मला चुकीची ऐकू आलेली गाणी

Submitted by परदेसाई on 15 July, 2008 - 02:53

काही वेळा असं होतं की एकादं गाणं डोक्यात बसतं पण त्याचे काही शब्द कळतच नाहीत. किंवा ऐकू येतात पण वेगळेच येतात आणि ते तसेच आहेत असा आपला समज होतो. इथे आपले गैरसमज लिहावेत.

या आधीची गाणी ईथे पहा.

जिहाले-मस्तीची माहीती...
नवीन चर्चा
जूनी मायबोली

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दलेर मेहंदीचं एक गाणं आहे कुठल्यातरी मूव्ही मधलं. कुठल्या ते आठवत नाही पण त्या गाण्यात जुही चावला पण आहे. काही तरी " ओये होये ये कुडीयां....." असं काही तरी आहे. ते मी " ओये होये ये पुडीयां शेंगदाणीयां " असं ऐकलं होतं.

श्रावणबाळ जातोका शीला जातोका शीला
माझा नवरा नेहमी असे गाणे म्हणतो खरे गाण "श्रावणबाळ जातो काशीला" असे असणार. Happy

रुनी,
आपण लिहिल्या प्रमाणेच त्या गाण्याचे शब्द आहेत...

या गाण्यातल्या काहि ठराविक श्ब्दांचि जस-जशी फोड करत जाल, त्या प्रमाणे त्याचा अर्थ बदलत जाणार... आपल्या 'यजमानांना' प्रयोग करुन बघायला सांगा...

जगजीतसिंग्-चित्रासिंग ची एक गझल.
मिलकर जुदा हूए तो ना रोयाकरेंगे हम
एक दूसरेके याद मे सोया करेंगे हम.
मी नेहमी असच म्हणायचो.
रोया सोया ची अदलाबदल होतेय अस खूप वर्षांनी समजल. Happy

आज इ-प्रसारणवर जितेंद्र अभिषेकींनी गायलेले माझे जीवन गाणे, माझे जीवन गाणे हे गाणे ऐकत होते. त्यात अभिषेकी ज्या पद्धतीने ताना घेतात त्यात एक ओळ ऐकायला आली "गावी हागा नो माझ्यासंगे, सुरावरी हा जीवच रंगे" Uhoh
मग नंतर मायबोलीवर बघीतल्यावर कळले ते "गा विहगांनो माझ्यासंगे, सुरांवरी हा जीव तरंगे" असे आहे.

खरच काही गाणी कळायला खूप अवघड असतात. ते ओम शांती ओमचं टायटल साँग "अब तो होश नमी दानम" मला पण नाही समजल. Sad कोणाला कळल असेल तर सांगा.

चिन्मय, ते गाण 'विकल मन' नाहिये. 'उगवला चंद्र पुनवेचा' या गाण्यातली ओळ आहे. हे गाण बकुळ पंडित या गायिकेने गायलेल आहे.
हे बघ गाणः

उगवला चंद्र पुनवेचा
मम ह्रदयी दरीया उसळला स्वर्गीचा||ध्रु||

दाही दिशा कशा फुलल्या,
वनी वनी कुमुदिनी फुलल्या,
नववधू अधिर मन जाहल्या,
प्रणयरस हा चहुकडे उसळला प्रितीचा||१||

Happy

ami,
ते गाण आहे.
दिस चार झाले, मन पाखरु होउन,
पान पान आर्त आणि सुर ये भरुन.
शेवटच्या "सुर ये भरुन" बद्दल मी पण जरा कनफ्युज आहे.

वसंतराव देशपांडेंच एक गाण आहे पूर्वी ,ते मी बरेच दिवस "मालिनी कळ वाही फवारा" अस ऐकत होते पण कळ आणि फवाराचा गाण्यात काही संबंध लागत नव्हता, बरेच दिवसां नंतर कळल ते "मालिनी कण वाही हा वारा " अस गाण आहे ते. Happy

लहानपणी कटी पतन्ग मधल्या 'प्यार दीवाना होता है' या गाण्यामधे 'शमा कहे परवाने से अरे चला जा' च्या ऐवजी मला आणि माझ्या बहिणीला 'शमा कहे परवाने से बडे कलाकार' अस ऐकू यायच. गाण्याचा अर्थ कळण्याच वय नसल्यामुळे फार विचारही केला नव्हता. नन्तर कधीतरी खरे शब्द कळले.

मला कितीतरी दिवस "कितना प्यारा वादा है इन मतवाली आखोका च्या ऐवजी..हिम्मतवाली आखोका असं ऐकू यायचं

बहुतेक मैं और मिसेस खन्ना मधल गाणं आहे. मी ते नेहमी "दूर से अल्विदा, दूर से अल्विदा, ना कहो अल्विदा" असं ऐकत होते. मला कळत नव्हतं की हिरो च प्रोब्लेम काय आहे.. हिरोइन 'अल्विदा' म्हण्तेय हा प्रोब्लेम आहे की 'दुरून' म्हणतेय हा प्रोब्लेम आहे.
नन्तर कुठेतरी वाचलं कि ते "डोन्ट से अल्विदा" असं आहे!

गोगो Happy त्यातलेच Happening गाणे मी हाफिझ असे ऐकायचो म्हटलि झिंटबाई पाकीस्तानी दाखवल्या आहेत तर असेलही ... Happy

Pages