Submitted by सूलू_८२ on 20 November, 2021 - 17:33

फायनलला थोडेच आठवडे उरले आहेत. स्पर्धा चुरशीची चालू आहे.
सो, हा आहे दुसरा धागा.
चला, चर्चा करुया!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Copy :
Copy :
#uf_बिगबॉसराजा
आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात बिगबॉससारखे प्रसंग कमीजास्त तीव्रतेने घडत असतात. मी बिगबॉस मुख्यत: psychological analysis करण्यासाठी बघते. मनुष्य स्वभावाचे, मनाचे कितीतरी कंगोरे दिसतात.
तर सद्यस्थितीत मला विकास आणि मीनल top two मधे बघायला आवडतील. आदिश सुद्धा चतुर आहे, पहिल्यापासून आला असता तर नक्की top three मधे असता.
विकास vs उत्कर्ष:
1. दोघेही मास्टरमाईंड तसेच माचिस म्हणून प्रसिद्ध आहेत, त्यामुळेच काहींना नापसंत देखील आहेत. गेमाड असणे ही ह्या गेमची गरज आहे, मी स्वत: मागून गेम्स करणे detest करते पण बिगबॉस मधे ही अनेकांची strategy असते, रादर समोरच्यावर डोळे झाकून विश्वास टाकता येणारा साथीदार इथे मिळाला नाही तर टिकून राहण्यासाठी हे करण्याशिवाय त्यांना पर्याय राहत नाही. जय खरंतर उत्कर्षसाठी अतिशय विश्वासू मित्र आहे ज्याची प्रथम priority उत्कर्ष आहे हे तो खुलेआम सांगते पण तरीदेखील उगीच काड्या टाकणे हा उत्कर्षचा स्वभाव वाटतो. विकास हा मीनल, विशाल वा सोनालीची प्रथम priority नाही, त्यामुळे तो सतत तिघांशी one to one बोलून अंदाज घेत असतो. बोलण्यात उत्कर्षपेक्षा विकास निर्विवाद चाणाक्ष, मिश्कील आणि मुद्देसुद आहे.
2. विकास हा कधीच परफेक्ट आहे असे pretend करायला जात नाही. मागून काही बोलला हे confront केले तर तो कबूल करतो. खेळात हरला तर frustration लपवत नाही. समोरच्यावर अविश्वास वाटला तरी स्पष्ट सांगतो. चिडतो, रुसतो पण परत विसरून ग्रुपला धरून पुढे जातो. उत्कर्ष सहसा मनाचा थांग लागू देत नाही, स्वत:च्या टीमबरोबर too much politically correct वागायला जाऊन दुसऱ्यांबरोबर unfair होतो आणि तोंडावर पडतो. स्वत:चा strong stand घेत नाही.
3. विकास आपल्या लोकांचे पटले नाही तर त्यांच्याविरुद्धही उभा राहतो पण विशालसारखे मीच फेअर आहे असा आव आणून आपल्याच लोकांवर विनाकारण खेकसत बसत नाही आणि दुसऱ्या टीमसमोर त्यांना मुद्दाम तोंडघशीदेखील पाडत नाही. टीमच्या strengths चा योग्य वापर करतो. त्यांना पूर्ण support करतो. स्वत:चे मुद्दे strategies टीमबरोबर विश्वासाने शेअर करतो. जय चुकला तरी उत्कर्ष त्याला कधीच करेक्ट करत नाही in fact त्याला अजून पेटवतो. मीराच्या हो लो हो करतो परत जय च्या हो लो हो करतो, त्याचा stand दिसतच नाही.
4. मांजरेकरांसमोर विकासने स्त्रीदाक्षिण्य दाखवत स्पष्टपणे एकटी सोनाली चुकीची नाही हे सांगितले त्याचबरोबर विशालशी बोलून विषय क्लिअर करू हे तिला insist केले. उत्कर्षने कधीच मीरा जय गायत्री स्नेहा ह्यांना तोंडावर चुका दाखवल्या नाहीत नेहमी आपली इमेज चांगली राहील ना हेच बघत राहीला.
