वेबसीरीज २

Submitted by sonalisl on 2 June, 2021 - 19:58

तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा वेबसीरीज. ( https://www.maayboli.com/node/65774 ) या धाग्यावर सुरू झाली. आता तिथली प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्क्विड गेम पहिला गेम च जाम डेंजर वाटला मला ,
स्पॉयलर:
बापरे काय ते पळताहेत आणि काय पॉझ होतायेत आणि जे नाही होत नीट ते ,, बाब्बौ , सगळं कल्पनेबाहेरचं वाटलं.. पुढचे त्यामानाने एवढे भयानक नाही वाटले , बोर झाले मला तर मधले काही सीन्स स्कीप करत पाहीली. ठिक आहे सिरीज, एवढे लोक मरताना बघून ( ते पण अश्याप्रकारे Sad ) आवडली म्हणवत नाही.

LUPIN पाहिली का कोणी ? टाईमपास आहे . बर्याचशा गोष्टी अ आणि अ वाटल्या. पण एखाद दूसरा एपिसोड सोडला तर फारसा कंटाळा नाही आला . मूळातच अशा कॉन स्टोरीज बघायला आवडतात म्हणून .

स्क्वीड गेम चालू केली आहे . अतिरंजित भाग आला तर पळवते , बाकी ठीक वाटली . अजून डोक बधीर झालं नाहीये.

सक्विडगेम(इतरांना हे इथे लिहिता येतं,मला का नाही येत) बघणार नव्हते पण बघून पूर्ण केली.आवडली.परत एकदा, इतके व्याप कोण का करतं वगैरे प्रश्न पडलेच.दूरदर्शन च्या जमान्यात 'फक्त एका रुपयासाठी' नावाची मालिका होती.त्यात राजा गोसावी आणि अजून एक काका एका गरीब माणसाच्या आयुष्याशी पैजेसाठी खेळतात. त्याची आणि काही काही ठिकाणी टेबल नंबर 21 ची आठवण आली.
गोट्या खेळण्याचा एपिसोड अतिशय हृदयद्रावक वाटला.

एखादा स्पॉयलर धागा कोणी काढला तर त्यावर लिहीन.

सक्सेशन (एचबीओ) पहिला सीझन पाहिल्यावर नंतर जेव्हा दुसरा आला तेव्हा कंटाळा आला होता पाहायचा. पण जरा नेटाने लावला तर आता इंटरेस्टिंग झाला आहे.

Special Ops 1.5: The Himmat Story हॉटस्टार वर आगमन झालयं . या विकांताचा प्लॅन नक्क्की !

तेच लिहिणार होते स्वस्ति.
खूपच मस्त जमलाय हा सीझन. सगळ्यांचीच कामं मस्त झाली आहे.
केके मेनन हा बाप माणूस आहे....
नक्की बघा.

स्पेशल ऑप्स पहिला सीजन बघून खूप महिने झाले, आता आठवत नाही. दुसरा सीजन आता बघितला तर काही समजेल की नाही. पहिल्याशी किती जोडलेला आहे दुसरा सीजन.

युट्युबवर विषय खोल च्या गोष्ट आहे पृथ्वीमोलाची टायटल खाली ३-४ शॉर्ट सिरीज बघितल्या. सगळ्या छान आहेत. साधे सोपे पण वेगवेगळे विषय छान हाताळले आहेत. गोष्ट अर्जूनची स्पेशली आवडली. गीता कुलकर्णीने छान केलंय काम. नक्की बघा.

