आम्ही घरी गेली 12 वर्षे काही फुलं, फळं, भाजीपाला घरच्या ओल्या कचर्यापासून कंपोस्ट करुन सेंद्रिय पद्धतीने वाढवत आहोत.
बागेतले काही निवडक फोटो ईथे या सिरीज मध्ये देत आहे.
या भागात फुलांचे फोटो आहेत. गेल्या काही वर्षातले एकत्र असे हे फोटो आहेत.
यातली काही फुलं, फळं, भाज्या झाडे आता बागेत नाहीत, तर काही नवीन झाडांची अजून त्यात भर पडणे हे चक्र सुरु असते.
१> ही पिंक जास्मीन ची वेल.
नर्सरीतून अगदी हातभर लांबीचं रोपं आणून लावलं होतं. ते आता गझेबुवर आजूबाजूला ईतस्त: पसरलं आहे.
हे पेरेनियल आहे. साधारण ईथे कॅलिफोर्नियामधला हिवाळ्याचा कडाका कमी झाला कि गुलाबी कळ्यांनी हा वेल बहरतो. खाली त्या गुलाबी कळ्यांचा फोटो दिला आहे. अर्ली स्प्रिंग पासून समर सुरु होई पर्यंत ३ एक महिने या सुंदर सुवासिक फुलांचा बहर असतो.
संध्याकाळ ढळून रात्री ची सुरवात होणार्या प्रकाशात 'फुलांचे चांदणे अंगणात सांडले' हा अनुभव देतो.
पिंक जास्मीन अगदी लो मेंटेनन्स प्रकारात येते. सूर्यप्रकाश , अधून मधून पाणी, बहर येऊन गेला कि जरा प्रुनिंग करुन (हे खरतर ऑप्शनल पण हा वेल फार पसरतो ) एवढ्याच गोष्टींवर दर वर्षी हि फुले भरभरून येत राहतात.
२> पिंक जास्मीनची वेल गुलाबी कळ्यांनी बहरलेला
३> पिंक जास्मीन
४>पिंक जास्मीन
५> पिंक जास्मीन
६> विविध रंगांची झिनीयाची फुलं.
याच्या बियांचं पाकिट मिळत. जर बियांपासून सुरु करण शक्य नसेल तर रोपं पण मिळतात. समर मध्ये फुलं येतात.
७>
८>
९>
१०>
११>
१२>
१३>
१४>
१५>
१६>
१७>
१८> डॅफोडिल्स.
याचे कंद आणून लावले. डॅफोडिल्स पण स्प्रिंग मध्ये फुलतात. एकदा कंद लावले आणि अधून मधून पाणी घातले कि बास. दर वर्षी त्यांची वेळ झाली कि फुलतात. फार दिवस टिकत नाहीत मात्र. पण सुंदर दिसतात.
१९>
२०>
२१> हे फुलांच शोभेचं झाड.
मला नाव सध्या लक्षात नाही. पण गुगलून बघायला हवं. याच्या बिया लावल्या होत्या. या फुलांना काही वास नसतो पण सुंदर दिसतात म्हणून शोभेसाठी लावली.
२२> मोगरा
ईथे नर्सरी मध्ये अरेबिक जास्मीन म्हणून मिळाला. याचे रोप आणून ३ दा प्रयत्न केला पण थंडी मध्ये आत नेऊन, एरवी सर्वतोपरी काळजी घेऊन सुद्धा ते जगले नाही. पण हाय तो मोगर्याचा सुगंध. नर्सरीत गेले कि अजून मोगर्याचा शोध सुरु असतो.
आता ईथे फोटो नाही, पण गार्डेनिया (अनंत) पण सुंदर सुवासिक फुलं. नर्सरीतून २ दा आणून खूप प्रयत्न केला पण ते काही फार वर्षे जगले नाही
२३> मेरीगोल्ड, आपला झेंडू
२४> लिली ऑफ नाईल किंवा आफ्रिकन लिली ( Agapanthus)
हि पण शोभेची झाडं, समर मध्ये छान फुलतात.
