मराठी बिग बॉस पर्व तिसरे- २

Submitted by सूलू_८२ on 20 November, 2021 - 17:33

फायनलला थोडेच आठवडे उरले आहेत. स्पर्धा चुरशीची चालू आहे.

सो, हा आहे दुसरा धागा.

चला, चर्चा करुया!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्यावेळी दोनजण एव्हिक्ट होतील असे बिबॉ म्हणाले.

मीरा आज गप्प गप्प वाटत होती. ह्यावेळी ती जाईल अस वाटतय.

विशालला सगळे २५ लाख हवे आहेत म्हणे.

मीरा सोनाला काढतील दोन evictions असतील तर.

उतक्याने थोडंफार कविता त्यानंतर स्नेहाची परतफेड असले काही काही चांगलं केलंय. त्यामुळे एंटरटेन तो करेल उरलेले दिवस.

सोनालीला घालवायचा प्लॅन नसुदे बिगबॉसचा , मला सोनाली जरी कधीकधी किरकिरी होत असली तरी आवडते, तिचा कोल्हापुरी ठसका भारी आहे आणि खूप एंटरटेनिंग आहे !
उत्क्याचा आणि मीराचा कंटाळा आलाय आता, त्यांना काढा Happy

किती गोंधळ घातला त्या मनी डिस्ट्रिब्यूशन मधे! विकास चे काय चालू होते काय माहित. मत च बाद करतो म्हणे आधी . म्हणजे बहुमत वाया गेले असते की त्यांचे. कधी नव्हे ते बहुमत होते निर्णायक क्षणी तर यांची ४ दिशेला ४ तोंडे Uhoh
शहाणे असते तर बी ग्रुप ने ठरवून सोनालीला १.५ लाख द्यायचे ना. बसेनात का ओरडत बाकीचे. कशाला हरिश्चन्द्रगिरी करून उत्क्या - जय ला १ लाख अन दीड लाख दिले?! ए ग्रुप नाही का त्यांचे बहुमत असताना दादुस मीनल पेक्षा स्ट्राँग आहे असे बिन्धास्त म्हणायचे. पण त्यांना प्लान करून वागताच येत नाही. फक्त मीनल ने केला होता तसा प्रयत्न.
जय ने अ‍ॅकसेप्ट केला डिसिजन. तो हेही म्हटला की जीप मधे उतरवायचा टास्क होता तेव्हा आपण ही हेच केले होते. फेअर इनफ. मीराला सुद्धा तिच्या दोस्तांनी सपोर्ट केले नाही आज. मीरा मला हाय अमाउंट द्या आणि सेफ करा असे उत्क्याला म्हणत होती तेव्हा उत्क्या औकातीवर जाऊन हो हो करत स्लायमीपणा करत होता.

उत्क्या -विकासला नॉमिनेट करेल अस मला वाटतय
मला पण आवडते सोनाली, तिला कोल्हापुर पब्लिक भरपुर सपोर्ट करतय.
मिराला बरोबर अन्दाज आला होता की ह्याचाच पुढचा पार्ट नॉमिनेशन मधे रिफ्लेक्ट होणार, बहुमताचा फटका बसायला लाग्ला तेव्हा लगेच मीरा
नेहमिच्या किरकिर मोड मध घुसलीच, किती रडका,चिडला चेहरा घेवुन फिरत असते घरात, ज्याना ८० दिवस तु चल हट केल ते कशाला तुला मत देणार आहेत?
मराठी बीबी टिम फक्त २५ लाख देतेय आणि त्यात काय अजुन रक्कम कापुन वैगरे घेतायत, किती चिन्धीचोरी!! द्या की जरा बरी रक्कम.
विशाल म्हटला मला २५ लाख हवेत,अरे !! पाटी आहे का तिथे २५ लाखाची? तु ते घेतल्यावर बाकीच्यानी काय घ्यायच??
विकास पण आज कूटकुट करतच होता.मीनलने तरी विकासला कशाला विचारायच त्याने उगाच मग तिलाच डाउन दाखवल.
जयला-उत्कर्श ला आताअ सगळे देजावु येत आहेत, बहुमताने आपण काय काय कसे कसे कान्ड केले ते सगळ सगळ आठ्वतय.
विकास बोललेला ते खर झाल " पहिला हाफ त्याचा होता आता सेकन्ड हाफ आपला असेल"

जय ने अ‍ॅकसेप्ट केला डिसिजन. तो हेही म्हटला की जीप मधे उतरवायचा टास्क होता तेव्हा आपण ही हेच केले होते. फेअर इनफ.>>> हो ! तसही जयच्या द्रुश्टीने २५ लाख किस झाड की पत्ती आहेत, जिम्,रेस्टॉरन्ट ,सेलेब्रेटी ट्रेनर भरपुर पैसा आहे, त्याला फक्त टायटल महत्वाचे आहे.

उतक्या ने जी कविता केली होती ती आधी त्यांच्याच कुटुंबातील कोणावर तरी केली असणार. आजी किंवा आईवर केलेली असावी कारण एका कडव्यात आदर्श उत्कर्ष अशी त्या भावंडांची नावं होती. आता त्याने आई आजी नाव काढून बिग बॉस टाकलं.

