मराठी बिग बॉस पर्व तिसरे- २

Submitted by सूलू_८२ on 20 November, 2021 - 17:33

फायनलला थोडेच आठवडे उरले आहेत. स्पर्धा चुरशीची चालू आहे.

सो, हा आहे दुसरा धागा.

चला, चर्चा करुया!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दोन्ही टिमचे ३-३ ठेवणार असतिल >>> मलाही असंच वाटतंय.

बाय द वे विकास कोल्हापुरचा असून त्याची भाषा तिथल्या मातीतली नाही वाटत. प्रमाण मराठी सहज बोलतो. मीरा पण शेतकरी कुटुंबातून आलीय पण मूळ जो भाषेचा घरचा बाज आहे तशी बोलत नाही , तिचा भाऊ बोलत होता. सोना आणि विशाल मात्र जिथले आहेत, तिथली भाषा बोलतात अस वाटतं.

विकास कोल्हापुरचा असून त्याची भाषा तिथल्या मातीतली नाही वाटत>>हो. त्याचा जन्म कोल्हापूरचा आहे पण शिक्षण पुण्यात झाले आहे.

शालेय शिक्षण बहुतेक कोल्हापुरात झालं असावं, not sure. कोल्हापुरकर सांगतील नीट काय ते.

आज मीरा का रडत होती जयच्या गळयात पडून ते कळल नाही. त्यावेळी ती नॉमिनेटही झाली नव्हती.

जय ने मुद्दामहून स्नेहाच्या पाठीवर शर्टाचा फटका मारला का?

टिम बी असताना गायत्री जयकडे रडायला गेली. फायनली तिची स्लिन्ग गेली.

आज पुन्हा सारन्गे ऐकाव लागल.

सोनाली किव्वा गायत्री जाईल.

मीनल छान नाचली शेवटी. सोनाली मोठमोठयाने गाण म्हणत होती.

जयने तिला कमोडच पाणी ओतायला लावल होत अन्गावर सैतान टास्कमध्ये. उद्या ही नक्कीच ह्याचा बदला घेईल त्याच्याकडुन हुकूमशहा टास्कमध्ये.

बादवे, हिन्दी बिबॉमध्ये आज बिचकुले आणि राखी सावन्तच भाण्डण झाल.

सोनाली अज्जिबात जाणार नाही जर बिबॉ वोटींग प्रमाणे एलिमिनेशन करणार असेल तर , इन फॅक्ट सोनाली जाऊ नये म्हणूनच अख्खी ए टिम नॉमिनेट केली असावी असं वाटतय मला , जर तिला घालवायच असत तर अख्खी बी टिम नॉमिनेट केली असती, ए नाही !
आत्ताच्या सिच्युएशन मधे ए टिमची वोट्स डिव्हाइड होणार पण बी च्या मेजॉरीटी पब्लिकची वोट्स मात्रं सोनालीला येतील Happy
वोटिंग ट्रेंड्स प्रमाणे जवळपास ७० % टक्के वोट्स तिला येत आहेत उरलेली बाकी सगळ्यांना !
जय दुसर्‍या नंबरवर असला तरी सोनाली आणि जय मधे भरपूर फरक आहे .

<आज मीरा का रडत होती जयच्या गळयात पडून ते कळल नाही>

विकासने तिचं आणि उत्कर्षचं कनेक्शन जुळवून दिलं होतं (एम आणि यू) . मांजरेकरांनी त्याला त्यावरून चावडीवर विचारलं होतं. त्याचं मीराला आता रडू आलं . खरं तर काही रडू आलं नव्हतं. ड्रामा होता कारण आवाज रडका नव्हता. चेहरा नीट होता .ठरवून केलं असेल. मग जय गायत्रीचेही डोळे पुसायला गेला.

आतिश, स्नेहा, तृप्ती यांच्यामतेही विशाल आणि मीनल टॉप टू आहेत. एलिमिनेशनसाठी दोघांचा विचारही केला नाही.