5. विकासचा sense of humor amazing आहे. He is the one liner king. उत्कर्षच्या काही काव्यरचना सोडली तर मलातरी तो फार creative, witty दिसला नाही, still Vikas showed his big heart and complimented him for his sense of humor.
6. टास्क खेळताना विकास जीव ओतून खेळतो पण physical न होता टास्क रद्द होऊ नये हा प्रयत्न करत डोक्याने खेळतो. तिथे उत्कर्ष तितकी मेहनत घेताना दिसत नाही. विकासचा स्वत: जिंकण्यावर फोकस आहे, उत्कर्ष तर जयला जिंकवायला आला आहे असे वाटते.
7. Negotiate करायला विकासला कुठेही कमीपणा वाटत नाही आणि तो हे लपून करत नाही तर टीमला पूर्ण updates देऊन करतो.
8. घरातील कामातही फार कटकट करत नाही.
9. बिगबॉस हाऊसमधे कॅरॅक्टरवर बोट उठेल असे त्याचे चुकूनही वागणे नाही.
10. दिलखुलास हसतो, fun-loving आहे. Emotions आणि stability ह्याचा balance त्याला उत्तम जमतो.
मीनल vs सोनाली:
मीनल आणि विकास दोघेही स्वत:च्या वैयक्तिक आयुष्यातील संघर्षाचे भांडवल करत नाहीत. She is a feisty player. जीव तोडून टास्क्स् खेळते. स्वत:च्या टीमला पूर्णत: सपोर्ट करते. Physically strong आणि mentally stable आहे. उत्तम dancer आहे. कोणाच्या आधारावर ती अवलंबून नाही सर्वच जण तिला strong player मानतात आणि घाबरतात. सगळ्यांच्या घरातल्यांची पण ती लाडकी आहे. आपल्याच मित्रमंडळींच्या विरूद्ध खेळायची वेळ आली तर त्यात १००% देऊन लगेच टास्क झाल्या झाल्या त्यांना मिठी मारून काही गिलेशिकवे झाले असतील तर मिटवते. मनाने अतिशय स्वच्छ, मैत्रीमधे प्रामाणिक, कोणालाही भिडायला तयार असणारी strong woman आहे ती. मित्रांना मनापासून प्रोत्साहन देते, maturity ने समजावते. विशालची बाजू देखील तिने ऐकून घेतली, सोनालीवर बहिणीसारखे प्रेम आहे, विकासच्या बुद्धीचा आदर आहे. ती फारशी judgmental नाहीये. आदिश, निथा, गायत्रीलाही सहज सामावून घेतले तिने. कैदेत असताना आजीच्या आठवणीने मीरा रडत होती तेव्हा तिलाही पटकन आधार दिला. Typical बायकी विषयात ती gossip करत नाही. तिच्या वागण्यासाठी, तिने कोणाशी बोलावे ह्यासाठी ती अजिबात answerable नाही. कर नाही त्याला डर कशाला. हुषार, independent, straightforward आहे ती म्हणूनच मनाला भावते देखील. मात्र ती खूप टास्क ओरीएंटेड आहे, थोडी pushy आहे स्वत:च्या ideas बद्दल. घरातील वावर, कामे, मिश्कीलपणा ह्यात कमी पडते ती. पण overall एक interesting package, a wonderful human being आणि जिंकायच्या रेसमधे नक्कीच आघाडीवर आहे.
सोनालीचा मेन प्रॉब्लेम तिचा inferiority complex आहे. मांजरेकर म्हणाले होते तिला कोल्हापूरची आहेस तर बिचारी कशाला माज कर मग काही episodes टेचात खेळले देखील तिने. पण तिला रडायला खांदा लागतो सारखा, विशालने तिला बरंच खचवलं, मीनल विकासच्या बुद्धीला ती साथ देऊ शकत नाही म्हणून एकटी पडली. तिला पहिल्यापासूनच A team चे attraction (specially जयचे) आहे आणि त्यांनी भाव दिला नाही की तिचा inferiority complex अजून वाढतो. आता त्यांच्या स्वार्थापुरता तिचा कोणीही brainwash करायला लागले की ती लगेच वाहवत जाते. किचनमधे अन्नपूर्णा आहे पण खूप कटकट करते. मनात आलं तर टास्क उत्तम खेळते पण emotionally weak आहे. बेभरवशाची आहे. तिला स्वत:लाही माहिती आहे की ती winner material नाही.
