Submitted by आशूडी on 10 February, 2016 - 05:51
बेत काय करावा वर अंदाजाच्या प्रश्नोत्तरांची वाढती संख्या पाहून हा धागा काढण्यात आलेला आहे. उद्देश तोच - पुनर्वापर!
एखाद्या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात काही पदार्थ करायचा असल्यास काही अनुभवी लोकांचा सल्ला घेणे योग्य वाटते. तर अशा प्रकारची चर्चा इथे करू. बेत काय करावा वर फक्त बेतच ठरवू.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आदू
आदू
पनीर नको असेल तर मटार किंवा
पनीर नको असेल तर मटार किंवा मटकी उसळ करा. किंवा मटार पनीर.
अन्दाज विचारायला आलेल्या
अन्दाज विचारायला आलेल्या व्यक्तिचा मेनुच चेन्ज करतोय की आपण !!तरी वर लिहलेय तसा अनुभव मलाही आहे जेष्ठ लोकाना पनिर फारस आवडत नाही.
ज्येष्ठांना पनीर आवडत नाही हे
ज्येष्ठांना पनीर आवडत नाही हे काही अपवाद सोडता अनेकांशी जुळणारं निरीक्षण आहे.
माझी आजी म्हणत असे "आम्ही
माझी आजी म्हणत असे "आम्ही नासकं दूध फेकून देतो, तुम्ही कशाला भाजीत घालून खाता?"
त्यामुळे हे त्यांचं मेंटल कंडिशनिंग असावं असंही वाटतंय
आमच्याकडेही पनीरला नाकं
आमच्याकडेही पनीरला नाकं मुरडली जायची. पण घरी पनीरच्या भाज्या बनवायला लागल्यावर नावड आवडीत रुपांतरीत झाली.
हॉटेलमधलं पनीर कधीकधी फार रबरी लागतं त्यामुळे असेल किंवा मग रीया म्हणतात तसं मेंटल कंडीशनिंग.
आपण हे किती प्रोटीनयुक्त असतं हा धोशा सोडायचा नाही. प्रयत्ने वाळूचे….
अर्थात हे सगळं घरात. बाहेरच्या ज्येनांना पार्टी द्यायची असेल तर लोएस्ट कॉमन डिनॉमिनेटरमधे बसणार नाही.
माझी आजी म्हणत असे "आम्ही
माझी आजी म्हणत असे "आम्ही नासकं दूध फेकून देतो, तुम्ही कशाला भाजीत घालून खाता?">>> अगदी सेम रिया, माझ्या साबां, दुध नासलं कि टाकून द्यायच्या. पण मी दुधाचं नासकवणी करायला लागल्यापासून त्यांना पण आवडायला लागलं. मग पनीर केलं तरी खायच्या पनीर ची भाजी.
आम्ही घरी पनीर भुर्जी किंवा
आम्ही घरी पनीर भुर्जी किंवा पनीर कॅप्सीकम बटाटा कांदा टोमॅटो मिक्स भाजी करतो. ती आवडते.
एकंदर पनीर हा मुख्य भाजी स्वरूपात थेट ठोकळा म्हणून एकटा खावा लागला तर बोअर होतो.कश्यात तरी मिसळून चांगला लागतो.रितेश देशमुख सारखा.(याचा अर्थ रितेश देशमुख ची भुर्जी करणे असा न घेता योग्य तो घ्यावा )
मला वाटतं दूध आपोआप नासण
मला वाटतं दूध आपोआप नासण (वयस्कर लोक म्हणतात ते) आणि ठरवून एका उच्च तापमानावर नासवण यात फरक असावा. नक्की माहीत नाही. मला पण आपोआप नासलेल्या दुधाचे केलेले इतर काही पदार्थ आवडत नाहीत पण पनीर चालतं. काही तरी मेंटल ब्लॉक असावा माझा...
वयस्क आणि पनीर नावड बद्दल
वयस्क आणि पनीर नावड बद्दल अगदी अगदी.
पण नासके दूध फेकून??? नाही रे बाबा! ते मंद आचेवर परतवून साखर, वेलची घालून खातील ज्ये ना. फेकून! शक्यच नाही.
