चित्रपट कसा वाटला - 4

Submitted by कटप्पा on 14 May, 2020 - 12:27

आधीच्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर Happy

पूर्वीचा धागा - https://www.maayboli.com/node/62306

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सरदार उधम सिंग चा ट्रेलर जबरदस्त आहे
विकी कौशल ला अजून एकदा एक सॉलिड रोल मिळाला आहे
आणि शुजित सरकार चा मुव्ही असल्याने टिपिकल बायोपिक असणार नाही असे वाटत आहे

आम्ही भूत पुलीस पाहिला. फुल्ल टाईम पास आहे. सैफ तर मस्त आहेच पण चक्क अर्जुन कपूर सुद्धा चांगले काम करतो.

खुप काही अपेक्षा न ठेवता पाहिल्याने आवडला. काही काही डायलॉग्ज भारी आहेत.

डायरेक्टरला की स्क्रीन रायटरला एग्झॉर्सिस्ट खुप आवडला होता बहुतेक - बरेच हॉरर सीन्स तिकडून उचललेले आहेत. अजूनही इतर इंग्लीश पिक्चर मधले हॉरर सीन्स घेतलेले आहेत. पण मज्जा खरी कॉमेडीत आहे.

थलायवी पाहिला. एकदम सरळसोट! एकदम naïve! घटना - प्रतिक्रिया - परिणाम! असं दोन-चार वाक्यांतून, एखाद्या प्रसंगातून लोकांचं मतपरिवर्तन झालं असतं तर मायबोलीवरचे चर्चांचे धागे पाच दहा प्रतिक्रियांमधे आटोपले असते.

बेल बॉटम - अत्यंत पांचट बोरिंग चित्रपट +1000

टॉम हँक्स चा Sully पाहिला. २०१६ च सिनेमा आहे , हडसन रिव्हर वर emergency मध्ये एक विमान उतरवल गेलं त्या सत्य घटनेवर आहे.
टॉम हँक्स ची mastery झालिये अशा रोल मध्ये. त्याच्या साठी आवडला.

कधी नव्हे ते परत एकदा च्रप्स ना अनुमोदन....
>>तुम्ही अनुमोदन दिले म्हणून, नाहीतर आतापर्यंत माझ्यावर तुटून पडले असते...

टॉम हँक्स वर जोक आलेला मध्ये
हा माणूस कुठेही दिसला प्रवासात तर तातडीने तुमचा प्रवास रद्द करा

जिथे जाईल तिथे संकटात सापडतो
Happy

थलायवी पाहिला. एकदम सरळसोट! एकदम naïve! घटना - प्रतिक्रिया - परिणाम! >> सहमत, सुरवातिला तिच आणी एम जे आर चे सगळे सीन, तिच त्याच्याविशयी आकर्शण सगळ डर्टी पिक्चरशी एकदम मिळतजुळत वाटत होत.
भाग्यश्री कन्गणाची आई कुठल्याच अ‍ॅन्गलने वाटत नव्हती फारतर बहिण म्हणून ठिक आहे.

अक्षय कुमार मला अतिशय भंपक वाटतो आताशा. पुर्वी जरा कमी भंपक वाटायचा. आजिबात बघवत नाही. काहीतरी भारी करतोय असा आव आणल्यासारखी ओवर अँक्टींग करतो.

टाईपकास्ट झालाय
पब्लिक डिमांड म्हणून हिट पिक्चर्स द्यायला एकाच टाईप चे रोल आणि अभिनय छापतोय(त्याचाही नाईलाज असेल.त्याला दुसरया प्रकारचे रोल मिळतच नसतील)
रुस्तम,एअरलिफ्ट,हॉलिडे,बेलबॉटम
सगळे एकाच टाईप चे पिक्चर.

22 October ला वेनम 2 थेटरात येणार म्हणे

>>>>मार्वल सिरीजचे पण रांग लावून येताहेत... एकामागे एक ... अगदी २०२३ पर्यंत :डोळ्यात बदाम:

