मराठी बिग बॉस पर्व तिसरे- २

Submitted by सूलू_८२ on 20 November, 2021 - 17:33

फायनलला थोडेच आठवडे उरले आहेत. स्पर्धा चुरशीची चालू आहे.

सो, हा आहे दुसरा धागा.

चला, चर्चा करुया!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जय खुप सोबर वाटायला लागलाय गेले एकदोन आठवडे!!
जय किमान त्याच्या मित्रांशी लॉयल आहे
<<<
बिबॉ क्रिएटिव्हज चा हाच हेतु असेल तर साध्य झाला Wink
नेहमी व्हिलन गृप असतातच मित्रांशी लॉयल, भरपूर मित्रं सांभाळून ठेवणारे , अजिबात जिंकणाचं स्पिरीट नसलं , एखादा लिडर बाकी सगळे फॉलोअर्स असलेले लोक रहतातच घट्ट मित्रं, त्यांना पर्याय नसतो Happy
हिरोज जिंकायच्या जिद्दीत असलेले १-२ मित्रं सुद्धा गमावतात / एकटे पडतात .

सारंगे ममा ना बरोबर divert करत होती.
>> येस .. स्किल्स आहेत तिच्याकडे...>>> सगळ्या स्पर्धकामधे सगळ्यात बेक्कार कोणि असेल तर सरन्गे मॅडम होत्या, गेम शुन्य आणी बाकी प्रकारच चालु होते, हिने बाहेर जाउन स्वतः काय वागली आणि काय दिसत होती हे बघितल असेलच ना?

विशालच फॅन फोलॉइन्ग प्रचन्ड आहे, लास्ट कॅप्टनसी टास्क मधे त्याने जयला खेचुन नेवुन गोळा फोडला याचे किमान १० -१२ व्हिडियो विथ बॅकग्राउन्ड इफेक्ट,फक्त एका फेसबुक ग्रुपवर बघितले.
त्याचे हेटर्सही आहेत भरपुर.त्याचि रडारड्,चिडका स्वभाव्,कुठलही क्रिटिसिझम स्पोर्टिन्गली न घेणे यासाठी त्याला भरपुर बॅश करतय पब्लिक.

सगळ्या स्पर्धकामधे सगळ्यात बेक्कार कोणि असेल तर सरन्गे मॅडम होत्या, गेम शुन्य आणी बाकी प्रकारच चालु होते, हिने बाहेर जाउन स्वतः काय वागली आणि काय दिसत होती हे बघितल असेलच ना?
<<
+११११११
अ‍ॅब्सोल्युट्ली वर्थलेस, झीरो स्किल्स = सारंगी

कलर्सवाल्यांना मीनलला जिंकू द्यायचं नसेल तर किमान त्यांच्या विकासला तरी जिंकून आणावे अस वाटायला लागलं आहे. एनिवे मी विशाल हेटर नाही पण आधी तो केवढा आवडायला लागलेला, तो आता उतरत चालला मनातून एकेक वागण्याने.

मेघा त्याला संत म्हणते. फेअर खेळतो म्हणून. त्याच्या फेअर खेळण्याला माझा सपोर्ट पण एरवी तो फार विचित्र वागतो. रडूबाई वाटतो, कोणीतरी अलका कुबल उपमा दिलीय ती बरोबर वाटते, हाहाहा. मेन तो चावडीवर सोनाला बोलला आणि माफी मागितली नाही की चुकीच्या जागी सर्वांसमोर बोलायला नको होतं, तेव्हापासून उतरत गेला मनातून. बाहेर भरपूर सपोर्टर्स आहेत याचा अर्थ आपण कसंही वागावे अस नाहीना. होप की आता positive वागेल दोन आठवडे. नाही वागला तरी म मां त्याला चढवणार, बाकीच्याना बोलणार. मी मीनलला बोलले तो भाग बघणारच नाही. पण विशालने जयला लोळवले ते बघणार आहे.

ते स्किल्स वेगळे आहेत... ते बिग बॉस गेम मध्ये नाही चालणार...जास्त डिटेल लिहू शकत नाही पण ओळखून घ्या...

बिबॉने गायत्रीचा आज चान्गलाच पचका केला. आधी मीराला सेफ केल आणि नन्तर हिला काढल. मागच्या आठवडयात हिच विकासला म्हणत होती ' . मीरा खरच एव्हिक्ट झाली असती तर मला आनन्द झाला असता'. नेमकी तिच चुगली आज मीराला आली.

बादवे, मीरा गायत्री जाताना खरच रडली का तिचे ते नाटक होत?

स्नेहाने जयच्या चेहर्यावर फोमचा छोटासा गोळाच ठेवला. मला वाटल, रागाने अख्खी फोमची बाटलीच त्याच्या चेहर्यावर माखते की काय.

तृप्तीताई सोनालीवर जरा जास्तच खुन्नस धरुन आहेत. फोम तिच्या चेहर्याला न लावता तिच्या केसान्वर फेकला.

विकास शकुनीमामा आहे म्हणे.

उद्याचा प्रोमो पाहिला. तिकिट टु फायनल आहे. पाहुणे दिसत नाहीत म्हणजे गेले वाटत.

