चीन आणि पाकिस्तान आपली शेजारी राष्ट्रे ज्यांनी वारंवार आपल्या परराष्ट्रीय धोरणांमधल्या त्रूटी किंवा राजकीय नेत्यांचा अतिविश्वास शोधून विश्वासघात केला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चीनशी पुढे व्यापार करावा की नाही, पाकिस्तान ला औषधे द्यावी किंवा नाही यावर नागरिक मत प्रदर्शन करत आहेत. त्यांच्या मार्गदर्शन करण्यासाठी छ.शिवाजी महाराज दगाबाज शत्रूशी कसे वागले ही इतिहासप्रेमी निनाद बेडेकरांनी चिंचवड मधील जिजाऊ व्याख्यानमालेमधील अपरिचीत गोष्ट सांगाविशी वाटते.
आता पुढील शब्द निनाद बेडेकरांचे आहेत जे अनेक वर्ष मनात, हृदयात साठवलेले आहेत.
शिवाजी महाराज शुर होते, मुत्सद्दी होते, राजकारण निपुण होते इ अनेक गुण अनेकांना माहित होते. पण शिवाजी महाराज कसलेले व्यापारी होते हा गुण अनेकांना माहित नसेल. याचे कारण आजवर इतिहास लिहीला गेला त्याचा आधार बखरी, नोंदी किंवा पत्रव्यवहार जो महाराजांनी केला किंवा इतरांनी महाराजांशी केला या माध्यमातून आहे.
मी इंग्लडला गेल्यावर मुद्दाम एका संग्रहालयात गेलो जिथे इस्ट इंडीया कंपनीचा पत्रव्यवहार साल आणि महिन्यांनुसार संग्रह केलेला आहे.
मी शिवाजी महाराजांच्या कालखंडातील एक ईस्ट इंडीया कंपनीचा कालखंड उघडला आणि शिवाजी महाराजांच्या संदर्भातील एक पत्र मिळाले. ज्यात भारतातील एका ईस्ट इंडीया अधिकाऱ्याने शिवाजी महाराजांशी तांबे विकुन व्यापार करताना ईस्ट इंडीया कंपनीला ३२% नुकसान का सोसावे लागले याची कहाणी आहे.
तेंव्हा आणि आजही तांबे भारताला आयात करावे लागते. शिवाजी महाराजांनी ईस्ट इंडीया कंपनी सोबत तांब्याच्या बदल्यात चांदी असा देण्या घेण्याचा करार केला.
यातील शर्ती अश्या होत्या.
१) इंग्रजांनी प्रथम तांबे दाभोळला द्यायचे.
२) बदल्यातली चांदी रायगडावर येऊन घेऊन जायची.
३) शिवाजी महाराज स्वतः चांदी वजन करून देतील.
४) वजनकाटा रायगडावरील असेल.
५) चांदी देताना, चांदीचा exchange rate ज्या दिवशी चांदी दिली जाईल त्या दिवशीचा असेल.
तांब्याची डिलीव्हरी घेतल्यानंतर ईस्ट इंडीया कंपनीला चांदी मिळवण्यासाठी अनेक खेटे मारावे लागले. दाभोळ ते रायगड प्रवास करून गेल्यावर अधिकारी शिवाजीमहाराज स्वतः चांदी मोजून देतील अशी शर्त दाखवून ते आत्ता रायगडावर नाहीत असे सांगत. शेवटी एकदा खुप नजर ठेऊन ईस्ट इंडीया अधिकारी शिवाजी महाराजांच्या पाठोपाठ वसुली साठी रायगडावर दाखल झाले.
चार दिवसांनी महाराज भेटले आणि एकदाची चांदी दिली. यात शिवाजी महाराजांनी चलाखीने खराब काट्यावर वजनात चांदी कमी दिली तसेच त्या दिवशी चांदी खरेदी रेट वाढल्यामुळे सुध्दा चांदी वजनाला कमी मिळाली. यासर्व व्यवहारात शिवाजी महाराजांनी ३२% तोटा ईस्ट इंडीया कंपनीला सोसायला लावला.
पुढे निनाद बेडेकर म्हणाले जनतेच्या गवताच्या काडीला सुध्दा हात लाऊ नका असे सैन्याला आदेश देणारे शिवाजी महाराज व्यवहारात असे का वागले ? निनाद बेडेकरांच्या मते इंग्रज व्यापाराच्या नावाखाली साम्राज्य विस्ताराची स्वप्ने पहात होते जे पुढे अर्धे जगावर राज्य करून इंग्रजांनी सिध्द केले. अश्या व्यापार्यांना सुरवातीलाच व्यवहारात नुकसान पत्करायला लावले तर तर ते साम्राज्य विस्ताराचे स्वप्न साकार करू शकणार नाहीत ही शिवाजी महाराजांची निती होती.
