..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ८)

Submitted by मामी on 17 July, 2021 - 12:36

मंडळी आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा आठवा धागा :
पहिला भाग : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग : http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग : http://www.maayboli.com/node/41855
सहावा भाग : http://www.maayboli.com/node/47126 (गाओ मॅरॅथॉन २०१४)
सातवा भाग : https://www.maayboli.com/node/47162

सातवा भागाचा धागा जरी 9 January, 2014 ला सुरू केला तरी त्या धाग्यावर २०० कोडी पूर्ण व्हायला जुलै २०२१ उजाडलं. आता अनेक नवे खेळाडू आले आहेत आणि खेळात बहार येत आहे. चला आता या आठव्या भागावर नवनवी कोडी घालूया .....

हिंदी गाण्यांची लिस्ट हवी असेल तर ही साईट बघा. मस्त आहे. विविध प्रकारे गाणी शोधायची सोय आहे यावर. https://www.hindigeetmala.net/geetmala/

ही पण एक साईट आहे पण यात सिनेमांवरून गाणी आहेत. http://myswar.co/year

मराठी गाण्यांसाठी https://www.aathavanitli-gani.com/Anukramanika ही साईट छान आहे.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चीज है काम की?

आणि कर्नल अमिताभच्या भूमिकेत "'किताबो में छपते है चाहत के किस्से, हकीकत की दुनिया मे चाहत नही है.."

(८/३१)
प्यार एक रोग शापितो नकळत या जवानीला
Vs
प्यार एक योग लाभतो, अवचीत या जवानीला

कोड्यातल्या गाण्यात दोन्ही गायकच आहेत का?
की एक गायक एक गायिका आहे? दोन्ही गायकच असतील तर हे वरचे चूक.

गाण्यात गायक आणि गायिका आहेत. गजानन, गाण्याचा मूड योग्य आहे. पण हिंदी गाणं आहे. त्यामुळे हे चूक.

हिंट ---- एक आकडाही लपलाय कोड्यात.

नौजवानों बात मानो
कभी किसी से न प्यार करना
(पुकार)

बरोबर की चूक माहीत नाही पण त्यानिमित्ताने 'पुकार'च्या आवडत्या गाण्यांची आठवण झाली. आमच्याकडे कॅसेट होती आणि त्यातली फित झिजेपर्यंत वॉकमनमध्ये ती गाणी ऐकली होती. Happy

८/३१
एका आर्मी ट्रेनिंग कँपमध्ये, कर्नल करणकुमार खुराना , १६ जवानांच्या तुकडीला ट्रेन करत होते. ते सर्वजण कर्नल सरांच्या खडतर ट्रेनिंगमध्ये बरंच काही शिकत होते. पुढे जाऊन हे जवान हनी ट्रॅपमध्ये अडकू नये, म्हणून कर्नल सर्वांची परीक्षा घ्यायची ठरवतात. त्यानुसार कँपजवळच्या भागात काही तरुणी राहायला येतात व वारंवार जवानांच्या नजरेस पडू लागतात. सरांचं लक्ष असतंच सर्वांवर. १०-१५ दिवसांत, त्यांच्या लक्षात येतं की, अर्ध्यापेक्षा जास्त जवान त्यांच्या परीक्षेत नापास झालेत.

लगेच ते संध्याकाळी सर्व जवानांना एकत्र बोलावून, नापास झालेल्या जवानांना चांगलंच खडसावतात. म्हणतात, ' माझं ऐका. प्रेमबिम सब झूठ आहे. कधीच प्रेमात पडू नका.'
तरीही, एक जवान त्यांना उलट उत्तर देतोच, की 'काही झालं तरी आम्ही प्रेम करणारच.'
हे सर्व ते दोघंजण एका गाण्यातून बोलतात. ते गाणं कोणतं?

उत्तर - गजानन

(कर्नल) -- नौ (९) जवानो, बात मानो
कभी किसीसे ना प्यार करना
(जवान) -- हे के सरा ( कर्नल करणकुमार खुराना सर) सरा सरा...... जो भी हो सो हो
हमे प्यार का हो आसरा, फिर चाहे जो हो

कोडं द्यायला भ्याव वाटतं. एकदा कोडं दिलं की इकडं तिकडं जाता येत नाही. उत्तर आलं आणि आपण नसलो की खोळंबा.
कि चालवून घेतात इथं तसं ?

घेतात चालवून द्या.
मी तर नुसतीच येऊन जाते इथे पण उत्तर कधीच येत नाही.

८/३२. पालनगावचा निर्गुणा वेगळा होता. त्याच्यात कुठलाही गुण नव्हता. मात्र कोणत्याही स्पर्धेत उडी घ्यायला तो सदैव तत्पर असायचा. कुठल्याही संकटात धावून जायचा. आपली क्षमता काय हे ही बघत नसायचा. मालनगाव आणि पालनगावात दर वर्षी स्पर्धा असायची. गेल्या वर्षी कुस्तीचा फड होता. मालनगावच्या झब्बू पैलवानासमोर टिकणारे कुणी नसल्याने पालनगावाकडून कुणीही आव्हान स्विकारले नाही. पण निर्गुणाने मागचा पुढचा विचार न करता कुस्तीत उडी घेतली आणि तो हरला. हरलेल्याचा उल्लेख मग हारा, हारे असा व्हायचा. गेल्या वर्षी पैज होती, जे गाव हरेल त्याने वर्षभर गावात पिकणारे धन धान्य भाज्या जिंकणा-या गावाला द्यायचे.

