मला चुकीची ऐकू आलेली गाणी

Submitted by परदेसाई on 15 July, 2008 - 02:53

काही वेळा असं होतं की एकादं गाणं डोक्यात बसतं पण त्याचे काही शब्द कळतच नाहीत. किंवा ऐकू येतात पण वेगळेच येतात आणि ते तसेच आहेत असा आपला समज होतो. इथे आपले गैरसमज लिहावेत.

या आधीची गाणी ईथे पहा.

जिहाले-मस्तीची माहीती...
नवीन चर्चा
जूनी मायबोली

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लहानपणी मुस्लिम मुलां सोबत मराठी शाळेत शिकत होतो तेव्हाची गोष्टः -

'धर्मात्मा' पिक्चर नुकताच आलेला होता. सोबतचा मुस्लिम मित्र कायम त्यातल्या गाण्याची एकच ओळ म्हणायचा: - याकुब लगती हो, बडी सुंदर दिखती हो...

बर्‍याच वर्षां नंतर खरे शब्द समजले ते असे: - क्या खूब लगती हो, बडी सुंदर दिखती हो...

>>>याकुब लगती हो, बडी सुंदर दिखती हो

अर्थाचा अनर्थ! हसून हसून मेले मी इथे. सगळ्यांना बरी आजच गाणी सुचताहेत. Biggrin

ते गुरूमधलं गाणं मला तरी कोसा है कोसा है बारीशको कोसा है असं ऐकू यायचं ती ऐश्वर्या पावसाला भिजवल्याबद्द्ल शिव्या शाप देतेय असं वाटायचं पण आत्ता खरा अर्थ कळला..ह्म्म

'बगळ्यांची माळ फुले अजुनी अंबरात' हे गाणं मित्राने सांगितल्यामुळे बरेच दिवस ....
'बगळ्यांची मान दुखे उडुनी अंबरात' असे म्हणायचो

बोसा बद्दल चर्चा पाहिली आणि एक शेर आठवला ...

वापस ले लो बोसा अपना
बात क्या है तकरार की
क्या कोई छिन ली
जागिर हमने सरकार की

काय जबरदस्त तत्वज्ञान आहे या माफीनाम्यात Happy

हे आधी विचारलं होतं का आठवत नाहीये. पण ते गाणं आहे ना "आखोंमे तेरी अजबसी अजबसी अदाये है" त्यात तो माणूस ते मधेमधे काय पुटपुटत असतो? मला ते कधी "हे मुली" असं ऐकू येतं तरी कधी "हे मनी" असं ऐकू येतं. आहे काय प्रकरण?

'जन विजन झाले आम्हा' ही तुकोबारायांची ओळ मी लहानपणी 'जननी जन झाले आम्हा' अशी म्हणत असे.

धन्य धन्य हो प्रदक्षिणा सदगुरुरायाची.....
हे गाणं लहानपणी ...धन्य धन्य हो प्रदक्षिणा सदगुरुरायाची..... गाडी करा कुरुकरा विमान उचलायाची ...असं ऐकायचो (:खजिल झालेली बाहुली: बोलायचो सुध्दा)

माझी मुलीला सतत मोठ्याने गाणी म्हणायची आवड आहे. मग शब्द कळले नाहीत की ती तिला आठवेल तो शब्द म्हणते. तिची काही गाणी -:
१. एब्न बतुता-ते ती 'तनमन जुता' असं म्हणते.:अओ:
२. मन उधाण वार्‍याचे- हे गाणे ' मन उधार वार्‍याचे' म्हणते.:)
३.सध्या 'अप्रेकीगक'च्या गाण्यांवर संक्रांत आहे. त्यातले 'प्रेमकी नैया..'मध्ये 'गोरी गोरिया' म्हणायच्या ऐवजी ती'गोरी चुहिया' म्हणते.:) तिची चूक दाखवून दिली की कधी कधी 'गोरी मैय्या' म्हणते.:)
त्यातलंच दुसरं गाणं 'यार नजर नहीं आता, दिलदार नजर नही आता, संसार नजर नही आता' च्या जागी ती 'संस्कार नजर नही आता' Uhoh म्हणते.

"करवटे बदलते रहे सारी रात हम" या गाण्यातील राजेश खन्नाच्या तोंडी असलेली ओळ मी "गम ना करो जिन्दगीके दिन बहोत है कम" ऐकत होते. मग मनाशी विचार करायचे की अस काय लिहिल आहे. परवा गाण लागल होत तेव्हा नीट ऐकल ते "गम ना करो दिन जुदाई के बहोत है कम" अस आहे खरतर Uhoh
एकटीच हसायला लागले. नवरा आणि सा.बांना कळेच ना काय झाल ते.

दिलदार नजर नही आता' च्या जागी ती 'संस्कार नजर नही आता>> Biggrin
काय परफेक्ट ओळखले आहे सगळ्यांना,क्रिटीकल अ‍ॅनॅलिसिस म्हनत्यात त्ये ह्येच!

माझ्या बहिणीला हुस्न-ए-जाना की तारीफ मुम्कीन नही "हुस्ने जाना की आई नमकीन नही" असं ऐकायला आलं होतं आणि ती काय बिन्डोक आचरट गाणं आहे म्हणून चिडली ही होती.

ओहो ते हुस्न-ए-जाना की तारीफ मुम्कीन नही असं आहे होय !!! मी आजपर्यंत ते उसने जाना की तारीफ मुम्कीन नही असं ऐकत आले आहे धन्यवाद अक्षरी Happy

'ॐ नमो जी आद्या' ह्या लताबाईंच्या आवाजातील सुरेल रचनेतील 'म कार महामंडल मस्तकाकारे' ही ओळ मला अनेक दिवस प्रश्नार्थक ऐकू यायची : म कार महामंडल मस्तका का रे?

कयामत से कयामत तक पिक्चर मधील 'अकेले है तो क्या गम है' गाण्यातील 'चाहे तो हमारे बस में क्या नही'....ह्या ओळीबद्दल मला कित्येक दिवस प्रश्न पडला होता.... हिरो-हिरॉईन ओसाड, विराण जागेत राहात आहेत, बाईकवरून पळून आलेत आणि आता त्यांना बसची चिंता का पडली आहे? Proud

हम दिल दे चुके सनम मधल्या ढोल बाजे गाण्यातल्या दोन ओळी मी इतके दिवस 'रात की रानी जैसा रुप मेरा मेहकासव...छुना ना मुझे बेहकासव...' अशा ऐकत होते आणि उगीचच सलमान-ऐश्वर्या नाचता नाचता कनकासव पीत आहेत असे चित्र डोळ्यासमोर उभे रहायचे Uhoh काल-परवा गाडीत सीडी लावली तेव्हा ते नुसतच बेह्कासा-मेह्कासा आहे असे लक्षात आले.

Pages