या सगळ्यात त्रुप्ती ताइना त्याच्या मेकपवरुन सोमीवर एवढ्या फनी कॉमेन्टस मीळतायत ,कुणी त्याना किम जॉन्ग उन म्हणतय,कुणी झपाटलेला बाहुला म्हणतय... कूणी केला होता त्याचा मेकप काय माहिती

Forwarded :
आजचा हिरो निर्विवाद आदिश होता!! हुशारीने खेळून गेलेला हुकूमशाह!! वास्तविक टास्क बोरिंग होता, कारण रिपीटेटिव्ह होता, पण त्यातही तो चांगला खेळुन गेला.पहिल्यांदा सोनालीला नॉमिनेट करतांना त्याने सहज कुठलीही झिकझिक न करता (त्याला माहिती होतं तशीही सोनाली होणारच आहे) 'तुम्हा दोघींचं एकमत आहे ना सोनाली वर, चला मला मान्य नाहीय तरी ठीक आहे करतो एकमत' नंतर गायत्रीला नॉमिनेट करतांना त्याने हा मुद्दा बरोबर वापरला की आधी मी तुमचं ऐकलं आता माझं मत गायत्रीला (जिथे स्नेहाचा विरोध होता गायत्रीला त्या पॉइंटला नॉमिनेट करायला) नंतर उत्कर्षाच्या वेळी त्याने बघितलं की दोघी तयार आहेत उत्कर्षला करायला तिथे बरोबर तो 'नरो वा कुंजरोवा' झाला, आणि शेवटी जय ला नॉमिनेट करतांना तर तो खरा खेळ खेळला. तृप्ती देसाईंना अर्ग्युमेंट करतांना कुणी काऊंटर केलं की त्यांचा इगो हर्ट होतो, हे ओळखून त्याने देसाईंनी सुचवलेल्या विकास नावाला अजिबात विरोध केला नाही, उलट जयच्या गेम खेळतांना होणाऱ्या बिट ओव्हियस उणिवा मांडल्या त्याला पाठीशी घालणे तृप्ती दादाला शक्य नव्हते, आणि इथे अलगद आदिशने स्नेहाच्या जय नावावर होणाऱ्या एकमताला हळुवार कुरवाळले आणि सारंगी काकु, तृप्ती दादा कडुन लगेच स्टॅम्प मारून एकमत आदिशने करवुन घेतले!! धिस मूव्ह वॉज रियल बँग ऑन टार्गेट बरं का!! कदाचित लास्ट एलिमिनेशन टास्कला बँग ऑन सदस्य निवडले गेले!!

बाकी उत्कर्षला अजुनही गेम कळत नाहीय की मास्टरमाइंडच्या आकलना पलीकडे तो गेलाय कळत नाहीय. पण इथे तो म्हणतो, 'ह्या तीन सदस्यांच्या मताला किंमत द्यायची नाही रे, पाहुणे आलेयत पाहुणचार करायचा बास' आणि दुसऱ्या फ्रेममध्ये हे तिघे हुकूमशहा होतात, नंतर कॅप्टन्सीला लायक जे नाहीत त्या यादीत पहिलं नाव तिघे उत्कर्षचे घेतात. ह्या सगळ्यात आपली आता जाम वाट लागणार आहे हे जाणवल्यामुळे उत्कर्षचा चेहरा असा काही पडला होता जणु काही बिग बॉसच्या घरात सुतकंच आहे जणु!! त्या तृप्ती ताई इतक्या जीवतोडून हिंट देतायत पण ह्याचं आपलंच सुरूय मेरी मुर्गे की एक ही टांग!! बरं बाबा घे एकही टांग!!

आजची सगळ्यात आवडलेली फ्रेम जय, मिरा, उत्कर्ष वॉशिंग एरियात बोलत असतात, जबकी काकु येतात आधी तर लगेच निघून जायला बघतात मग जय-उत्कर्षने थांबल्यावर म्हणतात 'तुम्ही तुमचं बोला मी फक्त दोन मिनिटं थांबते आणि जाते' आणि कहर म्हणजे नंतर फक्त जबकी काकूच बोलतात इतक्या बोलतात की तिघांचे चेहरे अगं बाई दोन मिनिटात जाणार होतीस ना तु??