२५> केशरी जास्वंद
२६>लाल जास्वंद
२७> हे डेझी पॉम पॉम फ्लॉवर्स या नावाने ओळखले जातात. (Chrysanthemum Poms असं सायंटिफिक नाव)
वेगवेगळ्या रंगातल्या या फुलांची छोटी कुंडी आमच्या टीम मधल्या सगळ्यांना भेट म्हणून बिग बॉस कडून मिळाली. मी ती आणून घरापुढे लावली. हिवाळ्यात हे झाड सुकून हायबरनेट झालं पण परत जरा थंडी सरली कि छान पालवी फुटून उन्हाळ्यात छान फुले येत राहिली.
२८> खाली बागेतले विविध रंगाचे गुलाबांचे फोटो आहेत.
२९>
३०>
३१>
३२>
३३>
३४>
३५>
३६> हा अत्यंत सुवासिक असा गावठी गुलाब.
३७>
३८>
३९>
४०>
४१>
४२> बागेतली फुलं एरवी तोडत नाही, पण काही कारणास्तव, सणवाराला सजावटीसाठी वापरतो. ही त्यापैकी एक बागेतल्या फुलांची सजावट.
पुढील भागात - आपण खातो त्या काही भाज्या, फळांची फुलं पण कमालीची देखणी, सुवासिक असतात.
तर पुढच्या भागात बागेतल्या अशा काही सुंदर सुवासिक फुलांबद्दल
क्रमश:
अप्रतिम फोटो...
अप्रतिम फोटो...
मन प्रसन्न झालं फुलांचे फोटो पाहून..!
सुंदर!
सुंदर!
जबरी !
जबरी !
फुलांची नावं पण लिही प्लिज.
आ हा हा.. डोळे निवले..फार
आ हा हा.. डोळे निवले..फार सुंदर
सुंदर ! तुझी मेहनत दिसून
सुंदर ! तुझी मेहनत दिसून येतेय. सुरेख उममली आहेत फुलं
फुलांची नावं पण लिही प्लिज.>>> + 1
सुंदर आहे तुमची परसबाग !
सुंदर आहे तुमची परसबाग !
फारच सुंदर. फोटोतला अलीकडे
फारच सुंदर. फोटोतला अलीकडे कमी आढळणारा गावठी गुलाब पाहून त्याचा सुगंध नाकात घमघमला आणि मनात दरवळला.
अप्रतिम..
अप्रतिम..
41 no चे फुल तर पहिल्यांदाच पाहिले,काय सुरेख रंग..वा!
गुलाब आवडले.
गुलाब आवडले.
पहिले पांढऱ्या आणि लाल फुलांच्या वेलाची कमान ( pergola) केली ती कोणती?
सुंदर!
सुंदर!
सुंदर फोटो. पण नावं पाहिजेत.
सुंदर फोटो. पण नावं पाहिजेत. मोगऱ्याचा फोटो बघून छान वाटलं.
रुपाली, अमित, पराग, केया,
रुपाली, अमित, पराग, केया, जाई, प्रणवंत, हीरा, तेजो, Srd, स्वाती२, वावे धन्यवाद!
@हीरा, अगदी अचूक ओळखलत, गावठी गुलाब खरच काय सुंदर सुवासिक आहेत. याचा गुलकंद करायचं मनात येतं, पण ती झाडावरची सगळी फुलं तोडायला मन धजावत नाही अजून.
पराग, जाई, वावे - आठवताहेत त्या फुलांना नावं दिली वर. खरतर हे मागच्या वर्षी बागकामाची सुरवात, अनुभव असे लिखाण आणि फोटो ड्राफ्ट लिहायला सुरवात केली . पण ते काही पुढे सरकेना. म्हणून फोटो सिरीज सुरु केली
बरं झालं नावं आणि माहिती
बरं झालं नावं आणि माहिती लिहिलीस ते.
गावठी गुलाब >> हा काय नावाने मिळतो ? इथे सुवासिक गुलाब फार कमी बघितले आहेत.
