मराठी बिग बॉस पर्व तिसरे- २

Submitted by सूलू_८२ on 20 November, 2021 - 17:33

फायनलला थोडेच आठवडे उरले आहेत. स्पर्धा चुरशीची चालू आहे.

सो, हा आहे दुसरा धागा.

चला, चर्चा करुया!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

इतरांच्या नातेवाईक भेटी पहाताना मीराच्या मनातली कालवाकालव जाणवली.

चूक बरोबर सोडून दिलं तरी नातेवाईकांबाबत ती दुःखी जाणवली.

छान निरीक्षण मेधावी.

हिंदीचे पहिले दोन सीझन पूर्ण आणि पुढचे एक दोन अधू न मधून पाहिलेत. >>> मीही सेम केलंय.

नंतर बरेच जण जास्त आरडाओरडा, भांडाभांडी करणारे आल्याने सोडून दिलं हिंदी.

हो, भेडचाल मधे खेळतायत असे टीम बी ला म्हणत होता! मजेशीरच आहे, अरेच्या इतके ९ आठवडे तुझा ग्रुप मेजॉरिटी मधे होता तेव्हा ते काय होते Happy

फॅमिलीज मधे मला गायत्रीचा भाऊ आवडला आणि मीनलचाही.
गायत्रीच्या भावानी मीनलला ‘दिनेरियस टार्गेरीयन’ अशी काँप्लिमेन्ट दिली Happy , तिला/इतर कोणाला समजली कि नाही काय माहित , कोणी गॉट पहाणारे नसावे त्यातले! मला मीनल खरच ड्रकारीस म्हणत बिबॉ सेटवर आग लावताना डोळ्यासमोर आली Biggrin
मला मीराचं मेजॉरीटीत नसल्याचं फ्रस्ट्रेशन जाम आवडलं, तिला एक मिनिट सुद्ध द्यायला नको होतं फॅमिलीला भेटायला, डायरेक्ट घरी पाठवायचं होतं अनलिमिटेड टाइम एन्जॉय करायला Wink , तिचा भाऊ काहीतरी विचित्रच वाटला !
जयचे आईबाबा मस्तं होते , बाबा थोडे आपल्या मायबोलीच्या वेमां सारखे दिसतात Happy
जयची आई जेंव्हा विशालला म्हंटली कि आम्हाला ज्योतीबा पासून तू आवडतोस, तेंव्हा जयची रिअ‍ॅक्शन ! Happy
विशालची लायकी काढली होतीना एकदा त्याने, कोण तू काय तुझी लायकी वगैरे.. विशालला पुढे एखादा वन लायनर ठोकायला चान्स आहे “ हम वही है जिसकी फॅन तुम्हारी मां है” Proud

बिबॉसच्या दणदणीत टीआरपीमुळे.शोलि एक आठवडा वाढवण्याचा मेकर्स विचार करत आहेत.बघू काय करतात.
बाकी ,आज परत टास्क रद्द.
बहुतेक बिबॉसला च टीम बीचा कँप्टन नको आहे.आज का नाही बहुमत?
आणि टास्क पण कसा जो रद्दच होईल.

गायत्री दातार अभिनेत्री म्हणून धन्य होतीच पण एक माणूस म्हणून पण या शो मध्ये फारशी आवडली नव्हती. ती कधी बिचारी तर कधी लोचट वाटायची. एवढ्या चांगल्या घरातील मुलगी असे वागुन सगळ्या कुटुंबाच्या इज्जत का फालुदा करतीये असेच चित्र उभे रहात होते.
आज पहिल्यांदा तीने योग्य शब्द वापरत बी टीमला ज्या पद्धतीने सॉरी म्हंटले, एकदम आवडून गेली.
विनिंग मटेरियल ती कधी नव्हतीच पण जे काही तीचे शेवटचे दिवस या शोत आहेत, तिच्या घरच्यांना नक्कीच छान वाटेल. देर आए मगर दुरूस्त आए.