आता सुध्दा जो माल ( फक्त आणि फक्त ) भारतातच तयार होतो तो चीनला विकताना अनेकपट किंमत वाढवून विकला तर आज खास करून चीन सोबत आयात जास्त व निर्यात कमी ही तुट कमी होईल. भारतीय हुशार व्यापारी आणि मोदींजीचे देशहीताचे सरकार याही पेक्षा काही वेगळे घडवू शकतील. याची चुणूक आपल्याला कोरोनासाठी चे औषध अमेरिकेला देताना पहायला मिळाली.
मांजरी सोबत घोडा फ्री पण मांजर तीन लाख रूपयांना विकायची या पंचतंत्रातील गोष्टी काय फक्त वाचण्यासाठी असतात ?
©नितीन जोगळेकर
नावासकट काॕपी पेस्ट किंवा शेअर करा.
त्यांचा अजून एक मास्टरस्ट्रोक
त्यांचा अजून एक मास्टरस्ट्रोक म्हणजे शेखचिल्ली टीकाकार.... प्रचारकांची गरजच नाही!
भक्तमांदियाळीची निंर्मिती हा
भक्तमांदियाळीची निंर्मिती हा सगळ्यात मोठा मास्टस्ट्रोक आहे.
मोदीजी पाकिस्तानला 4 कोटी
मोदीजी पाकिस्तानला 4 कोटी कोविड डोस देणार म्हणे
100 रु ने गुणले तर 400 कोटी होतात.
ते 55 कोटी , गोडसेवाले कुठे गेले ?
<< मोदीजी पाकिस्तानला 4 कोटी
<< मोदीजी पाकिस्तानला 4 कोटी कोविड डोस देणार म्हणे
100 रु ने गुणले तर 400 कोटी होतात.
ते 55 कोटी , गोडसेवाले कुठे गेले ? >>
------- आपल्या मोदींना तुम्ही साधे सुधे समजलात का... ब्यापारी दिमाग है.
लसींचे मोफत चाचण्या होणार... आणि मग लसीमागे ५००-६०० रुपयांना भारतियांना विकणार. पैसे देणार्यांचा आणि न देणार्यांचा अशा सर्वांचाच फायदा.
गमतीचा भाग सोडला तर शक्य असेल, आवाक्यात असेल तर अशा मदती करायला काही हरकत नाही. पण भारतातल्या १३५ कोटी जनते कडे आधी लक्ष द्या.... त्यांना पण वैज्ञानिक चाचणी पुर्ण केलेल्या लसी द्या. रामदेवबाबा बनावटीचे कोरोनिल नको.
https://www.businesstoday.in/sectors/pharma/patanjali-baba-ramdev-bal-kr...
55 कोटीसाठी 3 गोळ्या झाडल्या
55 कोटीसाठी 3 गोळ्या झाडल्या होत्या
200 कोटीसाठी 11 होतील
२०२१ साल आहे. जमाना बदलला आहे
२०२१ साल आहे. जमाना बदलला आहे. भोपाळच्या प्रज्ञा ठाकूर मंत्राचे पठण करुन शाप देते... आता गोळ्यांची अवशक्ताच नाही.
मागे नै का म. गांधींच्या
मागे नै का म. गांधींच्या कापडी पुतळ्याला ढिचकॅव .. ढिचकॅव ... ढिचकॅव करून त्यातून रक्तासारखे लाल द्रव बाहेर आल्यावर आनंदाने चित्कारले होते , तसा आनंद मंत्र शापाने मिळत नाही. त्यामुळे गोळ्या मस्ट .
इतक्यात काही नवे अॅप (
इतक्यात काही नवे अॅप ( अर्थात चायनाचे ) बंद करायला सांगितले का?
अनेकांनी आधी अॅपस डिलीट केली होती मग मोदींचे वर गेलेले दोन्ही हात खाली आले, लालबुंद डोळे पण कमी लाल झाले त्यामुळे परत reinstall केले गेले.
वाणिज्य मंत्रालय म्हणते चीन सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे... २०२० मधे तर चीन या देशाने अमिरिकेचे अव्वल स्थान (trade partner) पण घेतले. ड्रॅगन परत आलाय...
https://www.bloomberg.com/news/articles/2021-02-22/china-returns-as-top-...
एक चांगली गोष्ट म्हणजे व्यावहारातली तफावत ( आयात निर्यात मधला फरक) कमी होते आहे.
खरंय का हे?
खरंय का हे?
चायनाच कशाला , पाकिस्तानशी
चायनाच कशाला , पाकिस्तानशी सर्वात जास्त ट्रेड गुजरातमधूनच होतात , गुजरात पाकचा सख्खा शेजारी आहे , गुजरात बंदरातून पाकशी सर्व आयात निर्यात होते
इस्रोचा अप्प इंडियाशी करार
इस्रोचा ऑपो इंडियाशी करार
बाळांनो, ऑपो कंपनी कोणत्या देशातली आहे?
