मराठी बिग बॉस पर्व तिसरे- २

Submitted by सूलू_८२ on 20 November, 2021 - 17:33

फायनलला थोडेच आठवडे उरले आहेत. स्पर्धा चुरशीची चालू आहे.

सो, हा आहे दुसरा धागा.

चला, चर्चा करुया!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

विकास ची बायको खूपच मितभाषी वाटली. कमी बोलली खूप. तो म्हणाला पण नंतर की ती खूप कमी बोलते.
मीरा चे आई वडिलांशी काहीतरी पंगे झालेले दिसतात.भाऊ पण ओढून ताणून बोलत होता असं वाटलं.
सोना आणि आई ची काचेतून मिठी बघून एकदम भरून आलं. आईला इतके दिवसांनी भेटायला मिळालं पण दुरून ते पण नुकतंच वीकेंड ला राडे झालेले असताना.. विशाल, मीनल सगळेच रडत होते तेव्हा.. या फॅमिली वीक मुळे विशाल परत टीम बी शी भांडण मिटवून टाकेल असं वाटतंय. सोना च्या आई समोर येतच नव्हता तो जास्त.
सोना बद्दल बोललेलं योग्य नव्हतं असं मीनल ला म्हणाला.. नाईलाजाने बोललो ते सगळं, नको बोलायला पाहिजे होतं असं पण म्हणाला..
गादा अचानक कुठले टॉनिक पिऊन आली आहे ? भलतीच स्मार्ट वाटते आहे..
मीरा ला जास्त वेळ मिळावा म्हणून काल जय टीम बी सोबत भांडत होता पण स्वतः ची 14 मिनिटे द्यायला तयार नाही झाला उलट गादा काल थोडा वेळाने मीरा ला स्वतः ची 16 मिनिटे द्यायला तयार होती पण मीरा बाई चा इगो आडवा आला.इथे जय परत स्वार्थी दिसला उलट गादा positive वाटली.
टीम ए ला भांडायचं काहीच कारण नव्हतं. त्यांच्याकडे बहुमत असतं तर त्यांनी पण हेच केलं असतं.

मला वाटत मिराला देतिल, तीच ड्रामाक्विन आहे>> देवा असे झाले तर बाई स्वतला विनरच घोषित करेल, कारण मेघाला असेच केले होते म्हणुन.
विकास ची बायको खूपच मितभाषी वाटली. कमी बोलली खूप. तो म्हणाला पण नंतर की ती खूप कमी बोलते.>> दोघेही नवरा बायको तोलुन मापुन ,विचारपुर्वक बोलणारे परिपक्व जोडपे असावेत.

कालसुद्धा विकास मीनलबद्दल तिच्या पाठीमागे सोनालीशी निगेटिव्ह तेही अकारण बोलत होता. तो माझ्या मनातून उतरत चाललाय.

टीम बीने मीनलला १६/१७ मिनिटे द्यायची होती. फेअर कसं वागायचं ते दाखवता आलं असतं.

सगळे कुटुंबीय काचेवर किस करताहेत. त्यामध्ये ती डिसइन्फेक्ट करत असतील तर ठीक,

अरे वा, गा दा ला गेम आत्ता समजला. टीम बीच्या लोकप्रियतेचा फायदा हीला होणार. कानामागुन आली आणि तिखट झाली म्हणायला हवं. अर्थात ह्या गेमसाठी योग्यच त्यामुळे मला ती आवडत नसली तरी कौतुक तिचं, ती असेल फायनलला.

एक प्रोमो बघितला, गा दा ची दादा वहीनी , बाळ. दादा एकदम उत्स्फूर्त वाटला आणि मला वहिनी आणि बाळ जाम आवडलं, कयूट एकदम.

