मला चुकीची ऐकू आलेली गाणी

Submitted by परदेसाई on 15 July, 2008 - 02:53

काही वेळा असं होतं की एकादं गाणं डोक्यात बसतं पण त्याचे काही शब्द कळतच नाहीत. किंवा ऐकू येतात पण वेगळेच येतात आणि ते तसेच आहेत असा आपला समज होतो. इथे आपले गैरसमज लिहावेत.

या आधीची गाणी ईथे पहा.

जिहाले-मस्तीची माहीती...
नवीन चर्चा
जूनी मायबोली

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मल्ल्या तु कानडी मास्टर आहेस तेव्हा तू गप पड Proud
कांती = त्वचेचा पोत = गव्हाळ, गोरा, निमगोरा इ. आता तुम्ही ठरवा...

स्वप्ना - खरंच हे सर सर चं गाणं जाम डोक्यात जायचं माझ्याशी.
सरांना उद्देशुन गाणं म्हणताना किस्सा तमाम, पागल, तीर असे शब्द येतातंच कसे? Uhoh

मल्ल्या तु कानडी मास्टर आहेस तेव्हा तू गप पड
कांती = त्वचेचा पोत = गव्हाळ, गोरा, निमगोरा इ. आता तुम्ही ठरवा...

======================================

कांती म्हणजे त्वचा. त्वचेचा पोत नव्हे.

निमगोरी, गवहाळ, इत्यादी त्वचा असते ना?

आणि गाण्यातच पहा जर लिंबावानी कांती = लिंबाच्या रंगाची त्वचा, तर एकतर काविळ झालेली नायिका नाहीतर अक्षरशः "हिरवीण".

इथे मला वाटतं लिंबावानी कांती चा अर्थ लिंबा सारखी तुकतुकीत, चमकदार आणि टाईट त्वचा असा आहे. लिंबाच्या रंगाची त्वचा असणारी पिवळी अथवा हिरवी मुलगी नाही..

अर्थ बर्‍याचदा संदर्भानुसार बदलतो देखील हो. उदा. आकार. आकार कसा आहे ? उ. गोल, चौकोनी. आणि आकार केव्हढा आहे ? उ. छोटा, मोठा. यात आकार हा शब्द Size आणि Shape या दोन्ही अर्थांनी आला की. स्वारी, उदाहरण अस्थानी तर नाही ना ?

खरंय..
कांति हा शब्द प्रेमाभिषीक्त विशेषणासह येतो त्यामुळेच तो शोभा, दिप्ती अशा लकाकी, तेज अर्थी असलेल्या शब्दांपेक्षा वेगळा आहे.

ह्याच गाण्यात लिंबावानी कांती तुझी च्या पूढे "रंग गोरा गोरा" असं पण आहे ना?

कांती चा अर्थ संदर्भावरून जरी त्वचेचा पोत असा लावला तर "गोरा लिंबू "हे कुठल्या अर्थ, संदर्भ, सिमिली, मेटाफर इतादी मधे जस्टीफाय करणार?

तुकतुकीत कांती म्हणजेच चमकणारी त्वचा असा होतो. ह्यात "तुकतुकीत" चा अर्थ चमकदार असा आहे कांती चा नाही. ह्याचाच विरुद्धार्थी "मलूल" कांती असा आहे.

कांती = त्वचा =नाऊन.
मलूल/तुकतुकीत = त्याची विशेषता = एडजेक्टीव.

अक्श्री,
मी वर दिलेला अर्थ आपटे शब्दकोषातून दिलेला आहे. कांती म्हणजे त्वचा असा संदर्भ कुठे असेल तर कृपया द्या.

माझ्या कडे सद्या तरी कुठलंच मराठी शब्द्कोश नाही. पण मी माझ्या गुरुजींना विचारून माझं म्हणन कितपत बरोबर आहे नक्किच लिहिन.