हो मलाही वाटलं तसं. आणि आत्ता केलेली कविता पटकन् तोंडपाठ होणंही जरा कठीणच. आणि बिगबाॅस कसला मायबाप. एकमेकांत लाथाळ्या लावून मग मिटक्या मारणा-यांपैकीच तो ही.

काल विकासचं कौतुक वाटलं मला. सुरुवातीच्या पैसे वाटपाच्या डिस्कशनमधे विकास जेव्हा स्वतःसाठी 12.5 म्हणाला तेव्हा विशाल फुटला आणि त्याने विकासचा नं. जयच्या आणि उत्क्याच्या नंतर बाॅटम 3 मधे घातला. तसं झालं तर तो कदाचित नाॅमिनेशनमधे आला असता. तेव्हा विकासनं निर्णय मान्य नाही केला. मिनलशी थोडा पंगाच घेतला.
मग बोलाचालीच्या दुस-या फेरीत विकासनं विशालचं नाव 12.5 साठी घेतलं तेव्हा विशालनं त्याचं नाव टाॅप 3 मधे घेतलं. आणि विकास टाॅप 3 त आला.

मीराचा चेहरा म्हणजे करावं तसं भरावं ह्याची प्रचीती आल्यासारखा दिसत होता काल.

मीरा हल्ली टेप लावत असते की मी टास्कमधली भांडणं घरात नेत नाही, यंव आणि त्यंव.

एका टास्कनंतर टीम ए ने आपण आपलं जेवण करून खायचं, त्यांना त्यांचं करू दे असं ठरवलं होतं ना? दुसर्‍या दिवशी टीम बी ने शिजवलेलं खायलाही नकार द्यायचा प्रयत्न केला होता. यात मीरा व्होकल होती. तिथे तृप्तीने मी असं करणार नाही , सगळ्यांसाठी करेन असा स्टँड घेतला होता.

त्या तिघाचा काही पाय निघत नव्हता वाटत, एकदम माहेरी आलेल्या मुलिसारखे चारचारदा अडकुन तिथेच... जय-स्नेहाच आखोही आखो मे चालुच होत.

मीरा काल कसलं तोंड पाडुन बसली होती.. टास्क डीक्लेअर केला तेव्हाच तिला माहिती होतं की तिला सगळ्यात कमी पैसे मिळणार... फॅमिली वीक ला कमी वेळ मिळाला तसंच होणार....
मीनल मीरा ला नॉमिनेट करेल....मीरा सोनाली ला... आणि सोनाली उत्क्या ला .. असा माझा गेस आहे... यावेळी ३ च लोक असतील नॉमिनेटेड तर मजा येईल...
मीरा ला या शनिवारी शेवटची चावडी होईपर्यंत ठेवुन मग पाठवतील... तिचा चावडी साठी पुरेपुर उपयोग करुन घेणार बिबॉ...
सोना आणि उत्क्या मधे कोण जातं हा खरा प्रश्ण आहे...

मीरा काय कटकट करत होती आणि की मुलं मुलींना कमी लेखतात ई ई... स्वतः सुद्धा समर्थक म्हणुन १० वेळा जय लाच घेत होती ना खेळायला... तेव्हा का नाही एखाद्या मुलीला घेतलं... ?

सारंगे नक्की काय सांगुन गेली जय ला... कसली बघत असते ती त्याच्याकडे... काल बहुतेक कसले तरी लेन्स लावले होते .. भयंकर दिसत होते तिचे डोळे...

सारंगेबाई पदोपदी बावळटपणा दाखवून देते. काल आदिश बिग बॉसचे परत एक आठवडा घरी यायला दिलं त्याबद्दल आभार मानत होत्या त्यावर पण खिदळत होती सारंगे. मायबोलीवर असती तर राजकारणी धागे वाचून किती खिदळली असती.

जयला घरी गेल्यावर आईबाबा धोपटणार आहेत, राड्यासाठी नाही, सारंगेकाकुसाठी, हाहाहा. एवढा मालदार पोरगा आहे, ती तो बाहेर आल्यावर पण पाठीमागे लागणार त्याच्या.

तो उत्क्या कित्ती समजावत होता तरी असाच वागत असेल तर कोण काय करणार.

डेफिनेटली मीरा बाहेर जाणार आता, चावडीसाठी ठेवलं आहे तिला.

जय म्हणाला होता की आता नाही बोलणार सारंगेशी. पण लाचार वाटला फार तिच्यापुढे. ती कश्यामुळे इतकी मस्तवाल आहे देव जाणे. मम्या ओरडला तरी काहीतरी विचित्र भसाडं हसायची.

स्नेहाने तिच्या पर्फॉर्मन्सने टीम ए ला हादरवलं होतं.
मला आवडलं ते. जय , उत्कर्ष दोघेही हादरले. इतके की मांजरेकरांना त्यांच्या मदतीला धावून यावं लागलं.
टीम ए ने एवढे दिवस माज केला होता, त्याला टाचणी लागणं आवश्यक होतं.

