मला चुकीची ऐकू आलेली गाणी

Submitted by परदेसाई on 15 July, 2008 - 02:53

काही वेळा असं होतं की एकादं गाणं डोक्यात बसतं पण त्याचे काही शब्द कळतच नाहीत. किंवा ऐकू येतात पण वेगळेच येतात आणि ते तसेच आहेत असा आपला समज होतो. इथे आपले गैरसमज लिहावेत.

या आधीची गाणी ईथे पहा.

जिहाले-मस्तीची माहीती...
नवीन चर्चा
जूनी मायबोली

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज काल एफ एम वर एक गाण लागत... 'सेंसेक्स को धोका डार्लींग सेंसेक्स को धोका ..' हर्शद मेहेतावर गाण आहे कि काय हे..??

Biggrin लव्ह सेक्स और धोखा डार्लिंग, लव्ह सेक्स और धोखा- असं आहे ते. त्याच नावाचा चित्रपट आहे, त्याचं टायटल गाणं.

काशी, जाऊदे, आपल्यासारख्यांसाठी नाहीत असले सिनेमेही आणि गाणीही Proud

काशी, हे वाचून कोणालातरी नव्या हिंदी चित्रपटाचा आणि गाण्याचा विषय मिळाला नाही म्हणजे पुरे.

ते कार्तिकी गायकवाडचं 'कान्दा मुळा भाजी, अवघी विठाई माझी' हे गाणं माझी मुलगी असं म्हणायची...

'कान्दा मुळा भाजी, कान्दा मुळा भाजी,
अवघी मिठाई माझी'

ऐसी लागी लगन, मीरा हो गई मगन
वो तो गली गली हरी गुन गाने लगी,
महलों में पली, बनके जोगन चली
मीरा रानी दिवानी नहाने लगी... Uhoh

आज गोकू़ळात रंग खेळतो घरी (हे हरी होते ते समजले)
राधिकेच्या राजापूर जा तुझ्या घरी...

(हे राजापूर समजायला बरीच वर्षं लागली....)

'हमसे है मुकाबला' मधल्या 'मुकाबला' गाण्यामधे 'बंदुक तानकर गोली चलानेसे प्यार कभी मिटता है क्या' अशा काहीतरी ओळी आहेत. ते मी 'बंद दुकानपर गोली चलानेसे प्यार कभी मिटता है क्या' असं समजत होते. आत्ता पण जे समजलय ते बरोबर आहे का हे जरा तपासावे Happy

लव्ह सेक्स और धोखा डार्लिंग, लव्ह सेक्स और धोखा- असं आहे ते.>>> आईशप्पथ, असं आहे होय ते गाणं. मी ते 'राँग साईडपे ठोका डार्लिंग 'राँग साईडपे ठोका' असं ऐकायचे. Happy

सगळेच Proud
>>"गदर" - "एक प्रेम कथा" हे एकदा मी "गरोदर" -"एक गेम कथा" अस ऐकल होत..>> कैच्याकै Happy

सानी... या बाफवर सुरूवातीला एक लिंक आहे... ती वाचून या.. भरपूर करमणूक होईल....
आणि हे गाणं बर्‍याच वेळा इथे आल्याचंही दिसेल.. Happy

तो बात बन जाए
च्या ऐवजी मी बाप बन जाए>>>

हे खुप जणानी असच ऐकल होत. Happy
मागची पान उलटल्यास दिसेल.

"
बहारो मस्ती मुकुंद बरस्ती पहाडी हिजडा बेचारा दिल है

आजहि इतक भयानक गाण कळत नाही बुवा Proud "

असा गिरिराजने लिहिलेला ह्या बीबीवरचा सगळ्यात जास्त हसवणारा प्रतिसाद होता. Lol

हल्ली गिरी दिसतच नाही मायबोलीवर??

अरे हो! खरंच की!!! पान नं. ९ वर आहे... ही एक गोष्ट शोधायला किती पानं चाळावी लागली...
बट नेव्हर माईंड...इट वॉज वर्थ चाळींग Proud इतकी हसतेय....पोट जाम दुखायला लागलंय...:हहगलो:

माझ्या मावशीला ती लहान असतांना कुठलं तरी गाणं ज्याचे शब्द होते "तेरे मन मे प्रित का रंग भर दू" ऐवजी "भित का रंग भर दू" असं ऐकू यायचं...बिचारीला वाटायचं, हिंदीत भिंतीला "भित" म्हणत असावेत Rofl

मला वॉशिंग पावडर निरमा चे शब्द "रंगीन कपडा भी खिल खिल जाये" असं कधीच ऐकू आलं नाही... मी नेहमी म्हणायचे, "रंगीन कपडा भी तीळ तीळ जाये"

दक्षे ते
मीरा रानी दीवानी कहाने लगी
असे आहे. तुझी पोस्ट वाचुन मीच गाणे विसरले होते जरा वेळ. Happy

बंदुक तानकर गोली चलानेसे प्यार कभी मिटता है क्या>>
मी हे 'बंद कर ताले पर गोली चलानेसे प्यार कभी मिटता है क्या' असे ऐकत होते. डब मूव्हीच्या गाण्यांचे अर्थ लावणे केव्हाच सोडून दिलेय.

मी "रंगिन कपडा भी खिल खिल जाए" ला "रंगिन कपडा मिट्टी मे मिल जाए" असे खरंच ऐकायची..कळायचे की असे असुच शकत नाही, पण ऐकु तसेच यायचे न त्यामुळे म्हटले ही जाय्चे Happy

माझ्या आईला एकदा गुणगुणताना ऐकले (आशिकी चे कुठले तरी गाणे):
"मै फुलोसे, कलीयो से, कांटोसे तेरी मांग भर दुंगा
मै सासुकी महकी बहारो को तेरे नाम कर दुन्गा..."

खरे शब्द असे आहेतः
"मै फुलोसे, कलीयो से, तारोंसे तेरी मांग भर दुंगा
मै सासों की महकी बहारो को तेरे नाम कर दुन्गा..."

तिचे म्हणणे की फूल, कली सोबत तारे कुठुन आले? काटेच जास्त लॉजिकल वाटतात्..आणि "सासु" तिने चुकीने म्हटले होते..हाहाहाहा..

>>बहारो मस्ती मुकुंद बरस्ती पहाडी हिजडा बेचारा दिल है

आज सकाळी रेडिओवर हे गाणं लागलं होतं. ह्या पोस्टच्या प्रभावामुळे मीही ते असंच ऐकत होते आणि पहाडी हिजडा कसा अंगापिंडानी मजबुत दिसत असेल हे ईमॅजिन करून गाडीत हसत होते Rofl

आज सकाळपासून 'अरे अरे ज्ञाना ..ना ' असे एक गाणे आठवते आहे. ते रेडिओवर लागायचे. त्यातली पुढची ओळ मी नकळत गुणगुणली की ' अरे अरे ज्ञाना ज्ञाना ही काव..ड' अशी येते आहे. ती चुकीची आहे हे समजते आहे. कस्ली कावड! ज्ञानाचा वड वगैरे आहे का?

Pages