कॉल माय एजन्ट- बॉलिवुड - प्रोमो चांगला वाटला होता पण मी पहिला एपिसोड अर्ध्यात सोडला. फारच भंपक वाटली. >>> मी पण अर्ध्यात सोडली. फार म्हणजे फारच क्रिंज..
प्रीथ्वीराज चा मल्ल्याळम कोल्ड केस पाहिला, खूप आवडला ससपेन्स थ्रिलर, त्याला जरा पॅरनॉरमल ची फोडणी Wink प्राईम वर आहे. एखादा फ्लॉ आहे पण ठीक आहे.
दुसरा तामिळ सायलेन्स -आर माधवन आणि अनुश्का शेट्टी ना बघुन बघायला घेतला, तो ही थ्रिलर पण इतके कच्चे दुवे होते की मुडच गेला.

करोनाने दिवाळी सुट्टी बरीच लांबली त्यामुळे इतक्यात हिट मंकी, आरकेन या ऍनिमेटेड सिरीज, हेलबाऊंड ही कोरियन सिरीज , जिमी शेरगिलच्या युअर ऑनरचा दुसरा सीजन, डोपसिक ही अमेरिकन सिरीज, व्हील ऑफ टाइम ही प्राईमवरची तीन भागांची सिरीज, यलोस्टोनच्या नव्या सिजनचे आलेले एपिसोड आणि डजनभर सिनेमे पाहिले.

स्पेशल ऑप्स चा सीझन १.५ पाहिला. १.५ ही भानगड समजली नाही. कदाचित दुस-या सीझनचे बाकीचे एपिसोडस शूट व्हायच्या आधी तयार आहेत ते द्या टाकून असं काही तरी असेल. मागच्या सीझन मधे पण ऑफीसरच्या इन्व्हेस्टीगेशन मधून मालिका उलगडते.
या सीझन मधे पण रिटायर बेनेफिट्स द्यायचे कि नाही यासाठी चौकशी असते. अशी काही चौकशी सरकारी खात्यात करतात ?
के के मेनन पासून सर्वांनी सफाईदार कामे केली आहेत.

आर्या सिझन दोन येतोय, दहा डींसेबरला.

फार खुनाखुनी वाटतेय, आर्या डॉन झालीय बहुतेक. बघावी की बघु नये.

फॉर लाईफचा दुसरा सीझन आलाय नेफ्लिवर.
मला पहिला खूपच आवडलेला, हा दुसरा एरन सुटुन घरी आल्यावर पाणी घालून चालू घडामोडींवर बनवायचा म्हणून बनवलाय. कोविड, जॉर्ज फ्लॉईड, बीएलएम, रेशिअल प्रोफायलिंग असे धडाधड नवे नवे विषय येताहेत. हा चालू केला आहे आणि सगळ्यांची कामं उत्तम आहेत तर बघेन सगळा, पण एबीसीने तिसरा सीझन पास न करता का गुंडाळली असेल ते समजतय. मूळ चार्म गेलाय आणि दळण चालू झालंय.

इथे कोणी लिटल थिंग्जचे फॅन्स नाहीत का ? मला चौथा सिझन पण आवडला. हा बहूतेक शेवटचा असावा.
सुरुवातीला मला वाटलं खूप संथ चाललय का? पण नंतर जाणवलं की तो संथपणा गरजेचा होता. नेहमी प्रमाणे ध्रुवबाळ आणि पालकरबाईंनी मस्त काम केलय. उगीच प्रचंड काहीतरी "ड्रॅमॅटीक" ( म्हणजे आई वडिलांची भांडण किंवा मोठे मोठे समारंभ) न दाखवता एकदम साधा पण छान शेवट केला ह्या सिझनचा.

आता ३ -४ तारखेला एमिली इन पॅरिस आणि इनसाईड एज असे दोन्हीचे पुढचे सिझन येतायत. दोन्ही सिरीज आवडत्या असल्याने पुढचे सिझन बघायची उत्सुकता आहे.

नवरा व्हील ऑफ टाईम बघतोय, दर शुक्रवारी नवीन भाग प्रसारित होतो prime वर. हिंदीतून लावतो तो. येता जाता कधी बघते, त्यातले काही male chara दिसायला छान आहेत, female chara फार आवडलं नाही कोणी. ती मेन लिड आवडली दिसण्यात पण ती एजेड आहे. माझं उगाच आपलं काहीतरी, हाहाहा.

