मला चुकीची ऐकू आलेली गाणी

Submitted by परदेसाई on 15 July, 2008 - 02:53

काही वेळा असं होतं की एकादं गाणं डोक्यात बसतं पण त्याचे काही शब्द कळतच नाहीत. किंवा ऐकू येतात पण वेगळेच येतात आणि ते तसेच आहेत असा आपला समज होतो. इथे आपले गैरसमज लिहावेत.

या आधीची गाणी ईथे पहा.

जिहाले-मस्तीची माहीती...
नवीन चर्चा
जूनी मायबोली

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

याराना मधील बैठा दिया फलक पे मुझे खाक से उठाके......हे मला कित्येक दिवस

'' बैठा दिया पलंग पे मुझे खाट से उठा के ''असे वाटत होते.

डो.कैलास

फलक म्हणजे आकाश हे मला खूप दिवसांनी कळ्लं. त्याआधी शाळेतला फळा असा अर्थ असावा अशी माझी समजूत होती Happy

कदाचित हे मी आधी पोस्ट केलं असेल. अक्षयकुमारच्या एका गाण्यात "झुले झुले लाल दम मस्त कलंदर" ह्या शब्दांनंतर "केवलजी सरकार" हे काय आहे? असंच आहे का मला काही वेगळं ऐकू येतंय?

"मौजा ही मौजा" ह्या गाण्याच्या एकाहि ओळीचा अर्थबोध होत नाही......काहीतरी पन्जाबी आहे असे म्हणुन निमुतपणे ऐकावे लागते.....

"मौजा ही मौजा" चे सगळे शब्द आणि त्या गाण्याचा अर्थ मला वाटतं याच बाफ वर किंवा माबोवर अन्यत्र कुठेतरी कुणीतरी दिलाय.

सावली......निट बघ...... भिन्तिवरची तुझी सावलीपण पोट धरुन हसत असेल.......!

भिन्तिवरची तुझी सावलीपण पोट धरुन हसत असेल >> तस झाल तर मात्र भितीने मुरकुंडि वळ्ली असती हो!

गडद सावली >> नविन आयडी छान आहे

अरे अजुन एका पोस्ट नंतर हा धागा १००० पोस्ट वाला होणार आहे. माझी ९९९वी!

लहान पणी हे गाने असे ऐकत होतो..
----------------------------------------------------------

हसा मुलांनो हसा प्रकाशातले / आकाशातले तारे तुम्ही अंधारावर रुसा...

रात्रीस खेल चाले ह्य खुन चांदण्यांचा .. संपेल ना कधीही हा खेल सावल्यांचा.. Happy

"नरवर क्रिष्णासमान्".........हे नाट्यपद आम्हि लहानपणी (अजुनही कधि कधि) "धर नार्‍या (म्हणजे नारद) क्रिष्णाची मान..." असे म्हणायचो गमतिने......

कुलु आता बालकवींच्या मागे का?
गर्द सभोती रान साजणी तू तर चाफेकळी
काय हरवले सांग शोधिसी या यमुनेच्या जळी?

दिनेशदा हे गाणे आधी ऐकले आणि मग कधीतरी समग्र बालकवी वाचताना त्यात ही कविता वाचली , आणि खाली अपूर्ण असे वाचून आत कुठेतरी तटकन तुटले.. बालकवींचा रेल्वेखाली आल्याने झालेला मृत्यू आठवला.

ही चाल तुरुतुरु उडती केस भुरूभुरू ह्यापुढची ओळ मला "डाव्या डोळ्यावर बट धरली" अशी ऐकू यायची. दुधावर साय धरते तशी डोळ्यावर असेल बट आलेली अशी आपली माझी समजूत. काल एका सिरियलमध्ये शब्द कानी पडले त्यावरून "डाव्या डोळ्यावर बट ढळली" आहे हे कळलं आणि स्वतःचीच कीव आली Sad

'मालवून टाक दीप पेटवून (चेतवून) अंग अंग....' असं एकदा कुणाकडून तरी ऐकलं, आणि आधीच बोल्ड गाण्याचा शब्द अजूनच 'बोल्ड' वाटायला लागले..

मलाही नव्हतं माहित. Sad कोणीतरी आहे तशी ती कविता पोस्ट कराल का प्लीज? नाहीतर लिंक तरी द्या ना. हे "यमुनेच्या जळी" च आहे ना नक्की? का "तळी" आहे? पाण्यात कसं काय शोधणार?

तो :गर्द सभोती रान साजणी तू तर चाफेकळी
काय हरवले सांग शोधिसी या यमुनेच्या जळी?
ती: ती वनबाला म्हणे "नृपाळा हे तर माझे घर
पाहत बसते मी तर येथे जललहरी सुंदर
हरिणी माझी तिला आवडे फारच माझा गळा
मैना माझी गोड बोलते, तिजला माझा लळा

तो: रात्रीचे वनदेव पाहुनी भुलतिल रमणी तुला
तू वनराणी दिसे भुवनी ना तुझिया रूपा तुला
अर्धस्मित तव मंद मोहने पसरे गालावरी
भुलले तुजला हृदय साजणी ये चल माझ्या घरी

(सलग वाचता यावी म्हणून इथेच जोड दिली...थॅक्स टु दिनेशदा.

मस्यगंधा या नाटकात हि कविता वापरली होती. कथानक बहुदा महाभारतातील सत्यवती चे होते. तसा संदर्भ नसताना, या कथानकात ते फिट्ट बसले. नाटकात आशालताच गात असत. संगीत पं. जितेंद्र अभिषेकींचे होते.

दिनेशदा मूळ कविता मला दुष्यंत शकुंतला यांची वाटते...
हरिणी माझी तिला आवडे फारच माझा गळा
.....................तिजला माझा लळा"
या ओळी काय आहेत? आता हे गाणे ऐकायला मिळेपर्यंत भुंगा आहे.

भरत, अशी ओळ आहे ती.
मैना माझी गोड बोलते, तिजला माझा लळा

पण शकुंतला म्हंटले तर यमुनेचा संदर्भ लागत नाही !!

भरत, दिनेशदा, धन्यवाद कविता पोस्ट केल्याबद्दल. सत्यवती कोळयाची मुलगी होती ना? त्यामुळे हरिणी, वन वगैरेंचे संदर्भ लागत नाहीत हे पटते.

तिच्या अंगाला माश्यांचा वास येत असे म्हणून ती मस्यगंधा आणि तो वास योजनभर येत असे म्हणुन ती योजनगंधा !!!
चोप्रांच्या महाभारतात ही भुमिका देबश्री रॉय ने केली होती बहुतेक आणि आशालता ने शकुंतलेची (पण या अगदी पहिल्या पहिल्या भागातच होत्या.)

सत्यवतिच्या कथेवर रामदास कासलेबुवान्ची एक जबरदस्त "डबलबारी" आहे.......(कधि कोणी डबलबारी हा भजनाचा प्रकार ऐकला असेल तर...)

Pages