अक्षय कुमारचे गेल्या काही काळातले या टाईपचेच एलएलबी, हॉलिडे, बेबी हे चांगले वाटले. मला तो गब्बर सुद्धा आवडलेला. आणि पॅडमॅन, टॉयलेट या सामाजिक विषयांवरचेही जमलेले. टाईपकास्ट कोण नाही होत. अति झाले आणि परीणाम संपला वा धंदा बसला की आपसूक दुकान बंद पडेल. पण मुळात बंदे मे दम होता म्हणूनच चित्रपट हिट जात होते. एकेकाळी सुनिल शेट्टी आणि तेव्हाच्या अजय देवगणसारखा ॲक्शन हिरो होता. तिथेही खिलाडीकुमार म्हणून हिट होता. तिथून कॉमेडीकडे वळला आणि सुपरहिट झाला. मग हे देशभक्तीचे आधुनिक मनोजकुमार रूप आले. पुर्ण कारकिर्दीचा विचार करता काळानुसार प्रगल्भता आणि वैविध्य दोन्ही आहे.
आणि आता त्याचे वय झाले आहे. अभिनयाला मर्यादा आहेत. त्यामुळे हिरो म्हणून काम करायचे थांबले की अमिताभ वा ऋषी कपूरसारखी सेकंड इनिंग असेल असे वाटत नाही. त्यामुळे आता जे चालतेय ते तो ताणनारच.

अक्षय कुमारचा रिसेंटली आवडलेला पिक्चर म्हणजे हाऊसफुल ४. साजिद खानची हाकालपट्टी झाल्याने हा बाकीच्या हाऊसफुल पेक्षा बराच चांगला झाला होता. आणि रितेश बरोबर बाबू देऊळ यांनी धमाल केली होती.

एलेल्बी तर मला आपला ओरिजिनल अर्शद वारसीचाच आवडतो. अक्कीनी त्याला पण खुप देशभक्तीपर केले होते.

मला फार बोअर झाला होता 4(अर्थात मी 1,2,3 पाहिले नाहीयेत)
स्पेशली राजकुमार बाला चे सीन फार डोक्यात गेले.मला कलाकार वगैरे सगळे आवडले.अभिनय पण आवडला.पण मूळ शिळं वांगं, हिरवे पडलेले बटाटे याला कितीही उत्तम मसाला, उत्तम केशर बदाम वापरले तरी भाजी चांगली बनणार का?मूळ कथा चांगली हवी(किंवा कथा हवी)

मूळातच हाऊसफुल आम्ही कथेसाठी न बघता त्यातल्या विनोदी गोंधळाकरता पाहिला. त्यात अक्की आणि बाकीच्या सर्वांचेच विनोदी टायमिंग जमून आलेले आहे. अगदी नवाझचे आयटम साँग पण. कथेसाठी पिक्चर पहायचा तर मग माचिस, सत्या वगैरे पिक्चर पाहू Wink

हाऊसफुल्ल १ २ ३ धमाल आहेत. जरूर बघावेत.
४ मला कळतच नव्हते यात विनोदी काय आहे. मी अर्ध्यावर सोडला.

मला फार बोअर झाला होता 4(अर्थात मी 1,2,3 पाहिले नाहीयेत)
>>>
तुम्ही नेमके उलटे केलेय मग. ४ चा अनुभव विसरा. आधीचे बघा. Happy
मी चौथा अर्ध्यावर सोडला. पण आधीचे रिपीट बघितले आहेत.

अक्षय कुमार जरी टाईप कास्ट झाला तरी त्याने इतके विविधता पुर्ण रोल्स केलेत आणि उत्तम कथा असलेले ही बरेच होते.. हेराफेरी, खिलाडी मुळ, एयर्लिफ्ट, रुस्तम, केसरी, आवारा पागल दिवाना, भुलभुलैया, तो तस्वीर आणि ऐतराज, अजनबी, आंखे वगैरे पण आवडले वेगळे म्हणुन आणि कित्येक इतर. अ‍ॅक्टींग सरस च होती कायम.

मला खूप आवडतो अक्की. त्याचे अचाट सिनेमे मी बघणार च नाही राऊडी राठोड अपवाद Sad ) त्यामुळे तो हेट लिस्टित नाही जाणार Wink

मूळातच हाऊसफुल आम्ही कथेसाठी न बघता त्यातल्या विनोदी गोंधळाकरता पाहिला. त्यात अक्की आणि बाकीच्या सर्वांचेच विनोदी टायमिंग जमून आलेले आहे. अगदी नवाझचे आयटम साँग पण. >>>> ++ 1000000 .
1,2,3 पेक्षा हा आवडला. मी मुद्दामून परत बघणार नाही पण बघितला तेव्हा मस्त टाईमपास झालेला .