MU बद्दल इकडेही बोलणं झालं
MU बद्दल इकडेही बोलणं झालं होतं आणि सोमिवरही इतरत्र चर्चा झाली होती. तेही २-३ मिनिटांच्या सीन वरून. कदाचित, अजूनही काही प्रसंग असतील आणि त्यावरून विकास बोलला असेल. पण तो वाईट ठरला.
विशाल- सोनाली प्रकरणात विशाल पूर्ण निर्दोष नाही पण त्याने सगळा ब्लेम तिच्या वर ढकलला.
सोमिवर तिला 'वहिनी' म्हणत होते विशाल फॅन्स ते काही तरी जाणवल्यामुळेच ना? थोडी तो आग लगी होगी?
तो मला खूप अनस्टेबल वाटतो. इमोशनल आणि फेअर असे रंग दाखवायच्या नादात तो अजूनच खाली उतरत आहे. आणि आता त्याच्या 'मी असा, मी तसा' च्या टेपचा कंटाळा आला आहे.
मांजरेकर एका टास्कमुळे जय
मांजरेकर एका टास्कमुळे जय उत्कर्षची जोडी जमवून गाणं म्हणत होते. आणि विकासला झापताना त्याचा दाखलाही देत होते.
जय स्नेहाबद्दल बोलले नसतील असा आठवडा गेला नसेल.
हुकुमशाह नन्दकिशोरच्या
हुकुमशाह नन्दकिशोरच्या लेव्हलचा नाही झाला, एकट्या तृप्ती देसाईंना जमला होता अॅटिट्युड , लिलिपुट जनता सगळं ऐकत होती, मेघासई सारखे किडे करत नव्हती !

न्युज फक्तं मीनलच्या आवडल्या
ऊत्क्याची गाणी चालु असताना आज आणि कालही मीनल-सोनालीचा डान्स पाहून फार हसु आलं
सोनाली किती दिवस तोच विषय चालु ठेवणार ? कन्फ्रन्ट करायला २ आठवडे ??
सोनाली खरं तर जबरदस्तं एन्टरटेनर आहे, टास्क मधे खेळायला भरपूर दम आहे तरी का गेम स्पॉइल करते काय माहित !
विशाल - विकास , विशाल- सोनाली कोल्ड वॉर शेवटपर्यंत चालुच रहाणार , इनोशनली डिफिकल्ट आहे विशाल , असा माणुस नवरा-बॉफ्रे नसावा हे खरच पण बिबॉ मधे दाखवायला असंख्य शेड्स आहेत त्याच्याकडे, टास्क मधे आहेच बाप.. माझ्या मते तोच आहे बिबॉ साठी विनर मटेरिअल !
Btw, एका आठवड्यात सोनाली
Btw, एका आठवड्यात सोनाली nominate होती.
A टीम तिला content नाही द्यायचं म्हणून तिने उकरून काढण्याचा प्रयत्न केला तरी भाव देत नव्हती.
त्या आठवड्यात विकास तिला एकदम उचकवत होता.
नंतर मीनालने हे जास्त होतंय सांगितल्यावर सोनालीकडे गेला होता. तिला म्हणाला देखील तूच सांगितलेलं की भांडण काढ माझ्यासोबत असं. ते कन्टेन्ट क्रियेट करण्याचा प्रयत्न करतात अशा प्रकारे. न बोलता बोलतात हे लोकं. त्यातून अंदाज घेऊन वागतात. हे काय कॅमेरा मध्ये पकडणं सोप्प नाहीये.
विकासला मिश्किल जे वर लिहिलंय प्रतिसाद मध्ये ते पटलेच.