कांतीला विविध उपमा देतात त्यामुळे लकाकी चकाकी हे शब्द समानार्थी असू शकतात पण चपखल नाही. केतकी सारखी कांती पण म्हणतात केतकी कुठे चकचकित असते? Uhoh

चकचकीत नाही गं!
सौंदर्य, तेज हे ही अर्थ आहेत ना. केतकीसारखं सौंदर्य यांत चूक काय? संदर्भानुसार अर्थ घ्यावे लागतात नेहमी. आता सैंधवचा अर्थ मीठही होतो आणि घोडा असाही होतो. मग युद्धात सैंधव पाहिजे असं म्हंटलं तर काय मीठ आणून देणार का? Happy

दक्षिणा, दाद यान्चे मन्गल ( ललित ) मध्ये वाचा. लिम्बासार्खी आजीची कान्ती असे लिहिले आहे.

अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र पेपर फुट्ला.

अरेच्च्या ! अ‍ॅडमिनना सांगितले पाहीजे की मला चुकीची ऐकु आलेली गाणी हा बी.बी. redirect होउन शब्दोत्पत्ती (etymology) च्या बी.बी.वर जातो. Happy

लिंब्याचा रंग गोरा? आँ,त्याचा फोटो बघून तर असं वाटत नाय Proud
ते जावद्या ह्या बीबीला परत वाटेवर घेउन येत आहे
'हेची दान देगा देवा' मधले 'न लगे मुक्ती आणि संपदा' आहे ना ते मला 'व्यसनमुक्ती आणि संपदा' असे ऐकू येई. Proud

लडाई चित्रपटातील एक गाजलेले गाणे आहे लताच्या आवाजातले..
"निहाले मस्ती...." असे काहीतरी त्याचे शब्द आणि त्याचा अर्थ कोणाला माहित असेल तर कृपया
लिहाल का?

या गाण्याकरता एक स्वतन्त्र बीबी काढा रे मायबोलीच्या जन्मापासून या गाण्यावर एवढी चर्चा झाली आहे की बस...

हूडा!!!! तरीपण इथली चर्चा थांबणार नाही. संदर्भः जवस उर्फ फ्लॅक्स सीड्स उर्फ अजून काय असेल ते Happy

साजन या सिनेमातल्या ' देखा है पहली बार साजन की आंखोमे प्यार ' या गाण्यानंतर चा इंटर्ल्यूड आम्ही <<<दत्ता पाटील दत्ता पाटील>>>> असा करायचो.

कस्मे वादे निभायेंगे हम या गाण्यामधली ओळ
"तू है दिया मै हू बाती" माझा नवरा
"तू है हिरा मै हू मोती" अशीच म्हणतो!!!!

मल पण एक जुन नाट्य गीत कधी कळतच नव्हतं "लऊनी कंड ऊटी वार्याची" म्हणायची मी...गाण तर फार आवडायच ..पण असं म्हटल्याने कधी अर्थच लगत नव्हता....पुन्हा मीच शोधलं.. खूपवेळा ऐकलं...कि ते "लऊनी थंठ उटी वाळ्याची " मला वाटत वसंतराव देशपंडे साहेबांच गाण अहे न ते?अस होतं कधी कधी...

हा सगळा काय खेळ चालला आहे. तुम्हला गाण्याबद्दल चर्चाच करयची आसेल तर नवीन बाफ काढा रे.
उगाच शब्दपांडित्य दाखवु नका

हा सगळा काय खेळ चालला आहे. तुम्हला गाण्याबद्दल चर्चाच करयची आसेल तर नवीन बाफ काढा रे.
उगाच शब्दपांडित्य दाखवु नका

हा सगळा काय खेळ चालला आहे. तुम्हला गाण्याबद्दल चर्चाच करयची आसेल तर नवीन बाफ काढा रे.
उगाच शब्दपांडित्य दाखवु नका

देवानंदचं एक गाणं आहे, ते मला असं ऐकू यायचं "माला जनाबने पुकारा नही". आता लहान मुलं "मला' ला खेचून कधीकधी "माला" म्हणतात. पण मला कळायचं नाही हा एकच शब्द मराठी का? मग कळलं की ते "माना जनाबने पुकारा नही" असं आहे. तरी त्यातल्या "मुफ्तमे बनके चल दिये तनके" मधल्या "मुफ्तमे बनके" चा अर्थ अजून लागायचा आहे.

Pages