मला चुकीची ऐकू आलेली गाणी

Submitted by परदेसाई on 15 July, 2008 - 02:53

काही वेळा असं होतं की एकादं गाणं डोक्यात बसतं पण त्याचे काही शब्द कळतच नाहीत. किंवा ऐकू येतात पण वेगळेच येतात आणि ते तसेच आहेत असा आपला समज होतो. इथे आपले गैरसमज लिहावेत.

या आधीची गाणी ईथे पहा.

जिहाले-मस्तीची माहीती...
नवीन चर्चा
जूनी मायबोली

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वप्ना...अगदी बरोबर्...........मी फक्त ते जरा मिश्कील्पणे मान्डले ... (म्हणजे खुळा प्रयत्न केला)

स्वप्ना_राज, बरोबर अर्थ लावलाय तुम्ही. मालतीची फुले कुरळ्या केसात अडकवली आहेत - हाच अर्थ आहे. मी भ्रमर - Lol
अमी

रुनानुबन्धाच्या अवचित पडल्या गाठी, भेटीत दुष्टता मोटी...
काल पर्यन्त मि हे असच ऐकत होतो.. काल सारेगमप मधे ऐकलं तेव्हा समजलं..

काही नग असे भेटतात की "रुणानुबन्धान्च्या कुठून पडल्या गाठी" असं वाटतं Happy

स्वप्ना, मग गाणे असे होईल....

रुणानुबन्धान्च्या कुठुन पडल्या गाठी
भेटीत दुष्टता मोठी.......

मला हे असे ऐकु यायचे लहानपणी:
१. रुणानुबन्धान्च्या कुठुन पडल्या गाठी
भेटीत दुष्टता मोठी.......

२. रुणानुबन्धान्च्या तुटून पडल्या गाठी
भेटीत दुष्टता मोठी.......

अरे णानुबंधाच्या
रु नाही
कृष्ण आणि रुक्मिणी हे गाणे म्हणताहेत.

--

कधी जवळ सुखाने बसलो, दू:खात सुखाला हसलो
--

हसणे, रुसणे, रुसणे, हसणे
हसण्यावरती रुसण्यासाठी
जन्मोजन्मीच्या गाठी

असा सुंदर कल्पना आहेत या गाण्यात. इथे आहे ते पूर्ण गाणे.

आणि मी ते भ्रमराचे कॉपी-पेस्ट केलेले Happy

आणि ह्या गाण्यात असेही काहीतरी आहे ना?
"कधी दिने मनोरम रुसले
रुसण्यात उगीच ते हसले..
हसले, रुसले, रुसले, हसले"...
ते काय आहेत?
मला ह्या गाण्याचा फार राग यायचा लहानपणी कारण काय शब्द आहेत ते कळत नसे, अर्थ तर दूरच Sad

कधी तिने मनोरम रुसणे....

त वरून ताक भात ओळखणे....असे काही असते का नाही? की हा इंग्रजी माध्यमातून शिक्षणाचा परिणाम. मी कुणाला बोल लावत नाहीये, पण मला खरेच वाईट वाटतेय. एका बाजूला आपण भैया लोकांना मराठी बोला म्हणून दम देतोय आणि आपल्याच संचितापासून दूर गेलोय. कितीतरी लोकांनी ही सुंदर गाणी झीच्या सारेगम मधे पहिल्यांदा ऐकली असे दिसते...
मी शाळा-कॉलेजचा सगळा अभ्यास रेडिओच्या तालावर केला..त्यामुळे ही गाणी अगदी आत जाऊन पोचलेली आहेत.

भरत,
मी लहान (६-७ वर्षाची) असताना ऐकलेले गाणे आहे ते..मला आवडत नसल्याने त्यानंतर मुद्दाम ऐकून शब्द समजून घेण्याची गरज वाटली नाही. आता इथे चर्चा चाल्लेली दिसली, म्हणून विचारले. मुद्दामहून माहिती काढली नसती. असो.
माझा जन्म झाला तेव्हापासून घरात टीव्ही होता. त्यामुळे रेडिओ कधीच ऐकला नाही, रेडिओ मिर्ची येईपर्यंत. शिक्षण तर अनेक गावांतून अन पर्यायाने वेगवेगळ्या माध्यमातून झालेले. त्यात बाबांच्या नोकरीनिमेत्ताने अनेक ठिकाणी रहाणे, अमराठी नवरा/बायको..
माझ्यासारखे असंख्य लोक माझ्या पिढीत असणार..त्यात नवीन ते काय? अशा cultural mix मध्ये राहूनही माझ्यासारखे लोक मराठीशी नाते घट्ट जोडून आहेत. उगाच काय कॉन्वेंट वर खडे फोडायचे कशाहीसाठी?