त्याच्या टीम मध्ये तो कोणालाही सॉरी म्हणताना त्याला हसवून सॉरी म्हणतो.
Extra मसाला मध्ये त्याचे असे खूप videos आहेत.
मीनल खूप भारी हसते. दणाणून सोडते घर.
छान विश्लेषण, प्रत्येकाचे.
छान विश्लेषण, प्रत्येकाचे.
मीनलने काल सुखदायक धक्का दिला. सर्वात भारी तिच्या न्युज होत्या. मीराबाई काय काय बोलली तिचे तिलाच माहित.

सोनाली विकासची कॉपी करुन... त्याच्यासारखे हातवारे करुन एखाद्याला समजावण्याचा आव आणते तेव्हा अजुनच फनी दिसते.
मीराच्या अंगात काहीतरी शिरलय
मीराच्या अंगात काहीतरी शिरलय असे वाटत होते. गायत्री पण प्लेझंट. मीनलचे कौतुक करुन कंटाळा आला आता. बाई चुक काढायला काही वावच देत नाहिये. वाईट याचे वाटते तीला रिजनल सपोर्ट नाहीये.
>>विकासला मिश्किल जे वर लिहिलंय प्रतिसाद मध्ये ते पटलेच.
त्याच्या टीम मध्ये तो कोणालाही सॉरी म्हणताना त्याला हसवून सॉरी म्हणतो.
Extra मसाला मध्ये त्याचे असे खूप videos आहेत.
मीनल खूप भारी हसते. दणाणून सोडते घर.>अगदीच सहमत.
विशाल दिवसेंदिवस यक्स वाटतोय. इतका की जय उत्क्या बरे वाटतील थोड्या दिवसांनी त्याच्यासमोर.
विशाल जिंकला तर रिजनल सपोर्टमुळेच जिंकणार, डिझर्विंग कँडीडेट म्हणुन नाही.
विशाल जिंकला तर रिजनल
विशाल जिंकला तर रिजनल सपोर्टमुळेच जिंकणार, डिझर्विंग कँडीडेट म्हणुन नाही>>> खरय!
वरच उत्क्या,विकास्,मिनल सोनालीच विश्नेषण अगदी अॅक्युरेट आहे.
फायनली बी टिमचा कॅप्टन शेवटी का होइना झाला आहे अशी बातमी युट्युबवर होती.... मिनल झालीये कॅप्टन, जाम खुश आहे मी!!!
मिनल जिन्कली तर मी पार्टी करणार!!!
काल विशाल जे किही विकासबद्दल
काल विशाल जे किही विकासबद्दल बोलला की त्याने मिनलचा पत्ता कट करायचा अस सांगितले होते,हे खर आहे का?
मला तर आठवत नाही अस विकास काही बोलल्याच.कारण बोलला असता तर मिनलला चुगली आली असती,की चुगली आली असेल पण सांगितली नसेल बिबॉसने.
पण एवढ होऊनही मिनलने तो विषय वाढवला नाही.उलट आत जाऊन डिस्कस करा,सगळ्यांसमोर नको असही सांगितल.
असा स्पर्धक खरतर विनर व्हायला हवा.
पण बिबॉसला विशाललाच करायच असेल विनर तर प्रश्नच मिटला.
काल बातम्या देणार्यात मला
काल बातम्या देणार्यात मला मीनल आणि त्यातल्या त्यात गायत्री आवडली... बाकी सगळे बोअर..
मीरा तर...हे भगवान... ते टिव्ही सेट अप पण तोडुन टाकलं बाईने...
मीनल ने एकदम मस्त बातम्या दिल्या....
विशाल काहीही बोलत होता....दिवसेन्दिवस कमी कमी आवडायला लागलाय.... विकास वर आरोप केले की तो एकदम हालतो आणि लगेच स्पष्टीकरण मागायला जातो... मीनल बद्दल बोलला असेल तो कधी ना कधी पण ते टास्क शी रिलेटेड असु शकतं.. त्या वाक्याचा काय संदर्भ आहे तेच विचारत होता खरतर विकास पण विशाल ला नाही आले सांगता....