गायत्रीच्या भावानी मीनलला ‘दिनेरियस टार्गेरीयन’ अशी काँप्लिमेन्ट दिली Happy , तिला/इतर कोणाला समजली कि नाही काय माहित , कोणी गॉट पहाणारे नसावे त्यातले! मला मीनल खरच ड्रकारीस म्हणत बिबॉ सेटवर आग लावताना डोळ्यासमोर आली>> मलाही माहिती नव्हत पण काहितरी एकदम भारी असेल हे कळल.
गायत्रीच्या भावाने तिला एकदम भारी सान्गितल की सगळेच खुप हुशार आहेत तु फक्त गिव्ह अप करु नकोस, जर्नी महत्वाची गोलपेक्षा.
गायत्री बी टिममधे गेली ,मे़जॉरिटी शिफ्ट झाली याचा जयला भरपुर त्रास झालेला दिसतोय, सारख आपल्याला काहि फरक पडत नाही म्हणून तिचाच विषय बोलत होता.

कधी नव्हते ते बी टीममधला कोणीतरी कॅप्टन झाला असता, टास्क रद्दच.

राडे झाले काय परत.

भेटी गाठी दूसरा भाग बघितला नाही अजून.

गायत्रीच्या भावानी मीनलला ‘दिनेरियस टार्गेरीयन’ अशी काँप्लिमेन्ट दिली Happy , तिला/इतर कोणाला समजली कि नाही काय माहित , कोणी गॉट पहाणारे नसावे त्यातले! मला मीनल खरच ड्रकारीस म्हणत बिबॉ सेटवर आग लावताना डोळ्यासमोर आली>> मलाही माहिती नव्हत पण काहितरी एकदम भारी असेल हे कळल.
<<<<<
मदर ऑफ ड्रॅगन्स , सर्व शक्तिशाली, मोस्ट पॉवरफुल कॅरॅक्टर !

मदर ऑफ ड्रॅगन्स , सर्व शक्तिशाली, मोस्ट पॉवरफुल कॅरॅक्टर>>> ओह अस आहे का मग अगदी परफेक्ट उपमा दिली आहे मिनलला!
मिनलच जिन्कावी हा सिझन. माझे वोट्स मिनलसाठीच

मदर ऑफ ड्रॅगन्स , सर्व शक्तिशाली, मोस्ट पॉवरफुल कॅरॅक्टर ! >>> ओहह, मलाही माहिती नव्हतं. मस्त उत्स्फूर्त होता गायत्रीचा भाऊ, फार छान वाटला. एंजॉय द पाथ म्हणाला ते खूप आवडलं. वहिनी, बाळ गोड.

जयची आई मस्त आहे, बाबांची hight छान आहे.

विशालकडच्या कोणीतरी सांगायला हवं होतं, सोनालीबद्दल काही इश्यू होता तर असा सर्वांसमोर सांगायला नको होतास. विशाल वडलांना खूप मिस करत होता.

मीनलचा मोठा भाऊ वयाने लहान वाटला मला, तो छोटा भाचा होता का तिचा, गोड होता. त्याला जायचं नव्हतं, शेवटपर्यन्त flying kiss देत होता.

उतक्याची बायको छान आहे. ती पण डॉक्टर असावी अस वाटलं. ती नवऱ्याला एकेरी नाही हाक मारत.

आज सर्वजण positive वाटले घरातले. मध्ये मध्ये जय गा दा बद्दल बोलत होता मात्र.

मला जय, उतक्या, विकास सीन जाम आवडला. उतक्या छान बोलत होता. जयही मस्त मस्करी मूड मध्ये होता आणि विकासही छान बोलत होता.

मिनलच जिन्कावी हा सिझन. माझे वोट्स मिनलसाठीच >>> अगदी अगदी. मलाही तिलाच द्यावेसे वाटतायेत सर्व votes.

जय ट्रॉफी घेऊन घरी येतो म्हणाला, bb ने प्रॉमिस केलंय की काय, हाहाहा.

विकास विशाल टॉप २ असायला हवेत आयडिअली, पॉप्युलॅरीटी नुसार , त्यांनी दिलेल्या कन्टेन्ट नुसार… लाइट बन्द करायला एक हात विकासचा असणारच !
मीनल सुद्धा सॉल्लिड खेळली आहे, बघुया कोण जिंकतय!
हा सिझन एकदम वन साइडेड नाही झाला त्यामुळे मजा येतेय , पहिल्या २ सिझन्स मधे मेघा-शिव जिंकणार हे ऑलमोस्ट माहित होतं !
यावेळी दर आठवड्याला इक्वेशस्न्स बदलत आहेत !