कधी तिने मनोरम रुसणे, रुसण्यात उगीच ते हसणे
हसणे रुसणे, रुसणे हसणे
हसण्यावरती रुसण्यासाठी, रुसण्यावरती हसण्यासाठी

कृष्ण आणि रुक्मीणी मानवी जन्मातले, नवरा बायकोचे नाते निभावताना, त्या सगळ्याचा आनंद घेताहेत
असा प्रसंग आहे तो.
कुमार गंधर्व आणि वाणी जयराम ने गायलेय ते. वसंत देसाईंचे संगीत आहे. देव दिनाघरी धावला या नाटकातले, बाळ कोल्ह्टकरांचे पद आहे. नाटकात उदयराज गोडबोले आणि आशा काळे या भुमिकांत असत.

भरत अगदी सेम. सी ए चा सगळा अभ्यास मी रेडीओच्या सोबतीने केलाय.

एक फूल, मला पूर्ण कल्पना आहे.
मातृभाषेपासून तुटल्यावर काय होते त्याची. पण मायबोली आहे कि त्यासाठी. आमच्यासारखे लोक, अशा गाण्यांची नक्कीच ओळख करुन देतील. आता तरी ऐकणार ना हे गाणे ?

महाराष्ट्रातल्या मंडळींसाठी : आकाशवाणीची २ एफेम चॅनेल्स गोल्ड १००.७ (सकाळी १० ते दुपारी ३) आणि एफेम रेन्बो १०७.१ सकाळी ६ (किंवा कदाचित त्याआधीपासून) ते सकाळी ८ मराठी गाणी ऐकवतात. आकाशवाणी अस्मिता वाहिनी रात्री १०:३० ला आठवणितील गाणी ऐकवतात.

आणि जे भारतात नाहीत त्यांनी इप्रसारण जरुर ऐकावे. हिंदी आणि मराठी असे दोन्ही भाषेत दर्जेदार कार्यक्रम सादर केले जातात. कधीही आपल्या सोयीप्रमाणे ऐकता येतात. सध्या धिंगाणा सकट, अनेक साईट्स वर मराठी गाणी उअपल्ब्ध आहेत.

भरत...
माहिती बद्दल धन्यवाद!...

माझ्या माहितीप्रमाणे ही दोन्ही एफ्.एम्. चॅनेल्स 'मुंबई' पूरती मर्यादीत आहेत... कारण ईथे पूण्यात ही दोन्ही चॅनेल्स रेडिओवर ट्युन होत नाहीत... आकाशवाणि व्यतिरिक्त जी उपलब्ध एफ्.एम्. चॅनेल्स आहेत त्यांना अक्षरशः 'मराठी गाण्यां'चं वावडं आहे (कधी चुकून-माकून एकादं मराठी गाणं वाजवलंच तर निवेदक/ निवेदिकेला आंघोळ करावी लागते - अनधीकृत बातमी)... एफ्.एम्. आकाशवाणी वर संध्याकाळी साडे-पाच ते सव्वा-सहा या वेळेत 'सांजधारा' या कार्यक्रमात मराठी गाणि न चुकता वाजवली जातात - कारण सरकारी चॅनेल...

>>एफ्.एम्. आकाशवाणी वर संध्याकाळी साडे-पाच ते सव्वा-सहा या वेळेत 'सांजधारा' या कार्यक्रमात मराठी गाणि न चुकता वाजवली जातात

एफ्.एम्. आकाशवाणी?? ह्याची फ्रिक्केन्सी काय आहे ते सांगाल का प्लीज? मी फोनवर एफएम गोल्ड आणि रेनबो सेट केलेलं आहे कारण त्यावर संध्याकाळी जुनी हिंदी गाणी पण छान लागतात. पण एफ्.एम्. आकाशवाणी माहित नाही. विविधभारती एएम असल्याने फोनवर ऐकता येत नाही Sad आणि सांजधारा विकेन्डला पण असतो का?