पण एवढ होऊनही मिनलने तो विषय वाढवला नाही.उलट आत जाऊन डिस्कस करा,सगळ्यांसमोर नको असही सांगितल.
असा स्पर्धक खरतर विनर व्हायला हवा. >> अगदी अगदी.... खुप आवडली ती तेव्हा मला परत एकदा... ती नॉमिनेशल ला जेव्हा जेव्हा येइल तेव्हा माझी ९९ मतं तिलाच
ती नॉमिनेशल ला जेव्हा जेव्हा
ती नॉमिनेशल ला जेव्हा जेव्हा येइल तेव्हा माझी ९९ मतं तिलाच >>> नको नको ती कशाला नॉमिनेशनला??? अर्थात आधि येवुन गेली आहे आणी
सुर क्षित बाहेर पण पडली आहे.
खरतर विशाल-जयच्या कॅप्टनच्या स्पर्धेत याना माहिती होत की जयकडेच मेजॉरिटी आहे त्यावेळेस मिनलने २ आठवडयाची कॅप्टनशिप द्यायचीच नाही जरा स्मार्टली खेळायला हव होत बी ग्रुपने.
कालच्या ब्रेकिन्ग न्युज मधे मिरा काहीही बडबडत होती, ती घरात मज्जा मस्ती करताना क्वचितच दिसते.
मिनल सुपर्ब, गायत्री पण ठीक, विकास-उत्कर्श कडे टेलेन्ट असुन फार काही केल नाही, राजा हरिश्चन्द्र नेहमीचेच इतराचे गेम खराब करणे
सगळ्यांच्या कमेंटस मस्त. न
सगळ्यांच्या कमेंटस मस्त. न बघता बरंच काही समजतं.
एक्सट्रॉ मसाला बघायला हवं.
विशाल बऱ्याच जणांना इथे आधी खूप आवडायचा, मलाही आणि विनर व्हावा असं वाटायचं पण आता तो विनर होऊ नये वाटतं, होणार असला तरीही. मीनल व्हावी. इमोशनल, इमोशनल दाखवत रडत बसतो सारखा. काही शॉटस बघितले त्यावरून लिहिलं.
पण बिबॉसला विशाललाच करायच
पण बिबॉसला विशाललाच करायच असेल विनर तर प्रश्नच मिटला)))... नाही तसे काही नाही आहे. फेसबुकवर त्याला प्रचंड सपोर्ट मिळतोय. अमुक तालीम, तमुक मित्र मंडळ, अलानी संघटना, फलाना संघ.सगळ्यानी डोक्यावर घेतले आहे त्याला.
जे लोक ऑबजेक्टीवली बघतात तेव्हडेच मिनलला सपोर्ट करणार. बाकी सब भावनाओ की बाढमे बेह जाएंगे.
त्याला वोटिंग प्रचंड होणार
त्याला वोटिंग प्रचंड होणार त्यामुळे तोच जिंकेल.
पब्लिम सपोर्ट आहे विशालला,
पब्लिक सपोर्ट आहे विशालला, खूप मोठ्या मार्जिनने !
इमोशनली प्रचंड डिफिकल्ट आहे विशाल , असा माणुस नवरा-बॉयफ्रेंड-मित्रं नसावा हे खरच पण बिबॉ मधे दाखवायला असंख्य शेड्स आहेत त्याच्याकडे, टास्क मधे तर आहेच खूप स्ट्राँग , पर्सनॅलिटी छान आहे.. माझ्या मते तोच आहे बिबॉ साठी विनर मटेरिअल आहे कारण हा बिगबॉस गेम आहे, आयडिअल सिटिझन गेम नाही !