मी जर बिग बॉसचा कन्टेन्ट रायटर असतो तर ह्या आठवड्यात शॉकिंग एव्हिक्शन म्हणुन उत्कर्ष शिंदेला एव्हिक्ट केले असते. दोन कारणं कारण त्याच्यातून एक्सपोज करावे असे काहीही उरलेले नाही, म्हणजे त्याचा 'ग्रे' फ्लेवर संपल्यात जमा आहे, आणि अति एक्सपोज झाल्याने तो खूप सेफ खेळतोय ज्याने बिग बॉसला हवा तो कन्टेन्ट मिळत नाहीय!! त्याच्यापेक्षा मिरा आणि गायत्री जास्त कन्टेन्ट देतील पुढील दोन आठवडे!! आणि दोन एव्हिक्शन होणार असतील तर दुसरी सोनाली पाटील!! कारण ती विशाल निकमच्या धक्क्यातून सावरलीच नाहीय, चुका होतायत, आणि आदिशने सांगुन देखील रिपीटेटिव्ह कन्टेन्ट!!

एकूण काय इंटरेस्टिंग टाइम अहेड!!

#BiggBossMarathi
प्रसाद देशपांडे

मस्त पोस्ट... परफेक्ट अ‍ॅनॅलिसिस केलय... मी काल अर्धंच पाहिलं...नॉमिनेशन पर्यंत ..पुढचं पाहाते आहा...
आदीश असता तर गेम खुप बदलला असता खरचं... हुशार आहे तो एकदम....
सोनाली टॉप ५/६ मधे नसणार हे नक्की आहे... आता मला वाटतं की उत्कर्ष पण नसणार टॉप ५ मधे... मीरा त्याच्यापेक्षा जास्त कंटेंट देते...
आणि जय ला सिंपथ/जास्त वोट मिळवुन देण्यासाठी उत्क्या ला काढतील...

चान्गल अ‍ॅनॅलिसिस ! स्पेशली उत्कर्श विशयी खरतर शिन्देशाही बाणा, वडिल एवढे पॉप्युलर, आख्या महाराश्ट्रात एकहि घर नसेल जिथे "जवा नविन पोपट हा "माहित नसेल, त्याच्या प्रसिद्धीचा चान्गला फायदा करुन घेता आला असता पण तो जयला मास्टर बनवुन त्याच्या माइन्डने गेम खेळत बसला त्यात त्याच अर्ध लक्ष दादुसला वाचवण्यात गुन्तल होत त्याच काय गौड्बन्गाल होत ते त्यालाच माहित.

जय ला सिंपथ/जास्त वोट मिळवुन देण्यासाठी उत्क्या ला काढतील...
<<<
टु लेट फॉर इट !
उत्क्या जाऊच शकतो पण जयला अगदी काहीही झाले तरी सिंपथी मिळणार नाहीये आता, भयंकर निगेटिव असाच शिक्का आहे आणि तो तसाच रहाणार!

मीराला काढणार नाहीत,अस मला अजूनही वाटत आहे.घरात आणि चावडीवर मँक्झिमम कंटेंट तिने दिला आहे.
सोनालीला तर नाहीच काढणार पण वीक कंटेस्टंट करत करत टॉप 6मध्ये नाही नेल म्हणजे मिळवल.
तुपारेला बहुधा पुढच्या आठवड्यात काढतील.
या आठवड्यात शिंदेंना काढतील.गेल्या सिझनला बाहेर जाण्याअआधी जशी वैशिली दोन आठवडे लॉस्ट होती,तसच उत्कर्षच दिसत आहे,एकदम गेममधला इंटरेस्ट निघून गेल्यासारखा वाटत आहे त्याचा.
आदिशचा मात्र दोन दिवस घरातला वावर बघून हा राहिला असता तर जयलाच काय,वि2ला पण छान टशन देऊन कदाचित अख्खी टीम बी पण लीड केली असती.नक्की पोचला असता टॉप 6मध्ये,छान फँन बेस तयार केला असता.पण बिबॉसला वि2 पैकीच कोणालातरी विनर करायच असाव, म्हणूनच काढला त्याला.
सोमिवर तर प्रचंड कौतुक होत आहे आदिशच.

सोनाली नाही जात. जय, गा दा, उत्क्या, मीरा मिळून तिला एकटीला वोटस आहेत.