संपूर्ण वर्षभर निर्गुणाच्या चुकीमुळे पालनगावाने आपले धनधान्य मालनगावाला दिले. रागाने सर्वच जण त्याला हारे हारे म्हणायचे.

या वर्षी पण विजेते असल्याने मालनगावाने स्पर्धेचा खेळ ठरवला. गावात राजाच्या सैन्यातला नेमबाज आला होता. तो डोळ्यावर पट्टी बांधून आवाजाचा वेध घ्यायचा. मालनगावाने शब्दवेधाची ( ध्वनीवेध) स्पर्धा ठेवली. या वर्षी अट होती कि जे गाव हरेल ते गाव वर्षभर जिंकणा-या गावाची गुलामी करेल. त्यांना कुठलेही हक्क नसतील. आणि जर स्पर्धेत भाग घेतला नाही तर हरणा-या गावातल्या सर्व स्त्रिया जिंकणा-या गावाच्या होतील.

ही जाचक अट ऐकून पालनगावचे सर्व जण घाबरले. मालनगाव तसं गुंडांचंच होतं. त्यात नेमबाजीची स्पर्धा. पण एक गोष्ट होती.
निर्गुणाला पण नेमबाजीत चांगलीच गती होती. काहीच काम नसल्याने जंगलात जाऊन तो नेमबाजी करत असे.

आता हरलो काय जिंकलो काय निर्गुणाला स्पर्धेत भाग घेणे गरजेचे होते. पण गेल्या वर्षी हरल्याने हारे नाव पडल्याने तो तयार नव्हता.
गावाने त्याच्याकडे जाऊन त्याला विनंती केली.

तॉ कोणत्या गाण्यात केली असेल ?
( टीप : आता खोळंबा होणार नाही)

अगदी बरोबर मानव.

शेवटून दुसरे जे वाक्य आहे त्या वाक्याच्या पूर्णविरामात उत्तर आहे (त्यावर क्लिक केलं की मिळते ते).

शांत माणूस, धाग्यावर स्वागत.

कोड्याचे बरोबर उत्तर मिळाल्यावर मूळ कोडे, उत्तर आणि उत्तर देणार्या आयडीचे नाव असं एकत्रित लिहा ना. आधीच्या कोड्यात कसं लिहीलंय ते बघा.

ठीक आहे मामी.
८/३२. पालनगावचा निर्गुणा वेगळा होता. त्याच्यात कुठलाही गुण नव्हता. मात्र कोणत्याही स्पर्धेत उडी घ्यायला तो सदैव तत्पर असायचा. कुठल्याही संकटात धावून जायचा. आपली क्षमता काय हे ही बघत नसायचा. मालनगाव आणि पालनगावात दर वर्षी स्पर्धा असायची. गेल्या वर्षी कुस्तीचा फड होता. मालनगावच्या झब्बू पैलवानासमोर टिकणारे कुणी नसल्याने पालनगावाकडून कुणीही आव्हान स्विकारले नाही. पण निर्गुणाने मागचा पुढचा विचार न करता कुस्तीत उडी घेतली आणि तो हरला. हरलेल्याचा उल्लेख मग हारा, हारे असा व्हायचा. गेल्या वर्षी पैज होती, जे गाव हरेल त्याने वर्षभर गावात पिकणारे धन धान्य भाज्या जिंकणा-या गावाला द्यायचे.

संपूर्ण वर्षभर निर्गुणाच्या चुकीमुळे पालनगावाने आपले धनधान्य मालनगावाला दिले. रागाने सर्वच जण त्याला हारे हारे म्हणायचे.

या वर्षी पण विजेते असल्याने मालनगावाने स्पर्धेचा खेळ ठरवला. गावात राजाच्या सैन्यातला नेमबाज आला होता. तो डोळ्यावर पट्टी बांधून आवाजाचा वेध घ्यायचा. मालनगावाने शब्दवेधाची ( ध्वनीवेध) स्पर्धा ठेवली. या वर्षी अट होती कि जे गाव हरेल ते गाव वर्षभर जिंकणा-या गावाची गुलामी करेल. त्यांना कुठलेही हक्क नसतील. आणि जर स्पर्धेत भाग घेतला नाही तर हरणा-या गावातल्या सर्व स्त्रिया जिंकणा-या गावाच्या होतील.

ही जाचक अट ऐकून पालनगावचे सर्व जण घाबरले. मालनगाव तसं गुंडांचंच होतं. त्यात नेमबाजीची स्पर्धा. पण एक गोष्ट होती.
निर्गुणाला पण नेमबाजीत चांगलीच गती होती. काहीच काम नसल्याने जंगलात जाऊन तो नेमबाजी करत असे.