Bad choices often make good stories, इथे असाच माणुस जिंकतो ज्याच्या ग्राफ मधे खूप इमोशनल चढउतार आहेत, ज्याच्यावर खूप प्रोमो बनतात, ज्याने सर्वात जास्तं कन्टेन्ट प्रोव्हाइड केलय, ज्याच्यामुळे अनेक स्टोरीज तयार झाल्या घरात , अनेकदा टास्क्स मधे अॅग्रेसिव्/इमोशनल ब्रेक डाउन झाला तरी जय सारखा हिंसक-निगेटिव नाही दिसत, शो चं सेंट्रल कॅरॅक्टर तोच दिसतो .
पण हे खरय कि त्याला उरलेले २ आठवडे जास्तं पॉझिटिव दिसायला हवा.
अर्थात मीनल जिंकली तर आनंदच होईल, सर्वात पॉझिटिव जर्नी आहे तिची , टास्क मधे जय-विशाल यांच्या इतकीच स्ट्राँग आहे पण कन्टेन्ट मधे बिगबॉसने तिला सेंट्रल कॅरॅक्टर म्हणून ट्रिट केले नाही.
छान पॉईंट्स मांडलेस.
छान पॉईंट्स मांडलेस.
मीनलकडे ह्याच्या त्याच्या मागे फिरणे, काही जुळवणे, उगाच भांडणे, रडारड करणे ह्यासाठी वेळ नव्हता किंवा तसे करणे तिला योग्य वाटत नसेल, ती गेमवर फोकस्ड होती त्यामुळे ती कंटेट वाईज कमी पडली असेल. किचनमध्ये काम पण करायला नको तिला (हा दुर्गुण आहे मात्र, निदान bb तरी) .
बी टीममधल्या सगळ्या लोकांना काही सांगायला मात्र तिची गरज लागायची. सर्वांनी आपलं रडगाणे, म्हणणे तिला जास्त सांगितलं असावं, हे मी काही शॉटस बघून लिहितेय.
विशालला शिवसारखाच सपोर्ट आहे. पण शिव एकदाच निगेटिव्ह वाटला, विशाल वाटतो बरेचदा.
एनिवे पण विशालच जिंकेल, votes वर.
Submitted by दीपांजली on 9
Submitted by दीपांजली on 9 December, 2021 - 13:22>>> चान्गल अॅनेलिसिस डिजे, विशाल आताशा फारसा आवडत नाही पण त्याच आणी सोनालीच मॅटर सोमीवर,बीबॉ फॅन मधे भरपुर चर्चिल गेल ज्याचा त्या दोघानाही फायदा झाला त्यातही सिपथी सोनालिला आणि जेन्युइन म्हणून विशालला भरपुर सपोर्ट मिळाला
.त्यात त्याने स्वतःला नेहमी क्लिन ठेवण्याचा प्रयत्न केला, सतत सौदर्याच नाव घेवुन मी कसा लॉयल आहे हेहि प्रोजेक्ट केल खरतर सोनालिसारखी जरा डोक्याने कमी आणी तेवढी शार्प नसलेली मुलगी होती म्हणून त्याची मिजास या प्रकरणात चालुन गेली नाहितर जरा शार्प कुणी असती तर याला उलटा पालटाच केला असता. सोनालिची चुक नाही हे मला म्हणायच नाहिये पण या प्रकरणात हा दाखवतो तितका भोळा सान्ब नाही आहे.
जयसारख्या अॅरोगन्ट स्पर्धकापेक्षा बरा आहे विनर झाला तर!
त्यात त्याने स्वतःला नेहमी
त्यात त्याने स्वतःला नेहमी क्लिन ठेवण्याचा प्रयत्न केला, सतत सौदर्याच नाव घेवुन मी कसा लॉयल आहे हेहि प्रोजेक्ट केल खरतर सोनालिसारखी जरा डोक्याने कमी आणी तेवढी शार्प नसलेली मुलगी होती म्हणून त्याची मिजास या प्रकरणात चालुन गेली नाहितर जरा शार्प कुणी असती तर याला उलटा पालटाच केला असता. सोनालिची चुक नाही हे मला म्हणायच नाहिये पण या प्रकरणात हा दाखवतो तितका भोळा सान्ब >>> परफेक्ट, सही एकदम. एखादी मुलगी असती तर नीट काय ते समजल्यावर पुढच्या विकेंडची चावडी गाजवली असती आणि विशालला माफी मागायला लागली असती.