उत्क्या किंवा मीरा जाईल यावेळी. गा दा गेली तर मला पर्सनली आवडेल, मी तिला आवडून घ्यायचा प्रयत्न केला, नाही जमलं, हाहाहा.

यावेळी शकुनी मामा जाईल, पार गार पडलाय उत्क्या.

सोनाने खूप कटेंट दिलाना, विषय पेटवत ठेवला असावा तिने त्यामुळे तिला असंही काढणार नाहीत.

गा दा किंवा ती असेल फायनलला. व्हिलन टीममधले दोघेच असतील.

आदिशसाठी कालचा भाग बघावासा वाटतोय.

Forwarded :
आजचा हिरो निर्विवाद आदिश होता!! >> मस्त पोष्ट. उत्कर्ष बाबत तर अगदीच योग्य अ‍ॅनालीसिस. तस पाहिलं तर उत्कर्ष सारखे फुल-पॅकेज सदस्य बिगबॉस (आजी/माजी) मधे खुप कमी असतील. अगदीच जय इतका तगडा नसला तरी ताकतीच्या बाबतीत घरात तो तीन नंबरला आहे. मनोरंजनाच्या बाबतीत तर त्याच्या जवळपास कुणी फिरकतही नाही. "स्टॅटर्जी" व माइंड-गेम मधे तो उत्तम आहेच. खुप कमीवेळा त्याने घरात आरडा-ओरडा केला असेल. एव्हड्या सगळ्या पॉसिटीव गोष्टी असतांना फक्त चुकीच्या संगतीचा परिणाम दुसर काय.
बर हे त्याला कळत नसेल का? मला तर आता वाटतय की त्याला कळून चुकलय की तो काही आता विनर नाही होनार, तर कशाला उगिच जय सोबत संबंध खराब करायचे. टॉप ५ मधे गेल तरी त्याला खुप झाल वाटेल आणी त्याने ते गृहित धरले आहे.

टॉप ५ मधे जर टिम ए चे दोनच (जय व मीरा) सदस्य राहिले तर जय ला वोटींग चा फायदा होईल, टिम ए चे एक गट्ठा मते त्यालाच मिळतील.

International face, global face....स्नेहा वाघ?
अगं बाई तुला मराठीत नावाने कोणी ओळखायचं नाही, हिंदीत तर नाहीच नाही. काय ते २-४ सिरियल केले असतील काकूबाई रोल.
मेकअप,हेअरडू करून हिरोईन समजत होती, दुसरया दिवशी आहेच परत तेच भूतासारखे केस.

टॉप ५ मधे जर टिम ए चे दोनच (जय व मीरा) सदस्य राहिले तर जय ला वोटींग चा फायदा होईल, टिम ए चे एक गट्ठा मते त्यालाच मिळतील.
<<<<
हाहाहा , नाही , गठ्ठा कसला..सगळ्यांना मिळून मूठभरही फॅन्स नाहीयेत , चॅनलने न्यायचे ठरवले तरच जाईल तो टॉप २ मधे, नाहीतर त्याचा नंबर चौथा !

विशालने परत माती खाल्ली! आपल्याच टीम मेम्बरच्या चुगल्या सांगितल्या!
इथं जयला मानावे लागेल, मीरा बद्दल फनी गोष्टी सांगितल्या, उगाच एकमेकांच्या मागे कोण काय बोललं हे उघड केलं नाही!

विशाल थोडा बिनधास्त झाला असणार, म्हणून तो असं वागतोय आर्या. त्याची बहीण त्याला सांगत होती आणि तृप्तीताईंनी पण सांगितलं त्यावरून त्याला अंदाज आला असणार आपणच जिंकणार.

