मला चुकीची ऐकू आलेली गाणी

Submitted by परदेसाई on 15 July, 2008 - 02:53

काही वेळा असं होतं की एकादं गाणं डोक्यात बसतं पण त्याचे काही शब्द कळतच नाहीत. किंवा ऐकू येतात पण वेगळेच येतात आणि ते तसेच आहेत असा आपला समज होतो. इथे आपले गैरसमज लिहावेत.

या आधीची गाणी ईथे पहा.

जिहाले-मस्तीची माहीती...
नवीन चर्चा
जूनी मायबोली

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

निम्बुडा, ते "तु जो पिघले, लेहेजे मे बोले, छु लूं तेरे होठोंके शोले" अस आहे. अगदी अर्थहीन, डब्ब्ड आहे ना Proud

वसिम को देखो तुम<<< ते वसिमको देखो तुम नसून बस इनको देखो तुम असे आहे

>>>

अगं स्वप्ना मला ते माहीत आहे. मी लिहिलंय ना माझ्या पोस्टीत!!

अजीब दास्ता है ये या गाण्यात एक कडवे आहे,
ये रोशनी के साथ क्यु
धुआ उठा चिराग पे
ये खाब देखती हु मै
के जब पडी हु खाब से
ही शेवटची ओळ जरा विसंगत नाही का वाटंत? म्हणजे एव्हढं अर्थपुर्ण कडवं नि शेवटी "मी स्वप्नातुन पडले" असे?

अजीब दास्ता है
>>>लहानपणी हे गाणं मला 'अजीब रास्ता है ये' असे ऐकू यायचे. आणि त्याच्या पुढची ओळ 'ये मंजिले है कौनसी' असल्या मुळे मला खात्रीच होती की ती रस्त्या बद्द्लंच गातीये.:)

आणि ते "धुआ उठा चिराग पे" नाही - धुआ उठा चिराग से असं आहे.

आनेवाला पल जानेवाला है ह्या गाण्यात "एक बार यू मिली मासूमसी कली" ने सुरु होणार्‍या कडव्यात पुढे "खुषबाश मै चली" असे शब्द आहेत. त्याचा काय अर्थ?

ते बहुतेक- 'के जब परे हूं ख्वाब के' असं आहे. परे= संबंध न राहिलेले, पलिकडे

ओह्ह.. मी ते जग पडी असेच ऐकत होते आजपर्यंत...

बाकी तसेही बिचारी स्वप्नातुनच जागी झालेली. त्यामुळे मला तसेच ऐकु आले असावे.... Sad

गुलझार यांची काही जणांनी चुकीची ऐकलेली गाणी (मी अन्यत्र वाचलेली)
१ एक सौ सोला चांद की रातें एक तुम्हार कांधे कातिल (मेरा कुछ सामान)
२) बिन दिवाली रतिया (बीती ना बितायी रैना)
३) चांद का डोला लिए भिखारन रात
४) जुठे नैना बोले साची बतिया
५) झूठे तेरे नैन सौतन की छब छूके आए

तेरी दिवानी हे गाणं कैलाश खेर ह्या पुरूष गायाकानी का म्हटलय्..कोडच आहे...१ पुरुष म्हणतोय्..तेरी दिवानी...मर गयि मै, मिट गयि मै वगैरे....??????????????

माझी अडीच वर्षाची मुलगी "आभास हा" हे गाणे आधी "आबा सला आबा सला" असे म्हणायची......... आता ती हे गाणे "आबा चला आबा चला, छळतो तुला छळतो मला" असे म्हणते........ Lol

वडिलान्ची पुण्याई थोर म्हणुन तिने कधी "आबा साला, आबा साला, छळतो तुला, छळतो मला" असे कधी म्हटले नाही...... Rofl ...... पण अगदी सुरवातिला अम्हाला असेच ऐकु यायचे कि ती म्हणतेय "आबा साला"........ Biggrin

आबा साला.......:हहगलो:

चाची ४२० मध्ये बॅक्ग्राऊंड ला सतत एक गाणे अहे, त्याचे बोल काही कळत नहीत, आम्ही आपले काय वाट्टेल ते शब्द जुळवुन गाणे म्हणतो,

"चुपडे चुपडी चाची चुपडे चुपडी चाची,
चाची के पास मुश्किलो की सब चाविया है
सब जानती है औरतोमे क्या खराबिया है
चाची के पास सब है चाची बडी चुभन है"

मला महितेय या ओळीत कही अर्थ नही पण नुसते ललललल म्हणण्यापेक्षा काहीतरी शब्द घालायचे म्हणुन!
चाचीला या घोर अन्यायतुन वाचविण्यासाठी मला मदत करा!!!!!!! भरतजी धावा!!

चाची के पास मुश्किलोन की सारी चाबिया है
सोसायटी मे जानती है, क्या खराबिया है.....

हे आपले माझे नॉलेज पाजळतोय........... (आणि वाट बघतोय कोणितरी नक्कि येऊन याचे वस्त्रहरण करेल :खोखो:)

भ्रमर तुमचे बरोबर आहे......
चुपडी चुपडी चाची चुपडी चुपडी चाच्ची
चाची तमाम चाबियोंकी आखरी कडी है
चाची ने पहले बनने से ये जिंदगी पढी है
चाची का डौल देखो चाची बहुत बडी है
चाची ने चाचा को चांदनी चौक मे
चांदी के चम्मच से चाट चटाई
चाची के पास मुश्किलों की सारी चाबियां हैं
सोसायटी में जानती है क्या खराबियां हैं
चाची के पास हल है चाची तो बीरबल है
चाची की च्यूंटी ने चंडाल हाथी से जीती रे जीती लडाई
चुपडी चुपडी चाची चुपडी चुपडी चाच्ची

हे मी ऐकून नाही तर गुलझार यांच्या पुस्तकात पाहून लिहिले आहे.

Pages