हा सिझन एकदम वन साइडेड नाही झाला त्यामुळे मजा येतेय >>> हे मात्र खरं.

सोनाली विकास बोलत होते तेव्हा विकास विशाल खूप इमोशनल आहे म्हणाला आणि तो स्पेसिफीक सोनालीचा विषय, त्याबद्दल सोनाली म्हणाली तेव्हा तो म्हणाला तो टाळला असावा. त्याबद्दल फॅमिलीने विशालला थोडं सुनवायला हवं होतं, विशालने लगेच माफी मागितली असती सोनालीची तर त्याच्या लोकप्रियतेत मध्ये खूप फरक पडला असता.

मीनलने सिंपथी नाही घेतली, रड रड रडली नाही, लव angle नाही, कोणाच्या मागे नाही. कोणाबद्दल कान भरणे नाही. कोणाच्या पुढे पुढे करणे नाही ( हे आधीही एकदोन जणांनी इथे लिहिलं आणि सो मि वर पण वाचलं, अगदीच पटलं ते ). एक स्वयंपाक सोडला तर ती कशातही कमी नव्हती आणि टास्कमध्ये तर बाप होती. मला तीच जिंकलेली आवडेल, विकास दोन नंबर. विशालबद्दल आता नाही फार वाटत.

लाईटस मीनल विकासने बंद केलेले आवडतील, सध्यातरी हे मत. उद्या कोण कसं वागेल हे काय माहिती.

>>मला एक उत्सुकता आहे, मुळ इंग्रजी बिग बॉस कुणी बघितला आहे का? भारतीय बिग बॉस त्यांनी डिट्टो कापी केलाय की भारतीय मसाला टाकून फोडणी दिली आहे?<
मी पाहिलेत काहि एपिसोड्स. बिगबॉस हि काइंडॉफ फ्रँचाय्ज आहे. युके, अमेरिका इ. देशात हिट झाल्यावर भारतात आली. फ्रँचाय्ज म्हणजे बंधनं आली; पण त्यात तुम्हि लोकलायझेशन करु शकता, मूळ गाभ्याला धक्का न लावता. मूळ गाभा या कोर फॅक्टर्सवर स्पर्धकांना जोखतो - ह्युमन सायकालजी, लिडरशिप अ‍बिलटि, इंटेलिजंस, कांपिटिटिवनेस, आणि शेवटि ऑनेस्टि...

>लाईटस मीनल विकासने बंद केलेले आवडतील, <<
विकास जिंकला तर त्याला मी मेल मेधा धाडेचा किताब देइन - लायकिपेक्षा जास्त यश मिळाल्या बद्दल... Proud

बिगबॉस हि काइंडॉफ फ्रँचाय्ज आहे. युके, अमेरिका इ. देशात हिट झाल्यावर भारतात आली.>> सगळेच गेम शो. रिईलॅटि शोज कॉपीच केलेले आहेत कौन बनेगा करोडपती,पाचवी पास से स्मार्ट्,दस का दम्,फियर फॅक्टर्,सर्व्हावयर.बिग बॉस
सगळे सगळे फक्त अन्ताक्षरी वैगरे खुप आधिचे शोज सोडून.
एक विक जेमतेम दम धरुन जय दुधाणे आज परत अ‍ॅग्रेसिव्ह झाला आणी वाटेल ते बोलत सुटला होता कुठल्या ग्रुर्मीत असो देवच जाणे, पब्लिक सोमीवर त्याला आणी डॉक्टरला शिव्या घालतेच आहे पण. बीबी टिमला ही जयला सतत सुट देण्याबद्दल बायस्ड म्हणून शिव्या पडत आहेत.तो फिजिकली नेहमी सगळ्याना हार्म करतो यावर साधी वॉर्निग सुद्धा देत नाहीत. काहितरी सेटिन्ग आहेत आतमधे असही बोलल जातय.
आज एका पोईन्ट् विशालला त्या चौकटीतुन बाहेर काढायला जय त्याचा एक पाय एका बाजुने ओढतोय आणि उत्कर्ष दुसर्‍या बाजुने ओढतोय.
काय डोक्यावर पडलेत का हे दोघ्??उत्क्या डॉक्टर आहे ना?
उत्क्याचा खान्दा बरा झाला का? त्याची अजुन एक गम्मत म्हणजे सोनालीला जयने धरुन ठेवले होते आणी उत्क्याला सान्गत होता की विशालला बाहेर काढ त्यावर उत्क्या म्हणतो मी सोनालीला पकडतो पण तुच विशालला बाहेर काढ.