भारत-चीन द्विपक्षीय
भारत-चीन द्विपक्षीय व्यापाराने ( नोव्हेंबर २०२१ पर्यंत चे आकडे आहेत ) मधे ११४.२६ बिलीयन USD चा टप्पा पार केला. पैकी ८७.९१ बिलीयन USD चीनमधून आयात, म्हणजे ४९ % वाढ.
https://economictimes.indiatimes.com/news/economy/foreign-trade/2021-a-y...
चीन शी व्यापार करावा की नाही
चीन शी व्यापार करावा की नाही ? >>
व्यापार काय करायचा हे ठरलं की लगेचच करूयात. नंतरचं रूटीन आहे.
एक समिती बनवावी लागेल. मग वेमा एक ग्रुप बनवतील. चीनशी व्यापार नावाने.
मला परवा एक प्राणवायू यंत्र
मला परवा एक प्राणवायू यंत्र भाड्याने आणावे लागले आहे.
खाली लेबल चिनी कंपनीचे आहे.
किती सिंबॉलिक आहे ना? प्राणवायू ...तोही चिनी मशीनमधून !!!!
चीनशी व्यापार करावा की चीन
चीनशी व्यापार करावा की चीन शीव्या पार कराव्या?
(No subject)
(No subject)
यंदा 'चायनीज कंदील / माळा
यंदा 'चायनीज कंदील / माळा ह्यावर बंदी घाला' असा ट्रेंड नव्हता का? की असा ट्रेंड नको म्हणुन आदेश आला होता?
चीनी फटाक्यांतून टीबीचे जंतू
चीनी फटाक्यांतून टीबीचे जंतू पसरणार आहेत असा गृहमंत्रालयातील अधिकार्याच्या नावाने संदेश होता.
चीन मधून ज्या वस्तू येतात
चीन मधून ज्या वस्तू येतात त्या किरकोळ वस्तू आहेत
शेतकरी,कामगार,लहान उद्योग ह्यांना संकटात टाकतं आहे .
त्यांचे नुकसान करत आहे.
पण भारतीय मोठ्या उद्योगांना मोदी सरकार पूर्ण संरक्षण देत आहे.
मोटारी,टीव्ही,बाईक ह्या आणि ह्या सारख्या वस्तू चीन मधून भारतात येण्यास पूर्ण बंदी आहे.
म्हणजे बोक्याना संरक्षण देताना फक्त देश हीत,देश प्रेमं मोदी सरकार ला आठवत आहे.
चीन ची बाईक,किंवा कार कोणी बघितली आहे का भारतात.
इंटरनेट,दूर संचार,ऑईल आणि गॅस , वीज निर्मिती,वितरण अशा क्षेत्रात पण चीन ला संधी दिली पाहिजे .
येथील monopoly var भारतीय समाजाला लुटणाऱ्या उद्योगपती ना स्पर्धेची सवय हवी.
त्यांना पण स्पर्धा झाली पाहिजे.
फक्त शेतकरी,लहान उद्योग ह्यांच्या नर्डीला नख लावू नका.
चीन chya redmi नवीन मॉडेल ला
चीन chya redmi नवीन मॉडेल ला ५g connections मिळण्यात सरकार अडचण आणत आहे असे वाचण्यात आले.
जे भारतीय जनतेच्या हिताचे नाही.
कृत्रिम फुल,लाईट च्या माळा,खेळणी. ह्यांना सताड दार उघडे आणि मित्रांची वाट लागेल आणि भारतीय जनतेचा फायदा होईल ह्या बाबत चीन वर निर्बंध .
The Government of India is
The Government of India is planning to ban budget Chinese smartphones that cost less than Rs 12,000. The move is aimed at pushing Chinese telecommunication giants out of the lower segment of the world's second-biggest mobile market, say people close to the matter.09-Aug-2022
Reliance Jio to launch under Rs 12000 5G phone once 5G coverage expands: Counterpoint Sep 26, 2022
जर चीन ची खेळणी,किंवा विविथ
जर चीन ची खेळणी,किंवा विविथ वस्तू भारतात येत असतील .
तसे
खाण,कोळसा,वीज,दूर ध्वनी, ऑईल,गॅस, गाड्या बाईक , टीव्ही चॅनेल, बँकिंग, सर्व च क्षेत्रात चीन ल परवानगी द्यावी.
हे जमत नसेल तर .
सामान्य लोक,शेतकरी, लहान उद्योगी ह्यांना त्रासदायक होईल असे imports पूर्ण बंद करा.
ते मित्रो कोणाला म्हणायचे ते
ते मित्रो कोणाला म्हणायचे ते आता कळलं
Rely-On-Us!
Rely-On-Us!
Pages