मला चुकीची ऐकू आलेली गाणी

Submitted by परदेसाई on 15 July, 2008 - 02:53

काही वेळा असं होतं की एकादं गाणं डोक्यात बसतं पण त्याचे काही शब्द कळतच नाहीत. किंवा ऐकू येतात पण वेगळेच येतात आणि ते तसेच आहेत असा आपला समज होतो. इथे आपले गैरसमज लिहावेत.

या आधीची गाणी ईथे पहा.

जिहाले-मस्तीची माहीती...
नवीन चर्चा
जूनी मायबोली

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नुसरत फतेह अली खान यांचं "आफरीन आफरीन" हे गाणं मला गुणगुणायला खुप आवडायचं, पण मला शब्द काही केल्या कळायचे नाहीत (लहान होते हो मी तेव्हा आणि गूगल वगैरे पण काही नव्हतं = उगाचचं शंका निरसन) मी ते गाणं "जिस्मे नाना की नानी हो मुमकीन नही...जिस्मे नाना की नानी हो मुमकीन नही..आफरीन आफरीन आफरीन आफरीन" आणि मध्येच ते काहीतरी म्हणायचे "धागड धा धागड धा धागड धा नागड बम्ब" ते बरोबर म्हणायचे पण तरिही तेव्हा काही ते लॉजिक आणि गाणं काही काही झेपायचं नाही ... आत्ता गूगल करुन बघतेच..

हा किस्सा मी आधी पोष्टलाय कि का ते लक्षात येत नाही.....

देव माझा विठु सावळा, माळ त्याची माझीया गळा

हे गाणं मला पुर्वी...
देव माझा विठु सावळा, मान त्याची माझी आवळा

असं ऐकू यायचं कि हो....

>>>"धागड धा धागड धा धागड धा नागड बम्ब"
Rofl असं असतं तर ह्याचा लिसा रे वाला म्युझिक व्हिडिओ गाण्याआधी बनला होता की काय अशी शंका मला आली असती ...

पनू, गुलजारना ऐकवायला पाहिजेत या ओळी.... नंतर पुन्हा लेखणी हातात धरणार नाहीत ते बहुधा....

>>
अगदी अगदी, गुलजार बहुधा लेखनी मोडून बन्दूक हाती धरतील Proud

आफरीन आफरीन आफरीन आफरीन" आणि मध्येच ते काहीतरी म्हणायचे " "धागड धा धागड धा धागड धा नागड बम्ब">> हो बहुधा गाणे picturize करणार्‍यांना पण हेच ऐकायला आले असेल आफरीन बद्दल Lol

हुस्न-ए-जाना की तारीफ मुमकीन नहीं
आफ्रीन आफ्रीन आफ्रीन आफ्रीन

तू भी देखे अगर तो कहे हम-नशीन
आफ्रीन आफ्रीन आफ्रीन आफ्रीन

ऐसा देखा नही खूबसूरत कोई
जिस्म जैसे अजंताकी मूरत कोई
जिस्म जैसे निगाहोंपे जादू कोई
जिस्म नगमा कोई जिस्म खूश्बू कोई
जिस्म जैसे मचलती हुई रागिनी
जिस्म जैसे महकती हुई चांदनी
जिस्म जैसे के खिलता हुआ एक चमन
जिस्म जैसे के सूरज की पहली किरन
जिस्म तरशा हुआ दिलकश्-ओ-दिलनशीन
संदली संदली मरमरी मरमरी

चेहरा इक फूल की तरह शादाब है
चेहरा उसका है या कोई माहताब है
चेहरा जैसे गजल, चेहरा जान्-ए-गजल
चेहरा जैसे कली, चेहरा जैसे कंवल
चेहरा जैसे तसव्वूर भी तस्वीर भी
चेहरा इक ख्वाब भी, चेहरा ताबीर भी
चेहरा कोई अलिफ लैलवी दास्तां
चेहरा एक पल यकीं, चेहरा एक पल गुमां
चेहरा जैसे के चेहरा कोई भी नहीं
माह्-रूह माह्-रूह
माह्-जबीं माह्-जबीं

आँखे देखी तो मै देखता रह गया
जाम दो और दोनो ही दो आतिशाह्
आँखे या मैकदे के दो बाब है
आँखे इनको कहूं या कहूं ख्वाब है
ऑखे निची हुई तो हया बन गयी
आँखे ऊंची हुई तो दुवा बन गयी
आँखे उठकर झुकी तो अदा बन गयी
आँखे झुककर उठी तो कजा बन गयी
आँखे जीन मे है कैद आसमान्-ओ-जमीन
नर्गिसी नर्गिसी
सुरमई सुरमई

जुल्फ्-ए-जानां की भी लंबी है दास्तां
जुल्फ के मेरे दिल पर है परछाईंयाँ
जुल्फ जैसे के उमडी हुई हो घटाँ
जुल्फ जैसे के हो कोई काली बला
जुल्फ उल्झे तो दुनिया परेशान हो
जुल्फ सुल्झे तो ये गीत आसान हो
जुल्फ बिखरे सियाह रात छाने लगे
जुल्फ लहराये तो रात गाने लगे
जुल्फ जंजीर है फिर भी कितनी हसीं
रेशमी रेशमी
अंबरी अंबरी

जावेद अख्तर यांच्या लेखणीतून उतरलेलं नितांतसुंदर काव्य.