हे ध्यान मागे मागे विषय चघळत ठेवतेय. एक घाव दोन तुकडे सर्वांसमोर करायची हिम्मत नाही.
जयचे वोटिंग वाढलंय. सोनाली
जयचे वोटिंग वाढलंय. सोनाली आणि त्याच्यात फार फरक नाहीये.
उतक्या तीन, गा दा चार, मीरा पाचवर आहे. As per Act riders .
act riders तसे फेअर रिव्ह्यु
act riders तसे फेअर रिव्ह्यु देतो पणं त्यानेही विशाललाच हाइप केलेय त्याच्यामते विशाल आणी जय टॉप २ आहेत.
हो तो विशालप्रेमी आहे हे
हो तो विशालप्रेमी आहे हे जाणवते. मी दोन तीन मिनिटांचे vlog बघते त्याचे, मोठे नाही बघत.
विशालने विकासबद्दल सांगायची काय गरज होती, विशाल स्वत:ला मोठं दाखवण्यासाठी दुसऱ्यांना कमीपणा देतोय.
सोना मोनाला गा दा फार आवडत नाही, obvious आहे म्हणा. एका व्हीडीओत आदिश विचारत होता, ही तुमच्याकडे आली का तर म्हणाल्या कोणी नाही तिला म्हणून आली. एका व्हीडीओत त्या गा दा ने गरज नसताना उगाचच मीराला हाड तुड केलं ( अगदी हाड तुड शब्द वापरला नाही, त्या टाइप म्हणाल्या काहीतरी ), त्याबद्दल मीराबद्दल वाईट वाटलं दोघींना.
दोन वि ना उत्कर्ष जय बद्दल वाईट वाटतंय, त्यांची अवस्था बघून, स्नेहा आल्यावर जय जास्त down झाला म्हणत होते . विकास जयचा माज असायचा तो दिसत नाही आता म्हणत होता.
जय जिंकेल...
जय जिंकेल...
नाही. तो positive वागला नाही
नाही. तो positive वागला नाही. आता वागायचा प्रयत्न करत असेल तर उशीर झालाय, स्नेहाबरोबर पण फालतूगिरी करत राहिला. उत्कर्ष त्याला सांगत होता, टास्क व्यतिरिक्त मी तुला किती सांगायचो शांत रहा. बाकी काही म्हणा पण उतक्या जीवास जीव देणारा मित्र आहे.
छोट्या छोट्या क्लिपस बघायला मजा येते. जय सोना छान गप्पा मारत असतात. मीनल सोनाच्या छान गप्पा रंगतात. विकास विशालच्या पण छान आहेत काही.
आदिशने विकासची मिमीक्री फार भारी केली. त्याला पुढच्यावर्षी घ्या पहिल्यापासून. हिंदीत तेच तेच असतात की.
स्नेहाच काहीही बोलण चालू आहे.
स्नेहाच काहीही बोलण चालू आहे. जय कधी तिच्या कॅरेक्टरबद्दल बोलला? काहीही
जयने ' आता तिच्याकडे बघणारही नाही' असा डिसीजन घेतला. गुड!
विशाल मला काही दिवसापासून सायको वाटतोय. कधीही कुठेही रडतो.
उत्कर्ष सगळयाच गाण्यान्ना एकच चाल लावतो.
जय ' अस्वच्छ स्पर्धक' आहे म्हणे.
स्नेहा: सारन्गे बिगबॉस. सोनाली: खेकडा बिगबॉस
आजचा हुकूमशहा टास्क छान झाला. सोनाली, मिनल छान खेळल्या. गायत्री आणि मीराने सुद्दा सरप्राईज केल चान्गल खेळून. गायत्रीच्या कोलाण्ट्या उडया परफेक्ट होत्या.
विकासने कधी मागे येऊन राजचिन्ह बळकावल ते कळलच नाही.