सिद्दु ने चान्गल केल होस्टिन्ग.

उतक्या जे जे आहे ते सर्व विकासला चिकटवतायेत. बिचारा चांगले खेळून हे सर्व नशिबात. कलर्सवाले झोपलेत का. मागच्या सीझनला आधी वीणाला नावं ठेऊन शेवटी तिचं कौतुक केलं. इथे विकासच्या नशिबात ते दिसत नाही.

कॅप्टनसी टास्क मस्त झाला. मीनल कॅप्टन झाली म्हणून विशाल खरोखर खुश झाला. सर्वच खुश पण विशाल उमेदवार होता म्हणून त्याचं जास्त कौतुक वाटलं. मीनलसाठी जय मनापासून खेळला मात्र, मीनलने नष्ट केला होता पण राहिलेला जयने छान नष्ट केला. तिन्ही संचालकानी मीनलकडे नष्ट करायचा टास्क द्यावा हा योग्य निर्णय घेतला.

विशालने जबरदस्त भारी चितपट केला आधीच्या फेरीत जयला, विकास आणि मीनल मनापासून खुश झाले. मीरा गायत्रीमध्ये मीरा भारी खेळली.

किचनमध्ये काकू गाणे म्हणत जयवर लाइन मारायला आलेल्या, जयने मस्त इग्नोर केलं. सोनालीने काकूंना tonts मस्त मारले.

मीनल झाली कॅप्टन , विशाल झाला नाही याचा ए टीमला मनापासून आनंद झाला.

आजची चावडी फारच फुस्स निघाली. मांज्याचा होमवर्क कमी पडला बहुतेक. सगळ्यात आधी त्या आदिश ला विनाकारण बोलले. म्हणे पर्सनल स्कोर सेटल करायला आलाय. यांना मिराने त्याचे पाय धुतले ते आवडले नाही. टास्क काय होता ते तरी समजुन घ्यावा यांनी. म्हणे डोक्याची मालीश करुन घ्यायची. बरं ते "हे माझे ८ सदस्य आहेत" अन काय काय. त्यामागचं लॉजिक फारच गंडल. बिगबॉस टिमला विचारायच, असला कसला टास्क दिला ज्यात "तुमच्या" ८ सद्स्याला त्रास द्यायला बाहेरुन ३ माणसं पाठवली आत.

जिंक्ल्यावर मिनलच्या डोक्यात हवा जाते हा जावईशोध मांज्याला कसा लागला काय माहित.
बाकी, विकास जिंकलेला आवडेल, तो एकटाच जरा लेवल हेडेड वाटतो.

अजिबात आवडली नाही, शनिवारची चावडी. काही बोलायला विषय नाही म्हणुन मिनलला डिस्करेज करत होते ममां. आदिशलाही धारेवर धरले.
चौघांना कटघरेमे खडा करुन मीराबाइनेही उगाचच रडण्याचा ड्रामा केला.
गादाला आधी कल्पना दिली होती वाटते, हसत हसत गेली पोरगी बाहेर.

पुढच्या वेळी, सोनाली-उत्क्या जातील बहुधा. मीरा-जयला ठेवतील.. बेस्ट ५ मधे.

तुपारे अस काही सांगत आहे की बिबॉस हिला कळले हो.
अग बाई,70 दिवस एका ग्रुपसोबत रिहून त्याची सगळी मुक्ताफळ चाखलीस ,नाहीतर कधीच बाहेर गेली असतीस, बर ममांनी एवढ्या हिंट्स देऊनही परत त्याच ग्रुपच्या मागे होतीस,मग जेव्हा त्यांनीच हाकलल तेव्हा एकट खेळायच सोडून सरळ बी टीममध्ये घुसलीस .काही त्यांच्याबरोबर नुसती मैत्री नव्हती, आणि घुसलीस तर घुसलीस,त्या मीराला सरळ टार्गेट केल होत.
हिने वोटिंग ट्रेंड वगैरे पाहिलेले दिसत नाहीत.

तरी तिने निदान मान्य केले की मला तिथे असताना काय चुका केल्या, ए टीम च्या स्ट्रॅटेजीज निगेटिव दिसल्या हे कळले नाही. सरांनी हिंट्स दिल्या तरी लक्षात आल्या नाहीत.

तरी तिने निदान मान्य केले की मला तिथे असताना काय चुका केल्या, ए टीम च्या स्ट्रॅटेजीज निगेटिव दिसल्या हे कळले नाही. सरांनी हिंट्स दिल्या तरी लक्षात आल्या नाहीत.))) हो ना. आपला खेळ चुकीच्या दिशेने जात आहे हे ओळखून दिशा बदलायला धाडस लागतं. असे मीराने केले असते तर डोक्यावर घेतले असते तीला, सो कॉल्ड मास्टर माईंडला पण झेपले नाही ते, गायत्रीला किमान ऍप्रिशिएट तरी करा.
मला तर वाटत होते तीचा बदललेला ऍप्रोच बघून पब्लिक वाचवेल तीला, पण ज्याचा त्याचा फॅनबेस फिक्स झालाय आता.
व्होटिंग ट्रेंड तरी फ्रॉड आहेत नाही तर चॅनेल तरी फ्रॉड आहे. ट्रेंड नुसार गायत्री आरामात सेफ होती.