माझा एक मित्र म्हनायचा "ईश्क का लगदा ईश्क हि जाने"
ओरिजिनल गाण होत "ईश्क का रुत्बा ईश्क हि जाने"

आम्ही त्याला ईश्कका लगदा असच नाव थेवल

असुदे... धन्यवाद्.. त्या मधल्या ओळीं साठी..... जावेद अख्तर म्हणजे काय हो नितांत सुंदर असायलाच हवा... माझ्यासारखी कानसेन (नी) असल्यावर काय करणार ते तरी बिचारे...असो ते मला मोठ्या मनानी माफ करतील.... .. आज नवर्या कडुन दहा वेळा म्हणुन घेते...माझं एकुन तो पण तसाच म्हणतो ना...

खाली दिल नय्यो जानवी ये मन्गदा... इश्क दी गली विच उई उई लन्गदा.... म्हणजे हे ईश्क अस्सं आहे कि ते फक्त दिल नाही तर जान (जीव) पण मागतो... आणि मग त्याच्या गल्लीत (अहो ईश्काच्या अथवा आशिकच्या) गेल्यावर उई उई करायची वेळ येते असा काही अर्थ लावलेला मी...सोयीस्कर.. Proud

इथे मागे कोणीतरी "दूरसे अलविदा" ह्या गाण्याबद्दल लिहिलं होतं. काल मी चॅनेल सर्फिंग करत असताना कुठल्यातरी म्युझिक चॅनेलवर ह्या गाण्याची जाहिरात होती आणि खाली शब्द होते "डोन्ट से अलविदा". नक्की शब्द काय आहेत देवाला ठाऊक.

काल जिजु गाणं गात होते... नवीन दोस्ताना चित्रपटातलं .. मा दा लाडला बिगड गया रिमिक्स .... सुरूवात अशी झाली.. मै आकाशवणी हू.. ये सच है के आपका बेटा गे है... नहीहीहीहीईईई.....टुण्णा टाटा टोणी टण्णा टाँट टाँटणा... ताई ओरडली ही काय गाणी गातोयेस... तर त्यानी गुगलाय नमः करुन पाहिलं गाण्याचे बोल असे होते "मुन्ना साडा डोलि चढ गया बॅंड बज गया" Biggrin

मला खुप दिवस ..."आप जैसा कोई मेरी जिन्दगी मे आये,और वापस जाये"
हे गाणं "...................................,और बाप बन जाये " असं वाटायचं...आणि अजिबात कळायचं नाही कि हा काय प्रकार आहे!!!

"आप जैसा कोई मेरी जिन्दगी मे आये, और वापस जाये "
हे गाणं मला किती तरी दिवस
"आप..................................,और बाप बन जाये"
असं वाटत होतं !!
नेहमी वाटायचं,....असलं कसलं हे गाणं....आता वाटतय....असली कसली आपली बुध्धी!!!!

"आप जैसा कोई मेरी जिन्दगी मे आये, और वापस जाये " Rofl
असं नाहिये. "आप जैसा कोई मेरी जिन्दगी मे आये, और बात बन जाये " असं आहे.

सॉरी...सॉरी, एकच पोस्ट दोनदा टाकलं गेलंय्...नवीनच माबोवर "उद्योग" करायला लागलेय ना ,त्यामुळे जरा गडबड आहे....चुक पदरात घ्यावी,ही विनंती!

सध्या 'एडियट' सिनेमातल all is well गाण आम्हाला 'college girl' असेच ऐकाय्ला आले
जरा गुगलल्यावर कळले कि हे एडिय्ट होठ घुमाके सिटि बजाके All Is Well म्हणत आहेत

माझ्या बहिणीची गाणी (तिचा ठाम विश्वास की हीच बरोबर आहेत - बराच काळ पर्यंत)
रोजचाच चंद्र आज भासतो नवा - रोजचाच चंद्र आज भाजतो रवा..
माझी माय सरसोती - माझी माय चरत होती.

मला सजना है मुझे सजना के लिये चा अर्थच नव्हता कळलेला कित्येक वर्ष..
(सजना म्हणजे साजण हे कधी लक्षातच नाही आला.. मला वाटायचं सजायचय मला.. सजण्यासाठी..)
कहरः

एका मैत्रीणीच्या आईला वाटायचं -
जेंव्हा तिची नी माझी चोरून भेट झाली,
झाली फुले कळ्यांची - बाळे घरात आली!

हे डोरे लाल तेरे म्हणजे काय? >>> गोरे गाल तेरे.

च्यायला.. मलाही डोरेच वाटायचं. एका हिंदी भाषिक मुलीनं मला सांगितलं - डोरे म्हणजे ओठ! :O

नानबा... हे घे Unbeatable
सायलीचं हे कसं विसरलीस तु...

अष्टविनायका तुझा महिमा कसा....
अष्टविनायका तुझ्या मांडीमागे साप...

आणि आईशपथ नंतर असंच ऐकु येतं.... Lol

<<< "आप जैसा कोई मेरी जिन्दगी मे आये, और वापस जाये " >>>
<<< रोजचाच चंद्र आज भाजतो रवा.. >>> Lol
नानबा काय लाडु बनवायचे आहेत का ? Lol

मला डिस्को डान्सर (मिथुनचा) या चित्रपटातल्या I am disco dancer जिन्दगी मेरा गाना.. या गाण्यातले बोल
दोस्तो मेरी ये जवानी 'गीतों' की अमानत है हे नेहमी असे ऐकु यायचे
दोस्तो मेरी ये जवानी 'कुत्तों' की अमानत है. आणि मी हे कुत्तोंकीच म्हणायचे. Happy

मूळ गाणं
ये उस्का स्टायल होंगा होटो पे ना दिल मे हा होयेंगा.

मला आणि मजा म्हणजे माझ्या सासुबाईंना पण ते असं ऐकू यायचं

ये उस्का स्टायल होंगा कुतुबमिनार दिल मे हा होयेंगा.

Pages