टीम बी चं पॅचअप झालं वाटतं....छान हसत खेळत बोलत होते... गादा बाई होत्याच....
एक प्रोमो बघितला, गा दा ची दादा वहीनी , बाळ. दादा एकदम उत्स्फूर्त वाटला आणि मला वहिनी आणि बाळ जाम आवडलं, कयूट एकदम. > +१११
बी मुळे गादा पुढे जाउ शकते... मीरा जाईल आधी....उत्क्या चं काही सांगता येत नाही...
मीनल, जय, विकास, विशाल हे चार नक्की असतील फायनल ला...
मीरा, सोनाली जातील पुढच्या काही आठवड्यात.
उत्क्या/गादा यापैकी कोण शेवटी ते आता २ आठवड्यात ठरेल..
काल उत्क्या कसली कविता करुन गात होता...शीघ्रकवी आहे तो... काही ना काही जुळवत असतो...

उतक्या हुशार आहे. सकाळी गाणं लागतं त्यावरून टास्क काय असेल याचा अंदाज बरोबर बांधतो तो. आणि बरेच वेळेला त्याचे अंदाज खरे निघतात. मुंबई थीम होती ते एकदम बरोबर ओळखलं होतं त्याने.

उत्क्याची प्रतिभा खरेच वरच्या दर्जाची आहे. माणूस म्हणून पण चांगला असेल तो. इथं गंडलाय फक्त.>> सहमत पण, तो इतका जय जय करतो की त्याचा अस्टितन्ट वाटतो, त्याचा वेगळा असा गेम कधी दिसलाच नाहिये अजुन.

मिसेस उत्कर्ष, गादा चा भाऊ, मीनल चा भाऊ खूप आवडले..
विशाल ची बहीण पण त्याला छान hints देऊन गेली.
मीनल आणि तिच्या भावाचं बॉंडिंग मस्त वाटलं.
उत्कर्ष च्या बायको ची पर्सनेलिटी मस्त आहे.. दोघे जास्त फिल्मी नाही वागले. मस्त बोलत होते एकमेकांशी ..
गादा चा भाऊ मीनल ला काय म्हणाला ऐकलं नाही मी नीट.. कोणासारखी म्हणाला तो तिला ?

हो फॉर अ चेन्ज बहुमत बी टीम कडे गेल्यावर ते बाजू पलटल्याचे रियलायजेशन सगळ्यांच्या तोंडावर दिसत होते. मीरा तर किती चडफडत होती!
तिच्या भावाने काय ते मरणाच्या दारातून परत वगैरे लिहिले तिथे बोर्ड वर. असल्या गोष्टी कशाला लिहायच्या ?!! व्हॉट्स द पॉइन्ट?!
बी ग्रुप पुन्हा पॅच अप करत आहेत असे सध्या तरी दिसतय. किती टिकेल कुणास ठाउ़क. विशाल ने ( कोण चूक, कोण बरोबर होते ते जाऊ दे) एकदा सोनालीला तिला झालेल्या त्रासाबद्दल वाईट वाटल्याचे म्हणायला हवं होतं. तोच चांगला दिसला असता.

उत्कर्ष जयच्या सावलीत मोठा होत नाहीये.
फिजिकल टास्क मध्ये तो शक्तीबाबत 3 ऱ्या नंबर वर आरामात आहे. एंटरटेनर आहे. आता लोकं कमी झाले असल्याने आधीइतका गेमाड दिसत नाहीये. फार रागीट नसल्याने जय सारखा negative वाटला नसता कधीच.
त्याने हिंट्स घेतल्या नाहीत सिरियसली महेश सरांच्या.

सोनाली शाहूवाडी तालुका मूळ गाव कळालं.
आमचा पन्हाळा तालुका. एकदम जवळची वाटली अचानक. तिच्या आईचे टोनिंग, बोलणे, गडबड म्हणजे एकदम गावाकडच्या मावश्या, आत्या, मामी वै सगळ्या आठवल्या.

विकास देखील मूळचा कोल्हापूरचा आहे.
एका क्लासमेटचा relative आहे हे ही कळालं.
दोघे नवरा बायको मस्त आहेत.

