Submitted by पूनम on 8 October, 2012 - 05:41
स्वयंपाकघरातील युक्ती सांगण्यासाठी आणि सुचवण्यासाठी हा तिसरा बाफ.
नवीन प्रश्न विचारण्याआधी ह्याआधीचे दोन धागे पहायला विसरू नका :
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फ्रीज मध्ये टिकत पण काही
फ्रीज मध्ये टिकत पण काही दिवसातच ते कोरड पडत असा अनुभव आहे त्यामुळे थोडंच करायचं आणि खाऊन टाकायचं.
आवळे उकडून करतात ते लोणचं
आवळे उकडून करतात ते लोणचं केलंय.>>>>> संजीव कपूरच्या रेसिपीने, आवळे उकडून केलेले लोणचे बराच काळ बाहेर ठेऊनही चांगले राहिले.थोडेसेच केले होते,त्यातलेही राहिले होते.
भरपूर कोथिंबीर आलीय गावाकडून
भरपूर कोथिंबीर आलीय गावाकडून ,को वडी सोडून आणखी काय करता येईल. तळण नको ,धपाटे करून झाले आहेत.
1.कोथिंबीर झुणका
1.कोथिंबीर झुणका
2. कोथिंबीर , कांदा आणि सुकं खोबरं असं सारण असलेली पुडाची वडी
3. कोथिंबीर , लसूण , सुकं खोबरं दाणे अशी कोरडी चटणी
4.कोथिंबीर इलुश्या तेलात तळून घ्यायची कडक होई पर्यंत आणि मग जरा हाताने चुरून एअर टाईट डब्यात ठेवून द्यायची.... कशातही पटकन घालायला उपयोगी पडते
पुडाची वडी , चटण्या , लेमन
पुडाची वडी , चटण्या , लेमन कोरिअँडर सूप
आमच्याकडच्या चटणी तले जिन्नस - कोथिंबीर, ओलं खोबरं, आलं , लसूण, हिरवी मिरची, लिंबू रस किंवा चिंच
पराठे थालीपीठ
पराठे थालीपीठ
कोथिंबीर , लसूण , सुकं खोबरं
कोथिंबीर , लसूण , सुकं खोबरं दाणे अशी कोरडी चटणी>>>>>>> हे सर्व न भाजता वाटायचे ना? किती दिवस टिकेल?
सँडविचसाठी चटणी: हि.मि.,पुदिना, कोथिंबीर,आले,डाळे,लिंबाचा रस आणि किंचित साखर एकत्र वाटायचे.ही चटणी करून फ्रीजरमधेही ठेवू शकता.
सगळे वरचे ऑप्शन चांगले आहेत.
सगळे वरचे ऑप्शन चांगले आहेत.
आणि एकः नेहमीची कोथिंबीर वडी.
कोथिंबीर जुडी चिरुन, त्यात मीठ, तिखट, खसखस, तीळ, हळद,बेसन घालून मळून २ रोल करुन त्याला अर्धेखोल (म्हणजे पूर्ण खालपर्यंत न नेता) कापलाईन डिफाईन करुन कुकरच्या भांड्यात ठेवून कुकर मध्ये १-२ शिट्ट्या किंवा बिना शिट्ट्या वाफवायचे.नंतर थोडे गार झाल्यावर तेलात तळायचे किंवा तव्यावर तेलात परतायचे)परतायचे असल्यास वड्यांची रुंदी कमी.)
यात खूप कोथिंबीर एका वेळी संपते.
लसणाचं तिखट :
लसणाचं तिखट :
मोठी मूठभर कोथिंबीर, ७-८ लसूण पाकळ्या, अर्धा चमचा जिरं, एक चमचा लाल तिखट. मीठ. -> मिक्सर.
हे कच्चं खायला छान लागतं, खिचडी बरोबर तोंडी लावणे, किंवा त्यात तेल मीठ घालून पोळी बरोबर चटणी सारखे.
जास्त झालं, तर हेच तेलात तळून ठेवायचं. खूप दिवस टिकेल.
नवीन Submitted by mi_anu on
नवीन Submitted by mi_anu on 30 November, 2021 - 18:27
ही बाकरवडी च झाली ना?
बाकरवडीत शेव, चिंचकोळ इत्यादी
बाकरवडीत शेव, चिंचकोळ इत्यादी असतो.मैद्याचे/पीठाचे लेयरिंग असते.गुंडाळी करण्याची घडी प्रक्रिया आहे.
ही साधी अळूवडी स्टाईल ची कोथिंबीर वडी.यात नुसता दंडगोल बनवून शिजवून कापून तळायचा किंव परतायचा आहे.
प्लेन कोथिंबीर वडी मधे मिनिमम
प्लेन कोथिंबीर वडी मधे मिनिमम बेसन, मिरची, मीठ, जिरं घालून तळतात आमच्याकडे. अगदी बाईंडिंगपुरतंच बेसन. मस्त लागतात.
हो, त्यात मस्त हिरवी हिरवी
हो, त्यात मस्त हिरवी हिरवी कोथिंबीर दिसली पाहिजे.हलवाया कडे मिळणाऱ्या 80% बेसन 20% कोथिंबीर तसं नाही.
कोथिंबीरीचं तिखट.
कोथिंबीरीचं तिखट.
