मराठी बिग बॉस पर्व तिसरे- २

Submitted by सूलू_८२ on 20 November, 2021 - 17:33

फायनलला थोडेच आठवडे उरले आहेत. स्पर्धा चुरशीची चालू आहे.

सो, हा आहे दुसरा धागा.

चला, चर्चा करुया!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल जय आणि मीरा गायत्री ला काहीही बोलत होते... पर्सनल लेव्हल ला जाउन... शनिवारी निघणार हे.
जय साठी एक आठवडा सगळ्या सामानाचा त्याग तिनेच केला होता हे विसरला तो...
इतके दिवस तिनेसुद्धा गरज पडेल तेव्हा, जमेल तशी टीम ए च्या सगळ्यांना प्रत्येक टास्क मधे मदत केली हे पण विसरले ते लोक लगेच...
गायत्री गद्दार आहे असं त्यांचं म्हणणं आहे पण मग मीरा-गायत्री चं भांडण झालं तेव्हा त्या दोघींमधे समेट घडवुन आणायला जय आणि उत्कर्ष का नाही पुढे झाले... टीम ए चं प्रेम नुसतच वरवरचं होतं....गेलीस तर जा काय फरक पडतो...असं..
त्याउलट आत्तापर्यंत इतके वेळा टीम बी मधुन विकास, मीनल ने समजुतदारपणे भांडणं मिटवायचा प्रामाणिक प्रयत्न केला.. त्यामुळे इतके टोकाला जाउनही अजुनतरी सगळे सोबत आहेत....
काल गायत्री टीम बी ला सॉरी म्हणाली ते कुठेतरी बरं वाटलं...बाहेर आली तरी वाईट इमेज घेउन नाही येणार ती आता... तिच्या भावाच्या भेटीमुळे पण ती पॉझिटिव्ह दिसायला लागली आहे....
गायत्री च्या आधी मीरा गेली तरी आवडेल मला आता....
सोनाली गंडली आहे...काल जय कडे गायत्री ची तक्रार केली आणि मग गायत्री समोर लगेच शब्द फिरवले.... अजुनही विशाल सोबत बोलत नाहीये..पुढचा नंबर सोना चा लागु शकतो...
जय-विशाल भांडणात काल जय रानटीपणे ओरडत होता विशाल वर पण तरी विशाल शांतपणे रीप्लाय देत होता त्याला....
सोना ची आई येउन गेल्यावर विशाल एकटाच झोपळ्यावर रडत होता ते विकास ने पण नोटीस केलंय... त्यामुळे विशाल वरचा राग कमी व्हायला सुरुवात झाली आहे सोमी वर सुद्धा...
काल विकास डॉक्टर रुम मधुन बाहेर येईपर्यंत विशाल बाहेर उभा होता त्याची वाट बघत...
विकास रुम मधे रडला तेव्हा हेल्पलेस वाटला खुप... आमच्या टीम चं कोणीतरी कॅप्टन व्हावं अशी ईच्छा होती म्हणाला... खरंच आहे ते..
काल का नाही बहुतमाचा टास्क दिला ? बिबॉ पण मुद्दाम करतात काही गोष्टी...

<<विकास रुम मधे रडला तेव्हा हेल्पलेस वाटला खुप... आमच्या टीम चं कोणीतरी कॅप्टन व्हावं अशी ईच्छा होती म्हणाला<<
अगदि अग्दी... या वेळी फार आशा होती, मीनल कॅप्टन होईल असे आपल्यालाही.
विकास रडला, मिनलही उद्विग्न झालीहोती,, संतापात काय काय बोलली समोर मीरा, उत्क्या असतांना! पण लगेच सावरली ही.
पण खरे तर बिबॉलाच टीम बी चा कॅप्टन होउ द्यायच नाहीये.

विकासचे रडणे खुप खरे वाटले. त्याच्या मुलाला लागलेले आठवले असावे त्या क्षणी. मीनलच्या हातातून गेली कॅप्टनशीप.
विशालच्या शक्तिची कमाल म्हणावी लागेल. ते दोन रानरेडे दोन्ही बाजुनी पाय ओढत होते तरीही हु की चू नाही. नाही तर जय मनोरूग्णासारखा केकाटत होता. जराही स्पोर्ट्समनशीप नसणारा निर्बुद्ध बैल आहे. उत्क्या तर नक्कीच कॉपी करून डॉ झाला असावा. खुशाल मखलाशी करत होता एवढा राडा करून.

जय ची आई बोलली की, "तु असा नाहीयेस तापट वगैरे..." .
अरे २-४ दिवसातच मुलगा बदललाय का काय... टास्क मधे माणुसकी धरून पण वागणारे असतातच की. उगाच महाराष्ट्राला सांगायचं आमचा मुलगाच winning material आहे म्हणून.