मीराचं गणित कळालं नाही फॅमिली सोबतच. तिचा भाऊ तिला नीट हिंटस देत सांगत होता. तिने ऐकून विचार केला तर बरंय. तिचा फ्यूज लगेच का उडतो काय माहीत. नळावर भांडण मोड लगेच activate होतो तिचा.
जय कडून काहीच शिकली नाही की.

बाकी जय, मीरा आणि उत्कर्षला ह्यावेळी गायत्री जाणार असे वाटतेय.

गायत्री मीरा सोबत होती तेव्हा किती किरकीरी आणि negative वाटत होती. आता सुसह्य वाटतेय. ती मुद्दे पकडून, जुन्या गोष्टी आठवून समोरच्याला नडायचा प्रयत्न चांगला करते. आताही तिचा किंचित डबल गेम सुरू आहे.
विशाल आणि इतर बी टीम असे सगळ्यांना सोबत घेण्याचा प्रयत्न जमतोय तिला.
अर्थात एखाद्या टास्क मध्ये तिच्या मनाविरुद्ध बी टीम वागली तर काय reaction येतेय हे बघू.

मीनल संपूर्ण गेम मध्ये बाप माणूस वाटत आहे आता.
पहिल्या सीजन मध्ये असलेल्या स्मिता गोंदकर सारखी खेळाडू पण भारी डोकं चालवणारी.

मीराला काढतील अस वाटत नाही.अख्खी चावडी तिच्या जीवावर बिबॉसने आणि ममांनी काढली.इतकी की बरेच वेळा टीआरपी रेस मध्ये चावडीला रोजच्या बिबॉसपेक्षा टीआरपी जास्त होता.
त्याची थोडी का होईना पोचपावती बिबॉस मीराला देणारच.
पण आज बिबॉस टॉप 5 म्हणाले.
म्हणजे गेल्यिवेळी जस ममा आणि चँनेलने किशोरीला घुसवल आणि बिबॉसला 6 घ्यायलि लावले,तस चँनेल आणि ममा यावेळी पण घुसवतील.
जय ,विशाल,विकास,मिनल,हे तर नक्की.
पाच असतील.तर ममा नक्की मीराला नेतील.सहा असतील तर उत्कर्ष आणि मीरा.
तुपारेला नाही नेणार ,कारण काहीही झाल तरी तिची रूपाली भोसले झाली आहे.अशा लोकांना नाही नेत.

आजचा एपिसोड bb हिस्ट्री मधला सगळ्यात funny एपिसोड असेल...मजा आली freeze आणि release ची गम्मत बघायला...नंतरच्या individual खेळण्यावरून रंगलेल्या गप्पाही मस्त वाटल्या..असे नेहमी का नाही दाखवत असे वाटले...डॉक्टरच्या बायकोने ECG straight line पाहिजे असे म्हटले तेव्हा खूप हसलो आम्ही ..आणि गायत्रीने पण ते notice करून पुन्हा बोलुन दाखवले..गायत्रीचा भाऊ हुशार वाटला बोलण्यावरून...

पुर्ण पॅराला सहमत फक्त
पहिल्या सीजन मध्ये असलेल्या स्मिता गोंदकर सारखी खेळाडू पण भारी डोकं चालवणारी.>>> हे सोडून, स्मिता म्हणजे मला पहा आणि फुल वाहा होती, तिचे आउटफिट , ज्वेलरी सगळ सगळ स्पॉनर होत त्यामुळे पॅरेलल फॅशन शो, बाकी गेम मधे मिनलशी तुलना पण नाहि होवु शकत.
मिनलसारख मागच्या दोन्ही सिझन मधे कुणिही नव्हत.
दुसर्या सिझनमधे ती अती उर्मट शिवान्गी आणी त्या यड्पट बिचकुले मुळे मी सिझन फॉलो केला नव्हता.

