Submitted by कटप्पा on 14 May, 2020 - 12:27
आधीच्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर
पूर्वीचा धागा - https://www.maayboli.com/node/62306
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
विद्या बालनचा "बॉबी जासूस"
विद्या बालनचा "बॉबी जासूस" पाहिला (नेफि). घरी बघायला टाइमपास आहे. विद्या बालनचे काम चांगले आहे. हैदराबादी वातावरण व लोकांचा खटपणा दाखवतात तो ही आवडला. मिर्झापूर मधे पैलवान होण्याआधीचा अली फझल यात दिसतो
आदित्य रॉय कपूर चान्गला अभिनय
आदित्य रॉय कपूर चान्गला अभिनय करतो की. आशिकी २, यह जवानी है दिवानी, कलन्क मध्ये चान्गला वाटला. मुख्य म्हणजे त्याची सुरुवात इतर स्टारकिडस सारखी हिरो म्हणून झाली नव्हती. एक्शन रिप्ले, लन्डन ड्रिम्स ह्या सुरुवातीच्या दोन्ही चित्रपटात साईड रोल्स होते.
उदय चोप्राही बरा होता मेरे यार की शादी है, मुझसे दोस्ती करोगे, धूम सिरिज मध्ये. निल एन्ड निक्की, प्यार इम्पॉसिबल मध्ये भयाण होता. बर झाल, त्याने फिल्म इण्डस्ट्रीमधून लवकर एक्झिट घेतली ते.
. उदय चोप्रा मसल वाढलेल्या
. उदय चोप्रा मसल वाढलेल्या ओरांगउटाण सारखा दिसतो व वागतो......
khup hasle
https://www.kiranhegdelive
https://www.kiranhegdelive.com/Encyc/2019/11/7/Article-on-Suicide-and-Me...
कृपया कोणाच्या शारिरीक व्यंगावर शेरेबाजी करणे टाळावे.
https://www.saamana.com/uday-chopra-twit-suicide-note/
कृपया कोणाच्या शारिरीक
कृपया कोणाच्या शारिरीक व्यंगावर शेरेबाजी करणे टाळावे. +१
उदय चोप्रा आणि त्याची
उदय चोप्रा आणि त्याची स्वप्नातली मुलंबाळं, आणि ह्रितिक हा धूम 2 च्या अचाट कथेला सुसह्य बनवणारा फॉर्म्युला होता.
बाकी वजनावरून, वयावरून नायिकांचं ट्विटर इंस्टा वर ज्या नीच प्रकारे शेमिंग होतं ते पाहता उदय चोप्रा किंवा फरदिन ला त्यातल्या त्यात 'आपलं बरं' असं वाटायला हवं.
अहो, काटेकोर व्यायाम आणि जेवण
अहो, काटेकोर व्यायाम आणि जेवण जेऊन त्याने मसल बनवलेत आणि तुम्ही त्याला व्यंग म्हणून उपमर्द करताय. मसल बनवायला किती कष्ट घेतले असणार त्याने बिचाऱ्याने.
मसल व्यंग नाही,
मसल व्यंग नाही, ओरांगऊटानसारखा दिसतो या विधानावर त्यांना आक्षेप असावा. सई आणि स्वप्निल यांच्याबद्दलही मी अश्या कॉमेंट याच मायबोलीवर बरेच पाहिल्या आहेत. मायबोलीच नाही तर एकूणच सोशल मिडीयात सेलिब्रेटी स्पेशली फिल्मस्टारच्या दिसण्यावरून अश्या कॉमेंट टाकणे हे खूप कॉमन आहे. अर्थात चूकच आहे. पण हे एक हुमायून नेचर आहे. अशी टिका करताना कदाचित आतमध्ये काहीतरी सुखावत असेल. काहीतरी फ्रस्ट्रेशन असेल ज्याचा निचरा होत असेल. खरे तर हा स्वतंत्र धाग्याचा विषय आहे. ईथे फारच अवांतर होईल. वाद टाळा आणि पुढे चला
हुमायून नेचर लिहिल्याने
हुमायून नेचर लिहिल्याने कुठल्या फ्रस्ट्रेशनचा निचरा होतो?
मलाही नाही समजलं ते.
मलाही नाही समजलं ते.