गायत्रीने आधीच्या वागण्याबद्दल टीम बी वाल्यांची माफीही मागितली होती ना ? ही मोठी गोष्ट आहे.

पब्लिक ने तिला वोट्स दिले होते, म्हणजे तिच्या वोट्स मधे वाढ झालेली होती असे ट्रेन्ड्स वर दाखवत होते. मीराला खरं सगळ्यात कमी सपोर्ट होता. तिला मात्र ठेवले. चॅनल ला ती हवी आहे असे दिसते. तसा आता कन्टेन्ट तरी काय देतेय ती?

गायत्रीला मीरापेक्षा जास्त वोटस होते हे अगदी बरोबर. तरी मागे दोनदा गा दा ला सर्वात कमी वोटींग होतं तरी तिला ठेवलं होतं ना, त्याची परतफेड केली बिग बॉसनी. मला आवडलं गा दा बाहेर गेली ते. ती जावी म्हणून मी मिराला वोटींग केलेलं, सोनाला पण केलेलं. मीरा गा दा भोपळा टास्कमधे मीरा जास्त सरस वाटली आणि नाचातही वाटली मला त्यामुळे मला पश्चाताप नाही झाला माझ्या वोटींगचा.

हो खरय, म.मांनी चक्क मीराला म्हंटले होते ‘तुला कस काढु आम्ही’ , ती चॅनलला हवी आहे म्हणून ठेवलय !
मीराच्या कन्टेन्टलाही आता काहीही अर्थ राहिलेला नाहीये, अगदीच गुड फॉर नथ्थिंग असणार्‍या बाईने कितीही ड्रामा करो, भांडण करो त्याला काहीच अर्थ रहात नाही.. काहीच जमत नाही तिला , खूप मोनोटोनस झालाय तिचा वावर .. तिचे पिंजारलेले केस तर बघवत नाहीत !
गायत्री- मीरा डबल एव्हिक्शन चालल असत एक वेळ पण मीरा पेक्षा जास्त सपोर्ट गायत्रीला असताना मीराला ठेऊन तिला काढायला नको होतं !
किचनमधे काम करते म्हणून ठेवलय का Wink ?

मीरा आणि गादा सुरवातिपासून सारख्याच होत्या, एकिला झाकाव आणि दुसरिला काढाव अशा पण ,गायत्री-मिरा जोडीत मिरा गायत्रीवर कायम बॉसगिरी करतेय असच वाटायच.
मीराला सेफ केल्याबद्दल सोमीवर बीबी टिमलाच फॅन्स टोले देतय.
मिडवीक इव्हीक्शन मधे सोनाला काढतिल, मिराला चॅनेल फायनल ५ मधे नेतिलच

आता काढतील मीराला. व्हिलन दोन ठेवायचे असतील तर जय उतक्या ठेवतील. गुड ग्रुप चारी ठेवतील.

मला सहाजण असतील फायनलमध्ये असं वाटतंय. एकतर मीरा किंवा सोना असेल. उतक्याला काढतील असं वाटत नाही.

मला चांगला वाटला गायत्रीचा इंटरव्ह्यु, तिने मान्यं केलय म.मांच्या हिन्ट्स समजल्या नाहीत हे !
आधी भरपूर शिव्या खाल्ल्या पण अ‍ॅट लिस्ट बाहेर येऊन शिव्या खाणार नाही !

गायत्री छान बोलली शेवटी, म मां आणि सिद्धार्थबरोबर बाहेर बसलेली असताना. खुश दिसली बाहेर पडताना, अपेक्षित होतं का तिला. मीराला म मां, तुला कसं बाहेर काढू आम्ही म्हणत असतात त्यामुळे तिने मनाची तयारी केली असेल, आपणच जाणार यावेळी. त्यामुळे शेवटी ती positive दिसली.

तिने टॉप 3 मध्ये विशाल मीनल आणि विकास किंवा उतक्या असेल सांगितलं.

आत्ता एक प्रोमो बघितला त्यात टास्क नीट न पार पाडल्याने विजेत्याला मिळणारी रक्कम शून्य असेल असं सांगितलं, खरं की काय. मग फक्त ट्रॉफी देणार का. काय झालं नक्की.

आता परत नीट वाटप झालं असं समजलं. यावेळी पैसे कापले जाणार नाहीत मागच्यावेळेसारखे. विशालवर बारा लाख पन्नास लाख सर्वात जास्त आणि मीरावर पंचवीस हजार सर्वात कमी बोली लागली.

या टास्क चा उपयोग काय आहे? >> भान्डण होतिल,इगो क्लॅश होतिल्,लाडकी मिरा आरडाओरडा करेल्,टीआर्पी साठी अजुन काय

यावेळी मीरा नॉमीनेट झाली तर ती जाईल. उतक्याने छान कविता केली बिग बॉसवर त्यामुळे ते खुश असतील त्याच्यावर.

Pages