From facebook—1) आज सोनाली गेली तेव्हा तो बोलण्यासाठी आणि गोष्टी clear करण्यासाठी आजिबात positive न्हवता. BB संपल्यावर सोनालीच्या आईची माफी मागणार आहे म्हणाला ..का? कशासाठी? सोनाली चा character वर बोललास national tV वर तर तिची माफी मग सरळ सरळ .. पण धाडस नाही म्हणून तिच्या आईचं नाव घेऊन लोकांना emotional करण्याचा प्रयत्न .. २) ओझ्याच्या टास्क मध्ये पुन्हा स्वतः कित्ती कित्ती emotional आहोत हे दाखवण्यासाठी पुन्हा सोनाची माफी मागण्याचा नाटक ३) आज ती स्वतः गोष्टी clear karayla आली तर नको नको म्हणून backfoot var jana .. मी B team समर्थक आहे .. सुरवातीला वाटलेला विशाल winner होण्यास पात्र आहे ..पण सोनालीच्या बाबतीत खूप च बुचकळ्यात टाकणारे वागणे आहे त्याचे ...४)आज न्यूज देताना म्हणाला ..विकास म्हणतोय मीनल चा पत्ता कट करु .. विकास ने clarification मागितल्यावर खोटा बोलत आहे हे सरळ दिसला विशाल च्या चेहऱ्यावर ... 5) न्यूज देताना परत सोणाची माफी मागण्याचा नाटक आणि समोर समोर बसून clear करायला आली की नको नको म्हणून backfoot var जातोय ...म्हणजे मी कसा खरा आहे हे एकतर्फी पटवून देण्याचा प्रयत्न ..पण ती आली समोर बोलायला की भाऊ लगेच माग सरकतो .. strange behaviour .. म्हणून कुठेतरी पाणी मुरते अशी शंका येते ..

ओहह अस होतंय का.

मलाही विशाल आवडायचा खूप पण समहाऊ तो चावडीवर बोलून माफी मागत नाहीये, हे मला अजिबात आवडलं नाही. कोण खरं कोण खोटं हा भाग वेगळा पण एखाद्या मुलीच्या chara बद्दल चारचौघांत सांगणे वाईट नाही का. स्वत: सोना सोना करत फिरत होताच की, सारखा रडत बसतो पण मला वाटतं त्याला माहितेय आपण जिंकतोय. सोनाली पण म मां समोर जे बोलायला हवं ते बोलत नाही, (ह्या गोष्टीवरुन तिने दणाणून सोडायला हवं होतं) आणि नंतर विषय चघळत बसते.

बाय द वे विशाल आणि तिचं फार पटत नसतानाही तिला votes मिळतायेत. विकास, मीनल आणि तिचे स्वत:चे fans मिळून देत असतील votes तिला. विशाल fans देत नसले तरी फरक पडत नाहीये.

जय राडे मास्टर आहे. तो आपल्या फ्रेंडसाठी योग्य पण फेअर गेम नाही त्याचा. त्याला खूपदा समज दिली म मां नी पण तसंच करतो. एक आठवडा चांगला वागला. माज फार आहे. जरा positive वागला असता आणि स्नेहा प्रकरण केलं नसतं तर तीनात आला असता, दुसराच येईल मी गृहीत धरलेलं , आता शंका वाटते.

हुकुमशहा टास्क बोरिन्ग झाला. अगदीच माईल्ड टास्क दिले. मला वाटल, स्नेहा जयला कडक टास्कस देईल पण कसल काय. आदिश मात्र जयला चान्गलाच राबवत होता.

नन्दकिशोर चौगुलेचा टास्क उलट हॅपनिन्ग होता.

आज पुन्हा स्नेहा- जयच इशारो इशारो में चालू होत. हिचा एकपात्री प्रयोग फुकट गेला म्हणायचा.

दुसर्या दिवशीचा हुकूमशहा टास्क फनी झाला विकास, आणि सोनालीमुळे.

गायत्री जय शी सुद्दा बोलते आणि दुसरीकडे टिम बी बरोबर सुद्दा बसते.

सोनाली : मी शब्दलेस झाले. अत्यानन्दाने मन भरुन आले. हा हा हा

ब्रेकिन्ग न्यूज टास्कमध्ये मीनलने मस्त सरप्राईज दिल.

