घरची बाग, भाग १ ( फुलझाडं)

Submitted by मीपुणेकर on 11 May, 2021 - 14:31

आम्ही घरी गेली 12 वर्षे काही फुलं, फळं, भाजीपाला घरच्या ओल्या कचर्‍यापासून कंपोस्ट करुन सेंद्रिय पद्धतीने वाढवत आहोत.
बागेतले काही निवडक फोटो ईथे या सिरीज मध्ये देत आहे.
या भागात फुलांचे फोटो आहेत. गेल्या काही वर्षातले एकत्र असे हे फोटो आहेत.
यातली काही फुलं, फळं, भाज्या झाडे आता बागेत नाहीत, तर काही नवीन झाडांची अजून त्यात भर पडणे हे चक्र सुरु असते. Happy

१> ही पिंक जास्मीन ची वेल.
नर्सरीतून अगदी हातभर लांबीचं रोपं आणून लावलं होतं. ते आता गझेबुवर आजूबाजूला ईतस्त: पसरलं आहे.
हे पेरेनियल आहे. साधारण ईथे कॅलिफोर्नियामधला हिवाळ्याचा कडाका कमी झाला कि गुलाबी कळ्यांनी हा वेल बहरतो. खाली त्या गुलाबी कळ्यांचा फोटो दिला आहे. अर्ली स्प्रिंग पासून समर सुरु होई पर्यंत ३ एक महिने या सुंदर सुवासिक फुलांचा बहर असतो.
संध्याकाळ ढळून रात्री ची सुरवात होणार्‍या प्रकाशात 'फुलांचे चांदणे अंगणात सांडले' हा अनुभव देतो. Happy
पिंक जास्मीन अगदी लो मेंटेनन्स प्रकारात येते. सूर्यप्रकाश , अधून मधून पाणी, बहर येऊन गेला कि जरा प्रुनिंग करुन (हे खरतर ऑप्शनल पण हा वेल फार पसरतो ) एवढ्याच गोष्टींवर दर वर्षी हि फुले भरभरून येत राहतात.

904579_603406406337218_1619423712_o.jpg

२> पिंक जास्मीनची वेल गुलाबी कळ्यांनी बहरलेला
ea00c120-ed8f-41ca-ac20-c82148cd5008.jpg

३> पिंक जास्मीन
93d9eb0d-4135-46c6-9daf-7fc9f1f86d07.jpg

४>पिंक जास्मीन
3e0bc77d-b2f5-4682-8349-2dbdd206b916.jpg

५> पिंक जास्मीन
415ba303-3525-4a35-97b8-40d0385365f9.jpg

६> विविध रंगांची झिनीयाची फुलं.
याच्या बियांचं पाकिट मिळत. जर बियांपासून सुरु करण शक्य नसेल तर रोपं पण मिळतात. समर मध्ये फुलं येतात.

1916271_138643769480153_3656459_n.jpg

७>
1916319_138643546146842_1803487_n.jpg

८>
1916319_138643556146841_7624208_n.jpg

९>
1916319_138643552813508_5948922_n.jpg

१०>
1916319_138643539480176_6393686_n.jpg

११>
1916271_138643776146819_2842419_n.jpg

१२>
1916271_138643779480152_5408065_n.jpg

१३>
1916319_138643556146841_7624208_n.jpg

१४>
1916319_138643576146839_2377294_n.jpg

१५>
1916319_138643579480172_409307_n.jpg

१६>
1916319_138643582813505_1955298_n.jpg

१७>
1916319_138643586146838_5223525_n.jpg

१८> डॅफोडिल्स.
याचे कंद आणून लावले. डॅफोडिल्स पण स्प्रिंग मध्ये फुलतात. एकदा कंद लावले आणि अधून मधून पाणी घातले कि बास. दर वर्षी त्यांची वेळ झाली कि फुलतात. फार दिवस टिकत नाहीत मात्र. पण सुंदर दिसतात.