स्मिता मस्त होती. सर्वांशी जमायचं तिचं. टास्कमधे ए वन, तिथे डोकं मस्त चालायचं. दिसायला ग्रेसफुल. सतत कामात मग्न , कुणाचा हेअरकट करुन दे, कोणाचा मेकअप, मसाजही करुन द्यायची, स्वयंपाकही करायची. माझी लाडकी होती. एरवी थोडी मठठ वाटायची. अजिबात कामं हातात नसलेले अनेक बि बि त असताना, ती आपल्या हातातली अनेक कामं सोडून आलेली पोरगी होती (हे बिग बॉसनेच सांगितलं, हातातले अनेक प्रोजेक्ट सोडले होते तिने शो साठी) .

मीनल तिच्यापेक्षा भारीच आहे, नो डाऊट. तीही माझी प्रचंड लाडकी आहे. मीनल विनर मटेरीयल आहे. मीनलला मी पहील्या दिवसापासून सपोर्ट करते.

तुलना नाही होऊ शकत पण मला स्मिता आवडायची तशीच मीनल आवडते, मीनल जास्त कर्तुत्ववान आहे. ती जिंकली तर फार आवडेल.

मला आवडलं झक्याने लिहिलं ते स्मिता मीनलचे.

मागच्या सीझनमधे शिवलाही पहील्या दिवसांपासून सपोर्ट केला तसंच वीणाही आवडली.

नंतरच्या individual खेळण्यावरून रंगलेल्या गप्पाही मस्त वाटल्या..असे नेहमी का नाही दाखवत असे वाटले.>> हो ते मस्त होत..विकास आणि उत्कर्ष दोघेही कॉमेडी मस्त करतात...म्हणे सगळ्यांच्या घरच्यानी सांगितल आहे की तूच विनर आहेस..बिग बॉस आम्हाला नाही माहित आता 8 ट्रोफ्या बनवा..संगितल आहे individual खेळा.आता आम्ही 7 विरुद्ध 1 अशी टीम बनवणार.. Lol ..डॉक्टरच्या बायकोने ECG straight line पाहिजे>> हे काहितरी कोड होता वाटत..

गायत्रीचा भाऊ हुशार वाटला बोलण्यावरून>> हो मस्त वाटला.मिश्किल पण mature..मस्त संगितल तिला..आल्यावर आधी काळजीने विचारल पण..बाकी लोकां सोबत पण मस्त बोलला..

हो अन्जुताइची फार लाडकी होती स्मिता,दिसायला मेकप वैगरे भारिच होती ती पण बाकी सगळा उजेड.
सगळेच नातेवाइक येवुन छान बोलले,सगळेच एकत असल्याने फार काहि सान्ग्ताहि येत नसणार, त्यामुले आहे तसेच खेळा , भारि खेळताय एवढच सान्गत होते.
गायत्रीचा भाऊ पण छान बोलला, त्याचा मुलगा किती क्युट आहे. एकदम गोन्डस बाळ.

टिम बीच पॅचअप झालय पण विशाल आणि सोनाली अजूनही बोलतही नाही एकमेकान्शी. नॅचरलच आहे म्हणा. विशालने तिने बनवलेल्या डाळीची इनडायरेक्टली स्तुती केली तेव्हा सोनाली थन्डपणाने थॅन्कस म्हणाली. हा हा हा

आजचा एपिसोड bb हिस्ट्री मधला सगळ्यात funny एपिसोड असेल...मजा आली freeze आणि release ची गम्मत बघायला...नंतरच्या individual खेळण्यावरुन रंगलेल्या गप्पाही मस्त वाटल्या..असे नेहमी का नाही दाखवत असे वाटले >>>>>>>> अगदी अगदी मीरा उत्कर्षला टुथपेस्ट लावत होती. विशाल गुदगुदल्या करण्याची पोझ घेऊन गायत्रीला घाबरवत होता. गायत्रीची हसून हसून वाट लागली होती.

मिसेस उत्कर्षबरोबर आलेला मुलगा कोण होता? उत्कर्षचा आणखी एक भाऊ का?

मीनलच्या पाटीकडे बघून विकास आणि गायत्री 'तेरा नम्बर सुद्दा यावेळी जाऊ शकतो' अस काहीतरी म्हणत होते.