पण पनीर केलं तर शिवणार नाहीत.
पूर्वीचे लोक दूध दही ताक लोणी
पूर्वीचे लोक दूध दही ताक लोणी खायचे
मी कुठल्या विश्वात रहातो
मी कुठल्या विश्वात रहातो कुणास ठाऊक. आता मला पनीर अजिबात न खाणारे दोन तीन ज्येना भेटल्या शिवाय चैन पडणार नाही. आले घरी ज्येना की बनवा/ऑर्डर करा पनीर मोहीम सुरू करतो मी आता.
मी कुठल्या विश्वात रहातो
मी कुठल्या विश्वात रहातो कुणास ठाऊक>> मलाही असेच वाटतेय..
सेम पिंच मानव!
सेम पिंच मानव!
एकंदर पनीर हा मुख्य भाजी
एकंदर पनीर हा मुख्य भाजी स्वरूपात थेट ठोकळा म्हणून एकटा खावा लागला तर बोअर होतो.कश्यात तरी मिसळून चांगला लागतो >> हो. पण हे आपल्याकडे (महा. साऊथ, गुजरात वगैरे). नॉर्थला पनीर मस्त असतो. दिल्लीपेक्षाही चंडीगड, अमृतसर वगैरेला. तिथे शाही पनीर डिशही अगदी मस्त लागते. इकडे ती आवडीने नाही खाऊ शकत.
मी पनीर बटर मसाला , पनीर
मी पनीर बटर मसाला , पनीर कॅप्सिकम / पालक पनीर/ मटर पनीर बनवते. पनीरचे क्युब बनवून मैदा, गरम मसाला तिख ट मीठ आमचूर अश्या मसाल्यात घोळवून तळले तर छान स्टार्टर होते. तळलेले पनी र एकदम बेस्ट लागते. अगदी १९९१- मधे टूर ला जाय चे तर रात्री रूम वर आल्यावर पनीर बटर मसाला व नान. आणि मग आपला साउथ इंडिअन दही भात ऑर्डर करणे ही चैनीची परमावधि होती. सिंपल हॅपी डेज.
म्हशीच्या किंवा घट्ट असलेल्या
म्हशीच्या किंवा घट्ट असलेल्या नासक्या दुधाचे पाणी फेकून देऊन उरलेल्या गोळ्याची भुर्जी करून खाऊन पहा. आवडत असलेले पनीर किंवा तोफु नावडते होईल. दूध नासावं म्हणून गुपचूप मिठाचा खडा टाकायची सवय लागेल
अमित, ते बहुदा एकरांत आडनाव
अमित, ते बहुदा एकरांत आडनाव असलेल्यांकडे नसक्या दुधाची मिठाई बनवून खात असावेत. कारण सासरी बनवतात नासलेल्या दुधात काय काय घालून त्याचे पदार्थ पण आमच्याकडे (माहेरी) धडाधड फेकून देतात.
एकारांत आडनाववाल्यांनी दिवे घ्या. लागत नसतील तरी घेऊन ठेवा सोबतीला. फुकट मिळतायेत कशाला सोडायचे. (पुन्हा घ्या दिवे)
बहुदा एकरांत आडनाव
बहुदा एकरांत आडनाव असलेल्यांकडे नसक्या दुधाची मिठाई बनवून खात असावेत. कारण सासरी बनवतात नासलेल्या दुधात काय काय घालून त्याचे पदार्थ पण आमच्याकडे (माहेरी) धडाधड फेकून देतात.>> हिलेरिअस नासके पूर्वग्रह. अजून सासर आपले नाही का वाटत? कलाकंद घ्या.
शक्यतो पदार्थ वाया न जाऊ
शक्यतो पदार्थ वाया न जाऊ देण्याचा प्रयत्न करणे ह्यात वाईट काय आहे ?
आणि मस्तवालपणे वस्तू धडाधड फेकून देणे ह्यातही कौतुकास्पद काय आहे?