विशाल सोनालीची माफी मागत नाहीये कारण तो जे बोलला ते खरेच आहे असेच तो म्हणत आहे सारखे. (अन इतर बर्‍याच गोष्टी पहाता ते असूही शकेल) फक्त ते बोलून दाखवायला हवे होते का, तर नाही! काही गरज नव्हती. पण सोनाली बर्‍याच वेळा खोटे बोलते किंवा शब्द फिरवते, छे मी असे म्हटलेच नव्हते असे किती वेळा दिसते. मीनलबद्दलसुद्धा विकास खरोखर म्हटला होता तसं, एकदा नाही तर दोन तीन वेळा. सो तेही खोटे नाहीच, पण अगेन ते बोलायलाच हवे होते का, तर मेबी नॉट!
एकूण विशाल ला मी पूर्ण दोष नाही देणार पण तो एक बॅड टीम प्लेयर आहे हे खरेच आहे. त्याच्यसारखा मित्र, नवरा, बॉफ्रे असणे म्हणजे डोक्याला शॉट असेल Happy

पण तो एक बॅड टीम प्लेयर आहे हे खरेच आहे. त्याच्यसारखा मित्र, नवरा, बॉफ्रे असणे म्हणजे डोक्याला शॉट असेल>>अगदी अगदी!
एकाचवेळी भयकर हळवा, चिडका,आत्मकेन्द्रित अस वेगळच रसायन आहे...

नेलपॉलिश लावताना याच्या भावना कशा चाळवल्या गेल्या - >>
त्याच्या नाही तिच्या. एरवी सतत तुझ्या गळा माझ्या गळा असतं तेव्हा चालतं.

विशाल तत्वांच्या नावाखाली कायतरी वेगळंच extreme करायला जातो.
Btw , तिथे love angle दाखवण्याचा प्रयत्न केलाच आहे की. बरेच जण करतात तसं.
सोनाली देखील त्यासाठी उत्सुक होती.
तसं दिसतही होतं. एकदा तर विशालने बाहेर गेल्यावर काय हा प्रश्न विचारला होता तिला. एपिसोड मध्ये दाखवलेले बहुतेक.

पहिल्या सिजन मधील रेशम टिपणीस आणि हर्षदा खानविलकर ह्यांचा एक जबरदस्त talk झालेला.
रेशम आणि राजेश प्रकरणावरून. त्या maturity ने गोष्टी सोनालीला handle करता येणे हे तिच्या syllabus च्या बाहेर आहे. म्हणूनच ती विनर नाही वाटत.

सध्या मीनल आणि विकास हे दोघे माझ्या दृष्टीने टॉप 2.

जय त्याच्या anger issues आणि unfair खेळताना उघडे पडणे ह्यामुळे विनर बनेल ह्याची शंका आहे.
Otherwise तोच विनर होता.

उत्कर्ष हे खूप भारी package आहे. पण सावलीत राहिला तो. अन्यथा तो आणि चॅनेल ह्या दृष्टीने तोच विनर ही विन विन situation झाली असती. पण कुठेतरी 2 ते 3आठवडे मागेच त्याने strategy करून लीड घ्यायला हवा होता. रागावर कंट्रोल, शक्ती, युक्ती, टास्क ह्यात मागे नाहीच तो. चपळदेखील आहे. पण...

विकासने मीरा आणि उत्कर्ष angle शंका व्यक्त केलेली ते आपल्याला खरे नाही असे दिसत असले तरी आतमध्ये त्यांना सगळं थोडीच दिसतं. जे दिसतंय ते बघून त्याने अंदाज लावला. पण इथे त्यांचं विश्लेषण संपूर्ण चुकलं.
ही गोष्ट कशी प्रोजेक्ट झाली हे तृप्ती ताईने आत आल्यावर मीराला सांगितल्याने ती upset झाली. ती त्याचा फायदा करून घेईल का हे पुढे कळेल.

स्नेहा एकदम attitude दाखवत होती बॉ.
जयला तर पार हलवला तिने.

तृप्ती अजूनही टीम A कडे ओढा आहे.
आदिशने सुमडीत नॉमिनेशन टास्क मध्ये गेम केला.
जयला nominate केलं.

Btw, एक युट्यूब live केलेलं तृप्ती, अक्षय आणि सुरेखा ह्यांनी. सोनाली मेकअप करत बसते वै बोलत होते.
पब्लिकने जाम धुतलं त्यांना.

Pages