काल का नाही बहुतमाचा टास्क दिला ? बिबॉ पण मुद्दाम करतात काही गोष्टी...>>> खुपच, बीबी टिम बायस्ड आहे.

आणि ट्राॅफी मीनलच्या हातात >>> व्हय तर.

मीनलची आई एकदम सिंपल, भाउ उत्स्फुर्त. तो इंग्लिश खुप बोलत होता, मीनलने मराठीत बोल सांगितल्यावर छान बोलला, मीनलपेक्षाही.

पण खरे तर बिबॉलाच टीम बी चा कॅप्टन होउ द्यायच नाहीये. >>> हम्मम.

काल सोनाली जयच्या टीममध्ये होती का? कसे काय? मी फक्त फेसबुकवर एक विडिओ पाहिला त्यात दिसले. मिरा खेळत नव्हती का? तसे नसेल तर जयच्या टीममध्ये जास्त आणि मिनल कडे कमी माणूसबळ नाही का झाले?

फेसबुक वर एका तृतीयपंथी व्यक्तीने जयने विशालला ‘नल्ला’ हा शब्द शिवीच्या अर्थाने वापरला या बाबत जयचा निषेध आणि पोलिस कंप्लेन्ट केल्याचं लिहिलय.

हो काल जय अगदीच लो लेवल ला जाऊन बडबड करत होता. ४ दिवस नाटक जमले "नाइस गाय" चे, मग गेला शेवटी लायनीवर. मीरापण तसलीच. किती सतत निगेटिव बडबड करते. उत्क्या इतका दोस्त म्हणवतो पण जय असा बडबड करायला लागला की मुद्दामच शांत पहात उभा राहतो. त्याला व्यवस्थित समजत असते हे वाईट दिसते आहे पण तो जयला थांबवायचा प्रयत्न करत नाही. अ‍ॅज इफ त्याला ही तो वाइट दिसलेले हवेच आहे.
काल विशाल ला जय आणि उत्क्या दोन बाजूने पाय धरून ओढत होते ते खरंच भयंकर दिसत होतं. कल्पनेनेच पाय दुखला Happy

काल टिम ए ने लगेच सोनालीला खेळायला घेतले, माहित होतं त्यांना मिरा पेक्षा सोनाली टस्कमधे कधीही उजवीच आहे.
जयचे परत पहिले पाढे पंच्चावन्न, टिम बी साठी चांगलच आहे.
गायत्रीचा प्रजेंन्स आता एकदमच पॉसिटीव वाटत आहे, तीच्या बोलण्याच्या स्किलने ती जय आणि मिराला मस्त टक्कर देउ शकते.
गायत्रीच्या एक मुव्हमूळे सगळा गेम बलून गेलाय.
बिगबॉसने टिम बी विरुद्ध पार्शियालीटी सोडुन, जसा इतके दिवस टिम ए ला सपोर्ट केला, तसाच सपोर्ट टिम बी ला करावा.
प्रत्येकाला समसमान संधी या अगोदर का नाही दिली, तेंव्हा बर बहुमत चालत होत.

' आज 'विजेता' सिनेमाची टिम आली होती. सुबोध भावे, पूजा सावन्त, सुशान्त शेलार आंणि माधव देवचक्के.

सुभा गायत्रीला शेकरु म्हणतो.

सुशान्त माधवला बोलूही देत नव्हता. मध्येच ह्याची टकळी सुरु.

विकासने जय टास्कमध्ये बोलला त्याचा राग सोनालीवर काढला. सोनाली सुद्दा वाटेल तसे बोलते.

मीनलने आणि विकासने छान मुद्दे माण्डले जय आणि मिराविरोधात.

बाकी विकास सोनालीला ' उत्कर्ष आणि मिरात काहीतरी चालू आहे' ते नाही आवडल. चीप होत ते.

सोनाली विशालला 'विशाल निकम' म्हणते. मिनलशी बोलताना ऐकल.

गायत्रीचा प्रजेंन्स आता एकदमच पॉसिटीव वाटत आहे, तीच्या बोलण्याच्या स्किलने ती जय आणि मिराला मस्त टक्कर देउ शकते.
गायत्रीच्या एक मुव्हमूळे सगळा गेम बलून गेलाय. >>>>>>> ++++++++++ ११११११११

आणि ट्राॅफी मीनलच्या हातात >>> सहमत

त्याच्या आईने घरातल्या मुलींना त्याच्या बहिणी असा उल्लेख केला. >>>>>>>>>> जय सुद्दा मीराचा उल्लेख ' माझी बहिण' असा करत होता.