विकासची बायको मस्त आहे. सोनालीला का भेटायला दिलं नाही, ती बिचारी चुकून उठलेली. एवढं काय bb चे शिक्षा देतात लगेच. मुलाला आणायला हवं होतं का तिने, तो भांबावला असता बहुतेक आणि काही लोकांनी सिंपथीसाठी आणले हेही म्हणायला कमी केलं नसतं. विकासला त्याला भेटायची खूप इच्छा होती मात्र, स्वाभाविक आहे म्हणा. त्याला एकीकडे तो बरा आहेना नक्की हेही वाटलं. खूप टचिंग moment होती ती. खूप matured आहेत दोघे अस वाटलं, तिने सल्लेही योग्य दिले.

मीराच्या बाबांना ती या क्षेत्रात आहे हे पसंत नसल्याने त्यांनी आईला पण भेटायला पाठवले नाही, फार साधे असावेत घरचे. भाऊ पण साधा वाटला.

सोनलची आई , बहीण पण एकदम साधे वाटले पण त्यांचा सपोर्ट आहे तिला या क्षेत्रात असं वाटलं.

विकास देखील मूळचा कोल्हापूरचा आहे. >>> तुझं आणि त्याचं नाव आडनाव पण सेम.

मीनलच्या पाटीकडे बघून विकास आणि गायत्री 'तेरा नम्बर सुद्दा यावेळी जाऊ शकतो' अस काहीतरी म्हणत होते.>> मला वाटत आधी राजा-राणी आणी दस्सी नॉमिनेशन मधे आली तर दस्सी जाणार अस म्हणत होते म्हणजे मिरा ! ...नतर म्हटले नबर मधे बोलुयात.
तेरा नबर म्हणजे मिनल आली तरी ती जाउ शकते अस प्लॅनिन्ग चालु होत.

गेल्या वेळी शिवच्या आई आणि बहिणीने त्याला कानपिचक्या दिल्या होत्या तसं यावेळी कोणी केलं नाही. जयची आई त्याला म्हणाली तू घरी असा नसतोस. इथे होतोस तो टास्कचा भाग वगैरे. उद्या तो कामाच्या ठिकाणी पण इथल्यासारखं वागू शकेल.

विकासचं शिक्षण पुण्याला झाल्याचं वाचलं. त्याचा मुलगा इथे आणण्याच्या स्थितीत नसावा.

गेल्यावेळी आरोह सहावा ठरला होता. किशोरी पाचवी होती.

मला एक उत्सुकता आहे, मुळ इंग्रजी बिग बॉस कुणी बघितला आहे का? भारतीय बिग बॉस त्यांनी डिट्टो कापी केलाय की भारतीय मसाला टाकून फोडणी दिली आहे?
मी हिंदी सुध्दा बघत नाही, पण चॅनेल कलर्स आहे म्हणजे डिट्टो आयडियाज असणार. हिंदीत व्हल्गर कंटेंट थोडा जास्त असेल ईतकेच.

हिंदीचे पहिले दोन सीझन पूर्ण आणि पुढचे एक दोन अधू न मधून पाहिलेत.

हिंदीत हाउ समेट्स बर्‍याच वेगवेगळ्या क्षेत्रांतले असतत. एक पॅटर्न दिसतो. तरी अभिनेत्यांची संख्या जास्त असते.
एक रिजनल (भोजपुरी ) अभिनेता, एक जुना झालेला हिंदी चित्रपट अभिनेता , एक एल्जीबीटी , एक गायक, एक राजकारणी-समाजकारणी, खेळाडू ,मॉडेल्स, काही टीव्ही अभिनेते - यात भांडकुदळ म्हणून प्रसिद्ध ते सौजन्यमूर्ती अशी दोन्ही टोके लागतातच, वादग्रस्त - मोठ्या भानगडीत अडकलेल्या व्यक्ती.
(अभिनेता - स्त्री पुरुष दोन्ही)

मराठीत इतकी व्हरायटी दिसत नाही.

Pages