माझं आपलं सध्या नेटफ्लिक्सवर ‘ designated survivor’ पहाणं चालुये. अत्यंत वेगवान असल्याने झपाट्याने पाहिली जाते. खूप आवडली हे तर आहेच.

designated survivor >> ही चांगली आहे सिरीज. पण ही आवडली असेल तर द वेस्ट विंग जरूर पाहा.

आता हे वरातीच्या बरेच मागून घोडे टाइप पोस्ट आहे - पण नुकतीच स्लिंग ची सर्विस घेतल्याने इथे आधी चर्चा होउन गेलेल्या "स्कॅम १९९२", "कार्टेल" वगैरे पाहायला सुरूवात केली. चांगल्या आहेत. आश्रम सुद्धा पाहायची आहे.

कार्टेल ला मिर्झापूरची डेप्थ नाही पण तरीही इण्टरेस्टिंग आहे. गिरीजा ओक व जितेंद्र जोशी यांची कामे सर्वात आवडली. त्यानंतर तनुज विरवानी. तो अभय चे काम केलेला पण चांगला आहे. जितेंद्र जोशी सर्वात भारी वाटला. टायटल सिक्वेन्स मस्त आहे.

स्कॅम १९९२ मधे ८०/९० च्या दशकातील वातावरण मस्त आहे. त्यातील कर्मचारी लोक अस्सल वाटतात अगदी. सुचेता दलाल चे काम श्रेया धन्वंतरी ने जबरदस्त केले आहे. हर्षद मेहता चे सुरूवातीचे सुसंस्कृत वागणे व नंतरची शिवीगाळ - हे सगळे खरेच झालेले बदल की स्क्रिप्ट मधे कन्सिस्टंसी नसल्यामुळे - हे माहीत नाही.

वेस्ट विंग अमेरिकेत एचबीओ वर आहे. हाउस ऑफ कार्ड्स जास्त ग्रिम आहे. आणि त्यात वेगळ्या प्रकारचे राजकारण आहे. हाऑका चा मुख्य गाभा हा "रूथलेस पॉवर ग्रॅब - सत्तेकरता काहीही" हा आहे. तर वेस्ट विंग मधे ऑलरेडी निवडून आलेला प्रेसिडेण्ट व त्याची टीम ८ वर्षांत सरकार चालवण्यातील चॅलेंजेस कशी हॅण्डल करतात त्यावर आहे. खूप वेगळ्या सिरीज आहेत. वेस्ट विंग ही विनोदी सिरीज नव्हे. पण त्यातील ह्यूमर हा टॉप क्लास आहे.

ओके, थँक्स फारेन्ड.
नेटफ्लिक्सवरच मी ‘हेलबाऊंड’ थोडीशी पाहिली. कोरिअन आहे म्हणुन. वेगळाच प्रकार आहे काहीतरी. पुर्ण पहाणार की नाही ठरवले नाही.

हेलबाऊंड निराश करतं.आणि प्रचंड हिंसा आणि बरेच भडक खुनाचे सीन आहेत.हेलबाऊंड ला squid गेम पेक्षा सरस का मानतात हे मला अजिबातच कळलं नाहीये.आताच्या दिवसात अश्या आशा नसलेल्या सिरियल्स अजिबात बनू नये असं काहीतरी वाटलं.
शुद्ध हॉरर बघणं वेगळं.त्यात आशावादी काही घडेल ही अपेक्षा पण नसते.

काय सांगतेस? हेलबाऊंड ला squid गेम पेक्षा सरस मानतात ???? स्टंट असणार किंवा ज्यांनी हे मानलंय त्यांनी हेलबा. झोपेत पाहिली असेल. फक्त त्यातले नक्की रहस्य काय आहे ते पहायला मी शेवटचा भाग पहाणार आहे.

Pages