उत्क्या इतका दोस्त म्हणवतो पण जय असा बडबड करायला लागला की मुद्दामच शांत पहात उभा राहतो. त्याला व्यवस्थित समजत असते हे वाईट दिसते आहे पण तो जयला थांबवायचा प्रयत्न करत नाही. अ‍ॅज इफ त्याला ही तो वाइट दिसलेले हवेच आहे.>> अगदी अगदी पण आता त्याचि इमेज जयचा अस्टितन्ट म्हणूनच इस्टॅब्लिश झालिये, आता कितिही काहीही केल तरी ती बदलणार नाही.टिम ए मधे जय सर्वेसर्वा होता,आहे आणि राहिल.
विकास्- विशाल ब्रिफली का होइना का जातात जयशी बोलायला, त्याच्या ग्रुपशी तो अस वागतो तुम्हाला तो काय चान्गल ट्रिट करणार आहे.
कशाला स्वत:ला विक प्रुव्ह करण्याच्या मागे असतात हे लोक....मधे मिराने ट्राय केला होता एकट खेळण्याचा कसा रिअ‍ॅक्ट झाला तो ,यानी बघितल नाहि का? की मिराबाई परत जयच्या अधिपत्याखाली,
मी म्हणजे कोण असा त्याचा वावर असतो घरात त्याला कवडिचीही किम्मत देत नाही ती एकच मिनल बाकी सगळ्या मुली बायका सगळ्या जयजयकार करत त्याच्या भोवती असायच्या.
आज त्याच्याच इतकाच तोन्डाळ,अ‍ॅरोगन्ट तो सुशान्त शेलार आला होता आणी जयची तारिफ करत होता, म्हटल वळणाच पाणी वळणावरच जाणार.

आज त्याच्याच इतकाच तोन्डाळ,अ‍ॅरोगन्ट तो सुशान्त शेलार आला होता आणी जयची तारिफ करत होता, म्हटल वळणाच पाणी वळणावरच जाणार.
>> voot वर आल की पाहणार होते एपिसोड. पण आता इच्छा गेली.
आता डायरेक्ट चावडी एपिसोड पाहीन. ते सुद्धा इथे वाचून मग ठरवेन.
https://www.facebook.com/groups/2190089831223766/permalink/3260911284141...
यावरुन मांजरेकर कदाचित बोलतील विशालला.

बाकी हिंदी BB मध्ये नक्की अजून किती स्पर्धक आहेत.
व्हीआयपी आणि नॉन व्हीआयपी

काल मीनल ने जय साठी मांडलेले मुद्दे सगळ्यात जास्त आवडले. मीनल दिवसेंदिवस अजून जास्त छान वाटायला लागली आहे.
मीरा गायत्री विरुद्ध बोलताना माझा एकच मुद्दा आहे असं म्हणत अखंड बोलत बसली होती.
जय ने विकास चे नाव घेणे हास्यास्पद होते..
या आठवड्यात वोटिंग चालू असतं तर मीरा ची exit नक्की होती जवळजवळ...
आज चावडी वर कोणाला ओरडा बसतोय बघू.

कालचा भाग पाहिला नाही. कंटाळवाणं होत चाललंय.

जय विशालचा पाय कसा ओढत होता! भीतीदायक होतं.

त्याने त्याचा पाय आधी ओढला मग पिरगळला मग दुसऱ्या बाजूने डॅाक्टर आला दुसरा पाय ओढायला.
अ गट पूर्ण आठवडा गायत्रीचा जप करत होते. ती दुसऱ्या गटात गेल्याने फारच चिडलेत ते. त्या आधीच्या आठवड्यात हेच लोग तिला त्यांच्या बोलण्यात घेत नव्हते. मीरा तर कित्येक वेळा तिला मी आता बोलते तर तू इथे नको येऊ असे सांगत होती. तिला बाहेर कसे काढायचे ते ठरवत होते. मग आता ती सोडून गेली तर एवढा का संताप.
गा दाने बरोबर सांगितले ब गटाला कि तुम्ही दुसऱ्यांसमोर काही बोलत जाऊ नका कारण तेच ते लोक टास्क मधे भांडताना काढतात.

जयचे आई वडील फार सभ्य वाटले. मुलगा असा गुंड कसा निपजला? मला त्याच्या पालकांबद्दल सहानुभूती वाटते आहे, आपल्या मुलाला असे नॅशनल प्रोग्राम मध्ये बिभत्स वागताना पाहून किती त्रास होत असेल .

जयचं शरीर पण विचित्र दिसतं. बाकी फारच काटकुळा पण दंड विचित्र फुगलेले दिसतात. तो सतत अंडी खाताना आणि प्रोटीन शेक पिताना दिसतो. बाकी काही खातो की नाही देव जाणे. हाणामा-या करताना दैत्य वाटतो.