ह्युमन सायकालजी, लिडरशिप अ‍बिलटि, इंटेलिजंस, कांपिटिटिवनेस, आणि शेवटि ऑनेस्टि... भारतात रिजनल सपोर्ट हा फॅक्टर पण काम करत असावा, तो शिव फार हुशार बिशार नव्हता वाटला फारसा.
>लाईटस मीनल विकासने बंद केलेले आवडतील, << मला पण. आणि ट्राॅफी मीनलच्या हातात.

जयची आई जेंव्हा विशालला म्हंटली कि आम्हाला ज्योतीबा पासून तू आवडतोस, तेंव्हा जयची रिअ‍ॅॅक्शन>>> मला असे वाटते की इनडायरेक्टली त्यांनी जयला सांगितले की विशाल स्ट्रॉंग आहे. बचके रहना.
लाईटस मीनल विकासने बंद केलेले आवडतील, << मला पण. आणि ट्राॅफी मीनलच्या हातात. >>> +१

मेघा मला तेव्हा पण योग्य वाटली होती आणि आता पुढचे दोन सीजन बघता तीच योग्य होती हे परत परत पटते. या गेमचा व्यवस्थित अभ्यास करून तयारीने आली होती ती. तेवढे नंतर कोणी तयारीने आलेले दिसले नाही.

त्याचा मुलगा खेळताना पाण्याच्या टाकित पडला होता काही वेळ पाण्यात राहिल्याने मेन्दुला ऑक्सिजन पुरवठा झाला नाही त्यामूळे काही डेव्हलपमेन्टचे इशु आहेत अस अ‍ॅक्टरायडरने सान्गितल होत. नक्की काय इशु आहे ते माहिती नाही पण आजारी आहे ,उपचार चालू आहेत एवढच कळल.
मला वाटत अगदी सुरवातिच्या एपिसोडस मधे त्याने हे शेअर केल होत.

जयचं वय किती आहे?
Btw, त्याच्या आईने घरातल्या मुलींना त्याच्या बहिणी असा उल्लेख केला.

फॅमिली ड्रामा मेलोड्रामा झाला नाही त्यामुळे बारा वाटला एपिसोड.

जयचे आईबाबा कुल आहेत. राडा तर टास्क मध्ये होणारच हे त्यांनाही माहीत आहे.

उत्कर्षची बायको एकदम छान सांगून गेली त्याला individual खेळण्यासाठी. त्याने महाराष्ट्र सेफ आहे ना विचारलं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ते आवडलं. फक्त त्याच्या strategies over the top म्हणल्याने तो हवेत जाऊ नये म्हणजे झालं.

विकास एकदम निरागसपणे ह्याला सांगा मला लॉक करू नको असे सांगत होता. विकासचं कॉमिक timing भारीय. त्याचा वावर बोलणं त्याच्या ग्रुप मध्ये असच असतं.

Extra मसाला मध्ये हलके फुलके मोमेंट्स भारी असतात बघायला.

गायत्रीचा भाउ एकदम कुल, आणि जमिनीवर पाय.
मस्त बोलला सगळ्यांना.

मीरा, जय आणि उत्कर्ष हे तिघेही गायत्री जाणार ह्यावर एकदम ठाम दिसत आहेत. तिचा उल्लेख G असा करतात.

मिनलचे घरचे छान होते. तिचा भाउ तर एकदम मस्त बोलला तिला.

Pages