आता हरलो काय जिंकलो काय निर्गुणाला स्पर्धेत भाग घेणे गरजेचे होते. पण गेल्या वर्षी हरल्याने हारे नाव पडल्याने तो तयार नव्हता.
गावाने त्याच्याकडे जाऊन त्याला विनंती केली.

तॉ कोणत्या गाण्यात केली असेल ?

बरोबर उत्तर खालीलप्रमाणे
https://youtu.be/kbMinfmC3E0

Submitted by मानव पृथ्वीकर on 10 October, 2021 - 02:59

शेवटून दुसरे जे वाक्य आहे त्या वाक्याच्या पूर्णविरामात उत्तर आहे (त्यावर क्लिक केलं की मिळते ते).
>> मला वाटले मानव यांनी शोधून काढले... ही तर चिटिंग आहे.. प्रश्नातच उत्तर देणे...

वाक्याच्या पूर्णविरामात उत्तर आहे (त्यावर क्लिक केलं की मिळते ते).
Submitted by शांत माणूस on 10 October, 2021 - 12:31 >>>>>
अशी काही आवश्यकता नसते शांत माणूस.
जाणीव + मान्य असते सर्वांना की कोडेकर्ता कामात गुंतला तर नाही येऊ शकत.
लोक थांबतात आपण येऊन क्ल्यू देईस्तोवर / दिलेली उत्तरे चूक-बरोबर म्हणेपर्यंत.
फारच उशीर झाला १-२ दिवस वगैरे तर कोडे बाकी ठेवून पुढचे घेतात.

तुमचे पहिलेच कोडे होते का हे? वाचता वाचताच गाणे समजले. पुढच्या वेळी थोडे अजून कठीण करा, ४-५ गाणी आठवली पाहिजेत. मग त्यातून eliminate करत जायचे.

8/33

हातीमताई निघाला होता कामगिरीवर तिसरा की चौथा प्रश्न सोडवण्याच्या. सात पर्वत, सात अरण्यं, सात दऱ्या त्यानं पार केल्या आणि तो त्या किरमिजी पाणी असलेल्या तळ्याकाठी येऊन पोचला. तिथं एकच केऑस होता नुसता. खूप लोक गडबडा वाळूत लोळत, छाती पिटुन घेत 'एक बार देखा है, फिरसे देखने की तमन्ना है' असं म्हणत होते. काही लोक सुन्न होऊन शून्यात नजर लावून बसले होते. हातीम तहान लागली म्हणून तळ्यापाशी गेला तर एक मासा त्याच्या चाहुलीने बाहेर येउन मनुष्यवाणीने म्हणाला 'कोण बाबा तू? सुरक्षित राहायचं असेल तर सूर्यास्त होण्याआधी इथून निघून जा कसा...' हातीमला नवल वाटलं. त्याने त्या जागेची हकीकत त्याला विचारली. मासा सांगू लागला. या तळ्यात एक जादूगार राजकुमारी राहते. तिचं आमच्या राजकुमारावर प्रेम बसलं पण राजकुमाराने तिला नाकारलं. त्याला पाण्यात राहणाऱ्या बाईशी लग्न करायचं नव्हतं, त्याला आवडत नसे ओलं व्हायला. त्यामुळे चिडून तिने आमच्या राज्याला शाप दिला की सगळं राज्य एक मोठं तळं बनेल आणि सगळे प्रजाजन मासे. 'ज्या पाण्यात राहायला तुला आवडत नव्हतं त्याच पाण्याशिवाय तुला जगता येणार नाही' असं ती राजकुमाराला म्हटली. तसंच झालं. शिवाय या तळ्यापाशी जे प्रवासी येतात त्यांनाही ती भुलवते, तिच्या जलमहालात घेऊन जाते आणि नंतर त्यांना ते काहीच पुन्हा दिसत नाही. ते वेडे होतात आणि इथेच बसून राहतात. रोज संध्याकाळी तिचा फेरा असतो बाबा तळ्याकाठी....' मासा बोलतच सुटला होता. खूप दिवसांनी त्याला कुणीतरी मनुष्य बोलायला मिळाला होता. तेवढ्यात तळ्याच्या पृष्ठभागावर हालचाल झाली आणि तेजस्वी प्रकाश दिसू लागला. ही तीच राजकुमारी हे हतीमने ओळखलं आणि तो पटकन लपायला जागा शोधू लागला. मासा मात्र बोलतच सुटला होता. थांबायचं नावच घेत नव्हता. 'अरे वेड्या गप की! तिला इथे कुणीतरी नवीन माणूस आल्याचा सुगावा लागेल ना!' अशी हतीमने त्याला परोपरीने विनंती केली पण माशाने बोलणं थांबवायचं चिन्ह दिसत नव्हतं. हातीम तेव्हा काय गाणं म्हणेल?
(एवढ्याश्या गाण्यासाठी केवढी ती स्टोरी! घ्या वाचून आता काय!)

क्या बात है मामी, तू काहीशी बरोबर ट्रॅकवर आहेस. म्हणजे माशाचा टाईप बरोबर ओळखलास तू! पण गाणं हे नाही.

Pages