"ऋणानुबंधाच्या" मधलं "कधी गहिवरलो, कधी धुसफुसलो" ही ओळ मला फार आवडायची. मस्त म्हणायचे ते. दिनेशदा, तुम्ही देत असलेल्या माहितीबद्दल खूप धन्यवाद! Happy

स्पेशली "धुसफुसलो"..... मी हे आधी लिहिले नाही कारण म्हटले, नन्तर कळेल की "धुसफुसलो" हा शब्दच नाहिये.....पुन्हा चुकिचे ऐकलेय्.....धन्स स्वप्ने....!

स्वप्ना-राज...
मी चुकून एफ्.एम्. आकाशवाणी लिहिलंय, त्या बद्दल क्षमस्व... ईथे पूण्यात 'आकाशवाणी'ची 'विविध-भारती' सेवा एफ्.एम्. वर उपलब्ध आहे... त्याची ईथली फ्रिक्वेन्सी आहे 101.0 MHz... सांजधारा विकेन्डला पण असतो... अगदी हल्ली पर्यंत 'विशेष जयमाला'च्या धर्तीवर आठवड्यातून एकदा 'विशेष सांजधारा' हा कार्यक्रम मराठी मधला एकादा सेलिब्रिटी सादर करायचा...

आकाशवाणि व्यतिरिक्त जी उपलब्ध एफ्.एम्. चॅनेल्स आहेत त्यांना अक्षरशः 'मराठी गाण्यां'चं वावडं आहे
खाजगी एफेम चॅनेल्स ना मराठी downmarket वाटतं.म्हणुन तर कौशल इनामदारना मराथी अभिमान गीत करावेसे वाटले.
एफेम गोल्ड बहुधा dth वर पण आहे, त्याला महाराष्त्रातून प्रतिसाद येतात.
विविधभारतीवर ११८८ mhz मध्यम लहरीवर सकाळी ११:३० ला गीतगंगा, संध्याकाळी ६:१५ ला सांजधारा, ६:४५ ला नाट्यतरंग सकाळी ८:०० भक्तिगीत वाजतात.

कथा कादंबर्‍या वाचून संपवल्यामुळे टाईमपास साठी इथे डोकावले.... तर काय ह. ह. ग. लो..
माझ्या पेक्षाही जास्त (बधीर) कानसेन आहेत इथे...

लडकेउपर लडकी नाचे.., कुडी गुमान (हे तर प्रयत्न करूनही मला हेच ऐकू येतं Sad ) दिल बरका(मधील बरका गरा), सुरमयी अखियोंमे... मधील सुरमयी मासा... लक्ष लक्ष मोदक....

मी तर आणखी हाईट केलेली....

रंग दे.... मधील 'लुज कंट्रोल' हे कित्त्येक महिने कळले नाही. नेहमी मला ते 'यु स्कोउंड्रल' वाटायचे.... >> मला तेर ते यूज अ‍ॅण्ड थ्रो वाटायचं... मनात म्ह्टलं काय माहीत काय यूज अ‍ॅण्ड थ्रो म्हणताहेत... डबल मिनिंग वाटल्यामुळे आईबाबांसमोर हे गाणं लागलं तर मी पटकन बदलून टाकायचे...

धुंद मधुमती रात रे, नाथ रे
तनमन नाचे यौवन नाचे, >> ला दुम दुम दुमती रात रे नाच रे म्हणायचे... आता हिचं तनमन आणि यौवन नाचायला लागल्यावर रात दुमदुमणारच ना... Wink

पंजाबी आणि माझं वाकडंच आहे... गोरी नालविच को मिटा असलं काहीतरी अर्थहीन बोलायचे...
अशी बरीच गाणी आहेत आता आठवत नाहीयेत... आठवल्यावर पुन्हा डोकवेनच या धाग्यावर...

"कुडी गुमान" वर आमच्याकडे एक जण पैज लावून ५०रु. हरला होता. त्या महाविद्यालयीन (कोलेज लिहिता येत नाहिये Sad ) दिवसात ती फार मोठी गोष्ट होती Happy

Pages