वरच्या आरारा रेसिपी प्रमाणेच मायनस लसूण.
कोथींबीर, मीठ, तिखट, चिंच .. आजी हातानेच चुरडायची.. आपण सुरीने चिरून घ्यावे. मिक्सर मध्ये नको, त्याची रॉ टेस्ट, एखादं देठ दाताखाली आल्यावर फार भारी लागतं. भाकरी बरोबर, पोळी बरोबर तोंडी लावणं. चिंच ही कोळून नाही घालायची एखाद बुटूक तसच चुरडायचं. ते ही मध्येच आलं की आणखी मस्त लागतं.
कोंथिंबीरीची मुगडाळ कांदा
कोंथिंबीरीची मुगडाळ कांदा घालून परतून भाजी छान होते. मुगडाळ भिजवायची थोडा वेळ आणि फोडणीत आधी घालून परतायची, थोडी तळल्यासारखी करायची मग कांदा कोथिंबीर घालायची. पाण्याची गरज नसते यात, कोथिंबीरीला आणि कांद्याला पाणी सुटते ते आटलं की छान परतायची.
कोथिंबीरीची डाळ, शेंगदाणे घालून अळु किंवा पालकासारखी छान पातळ भाजी होते.
वाटूनही कोथिंबीर फ्रीजमध्ये टिकेल.
अरे वाह एक से एक रेसिपी
अरे वाह एक से एक रेसिपी मिळाल्या धन्यवाद सगळ्यांचे,
कोथिंबीर, मिरची, आले, कांदा ,
कोथिंबीर, मिरची, आले, कांदा , लसूण सगळे बारीक चिरायचे. तेल गरम करुन त्यात आले, मिरची, कांदे याच क्रमाने एकेका मिनिटाने घालून परतायचे. कांदा मऊ पडला की हळद, तिखट, बचकाभर खस खस घालून परतायचे. मग कोथिंबीर घालून परतायचे. फार लाड करायचे असतील तर काजूची पूड घालायची ( मग शाही पराठा म्हणावे ) . अगदी कोरडा गोळा झाला की मीठ घालायचे आणि पराठे करायचे. फार भारी लागतात. चिरताना कढईभर कोथिंबीर होईल असे वाटले तरी शेवटी गोळा फारच लहान होतो त्यामुळे मीठ शेवटी घालायचे. असल्यास एखादा उकडलेला बटाटा किसून घातला तर पराठ्याचे मिश्रण लाटायला सोपे जाते.
कोरियंडर राईस!
कोरियंडर राईस!
मोकळा भात शिजवून घ्यायचा. कोथिंबीर, हिमी वाटून घ्यायची. तेलात जिरे अगदी थोडी आलंलसूण पेस्ट, छोटा कांदा, तेजपान, लवंग दालचिनी बारीक चिरलेली कोथिंबीर परतून भात व पेस्ट टाकून परतायचे. मक्याचे वाफवलेले दाणे व काजू व सा तू टाकून सजवावे
एवढ्या रेसिप्या वाचून एखादी
एवढ्या रेसिप्या वाचून एखादी कोथिंबीरीची जुडी आणण्याची इच्छा होते आहे
एवढ्या रेसिप्या वाचून एखादी
एवढ्या रेसिप्या वाचून एखादी कोथिंबीरीची जुडी आणण्याची इच्छा होते आहे Proud>>>>> मलापण
मी आजच दोन आणल्या. एक रोजच्या
मी आजच दोन आणल्या. एक रोजच्या वापरात, एक वडी/पराठा/पुदिना मिक्स चटणीसाठी.
)
(पाणीपुरी च्या कच्च्या पुऱ्या आणलेल्या आहेत, त्या तळून एक दिवस पापुपार्टी.
आज एक पपई होती, वरून पिकली
आज एक पपई होती, वरून पिकली वाटली , पण आतून फार घट्ट व अगोड होती
म्हणून सगळी पीठे घालून थालीपीठ केले
सगळी पीठे घालून थालीपीठ केले>
सगळी पीठे घालून थालीपीठ केले>> छान आयडीया.
मला आधी कळेना काय फोटो आहे तो. वाचल्यावर समजले. आता अगदी थालिपीठात गेल्यासारखे वाटते
असा का काढलाय फोटो.
असा का काढलाय फोटो.
मला वाटलं, पिकलेल्या पपई चा फोटो आहे कि काय?
मलापण वाचल्यावर कळले ते थालिपीठ आहे.
असा का काढलाय फोटो.>>>> अग,
असा का काढलाय फोटो.>>>> अग,"गरमागरम थालीपिठावर लोणी कसं वितळत चाललंय' असा कौतुकाने काढलेला फोटो आहे तो.
हे दही वाटतंय ना?लोण्याला जरा
हे दही वाटतंय ना?लोण्याला जरा कमी गुळगुळीत पोत असेल.
आकार वाकडा होता
आकार वाकडा होता
फोटोत शेडो येत होती
दही आहे
मला तर कुठल्या पेशंटच्या
मला तर कुठल्या पेशंटच्या स्कीन डिसिजचा फोटो टाकला चुकून वाटलं....
(No subject)
नाचणीच्या पिठाचा उपमा होउ
नाचणीच्या पिठाचा उपमा होउ शकतो का? कुणी केलाय का? सोपी रेसिपी आहे हा?
Pages