मलाही आवडतो अक्षय कुमार.त्याने आधी खूप चांगले पिक्चर दिले आहेत
(आता आठवलं मुलीला मै खिलाडी तू अनाडी दाखवायचा आहे.तिला अक्षय कुमार खूप आवडतो.)

प्राईम वर Aame हा तमिळ चित्रपट आहे. सबटायटल्स सहीत पाहणे हे सुरूवातीला भयंकर काम आहे. पण नंतर जवळपास संवादच नाहीत. सिनेमा पाहताना आठवले कि यातले काही सीन्स व्हायरल झाले आहेत. अमला पॉल ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत आहे. वीस मिनिटांनंतर तिच्यावरच चित्रपट फिरत राहतो. एक वापरात नसलेली आयटीची इमारत. हॅशटॅग नावाच्या कंपनीचा फ्लोअर. अशा ठिकाणी ती एका सकाळी डोळे उघडते तेव्हां तिच्या अंगावर एकही कपडा नसतो. संपूर्ण इमा रतीत ( तीसेक मजली इमारत) कुणीही नाही. ती इथे कशी आली हे तिला आठवतं. रात्री पार्टी करत असताना नशेत चॅलेंज स्विकारून तिने कपडे उतरवलेले असतात.

त्या आधी या ग्रुपचा प्रँक व्हिडीओज बनवण्याचा धंदा असतो. मात्र हिच्यासोबत असे काही प्रँक घडते कि ती हादरून जातो. नायिका नग्न असूनही कुठेच अश्लीलता नाही. प्रेक्षकाच्या मनात जराही वासनेचा लवलेश असणार नाही याची काळजी दिग्दर्शकाने घेतली आहे. प्रेक्षक तिच्या परिस्थितीशी रिलेट होतो. शाळेत असताना बहुतेकांना हे स्वप्न पडले असणार. आपण शाळेत गेलो आहोत आणि अंगावर कपडेच नाहीत. त्या वेळी स्वप्नातही जाणवणारी लज्जा आणि त्यापोटी आलेली भीती हा इथून पुढे चित्रपटाचा आत्मा आहे.

कपडेच नसल्याने पैसे नाहीत. अशा अवस्थेत मदत मागता येत नाही. त्यातच दरवाजे बंद आहेत. ते महत्प्रयासाने उघडले जातात. मात्र ग्लास पॅनेल मुळे आजूबाजूच्या इमारतीतून मदत येणे अवघड आहे. गच्चीवर जाणे हा मार्ग आहे. पण जायचे कसे ? या परिस्थितीत एक मोठ्या आरशाचा फुटका तुकडा घेऊन ती गच्चीवर जाण्याचे साहस करते. आरसा सतत चमकल्याने शेजारच्या इमारतीतून एक कर्मचारी येतो. पण तो आल्यावर मात्र तिला भय वाटतं. स्वतःला एका मोठ्या हॉल मधे कोंडून घेऊन ती आलेली मदत जाण्याची वाट बघते. तिची ही असहाय्यता आता अंगावर येते. हिची सुटका कशी होणार असे वाटत असतानाच तिला तिचा फोन टेबलाखाली सापडतो. आईचा फोन अठराव्यांदा वाजून बंद झालेला असतो. रिचार्ज केला नसल्याने फोन करता येत नाही. अशा वेळी ती टेलिफोन कंअनीच्या कस्टमर केअरला फोन करत राहते. जोवर एखादी स्त्री उचलत नाही तोपर्यंत. तिला ती समस्या सांगते पण ती फोन ठेवून देते.

भूक लागलेली असते. ती फ्री नंबरवरून बिर्याणी मागवते. पण डिलीव्हरी गर्लची मागणी करते. येतो तो डिलीव्हरी बॉय. ती एक भल्या मोठ्या पाईपचा तुकडा घेऊन बसते. तो येतो आणि दारातच पडतो. त्याच्या पोटातून रक्त वाहत असते. त्याच वेळी दोन जण त्या इमारतीत प्रवेश करतात. ती पुन्हा लपून बसते... आता प्रेत सापडल्यावर पोलीस यायला निघतात.

भय फक्त भूत प्रेत अशा कथेतच नसतं. इथे भय इतके वाटत राहते की चित्रपट पुढे पाहण्याचा हिय्या करता आला नाही. काल्पनिक कथा असली तरी अंगावर येते. अगदी पुरूषांच्याही.
उर्वरीत नंतर पाहीन. जितका पाहिला आहे त्यावरून चांगलाच असणार.

Pages