10515276_830890336922156_1948487590251997760_o_0.jpg

१९>
88032391_3099169046760929_629207894205661184_n_0.jpg

२०>
883135_603405569670635_1655056371_o.jpg

२१> हे फुलांच शोभेचं झाड.
मला नाव सध्या लक्षात नाही. पण गुगलून बघायला हवं. याच्या बिया लावल्या होत्या. या फुलांना काही वास नसतो पण सुंदर दिसतात म्हणून शोभेसाठी लावली.
652369e8-760c-43bc-ac54-5de03c4d69ec.jpg

२२> मोगरा
ईथे नर्सरी मध्ये अरेबिक जास्मीन म्हणून मिळाला. याचे रोप आणून ३ दा प्रयत्न केला पण थंडी मध्ये आत नेऊन, एरवी सर्वतोपरी काळजी घेऊन सुद्धा ते जगले नाही. पण हाय तो मोगर्‍याचा सुगंध. नर्सरीत गेले कि अजून मोगर्‍याचा शोध सुरु असतो.
आता ईथे फोटो नाही, पण गार्डेनिया (अनंत) पण सुंदर सुवासिक फुलं. नर्सरीतून २ दा आणून खूप प्रयत्न केला पण ते काही फार वर्षे जगले नाही Sad
622396_486367818041078_2124276278_o.jpg

२३> मेरीगोल्ड, आपला झेंडू

29510_134897779854752_2542954_n.jpg

२४> लिली ऑफ नाईल किंवा आफ्रिकन लिली ( Agapanthus)
हि पण शोभेची झाडं, समर मध्ये छान फुलतात.
29510_134897793188084_5160538_n.jpg

२५> केशरी जास्वंद
259478_486367841374409_1611024724_o.jpg

२६>लाल जास्वंद
10365446_830890353588821_2206327229959399099_o.jpg

२७> हे डेझी पॉम पॉम फ्लॉवर्स या नावाने ओळखले जातात. (Chrysanthemum Poms असं सायंटिफिक नाव)

वेगवेगळ्या रंगातल्या या फुलांची छोटी कुंडी आमच्या टीम मधल्या सगळ्यांना भेट म्हणून बिग बॉस कडून मिळाली. मी ती आणून घरापुढे लावली. हिवाळ्यात हे झाड सुकून हायबरनेट झालं पण परत जरा थंडी सरली कि छान पालवी फुटून उन्हाळ्यात छान फुले येत राहिली.

bb0cdc48-51de-4952-a944-7b3af04dd59e.jpg

२८> खाली बागेतले विविध रंगाचे गुलाबांचे फोटो आहेत.
10524628_830890220255501_2114250091985295588_o.jpg

२९>
10499440_830891410255382_3879432440556610172_o.jpg

३०>
10496220_830890413588815_2010494180643435797_o.jpg

३१>
10387056_830890276922162_1848359552503952722_o.jpg

३२>
a5f4b5e4-c1a9-48ab-a56e-a44dc2a5cccf_0.jpg

३३>
29510_134897596521437_5596421_n.jpg

३४>
89339723_3099169120094255_9149960956887957504_n.jpg

३५>
0b8a3205-225c-4808-9594-34a249b28de6.jpg

३६> हा अत्यंत सुवासिक असा गावठी गुलाब.
10255784_830890403588816_1060478546248973672_o.jpg

३७>
29510_134897523188111_4623296_n.jpg

३८>
6d4ba903-e070-4bcd-8b47-58eac0e5fcd1.jpg

३९>
37981_151535064857690_3752052_n.jpg

४०>
1910115_830901453587711_4231560915598466947_n.jpg

४१>
125060869_3794066020604558_3788411846637757574_n.jpg

४२> बागेतली फुलं एरवी तोडत नाही, पण काही कारणास्तव, सणवाराला सजावटीसाठी वापरतो. ही त्यापैकी एक बागेतल्या फुलांची सजावट.
dde6b476-390e-428b-8669-e4a7992d08ac.jpg

पुढील भागात - आपण खातो त्या काही भाज्या, फळांची फुलं पण कमालीची देखणी, सुवासिक असतात.
तर पुढच्या भागात बागेतल्या अशा काही सुंदर सुवासिक फुलांबद्दल Happy

क्रमश:

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अप्रतिम फोटो...
मन प्रसन्न झालं फुलांचे फोटो पाहून..!

जबरी !
फुलांची नावं पण लिही प्लिज.

फारच सुंदर. फोटोतला अलीकडे कमी आढळणारा गावठी गुलाब पाहून त्याचा सुगंध नाकात घमघमला आणि मनात दरवळला.

अप्रतिम..
41 no चे फुल तर पहिल्यांदाच पाहिले,काय सुरेख रंग..वा!

गुलाब आवडले.
पहिले पांढऱ्या आणि लाल फुलांच्या वेलाची कमान ( pergola) केली ती कोणती?