बरं झालं नावं आणि माहिती
बरं झालं नावं आणि माहिती लिहिलीस ते.>>> + 1
मी पण थोडक्या हौशी बागकामला सुरुवात केलीये. सदाफुली, तुळस , गुलाब लावून . तू अनुभव शेयर केलेस तर आमच्यासारख्या हौशीना मदत होईलच
मिपु, अनंताची हार्डी व्हरायटी
मिपु, अनंताची हार्डी व्हरायटी मिळते. दोन एक फुटच उंच वाढतो, पण भरपूर फुलं येतात. आम्ही तिकडे असताना कुंडी बाहेरच ठेवुन चार वर्षे छान जगला होता. भारतवारीत त्याला महिना महिना पाणी ही मिळालं नाही तरी एकदम हार्डी होता होम डिपोतुन आणलेला मला वाटतं.
@ पराग, खात्रीच्या
@ पराग, खात्रीच्या नर्सरीमधे विचारुन बघ, पण बहुतेक Damascus Rose, Scented Rose म्हणून हे गुलाब मिळतील.
एरवी चक्कर मारली तर फार दिसले नाहीत.
@जाई, हो, आम्ही पण चुकतमाकत पुढे जात आहोत. जमेल तसं नक्की लिहीत राहीन ईथे
@अमित, अरे हो का? धन्यवाद, हे फार भारी काम होईल मग, शोधत राहते हार्डी व्हरायटी. अनंत फार आवडतो. होप डेपो, लोज नर्सरी सेक्शनमध्ये कधीही जायला आवडतं
सुंदर आहे घरची बाग, सगळ्या
सुंदर आहे घरची बाग, सगळ्या फुलांचे रंग चटकदार आहेत.
सगळे गुलाब मस्तच, आणि गावठी गुलाब तर अहाहा .....
ती सगळी जर्बेराची फुलं नसून झिनियाची आहेत
२१> हे फुलांच शोभेचं झाड.>>>>>Geranium वाटतंय
सुंदर !
सुंदर !
सुरेख बगीचा आहे.
सुरेख बगीचा आहे.
गुलाबांचा ताटवा तर अहाहा. रंगीबेरंगी आहे.
हल्ली देशी / गावठी गुलाब नर्सरीत मिळत नाहीत.
सुरेख एकदम. जाईचा वेल काय
सुरेख एकदम. जाईचा वेल काय सुंदर फुललाय.
पिंक जास्मीन ची वेल.
पिंक जास्मीन ची वेल.
कळ्या गुलाबी आणि फुले पांढरी असे असतात काय? ही प्रजाती भारतात दिसली नाही अजून.
सगळे फोटो सुंदर आहेत.
सगळे फोटो सुंदर आहेत.
खूप खूप खूप सुंदर फुले आहेत.
खूप खूप खूप सुंदर फुले आहेत. ती पण तिथल्या थंड वातावरणात. . _/\_
एवढी मस्त फुले वाढवणे तर मला इथे पण नाहीत जमणार. .
सुंदर !
सुंदर !
ऋतुराज, अस्मिता, वर्णिता,
ऋतुराज, अस्मिता, वर्णिता, सीमा, सोनाली, धनवन्ती, क्रिशा धन्यवाद
@ऋतुराज, हो बरोबर गडबड झाली, वर बदल करते
@Srd, पिंक जास्मीन फुले गुलबट पांढर्या रंगांची असतात, देठ गुलाबी असतो. कळ्या गुलाबी दिसतात. हे बघा फुलांचा क्लोजप
सुंदर आहेत सगळी फुले..
सुंदर आहेत सगळी फुले..
दक्षिण कोंकणात आणि गोव्याकडे
दक्षिण कोंकणात आणि गोव्याकडे ज्यांना जाई म्हणतात आणि मुंबई व उत्तर कोंकणात चमेली, ती फुले म्हणजे पिंक जस्मिन असावीत का? पण फोटोतली वेेल आणि पाने किंचित वेगळी दिसत आहेत.
की ती वेल दुसऱ्याच कुठल्या फुलाची आहे?