उत्कर्ष सगळयाच गाण्यान्ना एकच
उत्कर्ष सगळयाच गाण्यान्ना एकच चाल लावतो.>>> हो हो~शेतकर्याच गाण छान जुळवल पटकन, अॅन्करिन्गही जमुन आल होत पण चाल एकच.
जयला अजिबात डान्स येत नाहि नुसत्या उड्या मारतो किवा स्टन्ट करतो.
सोनाली पेक्षा मिनल अगदी बिटस वर डान्स करते पन सोनालीचे एक्स्प्रेशन छान असतात, विकास-विशालच आतुन खुप भारी डान्स करायचा असतो पण ठराविक अॅक्शनच्या पुढे काहि येत नाही असच होत
विकास किती स्पॉटॅनियस आहे त्याला खोटारडा म्हणून अॅवार्ड मीळाल्यावर त्याने जे 'अबब केल ते बघुन हसुच येत होत, मिराने पण हुशारिने आदिशचे कपडे पायदळी तुडवले.
स्नेहा आधिपेक्षा जास्त ईरिटेटिन्ग होतेय, म्हणे मी आधिच माज करायला हवा होता, कशाचा माज ग बाई??? गादा म्हटली ना तीला कि तुला कळत होत पण तु दुर्लक्ष केलस त्यावर म्हणते मला माहितिच नव्हत, कळलच नाही, रियली??? जय पण तिच्याशी फारच ऑपोलोजाटिक बिहेव्ह करतोय.
जय च्या जिवावर सारंगे बाई
जय च्या जिवावर सारंगे बाई इतके दिवस टिकली.. अविष्कार आधीच जायची लायकी होती तिची...
जयने ' आता तिच्याकडे बघणारही
जयने ' आता तिच्याकडे बघणारही नाही' असा डिसीजन घेतला. गुड!>>> कारण आता गोड बोलून काही होणार नाही. आठवडा संपत आला, ती बाहेर जायची वेळ आली.
मिनल-सोनालीचा डान्स भारी होता
मिनल-सोनालीचा डान्स भारी होता. सोनालीचे एक्स्प्रेशन्स एकदम मस्त असतात. मीरा-गायत्री सो सो! पण गायत्रीच्या उड्या सरप्राईजिंग..
जय काय भयाण नाचतो... याक!
<<विकास किती स्पॉटॅनियस आहे त्याला खोटारडा म्हणून अॅवार्ड मीळाल्यावर त्याने जे 'अबब केल ते बघुन हसुच येत होत,<< येस, मजा आली ते बघतांना!
आदिशने आज मीराने पाय धुताना
आदिशने आज मीराने पाय धुताना जुना लायकी वाला टॉपिक काढला तो फार भारी वाटला.. सो सॅटिस्फायिंग. टु वॉच

आज सोनाली कित्ती सुंदर दिसत होती, काय कातिल अदा आहेत तिच्याकडे !
जय-उत्क्याचा नागिन डान्स पण खूप भारी, जय भाव खाऊन गेला
मीनल सोनाली डान्स मस्त....
मीनल सोनाली डान्स मस्त.... सोनाली फार फार गोड आहे दिसायला... तिचे फीचर्स मला खुप आवडतात...
विशाल ने उगीच माती खाल्ली ..सोनाली सोबत मस्त करायचा ना प्रेमप्रकरण... छान वाटली असती त्यांची जोडी बघायला....
विशाल च झोकुन देउन खेळणं जसं आवडतं तसच हळुवार रोमांन्स पण आवडला असता पब्लिक ला... तसही हे २-३ महिन्या पुरतच असतं.. गेल्या सिझन चे शिव-वीणा आता कुठे आहेत एकत्र... उगी राजा हरिश्चंद्राचं बेरिन्ग पकडुन बसला...
जय-उत्क्या चा पण आवडला डान्स... एंटरटेनिंग होतं जे काहि केलं ते....
खोटारडा कोण असं उत्क्या ने विचारल्यावर... " उत्कर्श" असं पटकन बोलली सोना तेव्हा हसु आलं सगळ्यांनाच
Pages