असे मस्तवालपणे फेकाफेकी करून नंतर लोकांपुढे हात पसरणारेही पाहिले आहेत आणि काटकसरीनं, गरजा कमी ठेऊन, ऊतमात न करता असेल त्यात स्वाभिमानानं राहून टुकीनं संसार करणारेही पाहिलेत. रिसोर्सेस नीटच वापरले जावेत.
तरीही
दूध नासलं असेल तर नासण्याचं कारण शोधावं. त्यात कीटक वगैरे पडून नासलं असेल तर शक्यतो ते वापरू नये. कारण मग विषबाधेचा धोका असू शकतो. उन्हाळ्यामुळे किंवा न तापवल्यामुळे नासलं असेल
आणि कडू झालं नसेल तरच नासकवणी किंवा इतर काही करतात.
नासक्या दुधाचा पुनर्वापर करायचा असेल तर त्यात डाळीचे पीठ घालून त्याचा फेसपॅकही करता येतो.
दूध नासल्ं तरी त्यात लिंबू
दूध नासल्ं तरी त्यात लिंबू पिळून गाळून घेऊन ते पनीर म्हणून नक्की वापरू शकतो.
फेकून देण्याचा माज आणि असल्या भाकड माजेचा अभिमान वाचून धन्य झाले.
असे मस्तवालपणे फेकाफेकी करून नंतर लोकांपुढे हात पसरणारेही पाहिले आहेत >>> परफेक्ट मेधावि.
चांगलं दूध पनीरसाठी नासवलं तर
चांगलं दूध पनीरसाठी नासवलं तर उरलेलं पाणी फेकून का देता? मी त्या पाण्यात भात शिजवते, कणीक मळते. जिराराईस करताना लिंबू पिळलं की भात जसा मोकळा होतो तसाच या पाण्यानेही होतो. शिवाय पनीरचे फॅट्स वेगळे झाले तरी हलका तवंग राहतो त्यामुळे भात मऊ होतो. भाताचा/ पोळ्यांचा रंग किंचित पिवळसर वाटतो तेवढंच. पण या पाण्यात नैसर्गिक व्हे प्रोटीन असतं असं एका डाएटिशियन ने सांगितलं होतं.
बरोबर आहे प्रद्न्या.
बरोबर आहे प्रद्न्या.
मेधावि, पोस्ट पटली. पूर्वी
मेधावि, पोस्ट पटली. पूर्वी फ्रीज नव्हते त्यामुळे उन्हाळ्यात कलाकंद खायला मिळायचं.
प्रद्न्या, मी पण पाणी फेकत नाही. मला तर वाईट खोड काहीही फेकायच्या आधी दहादा विचार करते, दोन दिवस ठेवते कामाचं नाही वाटलं की मग फेकत्.
पाण्यात नैसर्गिक व्हे प्रोटीन
पाण्यात नैसर्गिक व्हे प्रोटीन असतं असं एका डाएटिशियन ने सांगितलं होतं.>>>> Oh! Ok!
चक्का करण्यासाठी दही बांधलं की जे पाणी गोळा होत त्याचं काय करतात? मी झाडांना टाकते कारण नक्की काय करावे हे माहीत नाही...
चक्क्याच्या पाण्याला निवळी
चक्क्याच्या पाण्याला निवळी म्हणतात आमच्याकडे. आमच्या घरी कढी/सार/कढण/ उपमा बनवत ती वापरून.
शक्यतो पदार्थ वाया न जाऊ
शक्यतो पदार्थ वाया न जाऊ देण्याचा प्रयत्न करणे ह्यात वाईट काय आहे ?
आणि मस्तवालपणे वस्तू धडाधड फेकून देणे ह्यातही कौतुकास्पद काय आहे?>>>> +१.
४० माणसांसाठी पावभाजी बनवायची
४० माणसांसाठी पावभाजी बनवायची आहे. भाज्यांचे प्रमाण कसे घ्यावे?
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/72251
माऊमैया
चक्क्याच्या पाण्याला निवळी
चक्क्याच्या पाण्याला निवळी म्हणतात आमच्याकडे. आमच्या घरी कढी/सार/कढण/ उपमा बनवत ती वापरून.>>>> वापरून बघते पुढच्या वेळी.
Pages