सोनाचा कंटाळा आलाय. सततची किरकीर आणि खोटारडेपणा बोअर होतो.

गायत्री एकदमच बदलली. एकंदरीतच वावर बदलला आहे तिचा.‌ एकदम एवढा फरक? का हापण गेम प्लान होता तिचा? गेल्या चावडीनंतर बी टीमवर जास्त फोकस असेल असं वाटल्यामुळे/लक्षात आल्यावर इकडे आली असेल का? कारण, आता सोमिवर तिला पण नावाजत आहेत लोक. पूर्वी ती आधी जावी असं वाटणारे आता 'मिरा, उत्कर्ष आधी जावेत' म्हणत आहेत.
आपण वीक आहोत तर बी टीमकडे येऊन अजून एक दोन आठवडे सेफ होता येईल असे गणित असेल का?
सेल्फ रिस्पेक्ट इतके दिवस कुठे होता?

तिला लाथा घालून हाकललं ना टीम ए वाल्यांनी!
टेम्प्टेशनच्या वेळी मीरा - उत्कर्ष बोलत असताना जयला घेतलं , हिला तू बाहेर थांब सांगितलं.
मग पुस्तक नॉमिनेशनमध्ये जयने प्रायॉरिटीज स्पष्ट केल्या.

शिवाय टीम ए चे सदस्य एकामागोमाग एक घराबाहेर जात आहेत. बीचे तिथेच आहेत हेही दिसलं असेल.

तिकडे असताना स्ट्राँग टीमला लटकायचा फायदा दिसत होता.

गायत्री तरीही मला नाही आवडत. तिथे कॅप्टनशिप मिळाली, ती घेतली आणि नंतर इथे आली. पब्लिक पण लगेच उदो उदो करतात. चार पाच आठवड्यात आली असती तर ठीक होतं.

अर्थात ए टीमवाले ती जाणार गृहीत धरून तिला लांब ठेवत होते, जयने तरी अस करायला नको होतं, तो कॅप्टन होण्यासाठी तिने खूप त्याग केला होता. ती आता त्यांना सोडून गेली तर किती च्याव च्याव करतात.

बहुमत इकडे तर काही फायदा झाला का टीम बी ला. कॅप्टन कोण झालं.

जय आई बाबा येऊन गेल्यावर सांगत होता की माझी स्टाईल बाबांसारखी आणि स्वभाव आईसारखा. का रे बाबा आईला लाज आणतोस, असा स्वभाव आईचा नसेल.

जयने विचारलेले आईबाबांना की राडे कसे वाटतात तेव्हा त्याची आईने 'एक नंबर' म्हंटले होते. आणि वडिलांनी राडे तर होणारच म्हणून दुजोरा दिला होता.

विकास ट्रॉफीपासून लांब आहे असे म्हणून जय जे काही बोलला ते त्यालाच लागू होत होते. जय स्वतःच्याच मस्तीत असतो. येणारे पाहुणेही अ टीमचच कौतुक करतात. जयचे नाक वाकडे आहे का, प्रसाद ओकसारखे.

टॉप 3 मध्ये जर मुलगी असेल तर ती नक्कीच मीनल असेल.
पण विनर नाही होणार कारण सोमिवर जेवढी सिंपथी आणि वोट्स वि2 ला आहेत तेवढे बिचारीला नाहीत आणि बिबॉस सुध्दा तिचा विचार करणार नाहीत.
मला तर ती सगळ्याच बाबतीत मेघापेक्षा पण सरस वाटते.मेघा कधीकधी नाटकी वाटायची.
सोनाली पहिल्या दिवसापासून मला कळलीच नाही,कशी काय राहिली 11 आठवडे कोण जाणे.पण गेले 3 आठवडे खेळते मात्र आहे आणि कधीकधी जे बोलते त्यामुळे हसायला पण येत.ती जायला हवी ,पण
काल विकासला म्हणाली,तुला भस्म्या झाला आहे,ते चुकीच होत ,पण ज्या पध्दतीने बोलली ते ऐकून हसायला आल.
विकास मात्र आवडेनासा होत आहे.
टीआरपी मात्र जय आणि मीरामुळेच आहे,हे मात्र नक्की.

मीनल एकमेव आहे तिन्ही सिझनमधली सरस.

निगेटिव्हीटी नाही ना तिच्यात, तिथे कमी पडते ती. त्यामुळेच आवडते.

मेघाला खानदेश, शिवला विदर्भ, विशालला सांगली कोल्हापूर असा रीजनल सपोर्ट मिळतोय. मीनलला तो आडव्हांटेज नाही.
मीनल एकमेव आहे तिन्ही सिझनमधली सरस.....कुणाचेच दुमत नसेल.

Pages