स्नेहाने आपल्याशी असं वागावं यात जयला मोठा पराभव वाटतोय.

हो स्नेहा ची एन्ट्री वॉज ग्रेट गेम बाय बिबॉ! ती आल्यावर तिच्या त्या पहिल्याच परफॉर्मन्स नंतर जय चा जो काही पायाखालची जमीन सरकल्यासारखा चेहरा झाला तो तसाच राहिला. उत्क्या पण.
तरी सध्या विकास विशाल मीनल ची आपसातली भांडणं, विकास ची साइडलाइन ला लागलेली गाडी, विशाल चे स्वतःला फेअर दाखवण्याच्या नादात निगेटिव होणे, हे सगळे बघता जय मधल्यामधे ट्रॉफी घेऊन जाऊ शकतो. टू बॅड. बी टीम कडे एवढं पोटेन्शियल होतं (आहे), पब्लिक ला जिंकले होते, आता टीम ए ची ताकदही कमी झालेली आहे योग्य वेळी, सगळे जमून आले आहे, पण हे लोक त्याचा फायदा न उचलता संधी वाया घालवतील की काय असेच वाटत आहे.

जय तर काल ती बाहेर गेल्यावर घरातले सगळे राग विसरून जाणार का याची विचारून खात्री करून घेत होता.

मीरा हल्ली टेप लावत असते की मी टास्कमधली भांडणं घरात नेत नाही, यंव आणि त्यंव.>>>हो. एकदम खोटे बोलते ती.
एकदा टास्क झाल्यावर विशालला टार्गेट करून ‘महाराष्ट्र बघतोय‘ची टेप वाजवत होती.
गायत्रीबद्दलही सतत नकारात्मक बोलली.

टिम ए अजुनही ग्रुप गेम खेळते आहे, उत्क्या-मिरा अजुनही जयचीच चाकरी करत असल्यासारखे असतात.टिम बी अगदी त्याच्या विरुद्ध वैयक्तिक होत आहे.

हो यार, टिम बी प्रत्येक इंडिव्हिज्युअल स्ट्राँग ओपिनियन असलेला आहे ,पण एकमेकांचा विचारच करत नाहीत.. ही त्यांची स्ट्रेन्थ आणि विकनेस दोन्ही आहे, काल का नाही ठेवलं सोनालीला उत्क्याच्या आधी Uhoh
जय एक वेळ ठिक आहे पण उत्क्याला कशाला सोनालीच्या आधी ?.. नको तिथे फेअर खेळतात बी वाले .. एकमेकांमधेच किती कचाकचा भांडतायेत , सोनालीच आता टिकिट टु फिनाले जिंकु देत !

जय तर काल ती बाहेर गेल्यावर घरातले सगळे राग विसरून जाणार का याची विचारून खात्री करून घेत होता.:)
वेडाय का तो? पाच पाच गर्लफ्रेंड होत्या ना त्याला. हिच्यासाठी काय अडलय याचं? जशी काय कतरीना कैफ आहे.

मीनलला काल मांजरेकरांच्या अनफेअर पॉइंट्सवर बोलताना दाखवलं, नक्की पुढच्या चावडीत ममा काढणार हा विषय !

मीनल ने बरोबर म्हटले की सर जय ला काहीच बोलले नाहीत, विशाल ची पण साईड घेतली अन मला चूक नसताना बोलले. खरंच ममांनी असे का केले ते कळले नाही.
हा आख्खा सीझन त्या उत्क्याला का मास्टर माइंड म्हणून चढवले गेले हाही एक मला न कळलेला मुद्दा आहे. त्याच्या कुठल्याच थिअरीज, गेसेस बरोबर निघायच्या नाहीत. याला उडवू , तिला काय कधीही काढता येईल, एकतर्फी गेम होणार इ. इ. काहीही. स्ट्रॅटेजीच्या नावाखाली सगळ्यांशी खोटेपणा अन डबल गेम मात्र सतत करायचा. याउलट विकास अंडररेटेड ठरला पण त्याचे पब्लिक ला काय आवडेल, काय वर्क होईल हे बहुतेक अंदाज परफेक्ट असतात. जय-स्नेहा बाबत तो म्हटला होता हे मराठी लोकांना नाही आवडणार. वि-वि दोघांनी केस कापण्यावरून म्हटला होता हे लोकांना फार आवडेल, तसंच गायत्री या मुलांचे हात पाय काय चेपत बसते , हे लोकांना आवडत नसेल, असे म्हटला होता तेही बरोबर ठरले. तो जे म्हटला होता की पहिला हाफ त्यांचा आणि शेवटचा हाफ आपला तेही करेक्ट ठरले, फक्त पुढचे एक्झिक्यूशन जमत नाहीये. कारण त्यांचीच आपसतली भांडणं. त्याला जर विशाल ला समहाऊ इन्फ्लुएन्स करता आले असते, कन्ट्रोल मधे ठेवायला जमले असते तर आज गेम ची मजा वेगळीच असती.

Pages