रुपाली, अमित, पराग, केया, जाई, प्रणवंत, हीरा, तेजो, Srd, स्वाती२, वावे धन्यवाद!

@हीरा, अगदी अचूक ओळखलत, गावठी गुलाब खरच काय सुंदर सुवासिक आहेत. याचा गुलकंद करायचं मनात येतं, पण ती झाडावरची सगळी फुलं तोडायला मन धजावत नाही अजून.

पराग, जाई, वावे - आठवताहेत त्या फुलांना नावं दिली वर. खरतर हे मागच्या वर्षी बागकामाची सुरवात, अनुभव असे लिखाण आणि फोटो ड्राफ्ट लिहायला सुरवात केली . पण ते काही पुढे सरकेना. म्हणून फोटो सिरीज सुरु केली Happy

बरं झालं नावं आणि माहिती लिहिलीस ते.

गावठी गुलाब >> हा काय नावाने मिळतो ? इथे सुवासिक गुलाब फार कमी बघितले आहेत.

बरं झालं नावं आणि माहिती लिहिलीस ते.>>> + 1

मी पण थोडक्या हौशी बागकामला सुरुवात केलीये. सदाफुली, तुळस , गुलाब लावून . तू अनुभव शेयर केलेस तर आमच्यासारख्या हौशीना मदत होईलच

मिपु, अनंताची हार्डी व्हरायटी मिळते. दोन एक फुटच उंच वाढतो, पण भरपूर फुलं येतात. आम्ही तिकडे असताना कुंडी बाहेरच ठेवुन चार वर्षे छान जगला होता. भारतवारीत त्याला महिना महिना पाणी ही मिळालं नाही तरी एकदम हार्डी होता Proud होम डिपोतुन आणलेला मला वाटतं.

@ पराग, खात्रीच्या नर्सरीमधे विचारुन बघ, पण बहुतेक Damascus Rose, Scented Rose म्हणून हे गुलाब मिळतील.
एरवी चक्कर मारली तर फार दिसले नाहीत.

@जाई, हो, आम्ही पण चुकतमाकत पुढे जात आहोत. जमेल तसं नक्की लिहीत राहीन ईथे Happy

@अमित, अरे हो का? धन्यवाद, हे फार भारी काम होईल मग, शोधत राहते हार्डी व्हरायटी. अनंत फार आवडतो. होप डेपो, लोज नर्सरी सेक्शनमध्ये कधीही जायला आवडतं Happy

सुंदर आहे घरची बाग, सगळ्या फुलांचे रंग चटकदार आहेत.
सगळे गुलाब मस्तच, आणि गावठी गुलाब तर अहाहा .....
ती सगळी जर्बेराची फुलं नसून झिनियाची आहेत
२१> हे फुलांच शोभेचं झाड.>>>>>Geranium वाटतंय

सुरेख बगीचा आहे.
गुलाबांचा ताटवा तर अहाहा. रंगीबेरंगी आहे.
हल्ली देशी / गावठी गुलाब नर्सरीत मिळत नाहीत.

पिंक जास्मीन ची वेल.
कळ्या गुलाबी आणि फुले पांढरी असे असतात काय? ही प्रजाती भारतात दिसली नाही अजून.

खूप खूप खूप सुंदर फुले आहेत. ती पण तिथल्या थंड वातावरणात. . _/\_
एवढी मस्त फुले वाढवणे तर मला इथे पण नाहीत जमणार. .

ऋतुराज, अस्मिता, वर्णिता, सीमा, सोनाली, धनवन्ती, क्रिशा धन्यवाद Happy

@ऋतुराज, हो बरोबर गडबड झाली, वर बदल करते Happy

@Srd, पिंक जास्मीन फुले गुलबट पांढर्‍या रंगांची असतात, देठ गुलाबी असतो. कळ्या गुलाबी दिसतात. हे बघा फुलांचा क्लोजप

pink_Jasmine.jpgPink_Jasmine2.jpg

दक्षिण कोंकणात आणि गोव्याकडे ज्यांना जाई म्हणतात आणि मुंबई व उत्तर कोंकणात चमेली, ती फुले म्हणजे पिंक जस्मिन असावीत का? पण फोटोतली वेेल आणि पाने किंचित वेगळी दिसत आहेत.
की ती वेल दुसऱ्याच कुठल्या फुलाची आहे?