बिपीन, वेगळा धागा काढतो नंतर
बिपीन, वेगळा धागा काढतो नंतर
चला सोय झाली नव्या जिलब्या
चला सोय झाली नव्या जिलब्या पाडायची
मला हुमायुन नेचर हा शब्द
मला हुमायुन नेचर हा शब्द समजला नाही. ह्युमन नेचर असावा असं वाटलं. पण त्याचा अपभ्रंश असा चुकून होणार नाही. म्हणून कन्फ्युजन. इथेच क्लिअर केलं.
तुम्हाला मग बाई द वे पण कळणार
तुम्हाला मग बाई द वे पण कळणार नाही
समजलं.
समजलं.
तुम्हाला मग बाई द वे पण कळणार
तुम्हाला मग बाई द वे पण कळणार नाही Happy >> रच्याकने पेक्षा सोपे आहे
येनी वेज, अवांतर टाळा पुढे चला. सध्या आम्ही रोज एक चित्रपट बघतो. त्यामुळे हा धागा जिव्हाळ्याचा वाटतो. भरकटवू नका.
कुणी बंगाली चित्रपट पाहतं का
कुणी बंगाली चित्रपट पाहतं का इथे ?
कुणी बंगाली चित्रपट पाहतं का
कुणी बंगाली चित्रपट पाहतं का इथे ? >>>> मला अतिशय आवडतात. माछेर झोल मी 2-3 वेळेस पाहिला. तनुजाचा शोनार पहार पण आवडला. जुने नवीन कोणतेही नेटफ्लिक्स/प्राईमवर दिसले की पहाते.
माछेर झोल इतका आवडला का ?
माछेर झोल इतका आवडला का ? बघू का ? एका रेसिपीचं नाव आहे ते. बहुतेक त्यावरच आहे स्टोरी.
हो मला आवडला. मला intense
हो मला आवडला. मला intense स्टोरीज आवडतात.
हो त्या रेसीपीशी निगडित कथा आहे. जगप्रसिद्ध शेफ आपल्या मृत्यूशय्येवर असलेल्या आईला भेटायला भारतात येतो तेव्हा ती त्याच्या हातचा माछेर झोल खाण्याची इच्छा व्यक्त करते. आणि मग बाकी उपकथानकं.
मासे आणि बंगाली. खूप हळवं
मासे आणि बंगाली. खूप हळवं नातं आहे.
कुठे बघता येईल माछेर झोल ?
कुठे बघता येईल माछेर झोल ?
कुठे बघता येईल माछेर झोल ?>>>
कुठे बघता येईल माछेर झोल ?>>> नेटफ्लिक्स
शोनार पहार पण तिथेच आहे.
समांतराल आणि मयूराक्षी खुप दिवसापासून विशलिस्टमध्ये आहे.
आता नेल पॉलिश पाहिला.
आता नेल पॉलिश पाहिला.
खूप गोष्टी ओपन ठेवल्या आहेत.
सर्वांचा अभिनय चांगला आहे.एकदा बघायला ओके.
कुठे बघितला मेल पॉलिश ?
कुठे बघितला नेल पॉलिश ?
Wonder woman 84 कसा आहे
Wonder woman 84 कसा आहे
लहान मुलींना नेता येईल का ?
डीसी आणि मार्व्हल च्या
डीसी आणि मार्व्हल च्या चित्रपटाला हा प्रश्न विचारू नये...
हा वोर्नर ब्रदरचा आहे ना
हा वोर्नर ब्रदरचा आहे ना
Wonder woman 84 कसा आहे >>
Wonder woman 84 कसा आहे >> मला थोडा बोअर वाटला.. सुरूवात चांगली आहे..नंतर रटाळ झाला पण एकदा बघू शकता.. Wonder woman चा पहिला पार्ट जास्त आवडलेला.
लहान मुलींना नेता येईल का ?>> थिएटर मधे बघण्या एवढा चांगला नाही वाटला.. मी HBO max वर बघितला.. मुलीं कदाचित कंटाळतील कारण ॲक्शन सीन्स जास्त नाहीत..
हा वोर्नर ब्रदरचा आहे ना>> हो.
नेलपॉलिश झी5 वर.
नेलपॉलिश झी5 वर.
मला त्यात बरेच लूज एन्ड सोडले असल्याने डोक्याला जरा भुंगा लागला.
आता स्पॉयलर देत नाही.पण यात फार जास्त ट्विस्ट नाहीयेत.कदाचित सत्य कथेवर आधारित असल्याने ड्रामा नसेल.
Pages