कुठे दिसलिच नाही.स्नेहा गेल्याचा सगळ्यात जास्त आनद मिराला झालाय.
" उत्क्या वॉक्ड राइट इन्टु द ट्रॅप "होय दादुस मला जास्त डिजर्विंग वाटतात" #महाराष्ट्रऐकतोय >>> अगदी अगदी ! मी मनात म्हटल ये खेल गयी, उत्क्या मास्तरमाइन्ड इन हिज ओन हेड.
आजचा टास्क म्हणजे पीच,बॉल,बँट
आजचा टास्क म्हणजे पीच,बॉल,बँट,अंपायर सगळेच टीम ए चे.
किती बोअर झाल.तरीही टीम बी ट्राय करत होते.
एका पॉईंटला तर मलाच अस वाटल की सरळ मीनल आणि सोनालीने घुसाव,तरच मजा येईल.
नाहीतरी काय अंपायर त्यांचाच आहे,म्हणजे तशीही टीम बी हरणारच आहे,मग एकेकाला लोळवून हरायच.
कारण जय कितीही घुसणार नाही अस विशालला म्हणाला तरी मीनल आली की तो स्वत:लि थांबवू शकणारच नाही.
पण काही झाल नाही तस.
फारच बोअर झाल.
उद्या पण हाच प्रकार दिसत आहे.
त्या तुपारेकडे बघून वाटत तरी आहे कि की हिला फ्रँक्चर झाल आहे.
एकंदरीत कंटाळा यायला लागला आहे.
इंडिविज्युअल टास्क द्यावेत बिबॉसने.
गादा तर सगळा सेल्फ रिस्पेक्ट
गादा तर सगळा सेल्फ रिस्पेक्ट वैगरे स्लिन्ग मधे गुन्डाळुन बसलिये >>> तरी हिला नेतील bb फायनलला. मीरा जाणार असेल तर ही नक्की फायनलला, काही करो किंवा न करो. नकोय मला ती.
एक प्रोमो बघितला, सोनालीचे
एक प्रोमो बघितला, सोनालीचे लग्न ठरलंय अस विकास विशालला सोनालीसमोर सांगत होता. त्याचं नाव अक्षय आहे मग विशाल माझ्याशी खोटं का बोललीस, माझ्या भावनांशी का खेळलीस म्हणतोय. ह्याची gf आहेना सौदर्या मग इथे ह्यांचे अफेअर तर नव्हतं मग अस का म्हणतोय. हा प्रोमो आता का आला, सोनाची votes कमी व्हावीत म्हणून का. अर्थात मी फक्त विकास आणि मीनलला यावेळी votes देणार आहे (अस ठरवतेय) .
विशाल सोनाच्या वडिलांबद्दल
विशाल सोनाच्या वडिलांबद्दल कधी आणि काय बोलला. सोना एव्हडी बोलते पण नक्की काय बोलतेय तेच कळत नाही.
सोनालीला बापावरून काहीतरी
सोनालीला बापावरून काहीतरी बोललेला मागे, अस you tube वर बघितलेलं.
विवी जरा जास्तच करता आहेत,
विवी जरा जास्तच करता आहेत, त्या बिचाऱ्या मुली सोना मोना ह्यांना आपलं मानतात, ह्यांना सोबत करतात तर ही दोघे फारच उलटा विचार करतात
मिनल ने सांगितले की निगेटिव्ह नको बोलू आपण तर ह्यात ही त्यांना गेम वाटतो अरे ती आपण सर्व म्हणते आहे मी एकटी निगेटिव्ह बोलणार नाही असे नाही
विशाल पण सोना बद्दल माझ्या इमोशन शी खेळली न ऑल बोलला, अरे तूच होता ना जो फर्स्ट वीक ला लव्ह अँगल चा प्रयत्न करणारा, त्याच वेळेस सोना ने नाही म्हणून सांगितले ल.
काय कळतच नाहीये, विवि असे
काय कळतच नाहीये, विवि असे उलटा विचार का कराय्ला लागले ते. ते जय उत्क्या यांना फितवतात अन मग यांच्यातली भांडणे बघत बसतात.
मलाही बोअर व्हायला लागलय हे... शेवटी शेवटी तर बघितलेच नाही.
विशाल म्हणतोय, सोना त्याच्या इमोशन्सशी खेळली. कुठे काय डोंबल्याच! जेव्हा पहावे तेव्हा भांडतच तर असतात.
तो विकास म्हणतोय, ही मिनल केव्हा आपल्या दोघांना डच्चु देउन तिकडे जाईल सांगता येत नाही. अरे जय - मीनल, मीरा- मीनलचे पटत नाही हे पाहिले नाही का त्याने?
हो. टीम बी ची सिंपथी जाईल
हो. टीम बी ची सिंपथी जाईल अशाने. उत्कर्षच्या वरताण निगेटिव्ह विचार करतोय विकास.
काल विशाल जयला म्हणत होता आता बॅगेज टाकून द्यायची वेळ आली. मीनल आणि सोनाली काही या दोघांना लटकून इथवर आलेल्या नाहीत.
अशाने जय जिंकेल.
या पुढे डोळे झाकुन सगळी मते
या पुढे डोळे झाकुन सगळी मते फक्त मीनलला देणार. ती एकटी डिझरव्हिंग खेळाडू आहे. खेळकर्,स्पष्टवत्की,लॉयल,नो किर किर्,फिट,स्मार्ट,कुणाबरोबरही लाळघोटेपणा नाही. स्ट्रॅटेजीच्या नावाखली वाट्टेल तो फालतुपणा, काड्या करणे नाही.
एक प्रोमो बघितला, सोनालीचे
एक प्रोमो बघितला, सोनालीचे लग्न ठरलंय अस विकास विशालला सोनालीसमोर सांगत होता>>>>>> हे प्रोमो फार उलट सुलट करून दाखवतात.
ह्या सगळ्या कचकड्याच्या
ह्या सगळ्या कचकड्याच्या पोरींत मिनलच सुंदर वाटते. फ्रेश आणि काॅन्फिडंट चेहरा आणि उमद्या स्वभावामुळे. कोणाशीही लाळघोटेपणा नाही. सोनाची साथ सोडली लवकर तर बरं. सोना जरा झोल वाटते.
मीनलला कोणतेही ड्रेसेस शोभतात आणि ती मुलांशी बोलताना वागताना अजिबात चीप वाटत नाही
या चावडीला सलमान गेस्ट म्हणून
या चावडीला सलमान गेस्ट म्हणून येणार आहे.त्याचा ममांनी डिरेक्ट केलेला अंतिम,मुळशी पँटर्नचा रिमेक बहुधा,या शुक्रवारी रिलिज होत आहे.
लास्ट विक ममां हिंदी बिबॉसच्या विकएंडवारीला गेले होत तेव्हा पिक्चर रिलीजच कारण देऊन एविक्शन केल नव्हत.
या वेळी पण गुरुवारपर्यंतच वोटिंग लाईन्स ओपन आहेत.मग इथेही तसच करणार का?
हिंदीमध्ये म्हणे नंतरच्या आठवड्यात एक स्पेशल टास्क देऊन घरातल्या एकाला एव्हिक्ट केल.
आता बघू इथे काय करतात ते.
दादूस राहणार वाटत घरात.
मीनलबद्दल सो मि वर फार
मीनलबद्दल सो मि वर फार positive कमेंट्स येतायेत, इथल्याप्रमाणेच. लव angle नाही, कोणाच्या मागे मागे नाही, उत्तम खेळाडू etc . तीच जिंकायला हवी अस वाटायला लागलं आहे.
Pages